क क कपलचा .....
बाकी लोकं चिंबोरीतुन बदली झाली की शक्य ते सर्व प्रयत्न करायचे ती टाळायचे, अगदी काहीही म्हणजे माझ्या आईची ट्रिटमेंट जवळच्या शामताबेन हॉस्पिटलमध्ये आहे तरी माझी बदली करु नये, अशी काहीही कारणे असायची त्या अर्जात, हर्षद्ला असे अर्ज घेतानाच काय पण आत साहेबांना नेउन देताना सुद्धा हसु आवरायचं नाही, पण ८-१० दिवसांत असेच अर्ज विनंती मंजुर होउन परत यायचे तेंव्हा आश्चर्य देखिल वाटायचं.
आज त्याच चिंबोरी पोलिस स्टेशनात हर्षदचा शेवटचा दिवस होता ३० एप्रिल , तो इथं आला तीन वर्षापुर्वी. सोलापुरात ९ वर्षांनी पोलिस भरती झालेली त्यात नशिबानं अन, वडिलांच्या ज्या वरकमाईचा त्याला एकेकाळी राग होता, त्या वरकमाईचा यथोचित उपयोग तो डिपार्ट्मेंटला जॉइन झाला. सोने पे सुहागा का काय तसं, त्याला पहिलीच रायटरची पोस्ट मिळाली चिंबोरीला. हे मात्र फक्त भाग्यातच असावं लागतं. पहिल्या दिवसापासुन चिंबोरीतला प्रत्येक जण त्याच्या नशिबाची तारीफ करायचा. प्रत्येकवेळी तो सुखावुन जायचा, दोन महिन्यात त्याला या कौतुकाची सवय झाली अन त्यामागची भावना पण समजुन यायला लागली. मग सहा महिन्यात तो सरावला, पुढं वर्षभरात स्थिरावला आणि तीन वर्षात दुणावला. अंगानं आणि पैशानं दोन्ही बाजुनं.
जानेवारीत लग्न ठरलं तेंव्हाच त्यानं सोनवणे साहेबांकडं बदलीसाठी अर्ज केला होता, कारण दिलं होतं पालकांच्या तब्येतीचं, अर्थात ते कागदावर लिहिलेलं. सोनवणेंच्या घरी गेल्यावर त्यानं स्पष्ट सांगितलं होतं ' साहेब, दोन अडीच वर्षात बरेच भले बुरे संबंध निर्माण झालेत, लग्न झाल्या झाल्या इथं नकोय आणायला मला बायकोला ' सोनवणे पाच मिनिटं डोळे मिटुन बसले आणि मग त्याला म्हणाले ' हर्षदराव, हे आपलं डिपार्टेमेंट आहेच असं *****, तिज्यायला यातुन मिळणारी सगळी ऐश पाहिजे बायकोला, पोराला पण ह्याच्या घाणीचा वास नको घरात घुसायला. तुला काय वाटतं, चिबोरी सोडलंस म्हणजे या सगळ्यापासुन दुर जाशील, हा वास जाईल का युनिफॉर्मचा , ** नाही जात, साला ही वर्दी अंगावरुन उतरवलीस ना तरी तिची मस्ती , तिचा माज डोक्यातुन कधीच नाही जाणार लिहुन ठेव , साला फुकणीचा रायटर कुठला , जा बोलतो मी त्या हराम्याशी, पाकिट मात्र तयार ठेव, ज्या दिवशी हो म्हणेल त्या दिवशीच डिल सोडवायचं, रात्र गेली की काही आठवत नाही इथं कुणाला. '
सोनवणेंनी काम केलं, अर्थात तिथंही डबल गेम केलाच, जो येणार होता त्याच्याकडनं पण पैसे घेतलेच होते. हर्षदला एवढ्याच गोष्टीचं बरं वाटलं की लग्नात स्टेशनच्या लोकांनी ४ तो़ळ्याच्या अंगठ्या दिल्या दोघांना पण आणि गेलेले थोडे वसुल झाले. आज रात्री प्रिती मध्ये पार्टी होती सेंडऑफची. त्याच्या तयारिसाठी त्यानं आपला आयफोन काढला अन महेश मांढरेना फोन लावला. ' नमस्कार, स्टँडिंग कमिटि मेंबर साहेब'...
क्रमशः
प्रतिक्रिया
विंटरेस्टिंग आहे पण
माताय वाचता वाचता संपला देखील.
मोठे भाग टाका ना भौ.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
अगदी बरोबर
वाचायला घेतलं आणि संपल पण! जरा जास्त वेळ काढा राव.
आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
वाचतोय...
भाग मोठा असता तर बरं वाटलं असतं.
(चपला आणि सत्कार चा फ्यान)
--मनोबा
"The last Christian died on the cross".
उत्कंठावर्धक सुरुवात. पण हा
उत्कंठावर्धक सुरुवात.
पण हा भाग खूपच लहान झालाय.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
छोटा भाग! निषेध!
छोटा भाग! निषेध!
बिपिन कार्यकर्ते
इंट्रेस्टिँग
इंट्रेस्टिँग
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
मस्तच !!
