✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अग्नी(इंद्र)धनूष्य..........

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 07/04/2012 - 17:08  ·  लेख
लेख
अग्नीधनूष्य हा एक फार दुर्मिळ अद्भूत असा नैसर्गिक चमत्कार आहे. हा घडायला आकाशात तंतूमय ढग असावे लागतात व त्यांची उंची वीस हजार फुटाहून अधिक असावी लागते. एवढेच नाही तर या ढगात भरपूर बर्फाचे कणही असावे लागतात. सुर्याचे किरण या ढगांवर बरोबर अठ्ठावन्न अंशाचा कोन करून पडावे लागतात. असे झाले तर हे इंद्रधनुष्य़ आग आकाशाला आग लागल्यासारखे दिसू लागते. या चमत्काराचे शास्त्रीय नाव आहे “सरकमहॉरीझाँटल आर्क”. हे नेहमी दिसणारे इंद्रधनुष्य नाही. जेव्हा प्रकाश उंचीवर असलेल्या तंतूमय ढगातून जातात तेव्हा हे चमत्कार दिसतात. यातील बर्फाचे षटकोनी स्फटीक हे जाड थाळ्यांच्या आकाराचे लागतात व ते जमिनीला समांतर असावे लागतात. प्रकाश या स्फटीकाच्या बाजूने आत शिरतात व खालच्या बाजूने बाहेर पडतात. हे होताना या किरणांचे अपवर्तन होऊन त्यातून रंग बाहेर पडतात. एवढे होऊन चालत नाही तर या बर्फाच्या स्फटीकांची एकामेकांशी एका विशिष्ठ प्रकारे रचना व्हावी लागते. हे सगळे जर झाले व आपण तेथे असलो तर नशिबवान माणसाला हा चमत्कार दिसतो. आपल्याही हे केव्हातरी दिसेल. फारच भारी दिसतो हा प्रकार..............! जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
5838 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

फारच भन्नाट. भाग्यवान आहात.

प्रचेतस
Wed, 07/04/2012 - 17:11 नवीन
फारच भन्नाट. भाग्यवान आहात.
  • Log in or register to post comments

फोटू कुठे काढलात ?

sagarpdy
Wed, 07/04/2012 - 17:14 नवीन
फोटू कुठे काढलात ?
  • Log in or register to post comments

हा हा, पुण्यात माझ्या

जयंत कुलकर्णी
Wed, 07/04/2012 - 17:18 नवीन
हा हा, पुण्यात माझ्या टेबलावरून......खरंच.
  • Log in or register to post comments

फटू दिसत नाहीये

इनिगोय
Wed, 07/04/2012 - 17:36 नवीन
फटू दिसत नाहीये :(
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!

हरिप्रिया_
Wed, 07/04/2012 - 17:42 नवीन
अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

फटु दिसत नाहीयेत.

सूड
Wed, 07/04/2012 - 17:47 नवीन
फटु दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

हे सगळे जर झाले व आपण तेथे

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/10/2012 - 18:10 नवीन
हे सगळे जर झाले व आपण तेथे असलो तर नशिबवान माणसाला हा चमत्कार दिसतो.>>> १०० % सहमत... जबरदस्त आहे हा निसर्गचमत्कार :-) Image removed.
  • Log in or register to post comments

नशिबवान आहात काका.. बघायला

पिंगू
Wed, 07/04/2012 - 18:06 नवीन
नशिबवान आहात काका.. बघायला आणि फोटो काढायला पण मिळाला..
  • Log in or register to post comments

व्वा...अद्भुत

चित्रगुप्त
Wed, 07/04/2012 - 19:03 नवीन
व्वा...अद्भुत आहे हा प्रकार. आणि तुम्हाला ही सर्व शास्त्रीय माहिती आहे, हे आणखी विशेष. अनेक आभार.
  • Log in or register to post comments

दोन वर्षापूर्वी हा सोहळा मी

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 07/05/2012 - 09:13 नवीन
दोन वर्षापूर्वी हा सोहळा मी एकदा बघितला होता तेव्हा ही माहिती काढली होती अर्थात नेटवरून. तेव्हा फोटो काढता न आल्यामुळे मतात हुरहुर राहिली होती ती यावेळी दूर झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

भन्नाट... अद्भुत!

