दुबाई....
नुकतीच दुबाई शहरास भेट दिली होती. तेंव्हा बुर्ज खलीफा (खलीफा टॉवर ऑफ दुबाई) आणि परीसराची तसेच बुर्ज खलीफावरून दुबाई शहराची काही छायाचित्रे घेतली होती. बुर्ज खलीफा हे एक आकाशाच्या दिशेने वसवलेले 'शहर' आहे. इंग्रजीत ज्याला 'व्हर्टीकल सीटी' असे नांव आहे. ह्यात राहायला घरे, दुकाने, कचेर्या, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, चित्रपटगृहे इ.इ. आहेत. वेळ रात्री १०.३० ची आहे. माझ्या जवळ ट्रायपॉड नव्हता त्यामुळे कॅमेराची संवेदन क्षमता (ए.एस.ए) वाढवून छायाचित्रे काढली आहेत त्यामुळे काही चित्रात 'नॉईज' दिसून येईल, ह्याची नोंद घ्यावी.
बुर्ज खलीफा अर्थात टॉवर ऑफ दुबाई.

बुर्ज खलीफाच्या आसपासचा परीसर.



बुर्ज खलीफाच्या १२२व्या मजल्यावरून दुबाई शहराचे विहंगम दृष्य...


१२२व्या मजल्यावरून बुर्ज खलीफाचा उर्वरीत मनोरा. इथे ही कचेर्या आणि इतर सोयी सुविधा आहेत.

पुन्हा, बुर्ज खलीफाच्या १२२व्या मजल्यावरून दुबाई शहराचे विहंगम दृष्य...



प्रतिक्रिया
विहंगम आणि मनोरम!
विहंगम आणि मनोरम!
बिपिन कार्यकर्ते
+१
+१
+२
+२
एक शंका: ठीकाण अ पासून ठिकाण ब पर्यंत एमिरेट्सच्या विमानाने जाताना वाटेत दुबाईला थांबा असेल तर त्या रिकाम्या वेळात शहरात भटकंती करता येते का?
येते ना! ऑन अरायव्हल वीस
येते ना! ऑन अरायव्हल वीस -पंचवीस डॉलर ला वगैरे एक दिवसाचा देतात. गोऱ्या लोकाना फुकटात मिळतो. अधिक माहिती इथे!
ग्रेट!
मस्त आलेयत हो फोटो, पेठकरांनु!

खेडूतदादांची माहितीही उपयुक्त आहे.
आता पुढल्या भारतवारीच्या वेळेस दुबाईत जर्नी ब्रेक करायला हवी!!! तुमचं हाटेल इथेच जवळपास आहे का?
नाही म्हणजे कलावंताचं दर्शन त्याची कला सिद्ध करतांना व्हावं, असं म्हणतात!!!!!
हा:..हा:..
तुमचं हाटेल इथेच जवळपास आहे का?....
कलावंताचं दर्शन त्याची कला सिद्ध करतांना व्हावं, असं म्हणतात!
मी मस्कतात असतो. सर्वस्वी वेगळ्या देशात. अंतर साधारणपणे ४०० ते ४५० कि.मी. आहे.
मस्कतला या, माझ्या हाताने जेवण बनविन तुमच्यासाठी.
मस्कत
मस्कतला या,
४००-४५० मैल, इतक्या दूर कठीण आहे हो!
माझ्या हाताने जेवण बनविन तुमच्यासाठी.
हा तुमचा चांगुलपणा आणि आमची पुण्याई!
असाच लोभ असू द्या...
काका, मस्कत हा देश कसा? ओमान
काका, मस्कत हा देश कसा?
ओमान ना?
हो म्हणा किंवा नाई म्हणा... पण ओम्हणा आपलं ओमान म्हणा!
________________________________________________________________
अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि,
सदा मे समत्वं न मुक्तिर्नबंधः चिदानंदरुप शिवोSहं शिवोSहं
अप्रतिम....! आठवणी जाग्या
अप्रतिम....!
आठवणी जाग्या झाल्या.
(झैरात करतो असे लगेच्च ओरडत येऊन ये- आपलं -येऊ नये! )
________________________________________________________________
अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि,
सदा मे समत्वं न मुक्तिर्नबंधः चिदानंदरुप शिवोSहं शिवोSहं
ऑस्सम!!!!
ऑस्सम!!!!
http://preetamohar.blogspot.com/
खल्लास !
पाककृती असो वा कलाकृती.. पेठकर काका झिंदाबाद.
जबरदस्त आहेत सगळे फटू. विशेषतः ते 'विहंगम' वाले तर एकदम खल्लास.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
सहमत.
अगदी हेच बोल्तो.....
इत्यलम्
:davie: प्रास :davie:
लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड
सुंदर फोटो
सुंदर फोटो
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
आवडले
छान आहेत फोटोज.
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
सोनियाची दुबाई
झक्कास फोटु.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
प्रभाकर पेठकर सर, मस्त च फोटो आहेत
प्रभाकर पेठकर सर, मस्त च फोटो आहेत .
अस वाटत आहे जस अप्रतिम बासरीचे स्वर कानावर यावेत आणी मन आनंदात तल्लिन होउन जाव.
तस वाटत आहे कारण फोटो बघताना माणसाच्या ताकदीचा अंदाज येतो तो मनात आणल तर काय करु शकतो ते बुर्ज खलीफा (खलीफा टॉवर ऑफ दुबाई) च्या निमित्ताने.
(फोटो बघताना फोटो म्हंजे बासरीचे स्वर अस मानुन तल्लिन झालेला....)
निश
निश
वा वा वा .ती मुंबईची कविता
वा वा वा .ती मुंबईची कविता आठवली
नवलाख दिवे लखखती..............
सुंदर
सुंदर आहेत फोटो! मस्तच.
जबरदस्त.. एरवी पहायला मिळालं
जबरदस्त.. एरवी पहायला मिळालं नसतं.. धन्यवाद... सॉलिड अजस्त्र इमारत दिसते आहे ही.....
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
आमचे मित्र
गणेशाच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत
काका: तुमी पिकासावरुन फोटो अपलोड केलेत तर बरं होईल
.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...
मस्त फोटो, उगा कुणीतरी गैर
मस्त फोटो, उगा कुणीतरी गैर माणसानं काढलेले फोटो पाहताना जो आपलेपणा जाणवत नाही, तो या फोटोत जाणवला काका, धन्यवाद.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
प्रचंड! सुंदर फोटो. धन्यवाद
प्रचंड! सुंदर फोटो.
धन्यवाद पेठकर काका.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
मस्त! मस्त! मस्त!
छान वाटले पाहुन. आपली मुम्बई, पुणे, कोल्हापुर, नागपुर, ईत्यादी केव्हा दिसणार असे?
मुम्बई दिसते काही प्रमाणात तशी पण इतकी नाही ......
जबरदस्त.... आणी विहंगम-ना....
जबरदस्त.... आणी विहंगम-ना.... एक अथांग सलाम
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
बस नाम ही काफि है। 
अत्रुप्त...!
मस्त.
मस्त.
I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.
सुंदर.....
केवळ सुंदर.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते, प्यारे१, प्रीत-मोहर,परिकथेतील राजकुमार, प्रास, जाई., इरसाल, गणपा, निश, विजुभाऊ, sneharani, गवि, मी-सौरभ, ५० फक्त, यकु, वैशाली माने, अत्रुप्त आत्मा, जयंत कुलकर्णी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
मी-सौरभ, दुर्दैवाने माझे पिकासावर खाते नाही. मी पिकासा कधी वापरलेले नाही. मी फ्लिकर वापरतो. पण पिकासाही शिकायचा प्रयत्न करीन.
प्लीज करा
पिकासा तुमच्या जीमेल आय डी ने लॉग ईन करता येते.
आधिक माहितीसाठी वल्ली वगैरेला विचारुन बघा..
.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...
सुपर्ब !!!!!!!
सुपर्ब !!!!!!!

पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
सुन्दर फोटो....
आपले आणि ह्या कलेचे कधि जमलेच नाही....(पण चान्गले काय आणि वाइट काय हे तर नक्किच समजते....)...
म्हणुन म्हणतो....फारच सुन्दर फोटो....
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
अप्रतिम
टिपले आहेत सगळे फोटो.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
सगळे फोटो मस्त आलेत.
सगळे फोटो मस्त आलेत.
झक्कास!
झगमगती दुबई मस्तच टिपलीय पेठकर काकांनी!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
एकदम सुंदर फोटो पेठकर
एकदम सुंदर फोटो पेठकर काका.
रात्रीची दुबई आवडली.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
येथे काम करावयास मिळावे
येथे काम करावयास मिळावे म्हणून अबुधाबीत एन्ट्री घेतली. चांगल्या संधीची वाट पाहत होतो तर मंदीच्या गर्तेत दुबई चे तीन तेरा वाजले. आमचे तेथील जर्मन कनेक्शन सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. अबू धाबी येथे होतो म्हणून नोकरी टिकली. मग दोन वर्षानंतर बुर्ज येथे काम करायची इच्छा मनात अपुरी ठेवून परत लंडन ला आलो तेथे कामाचे लोचे होते म्हणून जर्मनीत आलो. मंदी पूर्वीचे जग ....
हे फोटो पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
मस्त फोटो. शेवटचा फोटो लयं
मस्त फोटो.
शेवटचा फोटो लयं आवडला बघा ! अन् जाम जळालो.