मस्तच !! पुढ्चा भाग लवकर येऊ द्या !!
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा बहरात.....
पुधच्या भगाच्य प्रतिक्शेत.
-----------------------------------------------------------------------------------------------
सुखि संसाराची सोपी वाटचाल!
वाचिंग पण भाग लगेच संपिग
वाचिंग पण भाग लगेच संपिग !
लवकर लिखिंग तो आगे पढिंग !
मदनबाण.....
जलतरंग :- रंजना प्रधान {मी आत्ता पर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर जलतरंग वादन }
मस्त लिहिलंस
पण एका मिनिटात वाचून संपलं. जरा मोठा भाग लिही की रे!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
हा प्रोमो होता का सीरिज चा?
हा प्रोमो होता का सीरिज चा?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand
हप्ता....
आयला, चिंबोरी पोलीस स्टेशनचा 'हप्ता' एवढुसाच? फारच गरीब, बापुडवाणं दिसतय पोलीस स्टेशन. पुढचा हप्ता 'दणदणीत' द्यावा लागेल तरच तुमचं 'प्रतिसादांचं' काम होईल. नाहितर विसरा, आम्हाला बरीच इतर कामं आहेत.
सुरुवात मस्तं झाली आहे. कथानक लवकरच बाळसं धरेल अशी अपेक्षा आहे.
चला स्टार्टर मस्त झाल, आता
चला स्टार्टर मस्त झाल, आता मेनकोर्स कधी...?
सुरुवात छान झालीये!
पण मोठ्ठे भाग टाकायला का कंजुषी केली ते कळलं नै!
__________________________________________________________________________________
"And it never ceases to amaze me how many individuals feel their own ability to grasp a topic is a clear indication that anyone else can grasp it"
-Unknown author!
हा भाग वाचून मला टाटा
हा भाग वाचून मला टाटा डोकोमोच्या जाहिरातीतील इडली आठवली...
- पिंगू
- पिंगू
ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |
मस्त लिहिले आहे...
थोडे थोडे का होईना, पण लिहित जा, आणि पुर्ण करा.
इथे बरेचसे भाग अर्धवट आहेत.
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
वाचतिये.
वाचतिये.
काय हे
इतकच क्रमशः
अमृत
भाग इंटरेश्टींग आहे पण वाचतेय
भाग इंटरेश्टींग आहे पण वाचतेय तोपर्यंत संपला पण. पुढचे भाग जरा मोठे टाका.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
हं! आता सुरवातच लग्नान तर! पण
हं!
आता सुरवातच लग्नान तर!
पण काय हो पोलिस स्टेशनात राहुन मोजुन चारच शिव्या?अन रायटर म्हणजे काय पोस्ट असते? तेव्हढ जरा उलगडुन सांगा.
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
चपला आणि सत्कारच्या पहिल्या भागासारखाच हा एक पहिला भाग...
येऊ द्या पटकन पुढचा भाग.
~~~~~~~~~~~~~~~~~~oOoOoOoOoOoOo~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल..
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..
- अशोक बागवे
बर्याच दिवसांच्या
बर्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आमीर खानच्या चित्रपटाचा प्रोमो आला आहे....!
________________________________________________________________
अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि,
सदा मे समत्वं न मुक्तिर्नबंधः चिदानंदरुप शिवोSहं शिवोSहं
तुमच्या ष्टोर्या लैच
तुमच्या ष्टोर्या लैच विंटरेंस्टिंग अस्त्यात बघा. पुभाप्र.
********************************************
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी
हेच म्हणतो.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
पुढे
पुढे?? लवकर येऊ दे पुढचा भाग!!

वाचतेय..
वाचतेय..
-बागेश्री
ब्लॉग- वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
पुढचा भाग कधी ? एकच छोटी
पुढचा भाग कधी ?
एकच छोटी चिंबोरी टाकण्याऐवजी जुळ्ञा मोठ्या चिंबोर्या टाकल्या असत्या तर?
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
वाचतोय. पुभाप्र !!
वाचतोय. पुभाप्र !!
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
आजच बाईक वरती येताना, तुमचे
आजच बाईक वरती येताना, तुमचे लेखन ( क क कपल ) अजुन कसे नाहि आले. असे आठवले.
येवुन आज विचारणारच होतो तर हा लेख होता. योगायोग .
सुरुवात छान झाली आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
( मनोगतः 'तुमच आमच सेम नसत' अशी रोमँटीक स्टोरी असावी असे वाटते आहे.. 'चपला आणि सत्कार' अशी गुंतागुंतीची आनी टोळीची गोष्ट नसावी असे वाटते आहे.
शंका येण्यास कारणा की शिर्षक पहिल्या शक्यते सारखे आहे, आनि मायना दूसर्या.)
बाकी लिखानास शुभेच्छा आहेतच
-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "
आन्दो...
हम्म्म्म....
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =
दुसरा भाग, -
दुसरा भाग, - http://www.misalpav.com/node/22073
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
आनेदो भाय !!!
हे पण "नाथा" सारखं काहितरी इंट्रेस्टींग दिसतय...
अर्धवटराव
-रेडि टु थिंक