सॅम माणेकशॉ भाग-१
सॅम माणेकशॉ भाग-२
सॅम माणेकशॉ भाग-३
सॅम माणेकशॉ भाग-४
या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत 'सॅमबहादूर माणेकशॉ' यांच्याबद्दलचे अन्य पैलू.
सर्वप्रथम त्यांचे कुटुंब >>
(सॅम आणि सिल्लू)
फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचे वडिल श्री.होर्मुसजी खुद्द ब्रिटीश लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये कॅप्टन होते. सॅम यांना तीन भाऊ व दोन बहिणी. या सर्वांचा जन्म अमृतसरचा, पैकी फक्त फली हा भाऊ मुंबईत तर सॅमसह जान आणि जेमी हे अमृतसर येथील माध्यमिक शाळेनंतर नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये दाखल झाले, तर दोन्ही भगिनी त्याच जिल्ह्यातील मरी गावातील (आता पाकिस्तानात हे गाव गेले आहे) कॉलेजमध्ये दाखल झाल्या. सॅम हे कॉलेज जीवनात एक होतकरू टेनिस खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाले होते. १९३३ मध्ये तर डेहराडूनच्या मिलिटरी अॅकेडमीने त्यांना 'टेनिस ब्ल्यू' जर्सीने गौरविले होते. पुढच्याच वर्षी (१९३४) मध्ये मिलिटरी अधिकार्यांची पहिलीवहिली बॅच डेहराडून मिलिटरी अॅकेडमीमधून बाहेर पडली. [विशेष म्हणजे या पहिल्याच बॅचमधील तीन तरूण पुढे आपापल्या देशाचे 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' झाले....एक अर्थातच सॅम माणेकशॉ, दुसरे जनरल मोहम्मद मुसा, पाकिस्तान आणि तिसरे जनरल ड्युन स्मिथ, ब्रह्मदेश].
(दोन कन्या > शेरी आणि माया समवेत)
१९३७ मध्ये सॅम लाहोर बेसमध्ये ड्युटीवर असताना त्याना आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या कर्नलचे एका घरगुती कार्यक्रमाला हजर राहण्याचे आमंत्रण मिळाले. कर्नलच्या पत्नीची मुंबईत राहणारी आणि एलफिन्स्टन कॉलेजची ग्रॅज्युएट असलेली व त्यानंतर जे.जे. मध्ये कलाशाखेची विद्यार्थीनी असलेली 'सिल्लू' नावाची पारसी बहिणही त्या पार्टीला हजर होती. सॅम आणि सिल्लूची ओळख झाली, ओळखीचे प्रेमात आणि मग तो सिलसिला वर्षदीड्वर्ष चालू राहिल्यानंतर २२ एप्रिल १९३९ रोजी सिल्लू सौ.सॅम माणेकशॉ बनल्या....ते पुढील ६१ वर्षाची अखंड साथ देण्यासाठी. सिल्लू यांचे वैशिष्ट्य म्हणजे सॅमच्या पहिल्या लेफ्टनंटच्या रॅन्कपासून अखेरच्या त्या फिल्ड मार्शलच्या पदापर्यंत त्या नित्याच्या 'गृहिणी'च राहिल्या. साध्या सैनिकाच्या बायकामुलांमध्ये त्या रमत आणि सॅमना काही सल्ला द्यायचा असेल तो घरातील चार भिंतीच्या आतच. फक्त 'जवान फंडा' साठी बाहेर पडायचे असेल तरच त्याना आपली ओळख जनरल माणेकशॉ यांच्या पत्नी अशी करून दिली तर चालत असेल, अन्यथा त्या अखेरपर्यंत साधे सरळ जीवन जगल्या.
माणेकशॉ जोडीला दोन मुली झाल्या. पहिली 'शेरी' ११ जानेवारी १९४० तर दुसरी माया (मात्र नावाचे स्पेलिंग Maja असे होते.) २४ सप्टेंबर १९४५. शेरी यांनी आपली करीअर एअर इंडियाशी निगडीत ठेवली व तिथूनच त्या शेवटी निवृत्त झाल्या. त्यांचे पती श्री.डिंकी बाटलीवाला 'स्वीस एअर लाईन्स'च्या सेवेत होते. दोघेही आता चेन्नई येथे निवृत्तीनंतरचे आयुष्य व्यतीत करत आहेत. यांना एकमेव मुलगी जी सध्या कॅनडा येथील वास्तव्यास आहे. दुसरी कन्या 'माया' ही ब्रिटीश एअरवेजमध्ये काम करत होती आणि तिची भेट झाली एअर इंडियात इंजिनिअर असलेल्या धुन दारुवाला यांच्याशी. दोघानी विवाह केला आणि माया यांनी एअरवेजमधील नोकरी सोडून लंडनच्या लॉ कॉलेजमध्ये शिक्षण सुरु केले. तिथून त्या बॅरिस्टर झाल्या आणि सध्या त्या दिल्लीत 'मानवाधिकार समिती'चे काम पाहतात. या जोडप्याला रौल आणि जेहान ही दोन मुले. जेहान हा नातू आपले आजोबा माणेकशॉ यांच्याकडेच लहानाचा मोठा झाला पण असे असूनही सॅमनी त्याचा कलाक्षेत्राकडील कल पाहून मिलिटरीत जाण्याचा आग्रह धरला नाही. जेहान आजकाल थिएटर ग्रुप अॅक्टिव्हिटीशी फार निगडीत आहे. [आमीर खान, आशुतोष गोवारीकर, किरण राव, किट्टू गिडवानी आदी त्याचे निकटचे मित्रमंडळ आहे].
(नातू जेहान, सॅमचे निकटचे मित्र निवृत्त एअर चीफ मार्शल अर्जुन सिंग यांच्यासमवेत)
सॅम स्वभाव >
सर्वसाधारणतः जसे मानले जाते की, पारशी व्यक्ती अतिशय बोलघेवडी असते आणि कायम हास्यविनोदात मग्न. आपल्या मराठी साहित्यातही कुठल्याही साहित्यिकाने 'गंभीर पारशी' रंगविलेला नाही....(ठळक उदाहरण : पु.लं.चा भन्नाट सोकरजी त्रिलोकेकर..."इथं सालं आमाला मराठी येत नाही. साला भरडामदी तर सगळं मिडिअम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश होती... मदे नको हेकलिंग करू...साला भर्डाचा स्टुडंट.."); तर खुद्द सॅमदेखील या स्वभावापासून अजिबात दूर गेले नाहीत. त्यांचे आजवरचे जितके फोटो प्रसिध्द झाले आहेत ते सगळे हसर्या चेहर्याचेच. त्यांच्या चेहर्यावर वार्धक्याच्या खुणा दिसल्या त्या केवळ सिल्लू गेल्यानंतरच.
युद्ध चालू आहे तो पर्यंतच शत्रू. एकदा शस्त्रसंधी झाली की, आपल्या सैन्याच्या अधिकार्यांना आणि सैनिकाना जो आदर प्रेम, तेच शत्रूपक्षाला देखील...हा स्वभाव. भारतीय सैन्यापुढे नियाझी गुढघे टेकणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या सुमारे एक लाख सैन्याला रेडिओवरून संबोधिताना सॅम माणेकशॉ म्हणाले होते, "तुम्हाला मी शस्त्रे खाली ठेवा असे आवाहन करीत आहे. लक्षात ठेवा, सैनिकाने सैनिकाला शस्त्र परत करण्यात कसलीही मानहानी नसते. मी तुम्हाला खात्री देतो की, तुमच्याशी एक सैनिक या नात्यानेच माझे वर्तन राहील..." याचा परिणाम नक्कीच झाला. ढाक्याच्या शरणागतीनंतर सुमारे ९०,००० पाकिस्तानी सैनिकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यासाठी त्यांनी रेल्वे खात्याचे हार्दिक सहकार्य घेतले. कलकत्याहून दिल्लीला आलेली युध्दकैद्यांची पहिली ट्रेन पाहण्यासाठी खुद्द जनरल माणेकशॉ रेल्वे स्टेशनवर आले होते. दोनतीन बोगीत असलेल्या पाक सैनिकासमवेत त्यांनी हस्तांदोलन करून त्यांच्यासमवेत चहाही घेतला. त्या कारवाँचे प्रमुख मेजर जनरल व्ही.के.सिंग यांनी आपल्या 'लीडरशीप इन दि इंडियन आर्मी' या पुस्तका नोंदविले आहे, की सॅमबहादुरांची हस्तांदोलनाची ती दिलखुलास छबी पाहून ते पाकिस्ताने सैनिक अक्षरश: भारावून गेले, म्हणत असतील 'सेनाधिकारी असावा तर असा..!"
