Skip to main content

पेपिनचे पाचकपात्र

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 10/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझी कविता रेशीमनिळाई या काव्यसंग्रहात प्रसिद्ध होणार होती.... मग ती पुढे एका दिवाळी अंकात छापून आली... जागतिक महिला दिनी , तो बायकोला सरप्राईज देण्यासाठी निदान आमटीभात तरी करून खायला घालू, या विचाराने स्वयंपाकघरात शिरला आणि व्हायचे तेच झाले. ती : आमटीभात खाताना ,खडा आला घासात सखया रे खाऊ कसा, तुझा मी हा आमटीभात ती : शिजलेल्या भातातून आला तो एकटाच दूर शिते शिजलेली , उरली पानी कितीक ही असली पाककला तुझी सारे जाणतात तो : सांग कशी तुजविनाच, निवडू मी डाळतूर तांदूळ हे छळवादी , अन् हा कूकर फितूर भात माझा करपला , आमटीचीही लागली वाट
लेखनविषय:

वाचने 2356
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

म्याडम, आता तुम्ही पण विडंबनं करायला लागलात ना... मग आता आमच्याबद्दल तक्रार करायची नाही हां... ;) बिपिन कार्यकर्ते

बापरे ... मी आता गमन (पक्षी- लॉग आउट*) करतो.. :) * हल्ली बरेच नवविडंबक शब्दकोशात अर्थ पाहुन लगेच विचारणा करतात, म्हणुन खुलासा. काय बिपीनदा ठिक ना? --अवलिया

In reply to by अवलिया

=)) णाना... तो अर्थ आम्हाला शब्दकोशात पाहून सांगावा नाही लागला... ;) बिपिन कार्यकर्ते

'चांदण्यात फिरताना'चे उत्कृष्ट विडंबन. अगदी चालीवर गाऊन पाहिले. स्वगतः तिरपी अक्षरे तिरपी का असावीत बरे?

सखया रे आवर हा सावर हा आमटीभात! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

याचा कुकर पुरुषांसाठी सुकर म्हणून प्रसिद्ध असतो का?