✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Tue, 09/28/2010 - 16:24  ·  लेख
लेख

Book traversal links for देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)

  • ‹ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ~ यश आणि उपेक्षा
  • Up
  • राजकारण, मत्सर, असूया....आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग-३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25203 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

वाचतो आहे!

ब्रिटिश टिंग्या
Tue, 09/28/2010 - 16:33 नवीन
वाचतो आहे!
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 16:35 नवीन
माहितीपूर्ण भाग. त्या काळी कोल्हापुरात सकाळ नसला तरी पुढारी तर असणार. पुढारीच्या कार्यालयात फोटो मिळू शकतील. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

'पुढारी' आणि "पवार"

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 16:53 नवीन
"पुढारीच्या कार्यालयात फोटो मिळू शकतील....." ~~ होय. ही बाब माझ्या ध्यानी होती/आहे देखील....पण काय आहे की, पुढारीकारांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच 'पवार' आडनावाची अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे तिथे माझे आयकार्ड दाखविले की उपसंपादकापासून गेटमनपर्यंत सर्वांच्या कपाळावर आठया पडतील, म्हणून टाऊन हॉलकडे गाडी घेतली नाही. पण तुम्ही म्हणता ती शक्यता आहेच आहे, कारण १९७२ च्या सुमारास 'पुढारी' व 'सत्यवादी' हेच दोन स्थानिक पेपर्स कोल्हापुरात प्रसिद्ध होते. माझ्या मामांच्या ओळखीचे एक गृहस्थ श्री.राम देशपांडे [श्री.वि.स.खांडेकर यांचे लेखनीक] पुढारीत लायब्ररीयन म्हणून काम करीत असत त्यांच्याशीही यासंदर्भात संपर्क साधला होता. पण ते निवृत्त झाले असून पुढारीशी तसा काही संबंध ठेवला नसल्याचे त्यांच्या उदास बोलण्यावरून जाणवले. पण असो. प्रयत्न करतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

रामभाऊ

श्रावण मोडक
Tue, 09/28/2010 - 18:35 नवीन
रामभाऊ कसे आहेत हो सध्या? ते 'सकाळ'मध्येही होते. या माणसाकडील स्वाक्षरी संग्रहाविषयी लिहा केंव्हा तरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

स्वाक्षरी संग्रह

इन्द्र्राज पवार
Wed, 09/29/2010 - 12:45 नवीन
श्री.राम देशपांडे आमच्या घरी यायचे (मामांचे मित्र आहेत....किंवा मामांच्याबरोबर मी आणि माझे मित्रही कधीतरी त्यांच्या घरी गेलो होतो....); पण निवृत्तीनंतर त्यांनी फिरणे थोडे कमी केले असल्याचे समजले (काही डोळ्याचाही मध्यंतरी त्रास झाला असे 'अक्षर पुस्तकालया'च्या श्री.रविन्द्र जोशी यांच्याकडून समजले होते....'अक्षर' हा त्यांच्या आणि समवयस्कांचा संध्याकाळच्या साहित्यविषयक बैठकीचा गप्पांचा अड्डा होता). "स्वाक्षरी संग्रहा" [स्वाक्षरी नव्हे, तर लेखकांचे हस्ताक्षर] विषयी ~~ तुम्ही म्हणता तो विषय माझ्या डोक्यात मे महिन्यात डोकावला होता, श्रामो जी. करवीर नगर वाचन मंदिरमध्ये एका पुस्तक प्रकाशन समारंभासाठी ते आले होते त्यावेळी त्यांना अगदी जवळून ओळखणार्‍या माझ्या मित्राने त्या विषयाचे त्यांच्यासमोर सूतोवाच केले होते. पण त्यांनी ना होकार दिला ना नकार. पण चहापानाच्या वेळी आलोक याने (श्री.जोशींचे चिरंजीव) तिथे सांगितले की ते त्या संग्रहाचे फोटो काढू देत नाहीत. आता याचे कारण विचारण्याचे प्रश्नच नव्हता, ते श्री.रामभाऊंच्या मौनाने सांगितले होतेच. शिवाय इथे त्या विषयावर लिहायचे म्हटले तर हस्तलिखिताच्या नमुन्याशिवाय लिहिण्यात अर्थही नाही. तरीही येत्या सुट्टीत परत एकदा प्रयत्न करतो. [अशा संग्रहकांना अशी एक भीती वा शंका असते की, आम्ही ते प्रकाशित करून पैसे मिळविणार....कसा गैरसमज दूर करणार?] इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

एक अतिशय उत्कृष्ट मेजवानी.

गांधीवादी
Tue, 09/28/2010 - 16:37 नवीन
एक अतिशय उत्कृष्ट मेजवानी.
  • Log in or register to post comments

प्रवास....

इन्द्र्राज पवार
Wed, 09/29/2010 - 23:13 नवीन
श्री.गांधीवादी यांचा आतापर्यंतचा इथला प्रवास पाहता असे दिसते की, ते सातत्याने देशाच्या प्रगतीचा आणि हिताचा आवर्जून पाठपुरावा करतात...त्यामुळे मला त्यांच्याकडून या विषयावर विस्ताराने प्रतिक्रिया अपेक्षित होती....आहे. ~~ जरी आता ते देवू शकले नाही तरी, तिसर्‍या/चौथ्या भागात तर तसे करण्याची वाट पाहतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

>>श्री.गांधीवादी यांचा

नितिन थत्ते
Wed, 09/29/2010 - 23:54 नवीन
>>श्री.गांधीवादी यांचा आतापर्यंतचा इथला प्रवास पाहता असे दिसते की, ते सातत्याने देशाच्या प्रगतीचा आणि हिताचा आवर्जून पाठपुरावा करतात अतिशय विनोदी प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

नोप...नो विनोदी प्रतिसाद

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 09/30/2010 - 00:12 नवीन
"अतिशय विनोदी प्रतिसाद...." उप्प्स्स्स.....नाही. त्यांचे प्रतिसाद आणि धाग्यातून त्यांची त्यांना देशाविषयी वाटणारी काळजीच प्रतिबिंबीत होते असे वाटते. त्यामुळेच माझी अशी अपेक्षा आहे/होती की, निदान या निमित्ताने का होईना देशाच्याच एका प्रश्नाशी निगडीत असलेल्या या विषयावर त्यांनी 'लेख आवडला' असे शुष्कपणे न म्हणता खुल्या मनाने लिखाण करावे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुम्हाला गांधीवादी यांची काही

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/30/2010 - 06:25 नवीन
तुम्हाला गांधीवादी यांची काही मते पटत नाहीत म्हणून ते देशाच्या हिताचा आणि प्रगतीचा विचार करत नाहीत असे होत नाही थत्तेकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पुढे

श्रावण मोडक
Tue, 09/28/2010 - 16:41 नवीन
पुढे? उत्सुकता ताणवू नका जास्ती!
  • Log in or register to post comments

मस्त लेखमाला. आपल्याकडे

यशवंतकुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 16:48 नवीन
मस्त लेखमाला. आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड नको तिथं कात्री लावते म्हणून असल्या घटनांवर आधारीत अर्थपूर्ण रिअ‍ॅलिटी सिनेमे तयार होत नाहीत, मुद्दाम होऊ दिले जात नाहीत असे वाटते. जे होतात त्यात देश के लिये‌ ऽऽऽ, देश की जनता‌‍ऽऽऽ आणि असलाच निरर्थक ब्लाह्ब्लाह असतो. नाहीतर पॅटनसाहेबाच्या तोडीस तोड माणूस आहे हा.
  • Log in or register to post comments

पॅटन

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 09/30/2010 - 09:44 नवीन
"पॅटनसाहेबाच्या तोडीस तोड माणूस आहे हा....." जनरल पॅटनदेखील सॅम माणेकशॉ यांच्यासारखेच अखेरीस राजकारण्यांच्या मत्सराचे बळी ठरले होते, हाही एक योगायोगच.... 'पॅटन" वरही स्वतंत्रपणे लिहू या, पुढे कधीतरी. "असल्या घटनांवर आधारीत अर्थपूर्ण रिअ‍ॅलिटी सिनेमे तयार होत नाहीत, " ~~ होय हे मात्र सत्य आहेच. हॉलिवूडची ('सेव्हिंग प्रायव्हेट रायन' वा 'प्लटून'), अशी उदाहरणे पाहिली की आपल्याकडील 'चिठ्ठी आयी है, वतनसे चिठ्ठी आयी है, वहाँसे कब घर लौटोगे..." अशी धाय मोकलून रडणार्‍या सैनिकांची (आणि तीही मिलिटरी ड्रेसमध्येच) दृष्ये दाखविणारे आपल्याकडील चित्रपट पाहिले की समजते या निर्मात्यांना युध्द कथानकातदेखील 'दिल के टुकडे' आणल्याशिवाय काही जमणारच नाही. त्यातल्या त्यात 'हकिकत' हा एक रोखठोक चित्रपट होता असे म्हणतात. पाहिलेला नाही, पण ऐकले आहे खूप. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

:)

अब् क
Tue, 09/28/2010 - 16:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments

सुरेख.

पैसा
Tue, 09/28/2010 - 16:55 नवीन
"मला एका राजासारखे वागव" हे सिकंदरला फक्त भारतातला पोरस राजा सांगू शकतो. आणि हरला तरी तो (पाकिस्तानी) जनरल आहे हे सॅम माणेकशॉच सांगू शकतात! पारशी स्टाईल नाकाचा किस्सा खासच! आणि फोटोतही दोघांची नाके उठून दिसतायत! कृष्ण मेनन हे नेहरू गांधी परिवाराला विशेषतः इंदिराजीना खूप जवळचे होते असा एक प्रवाद होता. तसेच सॅमबहादूरची लोकप्रियता हेही त्याना साईडलाईन करण्यामागचे कारण असावे काय? लोकनेते जयप्रकाश यांचेही इंदिराजींबरोबर सुरुवातीला जवळचे संबंध होते, आणि तेही त्याना मुलीसारखं वागवत असत. पण आणिबाणीच्या काळात काय झाले हा इतिहास आहे!
  • Log in or register to post comments

करेक्शन

नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 17:09 नवीन
>>कृष्ण मेनन हे नेहरू गांधी परिवाराला विशेषतः इंदिराजीना खूप जवळचे होते असा एक प्रवाद होता. कृष्णमेनन १९६२ च्या चीन युद्धात डिसक्रेडिट झाले होते. इंदिरा गांधी १९६६ मध्ये पंतप्रधान झाल्या त्यावेळी कृष्णमेनन जवळचे असायची शक्यता नाही. >>लोकनेते जयप्रकाश यांचेही इंदिराजींबरोबर सुरुवातीला जवळचे संबंध होते, आणि तेही त्याना मुलीसारखं वागवत असत. पण आणिबाणीच्या काळात काय झाले हा इतिहास आहे. आणिबाणीत त्यांच्यात वितुष्ट आले नसून, त्यांच्यात वितुष्ट आल्यानंतर ३-४ वर्षांनी आणिबाणी आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

करेक्शन

पैसा
Tue, 09/28/2010 - 17:23 नवीन
थत्तेसाहेब करेक्शनबद्दल धन्यवाद. मेनन याना दूर केल्यामुळे इंदिरांचा काही grudge होता का? असं मला म्हणायचं होतं. आणि J.P. बरोबर वितुष्ट आधी आलं होतं हे मला ठाऊक आहे. मतलब एवढाच की J.P. ना त्या वयात तुरुंगात टाकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थोडे थांबा...

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 17:28 नवीन
पैसा.... एक दोन दिवस थांबा.... [मेनन संदर्भातील] तुमच्या मनातील सर्व विषयांचा उहापोह मी पुढील लेखात केला आहे. श्री.नितिन थत्तेना त्याची माहिती आहेच, पण तो सर्व घटनाक्रम लेख स्वरूपात वाचा, मग जरी शंका राहिलीच तर तिथे तिसर्‍या भागावर चर्चा पुढे नेऊ या. ओके? इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाचताना अगदी गुंग होऊन गेलो

अनिल २७
Tue, 09/28/2010 - 17:01 नवीन
वाचताना अगदी गुंग होऊन गेलो होतो.. छान आहे माहीती.. लवकर पुढला भाग येऊ द्या..
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

बेसनलाडू
Tue, 09/28/2010 - 22:20 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

वाचतेय...

