सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे.
मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात.
साहित्यः
वाटीभर सोडे
पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचून
हिंग थोडसं
हळद १ चमचा
लाल मसाला २ चमचे
चवीनुसार मिठ
तांदळाचे पीठ १ चमचा
लिंबाएवढी चिंच
फोडणीसाठी तेल
फोडणीसाठी तेल
२ मध्यम चिरलेले कांदे
कोथिंबीर चिरलेली थोडी
२ हिरव्या मिरच्या मोडून
भरीसाठी भाज्या हव्या असतील तर
१ वांग फोडी करून
बटाटा फोडी करून
शेवग्याच्या शेंगा तुकडे करुन
पाककृती
सोडे कोमट पाण्यात १० मिनीटे भिजत घालावेत.
गॅसवर भांडे गरम करुन तेल टाकून लसूण फोडणीला द्यायचा व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवायचा. आता त्यावर हिंग, हळद मसाला घालायचा.
ते एकजीव झाले की कोलंबीचे सोडे, शेंगा, बटाटे व वांगी घालायची.
आता त्यात गरजेनुसार पाणी घालायचे व भाज्या शिजू द्यायच्या.
भाज्या व सोडे शिजले की त्यात चिंचेचा कोळ करून त्यातच तांदळाचे पीठ कालवून तो कोळ रश्यात घालावा. पुन्हा कालवणाला एक उकळी येऊ द्यावी व मिठ घालावे. नंतर गॅस बंद करण्यापूर्वी मोडलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी म्हणजे कोथिंबीर व मिरच्यांचा सुगंध टिकून राहतो.
आता घरभर मस्त सोड्यांच्या कालवणाचा घमघमाट सुटलेला असतो व आपोआप भूक लागते.
वाचने
24330
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोड्यांचा कोणताही प्रकार शिजत
भारीच
In reply to सोड्यांचा कोणताही प्रकार शिजत by डॉ सुहास म्हात्रे
घमघमाटाला +१. आणि असं एखादं
In reply to सोड्यांचा कोणताही प्रकार शिजत by डॉ सुहास म्हात्रे
सहमत !
पाकॄ
सोड्यांची खिचडी
In reply to पाकॄ by कपिलमुनी
आवडती पाकृ
In reply to सोड्यांची खिचडी by निशाचर
वा!
जागुताईंचा धागा म्हणजे
पाककृती मस्तच!
कपिलमुनी, प्रसाद, शाली, एस,
वाह, सुरेख, आमच्याकडे बहुतेक
वैताग आहे हा धागा
उत्तम प्रतीचे सुके मासे
सुकी मासळी ऑनलाईन मिळते की
In reply to उत्तम प्रतीचे सुके मासे by जेम्स वांड
चांगल्या प्रतीची सुकी मासळी
In reply to सुकी मासळी ऑनलाईन मिळते की by डॉ सुहास म्हात्रे
ऑनलाईन भारतात का भारताबाहेर?
In reply to उत्तम प्रतीचे सुके मासे by जेम्स वांड
थँक्स
In reply to ऑनलाईन भारतात का भारताबाहेर? by केडी
किलोभर सोडे शेजारीच कुठेतरी
In reply to थँक्स by जेम्स वांड
वर्षभर आवडीने सुकी मासळी खाण्याची आवड असलेल्या खवय्यांसाठी वर्षभराची खात्रीशीर सुकी मासळी मिळण्याचे ठिकाणआहे असेच वर सांगितले आहे :) मासळीच्या चवीत जराशीही खोड निघणे जिभेला अजिबात मान्य नसल्यामुळे, आम्ही बोंबल्या यात्रेत जाणे जमले नाही (बर्याचदा नाहीच जमत) तर पेणला फेरी मारून सुक्या मासळीचा साठा करून ठेवतो. :) चवीच्या उच्च प्रतिला पर्याय नाही !पेणला कुठे मिळते सुकी मच्छी?
In reply to किलोभर सोडे शेजारीच कुठेतरी by डॉ सुहास म्हात्रे
पेणला कुठे मिळते सुकी मच्छी?
In reply to किलोभर सोडे शेजारीच कुठेतरी by डॉ सुहास म्हात्रे
खात्रीशीर चांगली सुकी मासळी
In reply to पेणला कुठे मिळते सुकी मच्छी? by जागु
केडी धन्यवाद.
बोंबल्या विठोबाच्या यात्रेत
पोयनाड
म्हात्रे काका, जागु ताई एक मदत कराल का?
बॉम्बे डक म्हणजे बोंबील.
शार्क - मुशी सारडाईन - तरली
मंकरेल- बांगडा
हैया!!!
लगे राहो... :-))
In reply to हैया!!! by जेम्स वांड
अरे वा छानच झाल जेम्स.
मी काय म्हणतो ताई
In reply to अरे वा छानच झाल जेम्स. by जागु
मावशी, जेवायला बोलवा राव एकदा