(डिसक्लेमर: सदर कथा ही संपुर्णतः काल्पनिक कथा आहे. कथेतील कोणत्याही घटनेचा, ठिकाणचा, संस्थेचा, जिवंत अथवा मृत पात्राचा, वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
मुंबईतलं एक अग्रगण्य महाविद्यालय.. डी. जी. रुपारेल कॉलेज. दिवस १० ऑगस्ट २००७ वेळ दुपारची.. पाउस रिमझिमत होता आणि वातावरणाला एक प्रकारचा 'रोमांचित साज' चढला होता.. आणि कॉलेजचे कॅम्पस विविधरंगी 'फुलांच्या' ताटव्यांनी बहरून गेले होते.. इकडे आत 'मेन बिल्डींग' मध्ये धावपळ सुरु होती.. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याची गडबड घाई .. १२ वी पर्यंत कॉलेजचा अनुभव घेतला असला तरी ११ वी १२ वी म्हणजे एकप्रकारे शाळाच.. या काळात कुठेही फिरण्याचे, नाईट आऊट पार्टीजला जाण्याचे स्वातंत्र्य मुलांना मिळत नसते.. साधारण १२ वी पास होईपर्यंत मात्र पालकांना आपल्या -कार्टींचा एकंदरीत अंदाज आलेला असतो.. आणि मुले देखील कागदोपत्री का होईना 'मोठी' झालेली असतात.. सो आजपर्यंत जे अनुभव घेता आले नाहीत ते आता एफ वाय (वरिष्ठ महाविद्यालयाचे पहिला वर्ष) मध्ये आल्यावर घेऊया, या औत्सुक्याने मुलं 'सीनीयर कॉलेज' करता तयार झालेली आहेत .. त्यामुळे त्यांची देखील आपापला वर्ग शोधण्यासाठी धावपळ सुरु असते . अशातच पहिली बेल होते.. विद्यार्थी विद्यार्थीनी आपापल्या वर्गात शिरतात.. आणि यातच असतो आपला नायक.. स्वताची ओळख शोधणारा, आयुष्यात काहीतरी करून धावण्याची इच्छा असणारा.. टिपीकल स्टोरीज प्रमाणे आपला नायक अति स्मार्ट, पहाताक्षणी नजरेत भरावा असा नाहिये उलट थोडासा भिडस्तच आहे.. नायकाचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर 'फॉर्मल' हा शब्दच योग्य ठरेल.. मात्र एकदा मैत्री झाली जीवाला जीव देखील देण्याची तयारी असणारा.. हा आपला नायक आपल्यासाठी एक ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.. शाळेपर्यंत अभ्यासात तथाकथित लो-प्रोफाईल असलेला हा विद्यार्थी.. एचएससी मध्ये चांगले गुण मिळवून मुंबईतीलं असं एक महाविद्यालय जिथे प्रवेश मिळणे म्हणजे आपला जन्म भरून पावला, असं बहुतांश विद्यार्थी आणि पालकांना वाटतं, त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने आपल्या नायकाचा आत्मविश्वास दुणावलेला असतो. आणि आता बाय हूक ऑर क्रूक, अभ्यासात जास्तीत जास्त मेहनत करुन येणाऱ्या भविष्यात आपण आपल्या पालकांचं आणि कुटुंबाचं नाव मोठं करायचं अशी पक्की खुणगाठ त्याने मनाशी बांधलेली असते.
***
साधारण विशीतल्या आणि भविष्याची स्वपने रंगवणारा विद्यार्थी विद्यार्थींनींचा ग्रुप थट्टा मस्करी करत आपल्या नेमून दिलेल्या वर्गात प्रवेशता होतो.. हा असतो बीएमएस चा वर्ग.. यांच्या मध्ये असतो आपला नायक.. आज एफवाय-बीएमएसला प्रवेश करताना त्यांचे कोर्स कोऑर्डीनेटर वेलकम स्पीच देत असतात.. अभ्यास सिरीयसली करा.. तुमाच्यातुनच उद्याचे व्यवस्थापक, अर्थतज्ज्ञ, बिझीनेस लीडर्स घडणार आहेत.. मुलं-मुली मात्र भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहत असतात.. नायक देखील आपला ग्रुप तयार करण्यासाठी आतुर असतो.. मात्र मुळच्याच भीडस्त स्वभावामुळे त्याची स्वत:हुन कोणाशी ओळख करण्याची तयारी नसते. मात्र तरीदेखील तो एका चेहर्यावरुन तरी सुसंस्कृत वाटण्यार्या मुलाशी ओळख करुन घेतो.. याचं नाव आहे अविनाश सेन.. प. बंगाल मधुन मुंबईला खास मॅनेंजमेंट्ची डिग्री मिळवण्याकरता आलेला तरुण.. मुंबईत वन बीएचके फ्लॅट रेन्ट्वरुन घेऊन एकटाच राहणारा..
