नाचणी पुट्टू spicy
Taxonomy upgrade extras
नाचणी पुट्टू
साहित्य :
१. नाचणी पीठ एक वाटी
२. बारीक कापलेला कांदा
३. बारीक चिरलेला टोम्याटो
४. लाल / हिरव्या मिरच्या
५. तेल व फोडणी साहित्य
६. मीठ
७. फुटाण्याची डाळ
--------------
१. नाचणी पीठात थोडे पाणी शिंपडून दमट करावे . नंतर कुकरच्या एका भांड्यात ठेवून कुकरमधून १०-१५ मिनिटे वाफवून घ्यावे. ( फडक्यात घालून वाफवणे , पुट्टु पात्र , इडली पात्रात वाफवणे असे इतर पर्याय आहेत. )
२. नंतर तेलाची फोडणी करुन त्यात कांदा, टोम्याटो, मिरच्या घालून परतावे. फुटाण्याची डाळ, ओली मूग डाळ , मटार , नारळाचा कीस , गाजर कीस, बीट कीस इ इ घालता येईल.
३. नंतर वाफवलेले पीठ घालून भरपूर परतावे. लागल्यास पाणी शिंपडावे.
४. वाटीतून मूद काढावी.
५. याच्याबरोबर हरबरा डाळीचे वरण , छोले इ इ घेतात. मी लसूण चटणी व दही कालवून घेतले होते.
* असेच गोड पुट्टु करता येते. मसाल्याऐवजी गूळ , ड्राय फ्रुट , ओला नारळ कीस , पीनट बटर , तूप , तेल इ इ घालून करावे.
वाचने
8659
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
हे केले http://www.misalpav.com/comment/988656#comment-988656
हे एक प्रकारचे गोड पुट्टू झाले.
आमच्या शेजारच्या केरळी अम्मा लांबुडके पुट्टू आणि हरभरे स्ट्यू नेहमी करत त्याची आठवण झाली.
हा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. करून पहायला हवं.
In reply to हा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. by एस
भरपूर variations दिसतील.
अजुन येऊ द्या अशा वेगवेगळ्या पाककृती.
-दिलीप बिरुटे
पौष्टिक पाकॄ... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rasputin... [ with Lyrics ] :- Boney Mहटके पाकृ!!
मकेच्या पिठाचे असेच आई करते. आम्ही त्याला मुकं म्हणतो.
हे नाचणीचं मुकं झालं..
मस्त पाकृ
गोड पुट्टू