मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुक्या सोड्यांचे कालवण

जागु · · पाककृती
सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे. मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात. साहित्यः वाटीभर सोडे पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचून हिंग थोडसं हळद १ चमचा लाल मसाला २ चमचे चवीनुसार मिठ तांदळाचे पीठ १ चमचा लिंबाएवढी चिंच फोडणीसाठी तेल फोडणीसाठी तेल २ मध्यम चिरलेले कांदे कोथिंबीर चिरलेली थोडी २ हिरव्या मिरच्या मोडून भरीसाठी भाज्या हव्या असतील तर १ वांग फोडी करून बटाटा फोडी करून शेवग्याच्या शेंगा तुकडे करुन पाककृती सोडे कोमट पाण्यात १० मिनीटे भिजत घालावेत. गॅसवर भांडे गरम करुन तेल टाकून लसूण फोडणीला द्यायचा व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवायचा. आता त्यावर हिंग, हळद मसाला घालायचा. ते एकजीव झाले की कोलंबीचे सोडे, शेंगा, बटाटे व वांगी घालायची. आता त्यात गरजेनुसार पाणी घालायचे व भाज्या शिजू द्यायच्या. भाज्या व सोडे शिजले की त्यात चिंचेचा कोळ करून त्यातच तांदळाचे पीठ कालवून तो कोळ रश्यात घालावा. पुन्हा कालवणाला एक उकळी येऊ द्यावी व मिठ घालावे. नंतर गॅस बंद करण्यापूर्वी मोडलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी म्हणजे कोथिंबीर व मिरच्यांचा सुगंध टिकून राहतो. आता घरभर मस्त सोड्यांच्या कालवणाचा घमघमाट सुटलेला असतो व आपोआप भूक लागते.

वाचन 24315 प्रतिक्रिया 0