मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माळरान अन् ते दोघे!! -- ४

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काव्यरस
माळरान अन् ते दोघे!! -- ३ त्या हिरव्या झाडावर एक घरटे आहे . बहुदा चिमणीचे बर्‍याचदा तिथून कलकलाट येतो कानावर पाखरे तरी किती निरागस . वठलेले झाड विचार करतेय . घरट्यामध्ये खोचलेल्या वाळलेल्या काटक्या तर त्याच्याच आहेत ना . . चला, म्हणजे अजूनही मी अगदीच निरपयोगी नाही तर . त्याच्या जीर्ण खोडावर अजूनही कोरल्याच्या खुणा जाणवतायत अगदी स्पष्ट नाहीयेत तरी त्याच्यावर, आणि हो, एकमेकांवरही प्रेम करणार्‍या दोघांनी गोंदवलेली काही अस्फुट अक्षरे . . किती यातना झाल्या होत्या पण त्याचे असे आहे कोण कोणाला कसा लळा लावेल . आता युगे लोटली त्या दोन्ही झाडांना शेजारी शेजारी उभे असून . . हिरव्या झाडाने अजूनही साथ सोडली नाही अन् वठलेल्या झाडाने . आशा (क्रमश:) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१०/१०/२०११)

वाचने 2855 वाचनखूण प्रतिक्रिया 8

५० फक्त Mon, 10/10/2011 - 18:05
मागच्या भागाचाच प्रतिसाद पुन्हा वाचावा, बाकी लिहिण्यासारखं काही नाही. पिडिएफ करुन ठेवल्या आहेत योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य किंवा अयोग्य माणसांना ? वाचुन दाखवण्यासाठी.

प्रकाश१११ Mon, 10/10/2011 - 20:26
त्याच्या जीर्ण खोडावर अजूनही कोरल्याच्या खुणा जाणवतायत अगदी स्पष्ट नाहीयेत तरी त्याच्यावर, आणि हो, एकमेकांवरही प्रेम करणार्‍या दोघांनी गोंदवलेली काही अस्फुट अक्षरे छान .आवडली कविता .शुभेच्छा ..!!