अशीही आणि तशीही
लेखनविषय:
जन्म देता देता जन्म घेणारी
शब्द नि अर्थ जुळवणारी
उंचच उंच गर्दीमध्ये
बोट घट्ट धरणारी
चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू
गिरगिर, भिरभिर.. खुलणारी
कधी रुजली हे न कळताही
अंगोपांग बहरणारी
कधी अंग चोरून बसणारी
नको असतानाही असणारी
काही आयुष्यभर दिसत, भासत
हुलकावणी देत राहणारी
उणे अधिक मांडता मांडता
हातचा म्हणून राहणारी
अन् ती.. आभाळागत सदैव जागी
फक्त नजरेत सामावणारी
जगणं-बिगणं सुरू असता
'का? कशासाठी?' हे सांगणारी
उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे
पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी
...नाती!
वाचने
4224
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
प्रत्येक कडव्यात वेगवेगळ्या नात्यांचा सुंदर भाव आला आहे.
सुरेख. :)
'कोण बरं ती? ' असा प्रश्न मनात येता येता उत्तर मिळाल्यासारखं वाटत होतं -
'त्या' शब्दामुळे कविता अधिक उलगडली :-)
In reply to 'कोण बरं ती? ' असा प्रश्न by आतिवास
मीही आधी चकले !
बादवे, व्याख्या चपखल आहे.
मस्त !!
जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारीअलबत!!
शब्दयोजना आणि प्रत्येक कडव्यातलं वेगळेपण छान आहे..
शेवट मस्त :)
छान कविता. घरातल्या सगळ्यांनीच लक्षात ठेवावी अशी.
उत्कृष्ट !
नात्यांचा एवढा सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल तुमचे 'आभार'.
सुरेख.
वर वर हलकीफुलकी वाटणारी पण मनाला स्पर्शून जाणारी हि रचना आवडली.
नाती!
अलगद जुळणारी
सुलगत रहाणारी
काळजात खोलवर
रुतू पहाणारी
रक्तांत खेळणारी
आसवांत नहाणारी
काटा बनुन कधी
अहोरात्र खूपणारी
मस्त हो इनिगोय! छान लिहिता तुम्ही.
In reply to नाती! by स्पंदना
अपर्णा, मस्त अॅडिशन..
'सुलगत राहणारी..' ... कधी धुमसत रहणारी.
In reply to अपर्णा, मस्त अॅडिशन.. by इनिगोय
सुरेख उतरलीत शब्दात नाती.
इन्नातै धन्यवाद.
आणि अर्थात अपर्णातैंना पण, :)
सुंदर रचना.!
कधी रुजली हे न कळताही अंगोपांग बहरणारीब्येष्ट!!
सुरेख रचना.
मनापासून आवडली ..... काहीसी नाती अणि तुमची कविता सुद्धा
आवडेश ओ इनिबाय येक लंबर बगा :)
छानच! नात्यांचा गोषवारा आवडला!
उंचच उंच गर्दी हे विशेष आवडलं, लहानपणीचा फील देणारं.
In reply to छानच! नात्यांचा गोषवारा आवडला by नगरीनिरंजन
:-)
फारच छान .:)
परफेक्ट जमलेय शब्द रचना!!
आवडली.
सुरेख
" उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे
पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी
...नाती! "
खरे आहे !
सुरेख रचना
खुपच सुंदर कविता
छानच कविता!
नात्यांचा उबदार फिल देणारी कविता.. आवडली.
मजा आली वाचून ...
सुरेख कविता. आवडली. :)
शेवटचा शब्द येईपर्यंत काही समजलं नव्हतं. शेवटचा शब्द वाचल्यावर पुन्हा एकदा वाचली, अर्थ लागला अन आवडून गेली.
सुरेख कविता.