आठवण...
लेखनविषय:
काव्यरस
आठवणींनी जीव माझा
बेचैन किती जाहला?
सखये तुझा कुठे तो...
माझाही न राहिला.
दूर किती दूर जाशी
लागे मज हुरंहूरं
शांत आहे ही तृप्तता
की भावनांचे काहूरं?
वेड असे भीत आहे
हाक कशी देऊ मी?
का तुझिया स्मरणाने
फक्त तृप्त होऊ मी???
आसवांचे नजराणे
का मागे प्रीत ही?
सहजाच्या जगण्याची
का अल्लड रीत ही?
दु:ख्ख असे आज नाही
जरी न तुझा राहिलो
देवालयी पुष्पांसम
निर्माल्य अता जाहलो.
वेड्या त्या उद्यानी
तार कुणी छेडिली?
कृष्ण नव्हे कृष्ण अन्
राधा हि न राधा राहिली...
वाचने
5631
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली.. आत्माजी? सुरेख भाऊ! फक्त पहिल्या कडव्यात "जीवा"बद्दल बोलताय ते लक्षात येत नाही. अन "माझा हि" जरा चुकलय का? ते 'ही' हवंय. अन ते माझा ला जोडुन हवंय.
दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलोहे अन शेवटच कडव काव्याची उच्च्त्तम पातळी गाठतात. मस्त रे आत्मुस! मस्त भावा! लिहित रहा.
अशा कविता लिहिणारेही पुणेकरच.
In reply to सुंदर कविता... by धन्या
मस्त कविता हो बुवा..
धन्या, नक्की पुणेकर का..? त्या असिधा(व्हावामा)विजि संघाचे काय झाले? ;-)
In reply to मस्त कविता हो बुवा.. by मोदक
ईकडे नर्हे आंबेगांवपर्यंत आणि तिकडे मोशीपर्यंत पुणे आहे.
वा बुवा, वा.
सुंदर कविता.
छान लिहिताय! हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.
In reply to वा बुवा! by पैसा
हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.असंच काही नाही. कदाचित त्यांचा सूर हरवलाही असेल म्हणून ईतक्या सुंदर कविता लिहित आहेत ते. ;)
वाह बुवा... भन्नाट
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...या साठी एक मस्तानी लागू तुम्हाला.
सुंदर कविता.
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...फक्त हीच ओळ कवितेच्या गाभ्याशी विसंगत वाटली. पण एकुणच कविता अप्रतिम. बहुदा शेवटचा पॅरॉ समजुन घेण्यात माझिच चुक होत असेल.
सर्वांचे धन्यवाद...!
थांबा हो ! इतक्यात नका निर्माल्य होऊ.
देवाला जरा सुवास तर घेऊ द्या...!
वाह! क्या बात है!
विडंबनाचा आला कंटाळा
वाल्याचा वाल्मिकी झाला
एक सूर प्रितीचा हरवला
परि कवनास सूर गवसला
बुवा आमची कविता कशी वाटते. पण सांप्रत आपण कहर चालविला आहे. राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ? ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली ! ) .
In reply to बुवा थक्क झालो.... by चौकटराजा
एक सूर प्रितीचा हरवलाहे कधी झालं. बुवा बोलले नाहीत काही.
राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ?कदाचित पुर्ण शब्दच चुकीचा असेल. राधा हे कवी जयदेव याने गीतगोविंद या काव्यात उभं केलेलं काल्पनिक पात्र आहे असं वल्ली म्हणतो. ;)
In reply to झक्कास हो काका. by धन्या
काही वेळा काल्पनिक प्रियेवर ही प्रेम करण्यात मजा असते राव ! नवरंग चित्रपटात " मोहिनी" त गुंतलेला कवि बरंच काही उत्त्तम काव्य करून जातो. बुवाही आता राहकवि असले तरी राजकवि होतील एक दिवस !
अप्रतिम कविता हो बुवा. :-)
लई भारी ओ बुवा,धन्यवाद
अभासिंधाव्हावामा संघातर्फे
In reply to लई भारी ओ बुवा,धन्यवाद by ५० फक्त
>>>> अभासिंधाव्हावामा संघातर्फे
ते मधले जिपा राहिले काय?
अभासिंधाव्हावामाजिपा संघातर्फे
In reply to >>>> अभासिंधाव्हावामा by प्रचेतस
ओ पिमचिनवाले, एकदा तरी अशी तरल, भावस्पर्शी, हळूवार, मृदू, मयुरपंखी कविता लिहा आणि मग आमच्या संघाला जिलेबीपाडू संघ म्हणा.
In reply to ओ पिमचिनवाले, एकदा तरी अशी by धन्या
हॅ हॅ हॅ , धन्या तुम्हाला सियाचिन म्हणायचे आहे का ? कारण जिलबीचे व्यापारी चांद्या पासून बांद्या पर्यंत पसरले आहेत.
कविता हुरहुर लावून गेली.
अवांतरः
"सहजाच्या जगण्याची
का अल्लड रीत ही?"
हे 'सहज' कोण म्हणे? आपले मिपावरचे सहज मामा तर नव्हेत? :D
एकही स्मायली नसल्याने आमचा पास.
"आठवण" काढीत चला
गुर्जि पीरमात पडलेत राव !
१०१टक्का .....
व्हय नावं गुर्जि ?? ;)
In reply to गुर्जि पीरमात पडलेत राव ! by जेनी...
@गुर्जि पीरमात पडलेत राव !
१०१टक्का ..... >>> =)) बालिका... महा डँबिस =))
आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... :-p
अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. =))
In reply to @गुर्जि पीरमात पडलेत राव ! by अत्रुप्त आत्मा
>>>>आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत...
अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया.
तर बुवांचे वय किती????
In reply to >>>>आंम्ही गेली १५ वर्ष by प्यारे१
@तर बुवांचे वय किती????>>> ३६ :-p :-p :-p
In reply to @तर बुवांचे वय किती????>>> ३६ by अत्रुप्त आत्मा
हे वर्ष जाउ द्या मग. आकडा जरा रिस्की आहे =))
बुवा कविता पुन्हा एकदा वाचली, तुम्ही ते आपलं विडंबनाचंच बघत जा, नका उगा काहीतरी हळवं लिहित जाउ, विवि फार बोअर होतं आहे,
विवि म्हणजे गविंचा भाउ नव्हे, विना विडंबन.
ते विडंबन वैगेरे राहू द्या हो बुवा, नेहमी असंच काहितरी लिहित चला.
ओरिगनल काव्य!
In reply to सुंदर लिहलंय. by किसन शिंदे
सुंदर कविता.
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला.या ओळी खुपच अर्थगर्भ आहेत. ;)
वाह आत्मूस वाह!!!! छान कविता. साधी-सरळ-नेमकी :)
खुप छान आहे आणि सत्याता आहे
ओय!