राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष की विसरभोळेपणा..?! :)
मिपावरील माझ्या सर्व जातीधर्माच्या मित्रमैत्रिणींनो,
सप्रेम नमस्कार वि वि,
आज तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १२ वा वर्धापनदिन. आपली राष्ट्रवादी १२ वर्षांची झाली हो..! त्यानिमित्ते शरदमामा पवारांचे अभिनंदन बर्र का! :)
या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज मुंबैत राष्ट्रवादीने 'सामाजिक हक्क परिषद..' या नावाने एक रॅली भरवली आहे. गेले काही दिवस रस्त्यावर काही ठिकाणी त्या संबंधीचे फलक पाहण्यात येत होते. त्या फलकावर शरदमामा पवारांसहीत राष्ट्रवादीच्या आजच्या बर्याच धुरीणांची चित्रे तर होतीच, शिवाय फलकाच्या सुरवातीलाच शिवछत्रपती, महात्मा फुले, डॉ आंबेडकर, शाहू महाराज यांचीही चित्रे टाकण्यात आली आहेत.
शिवछत्रपती तर आपले राष्टदैवतच होत. शिवाय महात्मा फुले, डॉ आंबेडकर, शाहू महाराज ह्या व्यक्तिही आपल्या आत्यंतिक आदराचीच स्थाने आहेत आणि नेहमीच राहतील. त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.
आज फुले-शाहू-आंबेडकर या त्रयीचे नाव सामाजिक सुधारणा, स्त्री-शिक्षण या विषयात प्रामुख्याने घेतले जाते, जी वस्तुस्थितीही आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या सामाजिक ह्क्क परिषदेच्या फलकावर या त्रयीची चित्रे असणे हे देखील औचित्याचेच आहे.
पण मग प्रश्न असा उरतो की समाज घडवण्यात, सुधारण्यात, तसेच विधवा-विवाह, स्त्री-शिक्षण या महत्वाच्या कार्यात गोपाळराव आगरकर, अण्णासाहेब कर्वे यांचा काहीच वाटा नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते का?
मला असे मुळीच म्हणायचे नाही की आगरकरांना किंवा महर्षी कर्व्यांना कुणा राष्ट्रवादीच्या फलकावर झळकण्याची काही गरज आहे. तरीही वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न इतकाच उरतो की यांचे फोटो अगदी हटकून न देणे हा राष्ट्रवादीचा ब्राह्म्णद्वेष आहे की याला सोयिस्कर विसरभोळेपणा म्हणायचे..?! :)
असो..
जमल्यास नोंदवा पाहू आपापली मते. नायतर द्या सोडून..! :)
आपला,
शरदतात्या अभ्यंकर.
मिसळपाववादी!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
शरदतात्या फुले-शाहू-आंबेडकर
क्या मॅनेजर तुम भी?????
फोटोंचं काय घेऊन बसलात
मला कळत नाही नेमक्या कुठल्या
अगदी अगदी!
मी ब्राम्हणांकडून श्राध्द/
हॅ हॅ हॅ!!!
धम्या लेका घड्याळात बघ्..सगळी
प्रायवेट लिमिटेड कंपनी.
"स्कार्पिओ" संस्कृतीचे
खरेय..
सावरकर
असरानिच्या जुन्या सिनेमाचे
हम कभि नहि सुधरेंगे.... अशा
अश्या नावाचा चित्रपट आहे.
फुकाची चर्चा
अहो तात्या..
ह्हांऽऽ....
बरोबर
आज धम्या एकदम फॉर्मात येऊन
र्हाऊ की !
आसं कसं?
विनोद
आता कसं मुद्द्याचं बोलल्लात
प्रयत्न?
पहिल्यांदाच असहमत
वेल वेल वेल....
मला
क्लास....####
सहमत
+/-
सहमत
हा
अखेर ते राजकारण आहे. मत
ह्म्म्म्म्म्म
पण, किती बामणं निवडणुकीत उभे
द्वेष
सोईस्कर विसरभोळेपणा!!. अगदी
.
ते जातीचे वाद नेऊन घाला...
जयराम रमेश यांची भेट
चला कुठे तरी आनंद आहे..
राष्ट्रवादी हा सोयीस्कर पक्ष
कालच्या मेळाव्यामुळे सायन -
पुण्याला कशाला ? "रागवल्याची
..
ते तात्याला म्हणलो की हो मी...
.
पवार तसे लै हुशार आहेत.