✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आठवण...

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 03/06/2013 - 00:10
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला. दूर किती दूर जाशी लागे मज हुरंहूरं शांत आहे ही तृप्तता की भावनांचे काहूरं? वेड असे भीत आहे हाक कशी देऊ मी? का तुझिया स्मरणाने फक्त तृप्त होऊ मी??? आसवांचे नजराणे का मागे प्रीत ही? सहजाच्या जगण्याची का अल्लड रीत ही? दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो. वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...

प्रतिक्रिया द्या
5563 वाचन

💬 प्रतिसाद (35)

ओय!

स्पंदना
Wed, 03/06/2013 - 06:18 नवीन
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली.
. आत्माजी? सुरेख भाऊ! फक्त पहिल्या कडव्यात "जीवा"बद्दल बोलताय ते लक्षात येत नाही. अन "माझा हि" जरा चुकलय का? ते 'ही' हवंय. अन ते माझा ला जोडुन हवंय.
दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो
हे अन शेवटच कडव काव्याची उच्च्त्तम पातळी गाठतात. मस्त रे आत्मुस! मस्त भावा! लिहित रहा.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता...

धन्या
Wed, 03/06/2013 - 07:27 नवीन
अशा कविता लिहिणारेही पुणेकरच.
  • Log in or register to post comments

मस्त कविता हो बुवा..

मोदक
Wed, 03/06/2013 - 09:48 नवीन
मस्त कविता हो बुवा.. धन्या, नक्की पुणेकर का..? त्या असिधा(व्हावामा)विजि संघाचे काय झाले? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ईकडे नर्‍हे आंबेगांवपर्यंत

धन्या
Sat, 03/09/2013 - 01:27 नवीन
ईकडे नर्‍हे आंबेगांवपर्यंत आणि तिकडे मोशीपर्यंत पुणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वा बुवा, वा. सुंदर कविता.

प्रचेतस
Wed, 03/06/2013 - 08:26 नवीन
वा बुवा, वा. सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

वा बुवा!

पैसा
Wed, 03/06/2013 - 09:00 नवीन
छान लिहिताय! हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

हल्ली तुम्हाला तुमचा सूर

धन्या
Sat, 03/09/2013 - 01:28 नवीन
हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.
असंच काही नाही. कदाचित त्यांचा सूर हरवलाही असेल म्हणून ईतक्या सुंदर कविता लिहित आहेत ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाह

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 03/06/2013 - 09:52 नवीन
वाह बुवा... भन्नाट
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
या साठी एक मस्तानी लागू तुम्हाला.
  • Log in or register to post comments

मस्त!!

फिझा
Wed, 03/06/2013 - 10:35 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

एकदम कडक!

अग्निकोल्हा
Wed, 03/06/2013 - 11:02 नवीन
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
फक्त हीच ओळ कवितेच्या गाभ्याशी विसंगत वाटली. पण एकुणच कविता अप्रतिम. बहुदा शेवटचा पॅरॉ समजुन घेण्यात माझिच चुक होत असेल.
  • Log in or register to post comments

सर्वांचे धन्यवाद...!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/08/2013 - 22:26 नवीन
सर्वांचे धन्यवाद...!
  • Log in or register to post comments

थांबा हो ! इतक्यात नका

सस्नेह
Fri, 03/08/2013 - 22:51 नवीन
थांबा हो ! इतक्यात नका निर्माल्य होऊ. देवाला जरा सुवास तर घेऊ द्या...!
  • Log in or register to post comments

वाह! क्या बात है!

अधिराज
Fri, 03/08/2013 - 23:42 नवीन
वाह! क्या बात है!
  • Log in or register to post comments

बुवा थक्क झालो....

चौकटराजा
Sat, 03/09/2013 - 06:14 नवीन
विडंबनाचा आला कंटाळा वाल्याचा वाल्मिकी झाला एक सूर प्रितीचा हरवला परि कवनास सूर गवसला बुवा आमची कविता कशी वाटते. पण सांप्रत आपण कहर चालविला आहे. राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ? ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली ! ) .
  • Log in or register to post comments

झक्कास हो काका.

धन्या
Sat, 03/09/2013 - 08:43 नवीन
एक सूर प्रितीचा हरवला
हे कधी झालं. बुवा बोलले नाहीत काही.
राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ?
कदाचित पुर्ण शब्दच चुकीचा असेल. राधा हे कवी जयदेव याने गीतगोविंद या काव्यात उभं केलेलं काल्पनिक पात्र आहे असं वल्ली म्हणतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

काही वेळा..

चौकटराजा
Sat, 03/09/2013 - 09:08 नवीन
काही वेळा काल्पनिक प्रियेवर ही प्रेम करण्यात मजा असते राव ! नवरंग चित्रपटात " मोहिनी" त गुंतलेला कवि बरंच काही उत्त्तम काव्य करून जातो. बुवाही आता राहकवि असले तरी राजकवि होतील एक दिवस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अप्रतिम कविता हो बुवा.

अन्या दातार
Sat, 03/09/2013 - 08:21 नवीन
अप्रतिम कविता हो बुवा. :-)
  • Log in or register to post comments

लई भारी ओ बुवा,धन्यवाद

५० फक्त
Sat, 03/09/2013 - 09:22 नवीन
लई भारी ओ बुवा,धन्यवाद अभासिंधाव्हावामा संघातर्फे
  • Log in or register to post comments

>>>> अभासिंधाव्हावामा

प्रचेतस
Sat, 03/09/2013 - 09:25 नवीन
>>>> अभासिंधाव्हावामा संघातर्फे ते मधले जिपा राहिले काय? अभासिंधाव्हावामाजिपा संघातर्फे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ओ पिमचिनवाले, एकदा तरी अशी

धन्या
Sat, 03/09/2013 - 15:57 नवीन
ओ पिमचिनवाले, एकदा तरी अशी तरल, भावस्पर्शी, हळूवार, मृदू, मयुरपंखी कविता लिहा आणि मग आमच्या संघाला जिलेबीपाडू संघ म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

स्पेलिंग चुकले काय ?

चौकटराजा
Sat, 03/09/2013 - 18:21 नवीन
हॅ हॅ हॅ , धन्या तुम्हाला सियाचिन म्हणायचे आहे का ? कारण जिलबीचे व्यापारी चांद्या पासून बांद्या पर्यंत पसरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कविता हुरहुर लावून गेली.

इन्दुसुता
Sat, 03/09/2013 - 09:53 नवीन
कविता हुरहुर लावून गेली. अवांतरः "सहजाच्या जगण्याची का अल्लड रीत ही?" हे 'सहज' कोण म्हणे? आपले मिपावरचे सहज मामा तर नव्हेत? :D
  • Log in or register to post comments

कवितेत

इरसाल
Sat, 03/09/2013 - 10:45 नवीन
एकही स्मायली नसल्याने आमचा पास.
  • Log in or register to post comments

बुवा अशीच

jaypal
Sat, 03/09/2013 - 11:00 नवीन
"आठवण" काढीत चला
  • Log in or register to post comments

गुर्जि पीरमात पडलेत राव !

जेनी...
Sun, 03/10/2013 - 00:28 नवीन
गुर्जि पीरमात पडलेत राव ! १०१टक्का ..... व्हय नावं गुर्जि ?? ;)
  • Log in or register to post comments

@गुर्जि पीरमात पडलेत राव !

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/12/2013 - 12:38 नवीन
@गुर्जि पीरमात पडलेत राव ! १०१टक्का ..... >>> =)) बालिका... महा डँबिस =)) आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... :-p अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

>>>>आंम्ही गेली १५ वर्ष

प्यारे१
Tue, 03/19/2013 - 16:12 नवीन
>>>>आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. तर बुवांचे वय किती????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तर बुवांचे वय किती????>>> ३६

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/19/2013 - 19:18 नवीन
@तर बुवांचे वय किती????>>> ३६ :-p :-p :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नेक्ष्ट यीयर

अभ्या..
Tue, 03/19/2013 - 19:35 नवीन
हे वर्ष जाउ द्या मग. आकडा जरा रिस्की आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा कविता पुन्हा एकदा वाचली,

५० फक्त
Tue, 03/12/2013 - 00:33 नवीन
बुवा कविता पुन्हा एकदा वाचली, तुम्ही ते आपलं विडंबनाचंच बघत जा, नका उगा काहीतरी हळवं लिहित जाउ, विवि फार बोअर होतं आहे, विवि म्हणजे गविंचा भाउ नव्हे, विना विडंबन.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहलंय.

किसन शिंदे
Tue, 03/12/2013 - 00:49 नवीन
ते विडंबन वैगेरे राहू द्या हो बुवा, नेहमी असंच काहितरी लिहित चला. ओरिगनल काव्य!
  • Log in or register to post comments

अगदि अगदि

प्रशांत
Tue, 03/19/2013 - 19:29 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आठवणींनी जीव माझा

धन्या
Tue, 03/12/2013 - 00:50 नवीन
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला.
या ओळी खुपच अर्थगर्भ आहेत. ;)
  • Log in or register to post comments

वाह आत्मूस वाह!!!! छान कविता.

बॅटमॅन
Tue, 03/19/2013 - 13:58 नवीन
वाह आत्मूस वाह!!!! छान कविता. साधी-सरळ-नेमकी :)
  • Log in or register to post comments

अतिसुन्दर

कान्होबा
गुरुवार, 03/21/2013 - 18:05 नवीन
खुप छान आहे आणि सत्याता आहे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा