अशीही आणि तशीही

इनिगोय जे न देखे रवी...
जन्म देता देता जन्म घेणारी शब्द नि अर्थ जुळवणारी उंचच उंच गर्दीमध्ये बोट घट्ट धरणारी चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू गिरगिर, भिरभिर.. खुलणारी कधी रुजली हे न कळताही अंगोपांग बहरणारी कधी अंग चोरून बसणारी नको असतानाही असणारी काही आयुष्यभर दिसत, भासत हुलकावणी देत राहणारी उणे अधिक मांडता मांडता हातचा म्हणून राहणारी अन् ती.. आभाळागत सदैव जागी फक्त नजरेत सामावणारी जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारी उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी ...नाती!
वर्गीकरण
लेखनविषय:

32 टिप्पण्या 4,224 दृश्ये

Comments

अक्षया नवीन

प्रत्येक कडव्यात वेगवेगळ्या नात्यांचा सुंदर भाव आला आहे. सुरेख. :)

आतिवास नवीन

'कोण बरं ती? ' असा प्रश्न मनात येता येता उत्तर मिळाल्यासारखं वाटत होतं - 'त्या' शब्दामुळे कविता अधिक उलगडली :-)

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारी
अलबत!!

मैत्र नवीन

शब्दयोजना आणि प्रत्येक कडव्यातलं वेगळेपण छान आहे.. शेवट मस्त :)

तिमा नवीन

नात्यांचा एवढा सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल तुमचे 'आभार'.

श्रीरंग_जोशी नवीन

वर वर हलकीफुलकी वाटणारी पण मनाला स्पर्शून जाणारी हि रचना आवडली.

स्पंदना नवीन

नाती! अलगद जुळणारी सुलगत रहाणारी काळजात खोलवर रुतू पहाणारी रक्तांत खेळणारी आसवांत नहाणारी काटा बनुन कधी अहोरात्र खूपणारी मस्त हो इनिगोय! छान लिहिता तुम्ही.

किसन शिंदे नवीन

सुंदर रचना.!
कधी रुजली हे न कळताही अंगोपांग बहरणारी
ब्येष्ट!!

भावना कल्लोळ नवीन

मनापासून आवडली ..... काहीसी नाती अणि तुमची कविता सुद्धा

चिगो नवीन

नात्यांचा उबदार फिल देणारी कविता.. आवडली.

सुधीर नवीन

शेवटचा शब्द येईपर्यंत काही समजलं नव्हतं. शेवटचा शब्द वाचल्यावर पुन्हा एकदा वाचली, अर्थ लागला अन आवडून गेली.