मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाचणी पुट्टू spicy

manguu@mail.com · · पाककृती
नाचणी पुट्टू साहित्य : १. नाचणी पीठ एक वाटी २. बारीक कापलेला कांदा ३. बारीक चिरलेला टोम्याटो ४. लाल / हिरव्या मिरच्या ५. तेल व फोडणी साहित्य ६. मीठ ७. फुटाण्याची डाळ -------------- १. नाचणी पीठात थोडे पाणी शिंपडून दमट करावे . नंतर कुकरच्या एका भांड्यात ठेवून कुकरमधून १०-१५ मिनिटे वाफवून घ्यावे. ( फडक्यात घालून वाफवणे , पुट्टु पात्र , इडली पात्रात वाफवणे असे इतर पर्याय आहेत. ) २. नंतर तेलाची फोडणी करुन त्यात कांदा, टोम्याटो, मिरच्या घालून परतावे. फुटाण्याची डाळ, ओली मूग डाळ , मटार , नारळाचा कीस , गाजर कीस, बीट कीस इ इ घालता येईल. ३. नंतर वाफवलेले पीठ घालून भरपूर परतावे. लागल्यास पाणी शिंपडावे. ४. वाटीतून मूद काढावी. ५. याच्याबरोबर हरबरा डाळीचे वरण , छोले इ इ घेतात. मी लसूण चटणी व दही कालवून घेतले होते. * असेच गोड पुट्टु करता येते. मसाल्याऐवजी गूळ , ड्राय फ्रुट , ओला नारळ कीस , पीनट बटर , तूप , तेल इ इ घालून करावे. puttu

वाचने 8659 वाचनखूण प्रतिक्रिया 8

पैसा 14/04/2018 - 22:12
आमच्या शेजारच्या केरळी अम्मा लांबुडके पुट्टू आणि हरभरे स्ट्यू नेहमी करत त्याची आठवण झाली.