पेपिनचे पाचकपात्र
लेखनविषय:
ही माझी कविता रेशीमनिळाई या काव्यसंग्रहात प्रसिद्ध होणार होती.... मग ती पुढे एका दिवाळी अंकात छापून आली...
जागतिक महिला दिनी , तो बायकोला सरप्राईज देण्यासाठी निदान आमटीभात तरी करून खायला घालू, या विचाराने स्वयंपाकघरात शिरला आणि व्हायचे तेच झाले.
ती : आमटीभात खाताना ,खडा आला घासात
सखया रे खाऊ कसा, तुझा मी हा आमटीभात
ती : शिजलेल्या भातातून आला तो एकटाच
दूर शिते शिजलेली , उरली पानी कितीक
ही असली पाककला तुझी सारे जाणतात
तो : सांग कशी तुजविनाच, निवडू मी डाळतूर
तांदूळ हे छळवादी , अन् हा कूकर फितूर
भात माझा करपला , आमटीचीही लागली वाट
वाचने
2354
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चांदण्यात फिरताना...
बापरे ... मी
In reply to बापरे ... मी by अवलिया
हाहाहा!!!
वा! वा!
सखया रे
पेपिन