मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवण...

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला. दूर किती दूर जाशी लागे मज हुरंहूरं शांत आहे ही तृप्तता की भावनांचे काहूरं? वेड असे भीत आहे हाक कशी देऊ मी? का तुझिया स्मरणाने फक्त तृप्त होऊ मी??? आसवांचे नजराणे का मागे प्रीत ही? सहजाच्या जगण्याची का अल्लड रीत ही? दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो. वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...

वाचने 5625 वाचनखूण प्रतिक्रिया 35

स्पंदना Wed, 03/06/2013 - 06:18
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली.
. आत्माजी? सुरेख भाऊ! फक्त पहिल्या कडव्यात "जीवा"बद्दल बोलताय ते लक्षात येत नाही. अन "माझा हि" जरा चुकलय का? ते 'ही' हवंय. अन ते माझा ला जोडुन हवंय.
दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो
हे अन शेवटच कडव काव्याची उच्च्त्तम पातळी गाठतात. मस्त रे आत्मुस! मस्त भावा! लिहित रहा.

पैसा Wed, 03/06/2013 - 09:00
छान लिहिताय! हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.

In reply to by पैसा

धन्या Sat, 03/09/2013 - 01:28
हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.
असंच काही नाही. कदाचित त्यांचा सूर हरवलाही असेल म्हणून ईतक्या सुंदर कविता लिहित आहेत ते. ;)

वाह बुवा... भन्नाट
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
या साठी एक मस्तानी लागू तुम्हाला.

अग्निकोल्हा Wed, 03/06/2013 - 11:02
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
फक्त हीच ओळ कवितेच्या गाभ्याशी विसंगत वाटली. पण एकुणच कविता अप्रतिम. बहुदा शेवटचा पॅरॉ समजुन घेण्यात माझिच चुक होत असेल.

चौकटराजा Sat, 03/09/2013 - 06:14
विडंबनाचा आला कंटाळा वाल्याचा वाल्मिकी झाला एक सूर प्रितीचा हरवला परि कवनास सूर गवसला बुवा आमची कविता कशी वाटते. पण सांप्रत आपण कहर चालविला आहे. राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ? ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली ! ) .

In reply to by चौकटराजा

धन्या Sat, 03/09/2013 - 08:43
एक सूर प्रितीचा हरवला
हे कधी झालं. बुवा बोलले नाहीत काही.
राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ?
कदाचित पुर्ण शब्दच चुकीचा असेल. राधा हे कवी जयदेव याने गीतगोविंद या काव्यात उभं केलेलं काल्पनिक पात्र आहे असं वल्ली म्हणतो. ;)

In reply to by धन्या

चौकटराजा Sat, 03/09/2013 - 09:08
काही वेळा काल्पनिक प्रियेवर ही प्रेम करण्यात मजा असते राव ! नवरंग चित्रपटात " मोहिनी" त गुंतलेला कवि बरंच काही उत्त्तम काव्य करून जातो. बुवाही आता राहकवि असले तरी राजकवि होतील एक दिवस !

In reply to by प्रचेतस

धन्या Sat, 03/09/2013 - 15:57
ओ पिमचिनवाले, एकदा तरी अशी तरल, भावस्पर्शी, हळूवार, मृदू, मयुरपंखी कविता लिहा आणि मग आमच्या संघाला जिलेबीपाडू संघ म्हणा.

In reply to by धन्या

चौकटराजा Sat, 03/09/2013 - 18:21
हॅ हॅ हॅ , धन्या तुम्हाला सियाचिन म्हणायचे आहे का ? कारण जिलबीचे व्यापारी चांद्या पासून बांद्या पर्यंत पसरले आहेत.

In reply to by जेनी...

@गुर्जि पीरमात पडलेत राव ! १०१टक्का ..... >>> =)) बालिका... महा डँबिस =)) आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... :-p अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 03/19/2013 - 16:12
>>>>आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. तर बुवांचे वय किती????

५० फक्त Tue, 03/12/2013 - 00:33
बुवा कविता पुन्हा एकदा वाचली, तुम्ही ते आपलं विडंबनाचंच बघत जा, नका उगा काहीतरी हळवं लिहित जाउ, विवि फार बोअर होतं आहे, विवि म्हणजे गविंचा भाउ नव्हे, विना विडंबन.

धन्या Tue, 03/12/2013 - 00:50
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला.
या ओळी खुपच अर्थगर्भ आहेत. ;)