का ?
आमच्या ठाण्यातले भंगार रस्ते आणि कित्येक वर्ष बांधकामात अडकुन राहिलेले उड्डाण पुल डोळ्यासमोर उभे ठाकले...
साला आपल्या भ्रष्ट नेते मंडळींना देशाची कदर ना जनतेची !
मी म्हातारा होईन तेव्हा सुद्धा असे स्वप्नवत रस्ते माझ्या नजरेस पडणार नाही याची खात्री आहे मला !
जाता-जाता :--- काका सॉफ्टवेअर वापरुन नॉइज देखील कमी करता येतो.
मदनबाण.....
बैचेन हुई तोरे कारन... (Ther Perfumed Garden) Abhijit Pohankar
अंगठेबहाद्दर...
श्री. मदनबाण,
काका सॉफ्टवेअर वापरुन नॉइज देखील कमी करता येतो.
अरे! तुझा हा काका संगणक-प्रणाली क्षेत्रात पार अंगठेबहाद्दर आहे. आता शिकतो आहे. पाहूया कसे काय जमते ते.
तिसरा आणि शेवटचे दोन फोटो
तिसरा आणि शेवटचे दोन फोटो आवडले.
तिसर्या फोटोत प्रतिबिंब आहे म्हणून; ही व्यक्तिगत आवड. (दुसर्यात, डाव्या बाजूने येणारा धक्का, भिंत जे काही आहे, त्यामुळे मजा कमी झाली.) शेवटच्या दोन फोटोंमधे गती आणि स्थैर्य दोन्ही आहे म्हणून.
(एक अवांतर शंका: स्थानिक दुबाई असा उच्चार करतात का?)
अदिती
Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
-- स्वाक्षरी सल्लागार कार्यकर्ते यांच्याकडून प्रीअप्रूव्ह्ड
कल्पना नाही..
अदिती,
दुबाईमध्ये कधी स्थानिकांशी संबंध आला नाही. पण ते 'दुबाई' किंवा 'अमिरात' असे म्हणत असावेत. मस्कतमधील स्थानिक मात्र दुबाईला दुबाई असेच संबोधितात.
हो काका माझी एक स्थानिक
पण एक गंमत सांगतो. दुबईच्या वेशीबाहेर आबुधाबिच्या दिशेने जातांना महामार्गावर आय बी एन बतुता ह्या नावाचा मोठा भव्य दिव्य मॉल आहे. स्थानिक त्याचा उच्चार इब्न्न बतुता असा करतात.
"इब्न्न बतुता ,बगल मे जुता" ह्या गाण्यातील मूळ प्रेरणा ह्या शब्द आहे.
आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
इब्न बतुता...
होय निनाद, तो उच्चार इब्न बतुता असाच आहे. इब्न बतुता हा १३०४ ते १३६८/६९ काळातील एक मोरोक्कन जगप्रवासी होता. त्याने त्या काळात जगभर प्रवास केला होता. तो त्याच्या आयुष्यात जवळ जवळ १२०००० कि.मी. फिरला. त्याला मुसलमान देशांमध्ये मानाने संबोधिले जाते.
मी इब्न बतुता व्यापारी संकुलास (मॉल) भेट दिली होती.
चुकीची माहिती
निनाद, माफ करा पण -
दुबईतील मॉलचे नाव 'IBN Batuta' असेल किंवा नसेल पण त्याचा 'इब्न बतूता' या जगप्रसिद्ध व्यक्तीशी काही संबंध नसावा.
आपण उल्लेखलेली मूळ कविता सीबीएसई अभ्यासक्रम ईयत्ता दुसरीच्या हिंदीच्या पुस्तकात आहे.
तिचे (इब्न बतूता) स्पष्टीकरण तेथेच आहे.
(हा प्रतिसाद देतानाच पेठकरांचा याच आशयाचा प्रतिसाद वर आलेला आहे.)
संबंध नसावा...
तसा थेट संबंध काही नसावा. कारण तो १३०४ ते १३६८/६९ काळात होऊन गेलेला मोरोक्कन जगप्रवासी होता. पण त्याला मुस्लीम प्रवासी, आणि कदाचित मुस्लीम धर्म प्रसार करणारा असावा, म्हणून बराच मान आहे. त्यामुळे त्या मॉलला त्याचे नांव दिले असावे. जसे आपल्याकडे मोठ्या लोकांची नांवे स्थळांना, सार्वजनिक वास्तूंना देण्याची प्रथा आहे त्या प्रमाणे.
इब्न बतुता हे मॉलचे नांव आहे की मोनोरेल स्टेशनचे हे आता निटसे आठवत नाही. पण त्या मॉल मध्ये इब्न बतुता बद्दल खुप माहीती, त्याच्या प्रवासाच्या मार्गाची माहीती इत्यादी चित्ररुपात फ्रेम करून ठेवलेली आढळली.
इब्न बतुता हे मॉलचे नांव आहे की मोनोरेल स्टेशनचे
"इब्न बतुता मॉल" हे मॉल चे नाव , तिथेच मेट्रो ( मोनो नव्हे ) स्थानक आहे म्हणुन त्याचे ही नाव "इब्न बतुता ( मेट्रो स्टेशन)"
बाकी परत याल तेंव्हा फोनवा.
अहो मी बगल मे जुता लिहिले
विसुनाना
अहो मी बगल मे जुता लिहिले आहे. आपण दिलेली कविता पहन के जुता अशी आहे.
असो बॉलीवूड वाले हुशार आहेत.
http://www.youtube.com/watch?v=Bn7LkiAmskA
आता हेच पहा
अरबी भाषेत खलास म्हणजे संपले असा अर्थ होतो. हाच शब्द ह्याच अर्थाने आपल्याकडे प्रचलित आहे.
आखतात कितीतरी वेळा हा शब्द बोलीभाषेत वापरला जातो. म्हणून रामूने दुबई मधील कंपनी राज रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी खलास ह्या शब्दावर आधारित एक आयटम सॉंग ठेवले. नाही तरी खलास हा शब्द गुन्हेगारी जगतात महत्व राखून आहेच.
@ कुंदन
दुबई मेट्रो सुरु झाली तेव्हा पहिल्या दिवशी हौस म्हणून ती पहायला गेलो होतो. त्यात बरेच जण गंमत म्हणून प्रवास करत होते. तेव्हा इब्न बतुता मॉल जवळ जवळ तिचा थांबा बांधून तयार होता पण मेट्रो दुबई शहरात मर्यादित भागांमध्ये फिरत होती. त्यांना हे मेट्रो चे जाळे पूर्ण यु ए इ मध्ये टाकायचे होते. सध्या काय चाललाय ह्याबाबत कल्पना नाही. पण जाणून घेण्यास उत्सुक आहे.
आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
झकास
पेठकर शेठ,
झकास फोटो. रात्रीची दुबई सफर फार आवडली.
पेठकर काका , अप्रतिम
पेठकर काका ,
अप्रतिम फोटो...
सर्व फोटो खुप आवडले.
कौशी
एकदम चकाचक ओ पेठकर काका
एकदम चकाचक ओ पेठकर काका !!
आपली खानावळ
नेमकी कुठे आहे , त्याचे पणा फोटो येवु द्यात ....बाकी परा म्हणतो ते खरे, पाकृ चे आजचे झकास्सच !!
सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )
खानावळ नाही...
श्री. सुहास,
माझी खानावळ नाही तर अल्पोपहार केंद्र (कॅफेटेरीआ) आहे. तेही दुबाईपासून ४००-४५० कि.मी. दूर सर्वस्वी दुसर्या देशात, म्हणजे मस्कत मध्ये आहे.
दुबाय काय नि मुंबाय काय
सुंदर!!
बाकी ही इमारत बघून नुसतेच उसासे टाकणार्यांसाठी - हे करून पहा.
आनंदीबाईने ध चा मा केला. तुम्ही दु चा मुं करा!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मस्तच..
मस्तच..
१२२ व्या मजल्यावरून जसे दिसते तसेच विमानातून नेहमी पहातो, पण असे फोटो नाही काढता येत..
एक दुरुस्ती...
सर्वांसाठी....
एक दुरुस्ती आहे ती म्हणजे, तो १२२वा मजला नसून १२४वा मजला आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
धन्यवाद.
पियुशा, मुक्त विहारि, jaypal, रेवती, पैसा, वल्ली, निनाद मुक्काम प..., मदनबाण, ३_१४ विक्षिप्त अदिती, सर्वसाक्षी, कौशी, सुहास, सुनील, खेडूत सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
सुंदर!
फोटो फार चांगले आले आहेत. रोषणाईचे फोटो काढणं तसं अवघड असतं. बहुतेक फोटोंमध्ये एक्स्पोजर टाईम व्यवस्थित वापरला आहे हे दिसतंय. फक्त आयएसओ सेटिंगमध्ये थोडीशी गडबड झाली असावी असं किंचित ग्रेनीनेस वरून वाटतंय. फोटो ट्रायपॉड न वापरता घेतले असतील तर मात्र विशेष कौतुक आहे.
-Nile
धन्यवाद.
धन्यवाद Nile,
माझ्या जवळ ट्रायपॉड नव्हता हे खरेच आहे. म्हणूनच मला आय एस ओ वाढवावा लागला.
झकास वर्णन...
तू नळीवर याच्या ओपनींगची मस्त क्लिप बघीतली होती..
"मेगास्ट्रक्चर्स" सिरीज मधले बुर्ज्-अल्-अरब आणी बुर्ज खलिफा (पूर्वाश्रमीचे बुर्ज दुबई) बघण्यासारखे आहेत.
सुंदर फोटोज
सर्वच फोटो आवडले. (हेवाही वाटला.
)
झकास!
फोटो झक्कास! एकदम मस्त,आवडले.
स्वाती
झक्कास !!
झक्कास !!
____________________________________________________
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
फार सुरेख आलेत फोटो मस्कत चं
फार सुरेख आलेत फोटो

मस्कत चं आमंत्रण सगळ्यांसाठी आहे का
अरे वा काका! बरेच दिवसानी
अरे वा काका! बरेच दिवसानी दर्शन दिलेत. छान वाटले.
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे
मस्कत कट्टा....
मोदक, विसूनाना, स्वाती दिनेश, सुहास झेले, जयवी आणि ॥पुण्याचे पेशवे॥ मनःपूर्वक धन्यवाद.
@जयवी,
मस्कत चं आमंत्रण सगळ्यांसाठी आहे का ?
अगदी सर्वांसाठी (सहकुटुंबं-सहपरीवार) आहे. कोण कोण येतंय बोला. एक मस्त कट्टाच भरवूया.
मस्त फोटो. डोळे दिपले , अमोल
मस्त फोटो. डोळे दिपले ,
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा.
मस्त
सगळेच फोटो आवडले. खासकरून शेवटचे तीन.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदरच आहेत फोटो
सुंदरच आहेत फोटो
खूप आवडले
***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/