माळरान अन् ते दोघे!! -- ४
माळरान अन् ते दोघे!! -- ३
त्या हिरव्या झाडावर
एक घरटे आहे
.
बहुदा चिमणीचे
बर्याचदा तिथून
कलकलाट येतो कानावर
पाखरे तरी किती निरागस
.
वठलेले झाड विचार करतेय
.
घरट्यामध्ये खोचलेल्या
वाळलेल्या काटक्या तर त्याच्याच आहेत ना
.
.
चला, म्हणजे अजूनही मी
अगदीच निरपयोगी नाही तर
.
त्याच्या जीर्ण खोडावर
अजूनही कोरल्याच्या
खुणा जाणवतायत
अगदी स्पष्ट नाहीयेत तरी
त्याच्यावर, आणि हो,
एकमेकांवरही प्रेम करणार्या
दोघांनी गोंदवलेली काही अस्फुट अक्षरे
.
.
किती यातना झाल्या होत्या पण
त्याचे असे आहे
कोण कोणाला कसा लळा लावेल
.
आता युगे लोटली
त्या दोन्ही झाडांना
शेजारी शेजारी उभे असून
.
.
हिरव्या झाडाने अजूनही
साथ सोडली नाही अन्
वठलेल्या झाडाने
.
आशा
(क्रमश:)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१०/१०/२०११)
छान
वाचतेय..
संपूर्ण मालिकाच अतिशय सुंदर
लाईक!
शैली मस्त ...
मागच्या भागाचाच प्रतिसाद
त्याच्या जीर्ण खोडावर अजूनही
वाचतो आहे रे