(सॅम यांचा विरंगुळा)
भाषणबाजीची त्यांना अजिबात सवय नव्हती. ज्या शेरवूड कॉलेजमध्ये विद्यार्थीजीवनातील सुंदर काळ त्यांनी व्यतीत केला, त्याच्या एका कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनरल सॅमबहादुरना निमंत्रीत करण्यात आले होते. ते थोडके भाषण इंग्लिशमधुनच वाचण्याची खुमारी आहे.
"Your Grace, the Metropolitan of India, My Lord Bishop of Lucknow, Mr. Principal, ladies and young gentlemen of Sherwood:
Yesterday evening when my A.D.C. told me that I would have to speak here, I was horrified. I thought the Principal had asked me to come and join the celebrations; I did not realize he wanted me to sing for my supper! Believe me, as I stand here, I am terrified. Those near me can almost hear my knees knocking and my teeth chattering. For eight years in Sherwood, I was at the receiving end. It is customary on these occasions for the guest speaker to give a learned discourse or advice to young gentlemen. It is not my fault that, although I received my early education in Sherwood, I am not learned. Sir, I am fit neither to give you a learned discourse nor advice."
(काही महत्वाच्या टप्प्यांचे सचित्र वर्णन)
अशा सॅमना 'गुरखा रेजिमेंट' चे फार कौतुक असे. अशा रेजिमेंटचे कमांडंट बनणारे ते पहिले नॉन-गुरखा ऑफिसर होते. या रेजिमेंट्च्या सैनिकांच्या धाडसाचे त्यांना अतिशय कौतुक असायचे. "मी मरणाला भीत नाही असे म्हणणारी व्यक्ती एक तर खोटारडी असली पाहिजे नाहीतर गुरखा सैनिक..." असे त्यांचे मत होते. आपल्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आठवणीने त्यांना गुरखा रेजिमेंटने दिलेली कुकरीच वापरण्याची आठवण आपल्या नातवंडांना ते करत असत. गुरख्यांवरील त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून पुढे त्यांनी नेपाळ सरकारने ऑनररी जनरल ऑफ नेपाळ आर्मी ही पदवी दिली. असा मान मिळालेले ते पहिलेच गैरनेपाळी लष्करी अधिकारी होते.
निवृतीनंतर ते कुन्नूरच्या टी-गार्डेनमध्ये फार रमले होते. तिथेच त्यानी पुढील पस्तीस वर्षे काढली. त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले अनेक अधिकारी सुट्टीच्या काळात त्यांनी भेटायला येत असत. त्यांच्यासमवेत पतीपत्नीचा वेळ छान जाई. टेनिस सोडल्यास अन्य क्रिडाप्रकाराकडे त्यांनी लक्ष दिले नव्हते. पण टेबल गेमपैकी ब्रिज प्रेमी होते आणि सिल्लू अर्थातच तिथेही पार्टनर होत्याच. त्या कोकाकोला किंवा वाईन घेत तर सॅम ग्राऊज या स्कॉच व्हिस्कीचे भोक्ते होते. त्यांचे चेले कर्नल राकेश मॅगन याना बीअर देत असताना कर्नल यांनी मुलींच्या नावाबद्दल सहज छेडले : 'तुम्ही तुमच्या मुलीचे नाव शेरी असे जे ठेवले ते अशाच एका ब्रॅण्डच्या संदर्भात का?" यावर खळखळून हसत सॅम उत्तरले, 'असेलही, पण बघ, तिने प्रेम केले तेही एका 'बाटलीवाल्या' बरोबर, ते तर मी सांगितले नव्हते...आणि दोघांनी आपल्या एकुलत्या एक लेकीचे लाडाने नाव ठेवले आहे 'ब्रॅन्डी'... पुढे तर मायाने लग्न केले ते एका 'दारुवाल्या' बरोबर. बोल आता?"
हजरजबाबी तर ते पहिल्या नंबरचे होते. कुन्नुर येथे भेटायला आलेल्या स्टाफ अॅकेडमीच्या एका कमांडटने त्यांना एकदा सांगितले, "सर, मला अॅकेडमीमध्ये खूप मान मिळत आहे सध्या...कारण सैनिक समजतात माझे व्यक्तिमत्व तुमच्यासारखेच आहे." सॅमनी हसून उत्तर दिले, "नो वंडर, तुझ्या बायकोने तुलाच नवरा म्हणून निवडले."
