✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क क कपलचा - भाग ०४

५
५० फक्त यांनी
Wed, 07/11/2012 - 08:51  ·  लेख
लेख
क क कपलचा भाग -०१ क क कपलचा भाग -०२ क क कपलचा भाग -०३ पिसिवरच्या फाईल पाहण्यात ती गुंग होती, तेंव्हाच बाहेर बेल पण वाजत होती.पिसि बंद करुन ती बाहेर आली, निकाळजे काकु आल्या होत्या, ' झालं का सामान लावुन, की येई मदतीला ?' असं विचारत थेट आत येत हॉलमधल्या एकुलत्या एक खुर्चीवर बसत बसत बोलल्या. अनुजाला हा भोचकपणा आवडला नाही पण आपल्या अनुभवहीन नव-यानं न केलेल्या कामांची यादी संपवण्यासाठी तिला काही दिवस तरी कुणीतरी मदतीला हवंच होतं. ' अहो, सामान आवरायचं काय एका दिवसात होणार का, चांगला आठवडा लागेल सगळं, आवरायला, काकु, तुमच्याकडची धुणं भांडीवाली करेल का हो आमच्याकडं काम ?' अंगावरचा टीशर्ट नीट करत अनुजा खालीच भिंतीला खेटुन बसली. ' आमच्याकडे नाही बाई वगैरे भांड्याल, आम्हीच करतो सगळं, परवडत नाही हो हल्ली' गळ्यातल्या बत्त्तीस इंची मंगळसुत्राशी चाळा करत काकु बोलल्या, आणि एकदम काहीतरी महत्त्वाचं आठवलं असं दाखवुन निघुन गेल्या. अनुजानं उठुन दार लावलं, पुन्हा बेडरुम मध्ये येउन पिसि चालु केला, विंडोज चालु होईपर्यंत तिची मोठी बॅग उघडली, वरचे कपडे बेडवर टाकले, खाली एका जुनाट पर्समध्ये एम्पि३ प्लेअर होता, तो आणि त्याची डाटा कॉर्ड काढली. एकुण फाईल्स पाहिल्या जवळपास २२ जिबि होत्या, तिच्या २ जिबित किती म्हणुन बसणार होत्या, मग तिनं एक एक फाईल पाहुन महत्त्वाच्या तेवढ्याच घ्यायचं ठरवलं, आणि एक एक फाइल उघडुन पाहायला सुरुवात केली, दोन मिनिटातच खिडक्या बंद करुन पुन्हा पिसि समोर येउन बसली. तीन वाजल्यापासुन सात वाजेपर्यंत तिचा वेळ त्या फाईल्स बघण्यातच गेला, खोलीत फक्त बाहेरच्या लाईटचा उजेड येतो आहे हे जाणवल्यावर ती उठली, पिसि बंद केला, किचनमध्ये येउन आवराआवरी केली, करायचं काहीच नव्हतं, फोन पाहिला तो डिसचार्ज होउन पडला होता, चार्जिंगला लावला अन लगेच हर्षदचा फोन आला, मग दोन मिनिटं चार्जर सापडला नाही, लाईट नव्हती, झोप लागली होती अशी कारणं सांगुन वेळ मारुन नेली. हर्षदनं तिला आवरुन बसायला सांगितलं खरं, पण त्याला घरी यायला साडेनउ वाजले, तो पर्यंत ती तिचा आवडता लखनवी टॉप अन काळी सलवार घालुन बसली होती. हर्षद आल्यावर दार उघडुन ती फणका-यानं वळुन आत गेली, तिला तसंच पाठमोरं मिठित घेउन हर्षदनं तिच्या मानेवर ओठ टेकवायचा प्रयत्न केला, पण ती सटकली अन खिडकीत जाउन उभी राहिली ' मागुन बघणा-या प्रत्येक पुरुषाला असंच करावं वाटेल, हे असले झिरझिरीत कपडे घातल्यावर, सगळं दिसतंय आतलं ' फाडकन बोलुन हर्षद आवरायला निघुन गेला. तिला किती अभिमान होता त्या पांढ-याशुभ्र कुडत्याचा, तरी पण डोळ्यातलं पाणी आवरुन ती सुद्धा कपडे बदलायला गेली. बेडरुम मध्ये दोघांनी एकदमच कपडे बदलले, पण काहीही न बोलता, अगदी घुम्यानं. सुटलेलं पोट दिसणार हे माहित असुन देखील त्यानं एक बॉडी टाईट टिशर्ट घातला अन तिनं एक दोन साइझ मोठा ब्राउन कलरचा कुर्ता अडकवला, ' आता मागुन काय पुढुनही कुणाला काही वाटणार नाही, ठिक आहे ना ?, ' त्याच्या स्टेटमेंटला तेवढंच सडेतोड उत्तर देउन ती हॉलमध्ये येउन बसली. ' चल आता, आज चायनिज खायला जाउ, बिहाईंड द वॉल मध्ये. जाम मस्त जागा आहे' , बुट चढवत हर्षद बोलला. तिचा मुड असाही गेलेलाच होता, आता जेवण म्हणजे ' जाणिजे यज्ञकर्म' एवढंच उरलं होतं तिच्यासाठी. जाणं येणं आणि जेवणं एवढ्यात दोन तास गेले, घरी येउन दोघांनी कपडे बदलले, पुन्हा घुम्यानंच. बेडवर पडल्यावर हर्षदनं तिला जवळ ओढलं, त्यानं काही करायच्या आधीच तिनं विषय काढला ' गॅसची सोय कधी करणार आहेस, का गावातली सगळी हॉटेल फिरुन घ्यायची आहेत ? ' रिझर्वला आलेल्या गाडीचा नॉब ऑनवर असावा अन उगाच किका मारुन हैराण व्हावं तसा त्याचा चेहरा झाला, लांब होत बोलला ' एक दोन दिवसात होईल सगळं, आज गेलो होतो दुपारी तिथं ' , तिचा प्रतिप्रश्न ' शेगडी दोन बर्नरची आहे की तीन ?' छताकडं पाहात ती निर्विकारतेनं विचारत होती. पंधरा दिवसांत बरीच प्रगती झाली, तो सकाळी लवकर उठुन जॉगिंगला जायचा , घरात दोन डंबेल्स आले होते, तिनं गाउन घालुन घराबाहेर जाणं सोडलं, लखनवी पार बॅगच्या तळाशी गेला होता. पण एक महत्त्वाची गोष्ट बदलली नव्हती ती म्हणजे हर्षदच्या नोकरीची जागा, चिंबोरी स्टेशनला एकच दिवस उरलेला असतना सिपि ऑफिस मधुन एक ऑर्डर आली अन सगळ्या बदल्या अनिश्चित काळापर्यंत स्थगित केल्याचं कळवलं गेलं, जेवढं दुखः हर्षदला झालं त्यापेक्षा जास्त सोनवणे आणि भरत दाबडे, जो हर्षदच्या जागी येणार होता त्यांना झालं. स्टेशनात पुन्हा हर्षदच्या नशीबाचं कौतुक केलं सगळ्यांनी. अशातच एक दिवस अनुजानं सकाळी निघताना त्याला सांगितलं ' घरात एक पुजा करुयात, चार लोकांना बोलवु जेवायला, आधी एकटा होतास ठिक होतं, पण आता बरोबर नाही, महिना झाला कोणी फारसं आलेलं नाही घरी शरद भावोजी सोडले तर' तसा तो ही धार्मिक होता, पण त्याला फारसं कुणाला घरी बोलावण्यात स्वारस्य नव्हतं, पण आता पुजेचा विषय काढल्यावर नाही म्हणणं ही जड गेलं, दिवस वार ठरला तसं, दोघंही पुजेच्या तयारीत गुंतली, सकाळी पुजा, दुपारी १५-२० लोकांची पंगत आणि संध्याकाळी छोटीशी पार्टी, असा बेत त्याच्याकडुन मंजुर करुन घेण्यात अनुजा यशस्वी झाली होती. संसार म्हणजे काय काय याची ओळख त्याला पटायला लागली होती हळुहळु, अजुन दोन दिवसांनी पुजा होती, पहाटे जॉगिंगला जाणं चार दिवस बंदच होतं त्याचं, सातच्या सुमारास जाग आली, बेडच्या बाजुला कपाटासमोर उभं राहुन अनुजा केस पुसत होती, साबणाचा अन शांपुचा अजुन न उडालेला वास आणि केसातुन गळालेल्या पाण्यानं पाठीवर आणि कंबरेवर ओला झालेला गाउन , हर्षद्ची झोप पुरी उडवायला पुरेसा होता, तसंच पडल्या पडल्या पुढं सरकुन त्यानं अनुजाचा गाउन पकडुन ओढला अन तिला बेडवर पाडली. ' आईगं ' एकदम तोल गेल्यानं ओरडतच अनुजा बेडवर पडली, आणि त्यानं काही करावं याच्या आधीच सावरुन उठली. लंगडत लंगडत बाजुला होताना तिच्या चेह-यावर वेदना दिसत होत्या ' गुरुजीनी सांगितलंय, पुजेच्या आधी दोन दिवस पुर्ण पवित्र राहायचं, म्हणुन काही लाड नाहीत आता पुजा होईपर्यंत , आणि कपाट लागलं ना माझ्या पायाला केवढं ' ती तशीच लंगडत बेडरुमच्या बाहेर निघुन गेली, ' लाड केलेचं नाहीत तर पुजा होणारच कशी मग ?' होता त्याच मुडमध्ये राहुन हर्षंदनं विनोद करायचा प्रयत्न केला. ' आईगं, आउच, ' अशा आरड्या ओरड्यानं तो उठुन किचनमध्ये गेला, कपाट लागलेला पाय कट्ट्यावर ठेवुन अनुजा जखमेवर हळद लावत होती, तिची पैंजणं मध्ये येत होती, पुढं होउन त्यानं पैंजणं काढायचा प्रयत्न केला, पण ते काही जमेना म्हणुन मग ती पार पिंडरीच्या वर नेउन घट्ट रुतवुन ठेवली, तिनं तशाही अवस्थेत त्याच्या हातावर फटका मारला. पुजेचा दिवस उजाडला, दोघांच्याही घरी कळवलं होतं पुजेचं, पण कुणी आलं नव्हतं, कारणं वेगवेगळी होती, त्याच्या आईचं ऑपरेशन ठरलेलं असल्यानं त्यांना प्रवास करायचा नव्हता, तिच्या घरी कुणाला वेळ नव्हता' अरे वहिनिच्या डिलिव्हरीची डेट आहे ना अशात, म्हणुन नाही येणार कुणी ' तिनं स्वताच्या मनाला अन हर्षदला समजवायचा प्रयत्न् केला, दिवसाचं महत्त्व आणि तिचा मुड पाहुन हर्षद्चं ' हो नकोच उगा प्रवास अशा वेळात ' म्हणुन पुढं ढकललं. सकाळी घरातलं सगळं आवरलं, निकाळजे काकु मदतीला होत्याच, गुरुजी आले, त्यांचं पु़जा मांडुन होईपर्यंत दोघांनी पुन्हा हात पाय धुवुन घेतले, त्यानं सोवळं पुन्हा एकदा घट्ट करुन घेतलं तर तिनं मुद्दाम आणलेली निळी पैठणी पुन्हा एकदा चोपुन बसवली, ' हा नॅपकिन, यालाच हात पुसा सोवळं घाण नका करु' त्याच्या कमरेला सोवळ्यात नॅपकिन खोचता खोचता तिच्या सुचना सुरु झाल्या. तिच्या खांद्यावरचा दुसरा नॅपकिन काढुन घेत हर्षद बोलला ' आता माझी पाळी, मी लावणार नॅपकिन तुझ्या कमरेला' तशी ती पटकन दुर झाली, पण त्यानं पुन्हा जवळ ओढलीच तिला, तसंच ढकलत आरशासमोर घेउन आला, आरशासमोर तिला पुढं घेउन उभा राहिला, तिच्या खांद्यावर हनुवटी टेकुन आणि दोन्ही हात तिच्या पोटावर आवळुन. न राहवुन तिनंसुद्धा त्याच्या दंडाना पकडलं, दोन क्षणच दोघांना खुप हवेहवेसे आणि गरजेचे होते. दारातुनच शरदचा आवाज आला, ' हर्ष्या, अबे मला वाटलं झाली का काय पुजा ?' दोघंही एक एक करुन बाहेर आले, शरद त्याच्या बायकोबरोबर आला होता, ती सुद्धा जरीची काठापदराची साडी नेसलेली. अनुजा आणि शरदची बायको स्मिता पहिल्यांदाच भेटत होत्या, दोन मिनिटं दोघींचही हसणं बोलणं झालं आणि दोघी आत गेल्या. कॉलनीमधली पाच सात पोरं हॉलमध्ये दंगा करत होती. स्वयंपाकाला निकाळजे काकुच होत्या, निवडणूकित अपक्ष उमेदवार एकटाच प्रचाराचा गोंधळ करत फिरतो तशी त्यांची एकटीचीच गडबड चालु होती, एक दोन पोरं त्यांचं लक्ष चुकवुन काकडी, काजु असलं काहीतरी उचलायचे, त्यांच्यावर रागवणं चालु होतं. गुरुजींचा आवाज आल्यावर अनुजा बाहेर आली, दोघांनी किचन मध्ये जाउन देवाला नमस्कार केला, आता अव्हेलेबेल मोठं निकाळजे काकुच त्यांच्या पाया पडुन हॉलमध्ये येउन पुजेला बसले, गुरुजींनी पुजा सांगायला सुरु केली, दिड तास सगळे सोपस्कार चालु होते, कमरेचे नॅपकिन कमरेची शोभा वाढवत राहिले तर हर्षद्चं सोवळं अन् अनुजाची साडीवर नविन डिझाइन तयार होत राहिल्या. मागं भिंतीला टेकुन शरद अन स्मिता पुर्ण वेळ बसुन होते. गुरुजींनी 'नैवेद्याचं आणा' असा हाकारा करत आरतीची तयारी करायला घेतल्यावर हर्षदनं अनुजाकडं पाहिलं, आज आपण खुप काहितरी केलं याचं समाधान दाखवणारे डोळे बघुन त्याला खुप बरं वाटलं, त्याचवेळी निका़ळजे काकुंनी अंदाज चुकुन केलेला पाच किलो शि-याचं पातेलं समोर आणुन ठेवलं, म्हणजे आदळलंच, तेवढा शिरा पाहुन ही दोघंच काय गुरुजी देखील चाट पडले ' अरे वा, हल्ली एवढा प्रसाद गणेश मंडळं देखील करत नाहीत, यजमान, धार्मिक आहात तुम्ही, ईश्वरावर श्रद्धा आहे तुमची, जे हव ते भरभरुन देईल तो तुम्हाला, चिंता नको. उठा, ते पातेलं घ्या इकडं, पाणि फिरवा अन घ्या आरती करायला' हॉलमधले सगळेच उठुन उभे राहिले,खांद्यावरचं उपरणं सावरत गुरुजींनी सुरुवात केली ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची......' तेंव्हा दरवाज्यात सोनवणे साहेब उभे होते विठ्ठल स्टाईलमध्ये.. क्रमशः

Book traversal links for क क कपलचा - भाग ०४

  • ‹ क क कपलचा - भाग ०३
  • Up
  • क क कपलचा - भाग ०५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
राहती जागा
नोकरी
लेखनप्रकार (Writing Type)
वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8114 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

कहानी मे टिव्स्ट आता ह्याचे

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 07/11/2012 - 09:01 नवीन
कहानी मे टिव्स्ट आता ह्याचे साहेब नक्कि पुजेला आले कि चौकशीला .....
  • Log in or register to post comments

झकास. जाम मजा येतेय

प्रचेतस
Wed, 07/11/2012 - 09:02 नवीन
झकास. जाम मजा येतेय वाचायला. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

शेवटी एव्हढ हसु आल त्या पाच

स्पंदना
Wed, 07/11/2012 - 09:26 नवीन
शेवटी एव्हढ हसु आल त्या पाच किलो शिर्‍याच की काय सांगु? मस्त ! बाकि आल्या आल्या कशी काय हो दोघ भांडायला सुरु झाली?
  • Log in or register to post comments

हाण्ण...!

प्यारे१
Wed, 07/11/2012 - 10:17 नवीन
हाण्ण...! ;)
  • Log in or register to post comments

काही *ट कळालं नाही. (क्रमशः

राजो
Wed, 07/11/2012 - 10:18 नवीन
काही *ट कळालं नाही. (क्रमशः नसल्यामुळे कथा संपली असे मानतो)
  • Log in or register to post comments

>>>निकले थे कहाँ को... और

प्यारे१
Wed, 07/11/2012 - 10:26 नवीन
>>>निकले थे कहाँ को... और किधर को आए... के चक्कर घूम्यो.... चालायचंच...! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो

मस्त

मी_आहे_ना
Wed, 07/11/2012 - 10:21 नवीन
हा भाग सुद्धा मस्त.. पण "क्रमशः" का नाही?
  • Log in or register to post comments

कथा हळू चालली आहे पण पुढ्ची

मराठमोळा
Wed, 07/11/2012 - 10:39 नवीन
कथा हळू चालली आहे पण पुढ्ची उत्कंठा देखील वाढवत आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त रे

कपिलमुनी
Wed, 07/11/2012 - 12:42 नवीन
वाचत आहे !
  • Log in or register to post comments

वाचतो आहे

अमृत
Wed, 07/11/2012 - 12:43 नवीन
कथा रंगते आहे पण अजुनही काही अंदाज येत नाही. पण ते दोघांच भांडण जरा खटकलचं. पु.भा.ल. टा. अमृत
  • Log in or register to post comments

छान झाला आहे भाग, मात्र खुप

गणेशा
Wed, 07/11/2012 - 13:58 नवीन
छान झाला आहे भाग, मात्र खुप वेग वाटला या भागात. एक शंका : लग्ना नंतर जर लगेच बदली होणाअर होती, तर रुम घेवून बायकोला इकडे का आणले होते हे काही कळाले नव्हते.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Wed, 07/11/2012 - 14:03 नवीन
लवकर टा़का पुढचे भाग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

छान.

प्रभाकर पेठकर
Wed, 07/11/2012 - 18:32 नवीन
भांडणाचं, रुसव्याफुगव्याचं आश्चर्य तर वाटलंच पण ' हा नॅपकिन, यालाच हात पुसा सोवळं घाण नका करु' असा सज्जड दम मारणार्‍या अनुजाच्या साडीवरही (आणि तीही पैठणी), कमरेला नॅपकीन असूनही, नवी डिझाइन्स तयार झाली हे काही मनाला पटले नाही. पुरुषांचा वेंधळेपणा ठिक आहे पण , ह्या बाबतीत बायका पक्क्या असतात, असा अनुभव आहे. कथानक छान वाटतेय पण नवरा बायकोतील प्रणयाचे तपशील जरा जास्त महत्व खाऊन जात आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

वाचतिये पण पुढे काय होईल याचा

रेवती
Wed, 07/11/2012 - 19:32 नवीन
वाचतिये पण पुढे काय होईल याचा अजूनही अंदाज येत नाहीये.
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Wed, 07/11/2012 - 19:46 नवीन
ते पीसीवरच्या फाईल्स कॉपी करायचं प्रकरण तिथेच ठेवलंय. त्या सूत्राचा काहीतरी महत्त्वाचा भाग आहे नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

थोडा विस्कळीत वाटतोय; तरीही

अन्या दातार
Wed, 07/11/2012 - 21:30 नवीन
थोडा विस्कळीत वाटतोय; तरीही उत्कंठावर्धक आहे हे निश्चित! :)
  • Log in or register to post comments

पुढे काय होईल सांगता येत नाही

किसन शिंदे
गुरुवार, 07/12/2012 - 18:25 नवीन
पुढे काय होईल सांगता येत नाही पण हा भागही जबराट झालाय. :)
  • Log in or register to post comments

सब्र का फल...........

नाखु
Fri, 07/13/2012 - 09:09 नवीन
अस दिसतयं
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा