अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग १)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
27 Nov 2009 - 2:11 pm

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग १)
हा भाग
पुढील भाग २
भाग ३

२००३ साली मी एका मोठया कॉम्पूटरच्या कंपनीत नोकरीला असतांनाची ही गोष्ट आहे. गोष्ट म्हणण्यापेक्षा मी मोटरसायकलवर जो काही २००० ते २५०० किमी प्रवास केला त्याचा हा अनूभव आहे. एखाद्या अलिखीत रोजनिशीतील पाने असे म्हटले तरी चालेल.

पगारपाणी चांगले होते. पण काम मनासारखे नव्हते. काम काही जास्त नसायचे. वेगवेगळ्या सरकारी ऑफीसात भेटून निघणारे टेंडरांवर लक्ष ठेवणे व रिलेशन्स सांभाळणे हे काम होते. कामानिमीत्त फिरणे फार व्हायचे. बरे फक्त पुणे नाही तर मुंबई, नाशिक, नगर, औरंगावाद असलाही चक्कर व्हायचा. त्यातच कधीकधी कॉम्पूटरच्या पार्टस् ची डिलीव्हरी शेड्यूल पाहणे वैगेरे नियमबाह्य कामे पण बघावी लागायची.

२००३ च्या १० व्या महिन्यात (ऑक्टोबर २००३) साली कंपनीला एका मोठ्या राज्यपातळीवरील सरकारी कार्यालयातून कॉम्पूटर्स सप्लाय करण्याची ऑर्डर 'भेटणार' होती. 'भेटणार' म्हणजे अजून टेंडर निघालेले पण नव्हते पण सगळी 'सेटींग' झालेली होती. ते कॉम्पूटर्स विवीध सरकारी कार्यालये, आयटीआय, आमदार निधीसाठी, निरनिराळ्या शाळा, काही एनजीओ व मुख्य म्हणजे ठिकठिकाणच्या आदिवासी शाळांना सप्लाय करायचे होते. कंपनीने व सरकारी अधिकार्‍यांनी त्या त्या ठिकाणांची यादी आधीच तयार केलेली होती.

या कामाला मला जुंपण्यात आले. सुरवातीला मला पुणे विभाग देण्यात आला होता पण नंतर नाशिक महसूल विभाग देण्यात आला. तेथील विभागातल्या ठिकठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये जावून 'आमच्या आश्रमशाळेमध्ये कॉम्पूटर फिट करण्यासाठी योग्य जागा व विज आहे. आम्हाला कॉम्पूटर ची आवश्यकता आहे' असल्या अर्थाचा एक अर्ज त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून सहीशिक्यानिशी आणायचा होता. अर्ज तयारच होता. मला जावून फक्त सहिशिक्का आणायचा होता.

मी कंपनीतून पैसे अ‍ॅडव्हान्स उचलले. माझी भेट देणार्‍या आश्रम शाळांची नाशिक विभागातील यादी पण घेतली. नाशिक जिल्हा हा नाशिकमधला अधिकारी सांभाळणार असल्याने त्या शाळा सोडून माझ्या वाट्याला एकूण २०/२१ आश्रमशाळा आल्या. माझ्या वाटेच्या शाळांमध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा व जळ्गाव जिल्हयातल्या शाळा होत्या.

पुढील भाग २
भाग ३

क्रमश:

प्रवासभूगोलआस्वादलेखअनुभव

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

27 Nov 2009 - 2:19 pm | कानडाऊ योगेशु

वाचतोय.. :?
जरा मोठे भाग येऊ द्यात ना राव.
हा भाग सुरु व्हायच्या आतच संपला.! :''(

(चक्रमशः) कानडाऊ योगेशु

-------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

टुकुल's picture

28 Nov 2009 - 12:41 am | टुकुल

हेच म्हणतो..
जरा सविस्तर आणी मोठे भाग येवुद्यात, वाचायला उत्सुक.

--टुकुल

टारझन's picture

27 Nov 2009 - 2:26 pm | टारझन

शब्द संपले !
पाषाणभेदा , तू ही एक उत्तम सुगरण्या आहेस हे ठाऊक नव्हतं :)

- टार्‍या

निखिल देशपांडे's picture

27 Nov 2009 - 2:27 pm | निखिल देशपांडे

पाषाणभेत गुव्हेरा... तुमच्या मोटरसायकल डायरीज वाचण्यास उत्सुक....

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अवलिया's picture

27 Nov 2009 - 2:29 pm | अवलिया

मोटार सायकलचा फोटो कुठे आहे ?

--अवलिया

jaypal's picture

29 Nov 2009 - 5:38 pm | jaypal

का बिचा-याच्या मागे लागला आहात फोटोसाठी?

ज्ञानेश...'s picture

27 Nov 2009 - 4:09 pm | ज्ञानेश...

येऊ द्या वर्णन!
मोटरसायकलसंबंधी काहीही वाचायला आम्ही उत्सुक असतो.

(व्हिलीमारू)
ठारजण

झकासराव's picture

27 Nov 2009 - 7:20 pm | झकासराव

देडफुट्या क्रमशः भाग.
जरा लांबी वाढवा की.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2009 - 8:20 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचनोत्सुक

बिपिन कार्यकर्ते

आशिष सुर्वे's picture

28 Nov 2009 - 12:55 am | आशिष सुर्वे

हे थोडे वेगळे प्रवासवर्णन असेल ही आशा आहे..
पुढचे भाग येऊदेत!!
-
कोकणी फणस

गणपा's picture

28 Nov 2009 - 3:20 am | गणपा

हं वाचतोय...

मदनबाण's picture

28 Nov 2009 - 6:29 am | मदनबाण

दफोराव जरा मोठे भाग टाका की...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

विंजिनेर's picture

28 Nov 2009 - 8:07 pm | विंजिनेर

पाभेदा वाचतोय.
थोडे मोठे येऊद्या की राव भाग.

धनंजय's picture

28 Nov 2009 - 8:16 pm | धनंजय

वा! वाचनोत्सूक आहे.

मीनल's picture

28 Nov 2009 - 8:29 pm | मीनल

फारच छोटी असली तरी छान आहे सुरवात.
प्रवास वर्णनात शाळांबद्दलही लिहा.आश्रम शाळा वेगळ्या असतील कदाचित.

मीनल.

sujay's picture

28 Nov 2009 - 9:26 pm | sujay

वाचतोय.
जरा मोठ लिवा कि मालक.

सुनील's picture

29 Nov 2009 - 5:24 am | सुनील

लवकर लिहा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती२'s picture

29 Nov 2009 - 5:15 pm | स्वाती२

वाचत आहे.

उमराणी सरकार's picture

29 Nov 2009 - 11:36 pm | उमराणी सरकार

उत्तम. बालपणीची ६ आणि नोकरीच्या सुरूवातीच्या काळातील ३ वर्षे नंदूरबार, धुळे आणि जळगाव भागातच गेली. तुमचे अनुभव व वर्णन वाचण्यास आतूर आणि उत्सुक. लवकर येवू द्या.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे