मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविची गाडी

प्रदीप · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे गाडी माणसांना तुडवते आहे हाडांच्या चिंध्या करते आहे शब्द हवेत फेकते आहे कल्पनांचे भुंगे सोडते आहे कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे 'शब्द बापुडे केवळ वारा' म्हणून गेला एक येडा त्या येड्याला काय ठावी जालाची किमया नाही गावी आता वाराही न दवडावी फुकटात 'काव्ये' प्रसिद्ध व्हावी कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे

वाचने 2330 वाचनखूण प्रतिक्रिया 6

पैसा 28/04/2018 - 12:04
जेसीबी आहे तो!! पुन्हा काही बोलले तर फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची!

नाखु 30/04/2018 - 19:01
तोच चंद्रमा आहे फक्त हौस म्हणून गाडी रणगाडा ते जैसीबी व्हाया डंपर बदलत आहे. गाडी सुसाट वेगाने पुढे जात आहे, सांडलेल्या शब्दांतून नवकविता (ऊ) जुळून येत आहे प्रेक्षक नाखु

खिलजि 02/05/2018 - 13:06
मस्तय गाडी,,, जेसीबी डंपर ट्रक आणि बरंच काही सिद्धेश्वर विलास पाटणकर