निवृत्तीवेतन, अवहेलना....एका फिल्ड मार्शलची
सॅम माणेकशॉ भाग-१
सॅम माणेकशॉ भाग-२
सॅम माणेकशॉ भाग-३
फिल्ड मार्शल पदाचे पेन्शन प्रकरण >
आर्मीच्या 'चीफ ऑफ स्टाफ' या हुद्द्यावरून सेवानिवृत्ती घेण्यास केवळ १३ दिवस राहिले असताना मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांनी सॅम माणेकशॉ याना "ऑनररी फिल्ड मार्शल' पदाचा दंड [बॅटन] एका कार्यक्रमात दिला. श्री.राममोहन राव हे [आर्मीचे पीआरओ असल्याने] या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रपती भवनाच्या नागरी अधिकार्याला भेटले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, हा कार्यक्रम साध्यारितीने करावा व प्रेसला निमंत्रीत करू नये. श्री.राव यांना हा धक्काच होता. देशातील पहिलेवहिले फिल्ड मार्शल, एक वॉरहीरो, आणि त्या अनोख्या पदाची चिन्हे खुद्द राष्ट्रपती देत असताना प्रेसला बोलाविण्याची आवश्यकता नाही अशा तर्हेची मानसिकता दिल्लीतील नोकरशहांना का होती हे अनाकलनीयच होते. सुदैवाने नेमक्या त्याचवेळी श्री.राव यांचे वरिष्ठ कर्नल लॉन्गर हे कॅबिनेट सेक्रेटरीपदी रूजू झाल्याने आणि ब्युरो चीफ रजेवर गेल्याने त्यांच्याकडेच या कार्यक्रमाच्या नियोजनाची अंतीम जबाबदारी आली. त्यांनी तात्काळ राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी श्री.अब्दुल हमीद यांची भेट घेतली व या प्रथमच होत असलेल्या कार्यक्रमाचे प्रसिद्धीच्यादृष्टीने किती महत्व आहे ही बाब त्यांच्या गळी उतरविली जिला श्री.हमीद यांनी मंजुरी दिली व मग त्यांच्याच पुढाकाराने 'फिल्ड मार्शल' पदाची चिन्हे आणि बॅटन देण्याचा कार्यक्रम झगमगाटात पार पडला जो राष्ट्रीय पातळीवरील सर्व वर्तमानपत्रातून प्रकाशित केला गेला. साहजिकच पुढे या 'प्रसिद्धी'बद्दल श्री.राव यांच्याकडे खुलासा मागण्यात आला, त्यावेळी त्यांनी ती सर्व तयारी खुद्द राष्ट्रपती भवनातून करण्यात आली असल्याचे प्रकटन केले.
'फिल्ड मार्शल' तर झाले, पण अजून 'ऑर्डर ऑफ प्रेफरन्स' निश्चित व्हायचे होते, व साहजिकच त्यामुळे या पदाची वेतनश्रेणी झाली नव्हती. सॅमना सांगण्यात आले होते की, त्या पदासाठी कोणतेही स्पेशल पे नाही, मात्र संकल्पनेनुसार ते या पदावर आयुष्याच्या अखेरपर्यंत राहू शकतात आणि त्याचे वेतन त्यांना मिळेल. पण केव्हा? ते नक्की झाल्यानंतर. आता नक्की केव्हा होणार ते नोकरशाहीवर अवलंबून असल्याने तात्पुरते म्हणून 'जनरल' पदाला लागू असलेले रुपये १२००/- (होय त्याकाळी देशाच्या लष्कर प्रमुखाला निवृत्तीवेतन म्हणून १२०० रुपये मिळत + भत्ते) व फिल्ड मार्शल झाले म्हणून १००/- जादा; असे एकदाचे रु.१३००/- मंजूर झाले मात्र ते पद ऑनररी असल्याने त्याला कोणतेही भत्ते इतकेच काय 'फिल्ड मार्शल' म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला हजर रहायचे झाल्यास मिलिटरी कारचीदेखील सुविधा नव्हती. तरीही पुढे केव्हातरी फिल्ड मार्शल पदाची वेतनश्रेणी निश्चित झाल्यानंतर आपणास फरकासह सरकार रक्कम देईल असा सॅमना विश्वास होता आणि रितसर जनरल गोपाल बेवूर यांच्याकडे पदाची सूत्रे देवून त्यांनी दिल्ली सोडली व कुन्नुर, तमिलनाडू येथे वास्तव्यास आले. १९७३ साली घेतलेले १३००/- चे तुटपुंजे वेतन आणि श्रेणी सुधारेल म्हणून वाट पाहणार्या सॅमना प्रत्यक्ष त्याचे फळ मिळण्यासाठी आक्टोबर २००७ ची वाट पाहावी लागली अन् तेही राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी त्यांच्या वेतनाच्या प्रश्नात वैयक्तीक लक्ष घातले म्हणून. त्यांना संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी उटीच्या दवाख्यान्यात जाऊन रु.१.१६ कोटीचा ३४ वर्षाचा फरकासहीतचा चेक दिला...त्यावेळी सॅम माणेकशॉ यांचे आयुष्य राहिले होते ८ महिने. (श्री.राव - दुवा)
(आपापल्या क्षेत्रातील दोन जाणकार....)
जरी ते या ना त्या निमित्ताने समाजजीवनाशी संलग्न राहिले तरी त्यांची कामकाजातील उपस्थिती 'नोकरशहा' ना खुपसत होतीच. विशेषत: ते ज्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी एक होते त्या एस्कॉर्टच्या प्रश्नावरून त्यांची आणि स्वराज पॉलशी सातत्याने खटके उडत असत. आपल्या भाषणात ते देशाच्या राजकारणाविषयी ज्या पातळीवर बोलत त्याबद्दल राजकारण्यांनी सेवानिवृतीनंतर त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणांतील टीकाटिपण्यांची लक्तरे काढली व त्यांच्यापासून दूर राहणेच पसंद केले. फिल्ड मार्शल माणेकशॉ खरे तर दोनतीन वक्तव्यामुळे अडचणीत आले होते पण ती वक्तव्ये त्यांच्या मजेदार पारसी स्वभावाला अनुसरून होती. एक होते "लंडन" माझे सर्वात आवडते शहर आहे. तर एकदा 'दिल्लीतील राजकारणी आणि सैन्य" यावर त्यांनी भाष्य केले, जे थोडक्यात इंग्लिशमधून वाचणे योग्य होईल “I wonder whether those of our political masters who have been put in charge of the defence of the country can distinguish a mortar from a motor; a guerrilla from a gorilla — although a great many of them in the past have resembled the latter.” ~ हे दिल्लीकरांना फार झोंबले गेले. ~ असला शेरा तर राजकारण्यांनाच काय तर सर्वसामान्य नोकरशाहीलाही पचनी पडणार नव्हता. पाकिस्तानचे भूतपूर्व अध्यक्ष जनरल याह्याखान यांनी दुसर्या महायुद्धाच्या काळात सॅम माणेकशॉ यांच्या हाताखाली 'कर्नल' पदावर काम केले होते. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर फाळणीवेळी मिलिटरीचीदेखील फाळणी झाली होती व कर्नल याह्याखान यांनी १९४८ ला जनरल माणेकशॉ यांचा निरोप घेतला व लाहोरला निघाले. त्यावेळी माणेकशॉ यांच्याकडे एक ब्रिटीश मेक बुलीट [टू व्हीलर] होती, तिच्यावर याह्याखान यांचे फार प्रेम होते. सॅम माणेकशॉ यांची पुढील लखलखती कारकिर्द पाहता ते आता एकट्याने बुलीट वरून फिरू शकणार नाहीत म्हणून याह्यांनी ती त्यांच्याकडे विकत मागितली व तो व्यवहार रुपये एक हजाराला ठरला. लाहोरला पोहोचल्यावर पैसे पाठवून देतो असे याह्या खान यानी वचन दिले, पण जे त्यांनी कधीच पाळले नाही. अर्थात सॅम माणेकशॉ यांनीही ते नुकसान फारसे मनाला लावून घेतले नाही. मात्र १९७१ च्या पूर्व पाकिस्तान विजयाच्यावेळी कुठेतरी खाजगीत काढलेल्या 'याह्याने माझे हजार रुपये दिले नाहीत, पण जाऊ दे, त्याच्याकडून निम्मे पाकिस्तानतरी मिळविले...." या वाक्यानेदेखील बरेचसे वादळ उठले होते. आता असली वाक्ये कधीही गंभीरपणे घ्यायची नसतात आणि ते स्वतःही हे सर्व गमतीने चालले होते असेच समजून चालले होते, पण हे विचार दिल्लीने कधीच समजून घेतले नाही व २७ जून २००८ रोजीच्या त्यांच्या निधनाच्या वार्तेवर दिल्लीकरांकडून जणू काही अलिखित बहिष्कारच घातला गेला. देशाच्या पहिल्यावहिल्या 'फिल्ड मार्शल' च्या अंत्ययात्रेसाठी सैन्यदलाचे सुप्रीम कमांडर या नात्याने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हजर राहणे अपेक्षीत होते पण त्यानी ते टाळले. त्या गेल्या नाहीत म्हणून उपराष्ट्रपती हमीद अन्सारीदेखील दिल्लीतच राहिले. पंतप्रधान मनमोहनसिंग, गैरहजर, सोनिया गांधीशी (राजीवमुळे) घरगुती संबंध, पण त्याही गैरहजर. ही झाली सत्ताधार्यांची गोष्ट, दुसरीकडे लालकृष्ण अडवाणीही गैरहजर. ज्या तमीळनाडू राज्याला माणेकशॉ यांनी आपले घर मानले व जिथे ते ३५ वर्षे राहिले त्या राज्याचे मुख्यमंत्री एम.करूणानिधी तसेच राज्यपाल सुरजितसिंग बर्नाला...गैरहजर. हे एकवेळ मान्य करू, पण त्या दिवशी तिन्ही दलाचे (पायदल, वायुदल, नाविकदल) प्रमुखदेखील अंत्ययात्रेला आले नाहीत....यापेक्षा दुसरी क्लेशदायक उपेक्षा कोणती असेल.
(अंत्ययात्रेतील काही दृश्ये)
अवहेलना >>
पण या सर्वाहून त्यांची अवहेलना कुणी केली असेल (अन तीदेखील सॅम माणेकशॉ यांनी नव्वदी पार केल्यानंतर).....ती सीएनएन आयबीएनचे एक प्रसिध्द समालोचक पत्रकार 'श्री.करण थापर' यांनी. यांचा एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे टीव्हीवर - 'डेव्हिल्स अॅडव्होकेट' या नावाने. यातले खरे तर 'डेव्हिल' हे करण थापरच आहेत जे आजतकच्या श्री.प्रभु चावला यांच्या हातावर हात मारतील, आगाऊपणात.
झाले असे ~~
१९६५ च्या युध्दात सणसणीत मार खाल्ल्यावर जनरल आयुब खानची पाकिस्तानात जी नाचक्की झाली ती अर्थात स्वाभाविकच होती. या पराभवानंतर ते खचले व त्यांची कारकिर्दच संपुष्टात आली. अयुबखानचे चिरंजीव गोहरखान राजकारणात उतरले व पुढे काही काळ पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीही झाले होते व यांनी आपल्याला आपल्या वडिलांनी पर्सनल डायरीच्या आधारे सांगितलेल्या आठवणीवर सन २००७ मध्ये "Glimpses into Corridors of Power' या नावाचे पुस्तक लिहिण्याचा मनसुबा जाहीर केला होता. यामध्ये १९६५ च्या युध्दादरम्यान एका भारतीय ब्रिगेडियरने आपल्या वडिलांना {जनरल आयुब खान} पं.जवाहरलाल नेहरू यांच्या टेबलवर जाण्यापूर्वी भारतीय लष्कर पाकवर करणार असलेल्या चढाईचा प्लॅन वीस हजार रुपयाला विकल्याची नोंद असल्याचे जाहीर केले. आता या दीडदमडीच्या गोहरखानला हे नक्की माहित होते की असली काहीतरी भंपक विधाने करून रान उठविल्याखेरीज मिडिया आपल्या पुस्तकाकडे लक्ष देणार नाही....आणि झालेही अगदी तसेच....त्यातही झाले ते पाकिस्तानच्या मिडिया वर्तुळात नव्हे तर आपल्या भारताच्या, प्रसिद्धीची जबरदस्त खाज असलेल्या 'करण थापर' नामक 'डेव्हिल्स अॅडव्होकेट'च्या अँकरमनला....आयबीएन न्यूज चॅनेलला.
७ मे २००७ रोजी 'करण थापर' याने गोहरखानचा आयबीएन वर प्रदीर्घ असा इंटरव्हू घेतला. प्रभु चावला जसे अंगावर आल्यासारखे करतात तसेच वारंवार करण या गोहरखानाला 'तुम्ही त्या ब्रिगेडियरचे नाव सांगा, ज्याने वीस हजार रुपयाला तुमच्या वडिलांना संरक्षण दलाचे नकाशे पोच केले...". गोहर नाव सांगायला अजिबात तयार नाही...ते पुटपुटत होते, 'वडिलांच्या डायरीत एक लष्करी अधिकारी अशीच नोंद आहे...". यावर गप्प राहिल तो करण थापर कसला? त्याने तर थेट आरोपच केला की डायरीत ज्या अधिकार्याच्या शरीरयष्टीचे वर्णन आहे असे सांगितले जाते, ते वर्णन एकाच लष्करी अधिकार्याला फिट्ट बसते, आणि ते म्हणजे 'सॅम माणेकशॉ'..... होय की नाही ? याला उत्तर म्हणून गोहर खान म्हणतात, 'हे तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही..." तरीही करणचे तेल ओतणे काही थांबेना. जो लष्करी अधिकारी सन १९४९ पासून पंतप्रधानापासून मिलिटरीतील शेवटच्या सैनिकाच्या, तसेच देशाच्या गळ्यातील ताईत बनला आहे, तो अधिकारी वीस हजारांसारख्या क्षुद्र रकमेसाठी भारतमातेच्या सैन्यदलाच्या चढाईचे रहस्य अयुब खानसारख्या शत्रूला विकेल यावर कुणाचा विश्वास बसेल..?
पण श्रीयुत करण थापर यांचा होता.... त्याला कारण आहे एक 'सूडाची भावना'.... जी करणने जोपासली होती आपल्या मनी. या करण थापरचे वडील म्हणजेच ते संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांचे 'फाईन्ड' जनरल पी.एन.थापर, ज्याना ले.जनरल एस.पी.पी.थोरात यांची वरिष्ठता डावलून मेनन यांनी 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' केले होते व जे नंतर खुद्द मेनन यांचे उजवे हात ले.जनरल कौल यांच्या हातातील खेळणे बनले होते. १९६२ च्या चीन आक्रमणाच्यावेळी जनरल थापर यांची सेनानायक म्हणून काय महती होती ते सगळ्या देशाला कळाले होतेच आणि कौलसारखी अशी व्यक्ती की जिने उभ्या आयुष्यात कधीही प्रत्यक्ष रणभूमीवर पाय टाकले नव्हते, अशा नेमणुकांना ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांचे नेतेपण सॅम माणेकशॉ यांच्याकडे आले होते. थापर काय किंवा कौल काय ही दोन्ही घराणी दिल्लीची आणि मूळ दिल्लीत असले की दिल्लीतील नोकरशाहीदेखील कशी ताब्यात ठेवता येते याचेही धडे यांच्या पुढील पिढीने गिरविलेले असतातच. आपल्या वडिलांचा त्यांच्या सेवेत झालेला अपमान हा 'करण थापर' यांच्या मनी खदखदत असणारच, मग त्यांच्या दृष्टीने गोहर खान यांच्या पुस्तकाच्या रुपाने सॅम माणेकशॉ यांच्यावर चिखलफेक करायची संधी जर आयतीच चालून आली आहे तर ती एक मिडिया अँकर या नात्याने ती वाया का घालवायची?
मुलाखात झाली ७ मे २००७ रोजी....त्यावेळी सॅम माणेकशॉ ९३ वर्षाचे होते....उटीच्या इस्पितळात अखेरच्या घटका मोजत.....ते काय खुलासा करणार अशा आरोपावर? आणि मुळात देशाला तसल्या खुलाशाची गरजच नव्हती, इतका हास्यास्पद आरोप...अन तोही एक पाकिस्तानी करतोय ! पण करण थापर यांनी या निमित्ताने का होईना राळ उठवून घेतलीच.
(गोहर-करण दुवा)
श्री.कुलदीप नायर यांच्या 'इंडिया आफ्टर नेहरू' या पुस्तकात खुद्द जनरल पी.एन.थापर यांनी श्री.नायर यांनी 'आपल्याला मेनन यांनी कशी वाईट वागणूक दिली आणि १९६२ च्या पराभवाचा मला एकट्यालाच बकरा कसा केला' हे सांगताना एकदाही माणेकशॉ यांचा उल्लेख केलेला नाही.
अर्थात केवळ जनरल थापरच काय तर देशाला त्या पराभवानंतर कृष्ण मेननही नको होते, ज्यांना अजूनही नेहरूंचे छत्र होतेच. पं.नेहरूंनी जन.थापर यांना पुढे केव्हातरी आपली बाजू मांडण्याची संधी देतो असे आश्वासन दिले जे कधीच प्रत्यक्षात उतरले नाही व थापर यांनी उर्वरीत आयुष्य त्याच मानहानीत काढावे लागले. त्यांचेच मित्र आणि डेप्युटी जनरल बालमुकुंद कौल यांचीही त्याचवेळी इस्टर्न कमांडच्या प्रमुख पदावरून गच्छंती झाली आणि नेहरूंनी त्याना वाटलेल्या एकमेव कर्तबगार अधिकार्याची त्या पदावर, मेनन यांचा विरोध धुडकावून लावून, नियुक्ती केली ते अधिकारी म्हणजे 'सॅम माणेकशॉ'. आपले वडिल पी.एन.थापर आणि वडिलांचे मित्र जन.कौल या दोघांच्या बेअब्रुला प्रामुख्याने जबाबदार कोण तर ते सॅम माणेकशॉ, हीच अढी मनात ठेवून श्री.करण थापर यांनी पाकिस्तानच्या गोहरखानला 'प्लॅन विकू इच्छिणारा तो अधिकारी म्हणजे सॅम माणेकशॉच' असे नाव घेण्याचा वारंवार आग्रह केला....पण गोहरखान एकच तबकडी वाजवत राहिले..."ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही."
आपल्या देशाचे सुदैव इतकेच की, यातून काहीही निष्पण्ण झाले नाही वा तशी मुलाखात झाली म्हणून कुणी चौकशी समिती नेमायची मागणीही केली नाही....याला कारण म्हणजे "फिल्ड मार्शल सॅमबहादूर माणेकशॉ" या नावाने देशभरात मिळविलेला आदर आणि त्या नावाप्रती असलेले प्रचंड प्रेम.
(फिल्ड मार्शल सॅमबहादूर माणेकशॉ यांची स्वाक्षरी)
इन्द्रा
(शेवटच्या भागात >> कुटुंब आणि सॅमसाहेबांच्या आठवणी)

प्रतिक्रिया
लेख आवडला. पण लेख
तटस्थता....!
उत्तम लेखमाला
नोकरशाही स्वतः निर्णय घेऊ शकत
सुंदर लेखन इंद्रदा. पुभाप्र.
छान लेख.. कलाम व माणकेशाँच्या
हाही भाग छान झालाय. माझ्यामते
( पण
न्यायाचा मुद्दा
सगळ्यामध्ये एक मुद्दा विसरला
हे पद देताना कोणतेही जादा
उत्तम
सहमत..! तात्या. -- प्रसिद्ध
इन्ग्लिश मिडिया आणि 'अँकर्स' ह्यांना ....
हल्ली जर्नॅलिझमच्या कोर्स
वॉशिंग्टनची कुर्हाड
वाचतोय....
.
वाचतोय
विभूतीपूजन
+
अलिप्तता आणि भावना
समजून घेतले आहे
वाचनिय लेखमाला.
वाचत आहे
भाग छान
+१
हेच म्हणतो
थिंक टँक ...
अति-अवांतर
सरदार पटेलांचा सल्ला ...
माहिती
परत
माहिती
टाइमलाईन
खूप आवडला.
अभ्यासपूर्ण. आणि म्हणूनच
अत्यंत अभ्यासपुर्ण लेख.....
लेख आवडला
अभ्यासपूर्ण लेख....
अलिप्तता
छान माहितीपूर्ण लेख...
चांगलं लेखन....
अभ्यासपूर्ण लेखमाला