स्मिता.
Wed, 07/04/2012 - 19:10 नवीन
अतिशय भन्नाट प्रकार दिसतोय हा... पुण्यात घरबसल्या असं अद्भुत दृष्य दिसायला खरोखर भाग्यवान आहात. हा सुरेख फोटो येथे शेअर केल्याबद्दल अनेक आभार!
  • Log in or register to post comments

....

अन्या दातार
Wed, 07/04/2012 - 20:49 नवीन
....
  • Log in or register to post comments

भन्नाट

जाई.
Wed, 07/04/2012 - 20:52 नवीन
भन्नाट
  • Log in or register to post comments

मी ओडीशामधे असताना

जोयबोय
गुरुवार, 07/05/2012 - 15:54 नवीन
मी ओडीशामधे असताना वर्तुळाक्रुती इन्द्रधनू पाहीले होते. पुर्ण गोल इन्द्रधनू सुर्याभोवती निर्माण झाले होते. फारच अद्भुत होता नजारा.
  • Log in or register to post comments

त्याला इंद्रवज्र म्हणतात असे

बॅटमॅन
Fri, 07/06/2012 - 12:49 नवीन
त्याला इंद्रवज्र म्हणतात असे गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत दिलेले आहे. तुम्ही दिलेला अनुभव त्यांनादेखील (बहुतेक) सिंहगडावर आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोयबोय

इंद्रवज्र मी रतनगडाच्या

प्रचेतस
Fri, 07/06/2012 - 12:59 नवीन
इंद्रवज्र मी रतनगडाच्या पश्चिम कड्यावरून पाहिलेले आहे. फारच भन्नाट प्रकार आहे तो. आपलीच प्रतिमा आपल्याला डोळ्यासमोरच्या कड्यात दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लै भाग्यवान बगा तुम्ही. ते

बॅटमॅन
Fri, 07/06/2012 - 13:04 नवीन
लै भाग्यवान बगा तुम्ही. ते वर्णन वाचताना असलं भारी वाटलं होतं काय सांगू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अग्नी इंद्रधनुष्य असे दिसते.

सागर
Tue, 07/10/2012 - 14:48 नवीन
धागाकर्ते जयंत सर यांच्या धाग्याचे महत्त्व वाचकांच्या लक्षात यावे यासाठी ही २ चित्रे Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

ग्रेट. तेजाळलेले आकाशच जणू.

प्रचेतस
Tue, 07/10/2012 - 14:55 नवीन
ग्रेट. तेजाळलेले आकाशच जणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

विश्वास ठेवायला अवघड असा

टुकुल
Wed, 07/11/2012 - 12:28 नवीन
विश्वास ठेवायला अवघड असा सुंदर फोटो काढलात आणी पुरेपुर माहीती हि दिलीत. धन्यवाद. --टुकुल.
  • Log in or register to post comments

अशक्य सुंदर!

पैसा
गुरुवार, 07/12/2012 - 17:39 नवीन
खरंच फार मोठं नशीब असायला पाहिजे हे दिसण्यासाठी!
  • Log in or register to post comments

+१ सहमत आहे

सागर
गुरुवार, 07/12/2012 - 17:49 नवीन
खरंच फार मोठं नशीब असायला पाहिजे हे दिसण्यासाठी! अवांतरः मी येथे दिलेले फोटो स्वतः काढलेले नाहियेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

युनिक !

तर्री
गुरुवार, 07/12/2012 - 18:12 नवीन
निसर्ग असा अद्भुत होताना पाहाणे हा काय अजब प्रकार असतो. छान फोटो !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा