चालू करा तुमचे इंजन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
12 Jan 2010 - 12:11 pm

सिचूयेशन: आप्ल्या पिच्चरचा बागाईतदार नायक निसता उंडारेल हाये. त्यो नुसता इकडतिकड पुढारपन करत फिरत आसतूया. त्येच्यावाली हिरवीन बायकू लय आंग मोडून शेतात कामं करतीया. आप्ला हिरो शेतात फिरकना झालाय. तवा काय व्हत त्ये हिरवीन गानं म्हनूनशान सांगती. ऐका:

लावनीच्या आधी आसतं तसं चालीमधलं गद्य:

{शेत आपलं मोठ भारी, निगरानी त्याची व्ह्याया हवी,
तुमी तर काय कामच करीना, फिरत्यात निसतं पुढार्‍यावानी
पाउस पडला, विहीर बी भरली, हिरव्या रानी हिरवी मखमल आली }

अहोss..सजनाs..

(चाल सुरू)

बघून काय राह्यले नुसतं तुम्ही, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

औंदाच्या हो सालाला लावल उसाचं हो बेनं
उभ्या आडव्या वाफ्यातून हातान काढल तण
पर काय अक्रीत घडलं, विजमंडळ हे नडलं
सुरू केलया त्याने भारनियमन ||१||

तेव्हा बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

पिक आल हाताशी हो नका त्यात घुसू देवू
जनावर ही माजलीत सारी एकेकाला हाकलून लावू
दांडक्यान रट्टा द्या हो,
पहारा करा डोळ्यात टाकून अंजन ||२||

बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

आडसाली उस झाला, तोडणी केली, उतारा वाढला
कारखान्यान दिलानं हप्ता, सपनात आल सोनं
गंजलं का इंजन सच्या तुमचं? जरा चालना!
मग चोळा की बेरींगांना वंगन ||३ ||

अहो राया,
बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक-डिझल)

कवितामौजमजाचित्रपट

प्रतिक्रिया

उग्रसेन's picture

12 Jan 2010 - 10:35 pm | उग्रसेन

विजमंडळ हे नडलं
सुरू केलया त्याने भारनियमन

आरं लेका, लावणीतबी भारनियमन आणलं का !

आडसाली उस झाला, तोडणी केली, उतारा वाढला
कारखान्यान दिलानं हप्ता, सपनात आल सोनं

जोरदार वळी.

बाबुराव :)

पाषाणभेद's picture

13 Jan 2010 - 1:34 am | पाषाणभेद

परतिसादाबद्दल धन्यवाद.
माला ना गंगीच्या तोंडाच "मुडदा बशीवला त्याचा" ह्ये घालायच व्हत. बघतो, म्होरल्या टायमाला नक्की.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(मेक्यॅनीक- ITI-डिझल इंजन)

उग्रसेन's picture

14 Jan 2010 - 6:30 pm | उग्रसेन

"मुडदा बशीवला त्याचा"

=))

jaypal's picture

13 Jan 2010 - 10:42 am | jaypal

चाल लावता लावता धुर निघाला ;-)
चांगला आणि वेगळा प्रयत्न
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पाषाणभेद's picture

13 Jan 2010 - 6:34 pm | पाषाणभेद

चाल थोडी निबार हाय पन जरा जोर लावा म्हंजे जमल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)