माळरान अन् ते दोघे!! -- ३
माळरान अन् ते दोघे!! -- २
आज वारा जरा
वेगळ्याच दिशेने
वाहत होता
हिरव्या झाडातून
आनंदाचे धुमारे फुटत होते
आज त्याच्या फांद्यांना
लय सापडली होती
.
हाच वारा, जेव्हा
वठलेल्या झाडातून फिरायचा
एक शिळ घुमायची
काय म्हणतात बरे त्याला
.
.
हम्म... हृदयद्रावक
.
तिकडे
हिरवे झाड मात्र
आज खूप खुश होते
चार नविन कळ्या
उमलत होत्या त्याच्या
दोन काहीश्या मोठ्या अन्
दोन अगदीच अल्लड, नाजूक
.
त्या मोठ्या कळ्या जरा
उदासच होत्या
.
.
बहुदा त्यांना फक्त
त्या उजाड माळरानावरचे
वठलेले झाडच दिसत होते
.
अन्
दुसर्या दोन अल्लड कळ्या
त्या खुश होत्या
त्यांना मोठ्या उमलणार्या
कळ्या दिसत होत्या
उमलणार्या
.
.
दृष्टीचा हा खेळ अजबच
(क्रमशः)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/१०/२०११)
जबरदस्तच रे, एका वैयक्तिक
अच्छा चल रहा है... लगे रहो...
छान!
अप्रतिम आहे हा