इतक्यातच, नायकच्या मागच्या बाकावर बसलेली एक नवतरुणी नायकाला 'हॅलो' म्हणते.. नायक देखील हसुन प्रतिसाद देतो.. हीच आपल्या कथेची नायिका... शर्वरी सुब्रमण्यम.. चेहरा टिपीकल दक्षिण भारतीय.. सावळा वर्ण.. मध्यम चणीची उंची आणि चेहर्यावर मात्र दिलखुलास आणि अफाट मनमोहक हास्य.. नायक मनातुन इम्प्रेस होतो, त्याला हवीहवीशी वाटणारी नायिका त्याला शर्वरीत दिसते.. पण सध्या तरी तो चेहर्यावर काहिच न दाखवता, प्राथमिक ओळखी वर समाधान मानतो.. आणि त्याच्या मित्रा सोबत चहाच्या टपरीवर रवाना होतो.. तिला देखील नायकाशी खरंतर पुढे बोलायचे असते, पण तास संपल्याने ती देखील तिच्या नवीनच झालेल्या मैत्रीणी सोबत कॅंटीनकडे जाते.. कॉलेजचा पहिला दिवस मावळतो.. आता पुढे काय होणार याची हळवी उत्सुकता दोघांच्याही मनाला लागलेली असते...
(क्रमश:)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8262
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
नावावरुन ही गुडी गुडी कथा
गणपाभौशी आपण सहमत आहोत... वर
In reply to नावावरुन ही गुडी गुडी कथा by गणपा
मस्त रे
आगदी सहमत बाकी वाट पहातोय...
In reply to मस्त रे by प्रचेतस
छान सुरुवात
त्याला वाटल असेल की
In reply to छान सुरुवात by शुचि
दाक्षिणात्यच!
In reply to त्याला वाटल असेल की by गणपा
हाहाहा .... मग कितव्या भागात
In reply to त्याला वाटल असेल की by गणपा
>>हाहाहा .... मग कितव्या
In reply to हाहाहा .... मग कितव्या भागात by शुचि
सिक्सर नाही.
In reply to >>हाहाहा .... मग कितव्या by सूड
गणपाभौ... तुम्ही तर इंटयाचा
In reply to त्याला वाटल असेल की by गणपा
आम्हाला इंट्याभाऊ आवडतात
In reply to गणपाभौ... तुम्ही तर इंटयाचा by धन्या
+१
In reply to आम्हाला इंट्याभाऊ आवडतात by शुचि
रे झिलां... तां आमकां ठाव
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
म्हणजे आता १०० नक्की
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
वाचतेय ...
चांगल लिहीलेस. वर्णन छान
चांगल लिहीलेस. वर्णन छान
In reply to चांगल लिहीलेस. वर्णन छान by जाई.
हँहँहँ
In reply to चांगल लिहीलेस. वर्णन छान by इंटरनेटस्नेही
वा रे वा
रुपारेलला बीएमएस आहे ही नवीन
पहिली बॅच
In reply to रुपारेलला बीएमएस आहे ही नवीन by कवितानागेश
काय कळं ना झालय राव! पुढे काय
नायकनायिकेस शुभेच्छा
अॅनिव्हर्सरीच्या का? लेखक
In reply to नायकनायिकेस शुभेच्छा by धनंजय
इंट्या!
इंटयाभौ, तुमचं आयुष्य ओपन बुक
In reply to इंट्या! by पैसा
+१
In reply to इंट्या! by पैसा
+२
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
आणि इंट्या लिहिता झाला, चला
अहो इंट्यास्वामी काही
त्वरित उत्तरे
In reply to अहो इंट्यास्वामी काही by माझीही शॅम्पेन
. . __/|\__ अरे मिपा
In reply to त्वरित उत्तरे by इंटरनेटस्नेही
ओ शॅम्पेनराव वर गणपाशेठचा
In reply to . . __/|\__ अरे मिपा by माझीही शॅम्पेन
अरे किस्ना , गणपा ने केल ते
In reply to ओ शॅम्पेनराव वर गणपाशेठचा by किसन शिंदे
सौदिंडीयन नायकिणीचं आपलं ते
In reply to . . __/|\__ अरे मिपा by माझीही शॅम्पेन
छान इन्टया येउ देत अजुन
?
''छान इन्टया येउ देत अजुन
असेच म्हणतो इंट्या ... अआणि
In reply to ''छान इन्टया येउ देत अजुन by ५० फक्त
इंट्या कूठं शिकलास रं लेखन करायला ?
आहा ! लव श्टोरी ! लव श्टोरी!