दोन लार्ज -एक सिमॉल ..
मी ज्या बारचा आश्रयदाता आहे त्या बारला फिफ्टी प्लस बार म्हणायला हरकत नाही.
इथे फारशी गर्दी नसते.माझ्या वयाची माणसं फक्त दारु पिण्यासाठीच येतात.
गप्पा नाहीत- बिझीनेस डील्स नाहीत.दारु पिणे आणि रिघणे.
वेटर दोन पेगचा कोटा एकदाच काय तो टेबलवर आणून ठेवतो आणि टिव्ही बघत बसतो.
संभाषणही फारसं काही नसतं .आठवड्यातून एकदाच एक प्रश्न विचारतो. उत्तर मिळालं की दुसर्या दिवशी शंका विचारतो.
पावणेअकराला चखण्याची डिश न विचारता उचलून ठेवतो.
अकराला दहा मिनीटे असताना बिल गोळा करतो .
अकरा वाजता रीक्षा बोलावतो.
अगदी घरच्यासारखं वातावरण आहे.
**************************************************
गेले काही दिवस मला वाटत होतं की वेटरला काहीतरी चर्चा करायची आहे .
घरच्या अनुभवानी मी इतकं नक्कीच शिकलो आहे की ज्याला चर्चा करायची असते त्यालाच सुरुवात करू द्यावी.
आपणच खोदून खोदून काही विचारणं म्हणजे नैतीक जबाबदारी वाढवण्यासारखं आहे.
शिवाय त्यामुळे बिलाच्या रकमेवर काहीच फरक पडणार नसतो.
काल नेहेमीपेक्षा एक स्मॉल जास्त मागवला तेव्हा त्यानी संधी साधून हळूच विचारलं ?
"साहेब ,न्यु नॉर्मल म्हणजे काय ?"
आता हा प्रश्न त्याच्याकडून अपेक्षीत नव्हताच . पण आजकाल कोण कुठलं चॅनेल बघून शाळेबाहेरचे शिक्षण घेतं हे काही कळत नाही. पण मी काही ताबडतोब दाद नाही दिली .
फक्त सांगीतलं "नविन ब्रँड असेल तर फुकटपण नको आहे."
अर्थात हे आपलं पन्नाशीनंतचं शहाणपण आहे.
"साहेब आय अॅम सिरीयस ."असं म्हटल्यावर मी त्याला विचारलं "तू हे ऐकलं कुठे ते सांग बाबा"
"आज नाही काही दिवसांपूर्वी एक रिझर्व बँकेच्या गवर्नर बाई महागाई बद्दल म्हणत होत्या की महागाईचा हा न्यु नॉर्मल आहे."
माझा हा एक्स्ट्रा स्मॉल होता. मी म्हटलं "महागाईचा न्यु नॉर्मल म्हणजे ज्याची अजून सवय झाली नाही असा. "
"मग तो नॉर्मल कसा ?"
"आता त्याच्याच सोबत रहायचं आहे म्हणून नॉर्मल."
"हे बघ नविन बनीयन घातल्यावर त्याचं लेबल कसं पाठीला टोचतं आणि काही धुण्यांनंतर नंतर त्याची सवय होते तसंच हे न्यु नॉर्मल."
खरं म्हणजे त्याला अगदी सगळं समजलं .त्यानी मान पण डोलावली.
आणि म्हणाला "गेल्या बुधवारी पण एक एक्स्ट्रा स्मॉल घेतला होता आजही घेतला म्हणजे आता ही तुमची न्यु नॉर्मलची सुरुवात म्हणायची का ?"
आता घरच्यासारखाच बार म्हणजे थोडा अगाऊपण सहन करावाच लागतो नाही का ?
***********************************************************
बर्याच वेळा सोप्या गोष्टी उगाचच कठीण करून लिहील्या जातात असं वाटल्यामुळे एक प्रयोग करावासा वाटला. प्रयोग म्हणून वाचून बघा. काही सूचना करा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आम्हाला हे ज्ञान इथे बसल्या
कधी?
हा हा हा
=)) =)) =))
न्यु नॉर्मल तुमची व्याख्या
मिपा
+१
-१
रेंज..
छान!
अच्छा
रामदासकाका,
झकास!
प्रयोग चांगला आहे. बाकी तुमचे
प्रयोग आवडला!
इंग्रजांनो, ही आमची मुंबई!
प्रयोग उत्तम आहे, रंगमंचावरील
उगीचच पाल्हाळ लावल्यासारखे
आवडलं, पण एवढा हुशार वेटर
फिफ्टी प्लस म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड..
आवडला
अजुन एक न्यु नॉर्मल आठवला
तंबी दुराईंच्या जवळ जाणारा
एकदम आवडेश.
न्यु नॉर्म्स
छान. बदलाची जाणीव करून
प्रयोग आवडला.
मस्त जमलाय