अशाच काही सेनाधिकार्यांसमवेत चहापानाच्या वेळी सिल्लूही सामील झाल्या होत्या त्यावेळी सॅमच्या वाढत्या घोरण्याविषयी सिल्लू हसतहसत तक्रार करीत होत्या व सॅमचे घोरणे कमी झाले नाही तर मी आजपासून दुसर्या खोलीत झोपायला जाणार, असा निर्णय जाहीर केला. यावर सर्वांसमोर सॅम चेहरा चिंताग्रस्त करून म्हणाले, 'च्यामारी, बाकीच्या बायकांनी अजून तक्रार केली नाही, हीच का करत्ये?"
अशी ही ६४ वर्षे साथ देणारी मैत्रीण असणारी पत्नी 'सिल्लू' त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतरच खर्या अर्थाने सॅम माणेकशॉ कुन्नुरच्या घरी एकटे उरले. मात्र पुढे आजारपण आणि वृध्दत्व यामुळे जरी ते थकले असले तरी वैयक्तीक टापटीप सातत्याने जपली होती. रोजची दाढीची त्यांची सवय डेहराडून मिलिटरी अॅकेडमीपासून चालू झाली होती ती अखेरपर्यंत. सदैव चकचकीत चेहरा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची खासियत बनली होती. अनेक कार्यक्रमांना ते प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहत. मात्र ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी सकाळी दाढी केली असली तरी संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यापूर्वीदेखील परत एकदा दाढी ते करणारच. तीच गोष्ट कपड्यांचीही. सैनिकी जीवनातल्या अगदी पहिल्या दिवसापासून आयुष्याचा अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी व्यवस्थितपणा कटाक्षाने पाळला.
(आपलाच 'इतिहास' पाहताना सॅम)
मानसन्मान
१९६८ : पद्मभूषण, १९७२ : पद्मविभूषण, पोस्टाचे तिकिट
मिलिटरीच्या बॅण्ड पथकाकडून त्यांच्या सन्मानार्थ 'सॅम माणेकशॉ' ही मार्चिंग ट्यून तयार करण्यात आली आहे. जी इथे खाली देत आहे. या चित्रफितीत सॅमसाहेबांचे अनेक प्रसंगातील स्टील फोटोग्राफ्स आहेत, पण मुख्य म्हणजे ती खास धून आपण ऐकावीच; जी त्यांच्याच गुरखा रेजिमेंटच्या श्री.एल.बी.गुरंग या लीडरने तयार केली आहे.
सेनाधिकारी येतात, जातात.... पण १९७३ मध्ये निवृत्त झालेल्या एका 'हाडाच्या' सैनिकाची आज जवळपास ४० वर्षानंतरदेखील आठवण सातत्याने भारतीय सैन्याच्या आणि सामान्य नागरिकांच्या मनात आहे; हे त्यांच्या कर्तृत्वाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. देशातील सर्वसामान्य जनतेला "फिल्ड मार्शल सॅमबहादूर होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ'' या नावाचा कधीच विसर पडू नये.
(लेखमाला समाप्त....मालेतील सर्व लेखांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच मुद्दाम खरडीद्वारे प्रोत्साहन दिलेल्या सुह्रदांचे मनःपूर्वक आभार !!)
इन्द्रा

प्रतिक्रिया
...
छान
हेच म्हणतो..
हेच म्हणतो
सुंदर मागोवा. आलेल्या अभ्यासू
फार सुंदर
माहिती...
सुंदर लेखन!
+१
+१
वस्तुनिष्ठ
छानच. आता नवीन प्रकल्प घ्या
नाही
त्याला पेस्तनकाका म्हणायचे आहे!
सोकरजी त्रिलोकेकर
छान लेखमाला.
इंद्रा, आभारी आहे.
+१ सहमत
अतिशय सुरेख लेखमाला. अशाच
पुर्ण लेखमाला वाचुन मगच
एक नंबर !!
मस्त झाली ही लेखमाला. खूप
माहितीपूर्ण लेखमाला
हेच
छान
आज
छान लेखमाला
घटनाक्रम
अप्रतिम! संपूर्ण लेखमाला
अप्रतिम! संपूर्ण लेखमाला अतिशय राजबिंडी झाली आहे..सॅमबहादूरांप्र
सुरेख लेखमाला!
ज्याचे श्रेय त्याला देण्याचे माणेकशाँचे मोठेपण उठून दिसते
स्टार्ट विथ 'आय थिंक....".
धन्यवाद
सर्वांगसुंदर
कडक मानवंदना ......
सुरेख लेखन...
कडक सॅल्युट....
सुंदर लेखमालिका... एका बैठकीत
खुप सुरेख लेख इन्द्रा
खुप छान आणि माहितीपुर्ण
लेखमाला खुप आवडली
सॅम बहादूर यांचे एक भाषण