प्राजक्ता पवार
Tue, 09/28/2010 - 17:13 नवीन
वाचतेय...
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया....

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 19:24 नवीन
जरूर वाचा...दोन्ही भाग. पण तुम्हाला काय वाटले त्याबद्दलही लिहा...[इथेच नव्हे पण तुम्हाला जे जे धागे आवडतील, तसेच त्यातील आशय भावेल अशा सर्व विषयांवर...).हे अशासाठी सांगतोय की पुढील भागात कोणत्या प्रकारे अधिकचे लिहिता येईल हे धागाकर्त्यांना समजते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजक्ता पवार

सॅम माणकेशाँचे बालपण..

अनिल २७
Tue, 09/28/2010 - 17:13 नवीन
सॅम माणकेशाँचे बालपण म्हणजे, जन्म कुठे झाला, बालपणीचे काही किस्से उपलब्ध असल्यास त्यावरही एक धागा काढावा ही ईंद्रराजजींना विनंती. कदाचित ही माहीती नेटावर प्रयत्न केल्यास उपलब्ध होईलही, पण ईंद्रराज पवार ह्यांच्या लेखनशैलीत ही माहीती वाचणे म्हणजे आम्हा पामरांस मेजवाणीच असेल...
  • Log in or register to post comments

कौटुंबिक माहिती...

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 17:22 नवीन
"माणकेशाँचे बालपण म्हणजे, जन्म कुठे झाला, बालपणीचे काही किस्से उपलब्ध असल्यास...." ~~ लेखनाच्या अखेरच्या भागात या संदर्भात, तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भात, वैयक्तिक पातळीवर.. लेख आहेच. त्यावेळी तुम्हाला ते समजेलच....पण त्या अगोदर 'राजकारण आणि लष्कर' यात ते कसे भरडले गेले, तो लेख देतो. ओके? [कौतुकाच्या शेर्‍याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, अनिल जी..] इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

ओ.के.

अनिल २७
Tue, 09/28/2010 - 17:27 नवीन
ओ.के. ईंद्रराजजी.. (विषयांतर : आमच्या नावासमोर 'जी' लावयला आम्ही काय त्या भाईच्या फ्लेक्सातले नाही आहोत !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सवयीचा परिणाम

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 17:59 नवीन
"त्या भाईच्या फ्लेक्सातले नाही आहोत !" ~ सॉरी....त्या अर्थाने ते 'जी' नव्हते. केवळ सवयीचा तो परिणाम आहे. इथे दिल्लीत विविध सरकारी कार्यालयात, कार्पोरेट मिटींग्ज, सोशल गेट टुगेदरनेस समयी 'जी' सातत्याने इतके कानावर पडते की, त्याचे एकप्रकारे बोलीत आणि लिखाणात (विशेषतः समोरची व्यक्ती अनोळखी असेल तर....) प्रतिबिंब येतेच येते. आपल्या मराठीत जसे "काय राव....होय राव...बरोबर आहे हे राव." असे म्हटले जाते, त्याचीच ही हिंदी आवृती. इकडील हिंदी (आणि पंजाबी भाषिकात) मुलाने बापाला "डॅडी....: अशी सहजजरी हाक मारली तरी बापाकडून, "जी, बेटा?" असा प्रतिसाद मिळतो....इतके कॅज्युअल आहे ते 'जी'. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

छान लेख

चिरोटा
Tue, 09/28/2010 - 17:14 नवीन
छान लेख.पुढचे भाग येवू द्यात.
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Tue, 09/28/2010 - 17:28 नवीन
लेख सुरेख. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

विसुनाना
Tue, 09/28/2010 - 17:59 नवीन
माणेकशॉ यांच्या मोठेपणाबद्दल ऐकून होतो. विशेषतः त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणीही केंद्रीय मंत्री उपस्थित राहिला नाही -या गदारोळामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. तुमच्या लेखामुळे उत्तम माहिती मिळत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 18:04 नवीन
मंत्रीच नाही तर तत्कालीन लष्करप्रमुखही. पण त्यांची Funeral with full state honour झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

अंत्यसंस्कार

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 18:09 नवीन
"त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणीही केंद्रीय मंत्री उपस्थित राहिला नाही -या गदारोळामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती...." ~~ यावर विस्ताराने [फोटोसह] पुढील भागात लिहीत आहेच. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सुंदर

आंसमा शख्स
Tue, 09/28/2010 - 18:17 नवीन
दुसरा भागही सुंदर. अजून विस्तारानेही लेख चालेल. उदा. बांग्लादेश निर्मितीच्यावेळी त्यांनी लढवलेले डावपेच वाचायला आवडत्याते किती लोकप्रिय होते यापेक्ष ते कशामुळे लोकप्रिय होत गेले हे सांगत असल्याने लेख आवडतो आहे. तुमची शैली इतकी ओघवती आहे की,छायाचित्रांची गरजच नाही...
  • Log in or register to post comments

फोटोंची आवश्यकता...

इन्द्र्राज पवार
Tue, 09/28/2010 - 19:11 नवीन
"तुमची शैली इतकी ओघवती आहे की,छायाचित्रांची गरजच नाही... " ~ प्रशंसेबद्दल तसेच सूचनेबद्दलही धन्यवाद. तिसरा/चौथा भागदेखील तितकेच रोचक होतील याची दक्षता घेतो. माहितीचा प्रचंड खजिनाच आहे एकुण लष्कर या विषयावर. पाहु या, "सॅम" मालिका पसंद पडली तर त्या अनुषंगाने लष्कराविषयीही लिहिता येईल. फोटोंबाबत तुम्ही लिहिले आहे....वेल, फोटो देण्याचा उद्देश इतकाच की या निमित्ताने सॅमसाहेबांच्या मुद्राही मजकुरासमवेत पाहिल्या तर त्यांच्याविषयी अजून आदर वाढतो, हे मी पाहिले आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

आंसमा यांच्या विनंतीशी सहमत आहे.....

मुशाफिर
Tue, 09/28/2010 - 20:56 नवीन
इन्द्र्राज साहेब, तुम्ही बांगलादेश युद्धात जनरल माणेकशाँनी लढवलेल्या डावपेचांविषयी थोडं विस्ताराने लिहाचं (हवं तर वेगळ्या धाग्यात). १९७२ च्या एप्रिल-मे मध्येच (त्यावेळच्या) पूर्व पाकिस्तानवर हल्ला करावा, ह्या राजकिय दबावाला बळी न पडता, नीट योजना आखून ऑक्टोबर, नोव्हेम्बर मध्ये खरीपाच्या पिकांची कापणी झाल्यावरच (म्हणजे किमान रसद उपलब्ध झाल्यावरच) आपण हल्ला करावा, हे इंदिरा गाधींना त्यानी अतिशय कुशलतेनं पटवून दिलं होतं. तसचं लष्कराच्या पूर्व मुख्यालयाला (लवकरात लवकर युद्ध निकाली काढण्यासाठी ) तयारीसाठी किमान १० महिने तरी हवेत हे जाणून आणि तिथल्या कर्तबगार अधिकार्‍यांना बरेचसं निर्णय स्वातंत्र्य देवून त्यांनी युद्धशास्त्रातला एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला. पूर्व पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यांची माहिती 'रॉ' कडून सुसुत्रपणे मिळवण्यासाठी ज्याप्रकारे व्यवस्था केली होती, तसे गुप्तहेर खातं आणि सक्रिय लष्कर (इंटलिजंस अँड ऑपरेशनल फोर्सेस), यांच्या समन्वयाचे दुसरे उदाहरण स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासात विरळाचं. केवळ १७ दिवसात निकाली निघालेलं हे युद्ध म्हणजे जगभराच्या लष्करी तज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. माझ्या माहितीप्रमाणे, हे युद्ध जगभरातील विविध सैनिकी अभ्यासक्रमात अतिशय बारकाईने अभ्यासलं जातं. आपला व्यासंग फार मोठा आहे, तेव्हा एव्हढं मनावर घ्याचं! मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

मुशाफिरी

अर्धवटराव
Tue, 09/28/2010 - 21:19 नवीन
>>आपला व्यासंग फार मोठा आहे, तेव्हा एव्हढं मनावर घ्याचं! प्रतिसादावरुन तरी वाटतय कि तुमचीही या लश्कर क्षेत्रात बरीच मुशाफिरी झालेली आहे. इंद्रजीतांना तर आग्रह केलाच आहे... आपणही मनावर घ्या आणि आपले "प्रवासवर्णन" लिहा.. कसं... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

नाही हो, असं काही नाही....

मुशाफिर
Tue, 09/28/2010 - 21:32 नवीन
अर्धवटराव, भारताच्या लष्करी इतिहासाविषयी माझं थोडसं वाचन असलं, तरी इंन्द्रजीत साहेबांसारखा दांडगा अभ्यास आणि मोठा व्यासंग नाही. तेव्हा गुजराथीत म्हणतात तसं "जेनु कामं तेनु....." :) कसं? मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मुशाफिर साहेब.. बांगला देशचे युद्ध...

संजय अभ्यंकर
Tue, 09/28/2010 - 23:05 नवीन
१९७१ डिसेंबर मध्ये झाले होते.. १९७२ चा उल्लेख कसा? चु.भु.दे.घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

बरोबर! युद्ध १९७१ डिसेंबर मध्येच झालं होतं....

मुशाफिर
Wed, 09/29/2010 - 00:18 नवीन
३ डिसेंबर ते १६ डिसेंबर ह्या दरम्यान. एकूण १३ दिवसात भारतीय सैन्यने ते जिंकलं. मला १९७१ च्या एप्रिल-मे मधील घडामोडींचा उल्लेख करायचा होता. १९७२ चा उल्लेख अनावधानाने झाला आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

हेरखातं आणि सैन्यदल या दोन्ही

पुष्करिणी
Wed, 09/29/2010 - 00:46 नवीन
हेरखातं आणि सैन्यदल या दोन्ही पातळ्यावरून हे युद्ध 'वेल प्रिपेअर्ड' होतं. पहिली फेज रामेश्वरनाथ काओ आणि दुसरी माणेकशांनी अत्यंत समर्थपणे पेलली. आणि हे हेरखातं फक्त ३ वर्षाचं होतं १९७१ मधे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

नक्किच!

मुशाफिर
Wed, 09/29/2010 - 02:13 नवीन
पण याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची पश्चिम आघाडीवरील कामगिरी खुपच तोकडी पडली होती, असचं म्हणावं लागेल. मे. ज. खंबाटानी केलेल्या चुका आपल्याला भलत्याच भोवल्या होत्या. लोंगोवाला पोस्टची लढाई आपण जरी जिंकली असली ; (हो तीच ती 'बॉर्डर' मधली! ज्यात 'सनी ' पाजी जवळजवळ एकटाच सगळ्या पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजताना आणि जॅकी श्रॉफ रणगाड्यांवर बॉम्ब टाकल्यावर शेरोशायरी करताना दाखवलाय! :) )तरी लोंगोवाला लढवण्याची वेळ आपल्यावर आलीच नसती ,जर जनरल माणेकशॉनी वारंवार सांगूनही 'रहिमयार कान/खान' वरच्या हल्ल्याला मे. ज. खंबाटानी आणि त्या भागाचे प्रमूख (सेक्टर जी. ओ. सी.) ज. गोपाळ बेवूर यांनी कोणत्यातरी अनाकलनिय कारणाने चार दिवसांनी उशीर केला नसता (अगदी भारतीय वायुसेनेचा तुलनात्मकदृष्ट्या चांगला पाठिंबा उपलब्ध असतानाही). एक लोंगोवाला सोडलं तर बाकी १९७१ मध्ये पश्चिम आघाडीवर आपली कामगिरी अपेक्षेपेक्षा फारच कमी दर्जाची होती, हे बहुतेक सगळेच तज्ञ मान्य करतात. १९७१ च्या युद्धाचा हा भागही अभ्यास करण्यासारखा आहे. मुशाफिर. अवांतरः इंद्रराजसाहेब, तुमच्या धाग्यावर हे लिहून विषयांतर करायचा अजिबात हेतू नाही. पण आपल्याला आपली तोकडी बाजू माहित असावी ,हाच उद्देश अहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

अभ्यास....

इन्द्र्राज पवार
Wed, 09/29/2010 - 11:17 नवीन
"१९७१ च्या युद्धाचा हा भागही अभ्यास करण्यासारखा आहे...." ~~ होय, याचीही गरज आहे. प्रत्यक्षात ही सर्व माहिती घटनाक्रमासह माझ्याकडे आहेच; पण मुळात धागा हा प्रामुख्याने सॅमसाहेबांच्या करिअरशी निगडीत ठेवण्याचा उद्देश असल्याने सर्वच घटनांवर फोकस टाकणे म्हणजे अस्ताव्यस्तपणा वाढण्याची भीती वाटली. त्यामुळे काहा वेळा शार्प एडिटींगही करावे लागले...लागत आहे. पण एकूणच "लष्कर" या विषयाची व्याप्ती जितकी रोमहर्षक तितकीच प्रचंड आहे हे तुम्हीही मान्य कराल. त्यामुळे, जरी महत्वाच्या असल्या, तरी काही घटनांना नाईलाजास्तव बाजुला ठेवावे लागते. शिवाय सदस्यांच्या वाचनक्षमतेचाही विचार करावा लागतोच. इन्द्रा (जाताजाता >> तुम्ही माझ्या या विषयातील अभ्यासाबद्दल वर प्रत्येक प्रतिसादात चांगले उदगार काढले आहेत....प्रत्यक्ष तुमचा 'लष्कर' अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असावा असे मी मानू लागलो आहे, हे लक्षात ठेवा.....इन्द्रा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

वाह !!

अर्धवटराव
Tue, 09/28/2010 - 21:14 नवीन
>>माहितीचा प्रचंड खजिनाच आहे एकुण लष्कर या विषयावर. पाहु या, "सॅम" मालिका पसंद पडली तर त्या अनुषंगाने लष्कराविषयीही लिहिता येईल. एका अत्यावश्यक पण तेव्हढ्याच उपेक्षीत विषयावर तुमच्या सारख्या व्यासंगी लेखकाकडुन येउ घातलेल्या मालिकेची प्रतीक्षा करतोय. माणेकशाँवरची ही मालिका या लश्कर संहितेचा "श्रीगणेशा" ठरावा अशी हार्दीक ईच्छा. (सिव्हिलियन) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

उत्कृष्ट लेख

मन१
Tue, 09/28/2010 - 18:29 नवीन
आणि लेखमाला.... वाचतोय. हल्ली इंद्राच्या लिखाणाचा फ्यान झालोय.
  • Log in or register to post comments

उत्तम माहितीपुर्ण लेख..

हर्षद आनंदी
Tue, 09/28/2010 - 19:12 नवीन
स्वातंत्र्य उत्तर २०-२५ वर्षे भारतात कीमान नितीमत्ता बाळगुन असणारी काही ऊच्च प्रतीची निष्ठावान माणसे होती, असे ऐकुन होतो. अश्या माणसांविषयी मिळणारी माहिती नेहमीच आवडेल.
  • Log in or register to post comments

थोडी निराशा

प्रदीप
Tue, 09/28/2010 - 19:55 नवीन
झाली हा भाग वाचून. पहिल्या भागापेक्षा हा थोडा 'खाली उतरलाय' असे वाटले, कारण एक इंदिरा गांधी ह्या मिलिटरीच्या मीटिंगला उपस्थित राहिल्या तो प्रसंग सोडला तर इतर सर्व माहिती नवी नव्हती अथवा जी होती ती फारशी सिग्निफिकंट वाटली नाही. अर्थात इंद्रचे लिखाण दिलकश असल्याने सुरूवातीपासून शेवटपर्यंत वाचकास खिळवून ठेवण्याची कला आहे. पुढील माहितीपूर्ण भागांच्या प्रतिक्षेत. जाता जाता: कॄष्ण मेननांविषयी वाचावयास आवडेल पण ते एकतर्फी नको. आणि त्यात खुशवंत सिंगाचे काही असेल, तर ते बरेच डिस्टील करून घेतलेले बरे.
  • Log in or register to post comments

वाचतोय. उत्तम लेख.

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/28/2010 - 20:02 नवीन
वाचतोय. उत्तम लेख. छायाचित्रांचे सिलेक्शनही उत्तम आणि चपखल. जेता कसा असावा याचा आदर्श घालून देणारा सॅमबहादुर. सलाम!!!
  • Log in or register to post comments

ज. थोरात.

जयंत कुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 22:06 नवीन
फार सुंदर लेखमाला. पवारसाहेबांचे आभार मानावेत तेवढे कमीच. हे सगळे वाचताना जनरल थोरांतांची एक आठवण सांगायची रहावत नाही. अर्थात ही मी कुठेतरी वाचलेली आहे. श्री. कार्यकर्ते यांनी जेता कसा असावा असे म्हटले आहे त्याचेच हे ही उदाहरण आहे. १९४१ ते १९४५ च्या दरम्यान ज. थोरातांना एका युधकैद्यांच्या तुरुंगाचे अधिकारी म्हणून काम करावे लागले. त्या तुरुंगात सर्व जपानी युध्द्कैदी भरले होते. युध्द्कैद्यांचा कँप कसा असतो हे आपण अनेक सिनेमात पाहिला असेलच. तर जेव्हा ज. थोरात त्या कँपला पहिल्यांदा भेट द्यायला गेले तेव्हा एक वयस्कर असा जपानी अधिकारी त्यांना मानवंदना द्यायला धावत धावत आला व त्याने ज. थोरातांना सॅल्युट केला. त्याच्या खांद्यावरच्या चिन्हांनी तो एक वरिष्ठ ब्रिगेडियर आहे हे समजत होते. ज. थोरातांनी तो परत केला आणि विचारले " पण आपण धावत का आहात ?" " सुप्रीम कमांडरची आज्ञा आहे की कैद्यांनी सर्व काम धावतच करायची आहेत." ज. थोरात काही बोलले नाहीत पण त्यांनी GOCशी बोलुन ही ऑर्डर रद्द करून घेतली. व तसे त्या कँपमधे नवीन ऑर्डर दिली. हे कळल्यावर तो ब्रिगेडियर त्यांना भेटायला आला आणि म्हणाला "मी आपले आभार मानायला आलो आहे. मी स्वतः व माझा देश ही घटना कधिच विसरणार नाही". दहा वर्षांनंतर जेव्हा ज. थोरात कोरीयाला Indian Custodian Force चे कमांडर म्हणून गेले तेव्हा त्यांनी पत्नीसमवेत टोकीयोला भेट दिली होती. ही भेट तशी खाजगी होती. पण दुसर्‍या दिचशी जेव्हा ते त्या हॉटेलमधून त्यांच्या कारमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या साठी त्या रस्त्यातली पूर्ण रहदारी थांबवली गेली होती. त्यांच्या लक्षात हे कसे काय झाले हे यईना. जेव्हा त्यांनी अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की त्याच ब्रिगेडियरने टोकियोच्या पोलिसदलाच्या प्रमूखाला ती जुनी हकिकत सांगून ज. थोरांताच्या प्रती आदर दर्शवण्यासाठी हे केले होते आणि त्या पोलिस प्रमूखलाही हा आदर अशा प्रकारे व्यक्त करावासा वाटला. सगळेच भारी ! आहे की नाही ?
  • Log in or register to post comments

खरेच भारी आठवण आहे

बेसनलाडू
Tue, 09/28/2010 - 22:22 नवीन
(अचंबित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अगदी हेच

सहज
Wed, 09/29/2010 - 06:33 नवीन
म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

असेच

प्रदीप
Wed, 09/29/2010 - 19:59 नवीन
म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा