मूलभूत नीतितत्त्वे : यनावाला
[ईश्वरवादी--निरीश्वरवादी या दोघांतील प्रश्नोत्तररूपी संवाद . प्रश्न आस्तिकाचे, उत्तरे नास्तिकाची.]
प्रश्न :- तुम्ही म्हणता की, "आजच्या प्रगत युगात समाजाला देवा-धर्माची आवश्यकता नाही. पुरातनकाळीं अज्ञानयुगातील माणसाला सुचलेल्या आणि रुचलेल्या या संकल्पनांचे आता काही प्रयोजन उरलेले नाही. सर्वांनी त्या डोक्यातून काढून टाकल्या पहिजेत" असे करणे योग्य होईल का ?
उत्तर :- हो निश्चितच. इथे "धर्म" या शब्दात जगातील सर्व प्रचलित धर्म (उपासना पद्धती) समाविष्ट आहेत. तसेच देव हा शब्द जगातील सर्व देव-देवतांविषयीं आहे. इथे उपासनेचा देव (पर्सनल गॉड) --म्हणजे पूजा, प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, परम दयाळू देव हा अर्थ घ्यायचा. धर्म म्हणजे जे कांही रूढी परंपरांनी धर्माचरण चालू आहे , कर्मकांडे होत आहेत, ते सर्व. या देव-धर्मांमुळे जगभरातील अनेकांवर अन्याय-अत्याचार झाले आहेत. धर्मावरून भीषण युद्धे झाली आहेत. रक्ताचे पाट वाहिले आहेत. सर्व समाजांची अतोनात हानी झाली आहे. आणि होत आहे. धर्मगुरू, पुरोहित अशा कांही हितसंबंधी लबाडांना मात्र मोठा लाभ झाला आहे आणि होत आहे हे खरे. म्हणून समाजाच्या हितासाठी या देव-धर्माच्या संकल्पनांचे उच्चाटन होणे योग्य आहे. सुधारककार आगरकर लिहितात, "मानवी समाजाला यापुढे धर्माची आवश्यकता नाही. कारण धर्माचा मूळारंभ अज्ञान आणि भीती यांतून झालेला आहे. धर्मविषयक कल्पना या वस्तुस्थितीच्या अज्ञानातून आणि अज्ञात संकटाच्या भीतीतून आलेल्या आहेत."
प्रश्न :- धर्मग्रंथातून माणसाला नीतितत्त्वांची शिकवण मिळते. आपल्या हातून काही दुष्कृत्य, कुकर्म घडल्यास पाप लागेल, देव शिक्षा करील, अशी माणसाला भीती असते. तसेच सद्धर्माने वागल्यास पुढच्या जन्मी सुख मिळेल अशी आशाही त्याला वाटते. देव-धर्माचे उच्चाटन झाल्यास माणसाला नीतिबोध कसा होईल? देवाची भीती नसेल तर माणूस अनिर्बंध, अनैतिक वागणार नाही काय ? त्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढणार नाही काय ?
उत्तर :- म्हणजे देव-धर्म मानणारी, धार्मिक परंपरा पाळणारी माणसे नीतीने वागतात, तर नास्तिक लोक नीतिभ्रष्ट असतात, असे तुम्हाला म्हणायचे आहे.
प्रश्न :- होय. असे वाटते खरे. त्यात काय चूक आहे ?
उत्तर :- ठीक आहे. आपण वास्तवाचा, म्हणजे आजच्या सत्य परिस्थितीचा विचार करू. आपल्या देशात ८५% हून अधिक लोक आस्तिक आहेत. आपला देश ऋषी-मुनींचा, संन्यासी-योग्यांचा, बुवा-बाबांचा, आहे. इथे असंख्य मंदिरे आहेत. अगणित देव-देवता आहेत. उत्सव-सोहळे, भजने-कीर्तने, वार्या-तीर्थयात्रा, पर्वण्या-कुंभमेळे असतात. देवाचा उद् घोष, धर्माचा उदो उदो, अखंड चालतो. तुम्ही म्हणतां त्या अनैतिक नास्तिकांची संख्या इथे नगण्य आहे. या सत्य परिस्थितीचा विचार करता आपल्या देशाचा नैतिक स्तर अति उच्च असला पाहिजे ना ?
पण वास्तव काय आहे? भ्रष्टाचार, भूखंड घोटाळे, आर्थिक लुबाडणूक, बॅंकांतील थकित कर्जे, अशा अनेक अवैध गोष्टीत हा देश आकंठ बुडालेला आहे. स्रियांवरील बलात्कार, बालिकांवरील अत्याचार, अनेक विकृत गुन्हे, यांत आपला देश जगात अग्रेसर आहे. अनैतिकतेत भारताचा क्रमांक पहिल्या दहात आहे. या वास्तवावरून काय समजते ? यावरून तर्कसंगत निष्कर्ष निघतो की देव- धर्म- धर्मग्रंथ यांचा नीतीशी काही संबंध नाही. पूजा-प्रार्थना-भजने -आरत्या,कथा-कीर्तने यांनी नीती वाढत नाही. व्रत-वैकल्ये,अभिषेक-अनुष्ठाने, होम-हवने करून नीती उन्नत होत नाही. वार्या, पालख्या, छबिने, प्रकटदिनसोहळे यांनी नीतिमत्ता उद्भवत नाही.
तसेच तुम्ही समजता की देवा-धर्माचे उच्चाटन झाले तर गुन्हेगारी वाढेल ! त्याविषयी वस्तुस्थितीचा विचार करू. आज देशात बाराही महिने देवा-धर्माचा एवढा दुमदुमाट असताना भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रचंड आहे. देवाधर्माच्या उच्चाटनाने आणखी किती वाढणार ? युरोपीय देशांतील सर्वेक्षणांवरून असे दिसते की जिथे आस्तिकांची संख्या थोडी आहे त्या देशांत गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. यावरून दिसते की बहुसंख्य नास्तिक लोक हे स्वयंप्रेरणेने नीतितत्त्वे पाळतात.
प्रश्न :- नास्तिक माणसे धर्मग्रंथ वाचत नाहीत. मग त्यांना नीतितत्त्वे कशी कळतात ? कोण शिकवते ?
उत्तर :- मूलभूत नीतितत्त्वे पाच आहेत. ती अशी :
१) हेतुत:(म्हणजे जाणून-बुजून ) खोटे बोलू नये.
२) चोरी करू नये.
३) कुणाची फसवणूक करू नये.
४) कुणावर बळजबरी, अत्याचार करू नये.
५) कुणा माणसाची हिंसा करू नये.
या नीतितत्त्वांचा देवा-धर्माशी काही संबंध नाही. ही साधी तत्त्वे जर जगातील प्रत्येक माणसाने पाळली तर सर्वजण सुखी होतील. विश्वशांती नांदेल. प्रत्येक माणसात ही तत्त्वे स्वाभाविक (नैसर्गिक) म्हणजे उपजतच असतात. ती कुणी शिकवावी लागत नाहीत. कुठल्या ग्रंथातून वाचावी लागत नाहीत. इथे सद्गुरू, स्वामी, बुवा, बापू, अशा कुणाचीही आवश्यकता नाही. सत्संग, आध्यात्मिक प्रवचने, भजने, कीर्तने अशा गोष्टी इथे निरुपयोगी ठरतात. प्रत्येक सुजाण माणसाच्या बुद्धीत ही तत्त्वे असतातच.
प्रश्न :- तुमचे विधान धार्ष्ट्याचे आहे. ही मूलभूत तत्त्वे स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक असतील असे वाटत नाही. काहींही करून जीव वाचवणे, अन्न मिळवणे, आणि जनुक सातत्य टिकण्यासाठी पुनरुत्पत्ती करणे या प्रत्येक सजीव प्राण्याच्या नैसर्गिक प्रेरणा ( नॅचरल इन्स्टिंक्ट) आहेत असे वाचले आहे. ते पटते. म्हणजे माणसासाठी सुद्धा या नैसर्गिक ऊर्मी आहेतच. त्याला जिवंत राहण्यासाठी अन्न लागते. ते वैध मार्गांनी मिळणे अशक्य झाले तर प्रसंगी जीव वाचविण्यासाठी माणूस चोरी करील. जीव वाचविणे ही नैसर्गिक प्रेरणा आणि चोरी करू नये हे मूलभूत नीतितत्त्व यांची सांगड कशी घालता येईल ?
उत्तर :- हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नीतितत्त्वे सज्ञान माणसासाठीच आहेत, अन्य सजीवांसाठी नाहीत हे उघड आहे. उत्क्रांत होता होता माणसाच्या डोक्याच्या कवटीत नव्या मेंदूचा (निओकॉर्टेक्स चा ) उद्भव झाला. हा नवा मेंदू अधिक विकसित झाला. या नवमेंदूमुळे माणूस सुसंस्कृत झाला. अन्य माणसांचा, समाजाचा, विचार करूं लागला. तेव्हा त्याच्या मेंदूत ही मूलभूत नीतितत्त्वे उद्भवली. पुढे विकसित झाली. आता जनुकीय प्रेरणांवर माणूस आपल्या बुद्धीने नियंत्रण ठेऊं शकतो. माणूस हे जनुकीय यंत्र असले तरी बर्याच प्रमाणात माणूस स्वतंत्र आहे.
जिवंत राहाण्यासाठी चोरी करणे भाग आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर माणूस म्हणेल ," प्राण गेला तरी चालेल पण मी चोरी करणार नाही." हे जनुकीय प्रेरणेच्या विरुद्ध आहे. पण तत्त्वनिष्ठ माणूस ती प्रेरणा झिडकारून असा निश्चय करू शकतो. तसे वागू शकतो. तो स्वतंत्र आहे.
प्रश्न :- ठीक आहे. हे समजले. पण प्रसंगी जगण्याविरुद्ध असलेले हे नीतितत्त्व त्याच्या नव्या मेंदूत मुळात उद्भवलेच कसे ?
उत्तर : - योग्य प्रश्न विचारला. माणूस हा जाणीवेची जाणीव असलेला (होमो सेपियन्स् सेपियन्स्) प्राणी आहे. आपल्याला जाणीव असते याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे दुसर्या माणसालासुद्धा जाणीव असणार , मला भावना आहेत तशा त्यालाही भावना असणार हे माणसाला समजते.
तसेच माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी म्हणून विकसित झाला आहे.(त्या तर्कनिष्ठतेमुळे तो एवढी आश्चर्यकार प्रगती करू शकला.) या दोन गोष्टींमुळे माणसाला पुढील युक्तिवाद कळतो आणि पटतो. किंबहुना त्याला स्वत:लाच तो सुचू शकतो. :-
" * कोणी मला काही खोटे सांगितले तर ते मला आवडणार नाही. माझ्याशीं कोणी खोटे बोलू नये असे मला वाटते. म्हणून मी सुद्धा कुणाशी खोटे बोलता नये. नाहीतर -मला कोणी कांही खोटे सांगू नये--अशी अपेक्षा मी करणे योग्य होणार नही."
"* जी वस्तू माझी आहे., जिच्यावर माझा अधिकार आहे ती कोणी पळवली तर ते मला आवडणार नाही. मला दु:ख होईल. म्हणून मीसुद्धा कोणाची वस्तू चोरता नये. चोरणार नाही."
अशा तर्हेने ही पाच मूलभूत तत्त्वे माणसाच्या बुद्धीत उद्भवली.
प्रश्न :- हे सगळे तत्त्वत: ठीक आहे. पटण्यासारखे आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय अनुभव येतो ?
* खोटे बोलणारी माणसे पदोपदी भेटतात.
* चोरी, घरफोडी, दरोडा यांविषयींच्या बातम्या वृत्तपत्रांत सतत येत असतात.
* फसवणुकीची प्रकरणे इतकी असतात की जो तो दुसर्याला फसवायला टपला आहे असे वाटावे.
* बळजबरी, अत्याचार यांविषयी तर बोलायलाच नको. बलात्काराच्या बातमीविना एक दिवस जात नाही.
असे असता ही नीतितत्त्वे मानवी बुद्धीत उपजतच असतात असे म्हणण्यात काय अर्थ आहे ?
उत्तर :- हा प्रश्न अपेक्षित होताच. तुम्ही म्हणता ते खरे आहे. हेतुत: खोटे बोलणारी, दुसर्याला फसवणारी, अन्याय अत्याचार करणारी, हिंसक असणारी माणसे समाजात आहेतच. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. यात शंका नाही. पण मला असे म्हणायचे आहे की, जो अनेकदा हेतुत: असत्य कथन करतो, त्यालासुद्धा "खोटे बोलणे वाईट असते. खोटे बोलू नये. " हे समजते. पटलेले असते. समजा तो एक कथा वाचतो आहे. त्या कथेत शेवटी असत्याचा विजय होतो असे दाखवले आहे. तर त्या खोटारड्या माणसालासुद्धा तो शेवट आवडणार नाही. कारण अंतिम विजय सत्याचा व्हावा असेच त्याला वाटत असते. मग तो खोटे का बोलतो ? त्याची कांही कारणे असतात. आपल्या असत्य बोलण्याचे तो समर्थन करतो. तो म्हणतो ," खोटे बोलू नयेच. पण माझा निरुपाय असतो. मला खोटे बोलावे लागते. असत्य बोलण्याने लागलेले पाप मी पुण्य कृत्य करून धुऊन काढीन." धर्मात असे पापक्षालनाचे उपाय ठायीं ठायीं आहेत.
प्रश्न :- असे कोणते उपाय आहेत ?
उत्तर :- तुम्ही धार्मिक ग्रंथात वाचले नाही काय ? अशा प्रत्येक ग्रंथाच्या फलश्रुतीत ते सापडतील. सत्यनारायणकथेच्या दुसर्या अध्यायात आहे, "एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वा द्विजोत्तम: । सर्वपापविनिर्मुक्तो दुर्लभं मोक्षमाप्नुयात् । --हे सत्यनारायणाचे व्रत करून सर्व पापांतून मुक्त झालेला तो श्रेष्ठ ब्राह्मण अंतीं दुर्लभ अशा मोक्षपदाला गेला."-- समजा एक गुंड....
प्रश्न :- यात पापक्षालनाचा कोणता मार्ग सांगितला आहे ?
उत्तर :- अहो असे काय विचारता ? सत्यनारायणाची पूजा घातली की माणूस सर्व पापांतून मुक्त होतो असे स्पष्ट म्हटले आहे ना ?
प्रश्न :- हो हो. आले लक्षात. तुम्ही एका गुंडाविषयीं काय सांगत होता ?
उत्तर :- समजा एक गुंड चित्रपट बघायला गेला. खलनायक आणि त्याची टोळी यांची नायक पिटाई करतो असे दृश्य आहे. त्यावेळी हा गुंड प्रेक्षक टाळ्या वाजवतो. शिट्ट्या मारतो. गुंडांची पिटाई होते हे त्याला मनापासून आवडते. त्याचा धंदा धमक्या देऊन खंडणी वसूल करणे हा असतो. हे वाईट आहे. दुष्कृत्य आहे. हे त्याला ठाऊक असते. पण त्याला ते निरुपायाने करावे लागते. असे तो आपल्या दुष्कृत्याचे स्वत:शीच समर्थन करतो. खंडणीतील काही रक्कम मी सत्कृत्यासाठी खर्च करीन, पुण्य मिळवीन मग माझे पाप धुऊन जाईल असे तो आपले समाधान करून घेतो. मग शिरडीला किंवा बालाजीला जाऊन तिथल्या पेटीत मोठे दान टाकतो. गणपतीला चांदीचा उंदीर अर्पण करतो. अष्टविनायक यात्रा करतो. कुंभमेळ्यात स्नान करतो. पापक्षालनासाठी असे कितीतरी उपाय आहेत. माझे पाप धुऊन गेले या समजुतीने त्याच्या मनाला समाधान वाटते. पाप केल्याची जी टोचणी मनाला लागलेली असते ती संपते. त्याला पापक्षालनाचा मार्ग सापडलेला असतो. मग तो निर्ढावतो. उत्साहाने नवी दुष्कृत्ये करायला लागतो.
गीतेत भगवानुवाच आहे :- ".....मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच :। "[ ( कृत दुष्कृत्यांची) चिंता करू नकोस. मला शरण ये. मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन.]
प्रश्न :- नास्तिक माणसे अनैतिक काम करतात का ? केल्यास त्यांच्या मनाला टोचणी लागते का ?
उत्तर :- सगळेच नास्तिक नीतिमान असतात असे नाही. तसेच सगळे नास्तिक अनैतिक असतात असेही नाही. कांही निरीश्वरवाद्यांच्या हातून अनैतिक गोष्टी घडत असतील. दुष्कृत्य केल्यावर मनाला सदसद्विवेक बुद्धीची टोचणी लागणे, मनात खुपत-सलत राहणे ही सर्व माणसांच्या बाबतीत स्वाभाविक गोष्ट आहे. ही खुपणी संपविण्यासाठी, मानसिक समाधानासाठी पापक्षालनाचे मार्ग धर्मग्रंथांत आहेत हे आपण पाहिले.
समजा चित्रपटाला गेलेला खंडणीगुंड नास्तिक आहे, तरी केलेल्या दुष्कृत्याची टोचणी त्याच्या मनाला लागणारच. कारण मूलभूत नीतितत्त्वे स्वाभाविक आहेत. त्यांचा आस्तिक-नास्तिकतेशी संबंध नाही. पण मनाच्या समाधानासाठी, मनाची टोचणी घालवण्यासाठी नास्तिकाला कोणताच मार्ग उपलब्ध नाही. नास्तिक असल्यामुळे तो बालाजीला, साईबाबाला, कुंभमेळ्याला जाणार नाही. असल्या गोष्टींवर त्याची श्रद्धाच नाही. दुष्कत्य केल्याची खंत त्याच्या मनात सतत सलत राहील. त्यामुळे आणखी पापे करायला तो प्रवृत्त होणार नाही. परिणामत: तो गुंडगिरीतून मुक्त होईल. सन्मार्गाला लागेल. अशी शक्यता अधिक आहे. म्हणून गुन्हेगारांमध्ये निरीश्वरवाद्यांचे प्रमाण अत्यल्प असते. हे अनेक सर्वेक्षणांतून दिसून आले आहे.
प्रश्न :- तुम्ही सांगता त्यावर थोडा विचार केला तर काही पटण्यासारखे आहे. तरीपण मला प्रश्न पडतो की माणसासाठी ही नीतितत्त्वे जर उपजत असतील , तर माणूस अनैतिक गोष्टी करतोच कसा ? "त्याचा निरुपाय असतो " असे सांगून उत्तर पूर्ण होते काय ?
उत्तर :- तुमची अडचण लक्षात आली. माणूस जर जन्मत:च नीतिमान आहे तर तो अनैतिक कृत्ये करण्यास कसा प्रवृत्त होतो? असा तुमचा प्रश्न आहे. असे पाहा मानवी मेंदू हे जगातील सर्वांत आश्चर्यकारक, अत्यंत गुंतागुंतीचे , व्यामिश्र असे इलेक्ट्रो-केमिकल (विद्युत्-रासायनिक) यंत्र आहे. माणसाची बुद्धी आणि मन या अमूर्त गोष्टी आहेत. त्या मेंदूत उद्भवतात. मेंदू वस्तुरूप आहे. आनंद, नैराश्य, राग, लोभ, मोह, दंभ, मत्सर, प्रेम, श्रद्धा इत्यदि भावना आहेत. अशा सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, इ. नऊ घटकांचा समुच्चय म्हणजे मानवी बुद्धी.
एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेताना बुद्धी आणि मन यांच्यात द्वंद्व निर्माण होऊ शकते. (प्रत्येक वेळी होतेच असे नाही.) बुद्धीने घेतलेला निर्णय मनाला (म्हणजे भावनेला) नको असतो. तर मनाचा निर्णय बुद्धीला मान्य नसतो. खरे तर अंतिम निर्णय बुद्धीने घ्यायला हवा. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे. मनसस्तु परा बुद्धि:।[मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे.] असे गीतेत म्हटले आहे. ते योग्य वाटते. मनाने जर बुद्धीवर कुरघोडी केली तर माणूस अनैतिक कृत्य करतो. (मूलभूत नीतितत्त्वे बुद्धीत असतात. मनात नसतात.) उदाहरणार्थ चोरी करू नये हा बुद्धीचा निर्णय असतो. पण मनातील लोभ, अभिलाषा, या भावना जर वरचढ झाल्या तर बुद्धीचा निर्णय झुगारून देऊन माणूस चोरी करतो. तसेच हिंसा करू नये हा बुद्धीचा नियम असतो. पण क्रोध, मद, मत्सर, या मनोभावना प्रबळ झाल्या तर माणूस हिंसक बनतो. याप्रमाणे बुद्धीतील नीतितत्त्वांपेक्षा एखादी मनोभावना प्रबळ झाली तर त्या भावनेच्या प्रभावाखाली माणूस अनैतिक कृत्य करतो.
प्रसिद्ध तत्त्वज्ञानी इमॅन्युएल कांट यांनी म्हटले आहे, "अगणित तारकांनी भरलेली ही आकाशाची अथांग पोकळी आणि मूलभूत नीतितत्त्वे मानणारी मानवी बुद्धी या दोन गोष्टींवर मी जों जों विचार करतो तों तों माझे मन आश्चर्याने भरून येते."
जनुकीय प्रेरणांच्या विरुद्ध असलेली मूलभूत नीतीची संकल्पना मानवी बुद्धीत कशी उद्भवते ? कोठून येते ? अनैतिक आचरण केल्यावर मनाला टोचणी का लागते ? या प्रश्नांची उत्तरे कांही अंशीं देण्याचा इथे प्रयत्न केला आहे. या प्रश्नांची परिपूर्ण उत्तरे मी देऊ शकत नाही. याची मला जाणीव आहे.
***************************************************************
वर्गीकरण
वाचने
65052
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
नीतिमत्ता आणि धार्मिक
१०० वा प्रतिसाद. (कुठे द्यायचा म्हणून इथे )
In reply to नीतिमत्ता आणि धार्मिक by एस
लेखन टाकून मोकळे होत चला.
In reply to १०० वा प्रतिसाद. (कुठे द्यायचा म्हणून इथे ) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी अ-देवाळू आहे, माझ्याकडे
In reply to लेखन टाकून मोकळे होत चला. by बिटाकाका
वल्ली
In reply to मी अ-देवाळू आहे, माझ्याकडे by प्रचेतस
इरसाल उत्तर ! ;) =))
In reply to वल्ली by इरसाल
अ-देवाळू
In reply to मी अ-देवाळू आहे, माझ्याकडे by प्रचेतस
अ-देवाळू लोकांचे वैयक्तिक
In reply to मी अ-देवाळू आहे, माझ्याकडे by प्रचेतस
आस्तिकांवर ब्रह्मास्त्र .
आमच्याकडे न फुटणार्या
In reply to आस्तिकांवर ब्रह्मास्त्र . by मार्मिक गोडसे
फुसका बार
In reply to आमच्याकडे न फुटणार्या by arunjoshi123
देव आणि धर्म एक कसे? धर्म आणि
नास्तिक गांधी
यनावाला काही आस्तिकांना
बाकी ठीकच..
In reply to यनावाला काही आस्तिकांना by डॉ सुहास म्हात्रे
यनावालांची अतार्किक विचारशैली
In reply to बाकी ठीकच.. by पुंबा
चांगले
लिहाच बाई तुम्ही तर्कशास्त्र.
In reply to चांगले by सांरा (verified= न पडताळणी केलेला)
मुद्दा
In reply to लिहाच बाई तुम्ही तर्कशास्त्र. by arunjoshi123
#मीच लै शाना, #अज्ञानी लोक्स,
आस्तिक
लेख आवडला.
यना साठी मुलभुत नीतीतत्वे
यनावाला यांचे लेख
डियर यनावाला
प्रश्न :- नास्तिक माणसे धर्मग्रंथ वाचत नाहीत. मग त्यांना नीतितत्त्वे कशी कळतात ? कोण शिकवते ? उत्तर :- मूलभूत नीतितत्त्वे पाच आहेत. ती अशी : १) हेतुत:(म्हणजे जाणून-बुजून ) खोटे बोलू नये. २) चोरी करू नये. ३) कुणाची फसवणूक करू नये. ४) कुणावर बळजबरी, अत्याचार करू नये. ५) कुणा माणसाची हिंसा करू नये.एक अत्यंत विनम्र विनंती अशी आहे की तुम्ही फिलॉसॉफी ऑफ एथिक्स चा किमान प्राथमिक अभ्यास एकदा तरी करुन बघा. किमान अत्यंत प्राथमिक पातळीवर जरी अगदी बेसीक जरी तुम्ही फिलॉसॉफी ऑफ एथिक्स चा अभ्यास केला तर तुम्हाला वरील विधानाच्या मर्यादा सहज लक्षात येतील. अतीव विनम्रतेने हे सुचवीत आहेत याची कृपया नोंद घ्यावी. The following examples of questions that might be considered in each field illustrate the differences between the fields: Descriptive ethics: What do people think is right? Normative ethics (prescriptive): How should people act? Applied ethics: How do we take moral knowledge and put it into practice? Meta-ethics: What does "right" even mean? वरीलपैकी दोन मुलभुत किमान Normative आणि Meta-ethics या दोनच शाखा जरी बघितल्या सुरुवातीला तरी प्रत्येक शाखेच्या अगदी मुलभुत विश्लेषणासाठी ही दोन अगदी बेसीक पुस्तके जरी तुम्ही अभ्यासलीत तर तुम्हाला एथिक्स चा आवाका किती विशाल आणि व्यामिश्र आहे याची नक्की कल्पना येइल. ही माझ्या अल्प अनुभवाप्रमाणे अत्यंत उत्तम बेसीक व बेस्ट फॉर बिगीनर्स अशी पुस्तके आहेत व साधारणतः २०० पानाच्या आसपास प्रत्येकी आहे. याने तुम्ही ज्या मर्यादेत निती या विषयाकडे बघत आहात तो दृष्टीकोण कदाचित व्यापक व्हावयास मदत होइल असे मनापासुन वाटते. १- Ethics: The Fundamentals - Julia Driver या पुस्तकात प्रामुख्याने Normative ethics च्या अंतर्गत येणार्या विविध थेअरीजचे अप्रतिम असे मुलभुत विवेचन आहे उदा. Consequentialism, Kantian ethics. इत्यादी. लेखिका Normative ethics च्या विख्यात एक्सपर्ट आहेत. २ Metaethics: An Introduction- Andrew Fisher हे देखील एक अप्रतिम असे मुलभुत बेसीक टेक्स्टबुक आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र अशी ग्संदर्भ रंथसुची लेखकाने फार परीश्रमाने काळजीपुर्वक जोडलेली आहे. जी तुम्हाला विशीष्ट विषयाच्या अधिक खोलात जाऊन धांडोळा घेण्यास उपयुक्त आहे. अत्यंत सोप्या भाषेत अतीशय वाचनीय असा हा ग्रंथ आहे. एकवार अवश्य वाचुन बघावा. या साठी पुरेसा वेळ नसल्यास किमान खालील दुवे उपयुक्त ठरतील. १- https://www.philosophybasics.com/branch_ethics.html#Introduction २- https://www.iep.utm.edu/ethics/ यालाही वेळ नसेल तर किमान Alastair Norcross चा हा एक अप्रतिम पेपर PUPPIES, PIGS, AND PEOPLE: EATING MEAT AND MARGINAL CASES हा तरी मुद्दाम वाचुन पहावा. हे अशासाठी म्हणतोय की निती तत्वाची वा निती प्रश्नांची किमान व्यामिश्रता याने लक्षात यावयास मदत होइल. याचा दुवा इथे. http://spot.colorado.edu/~heathwoo/readings/norcross.pdfभारीच
In reply to डियर यनावाला by मारवा
यनांचा लेख टाकण्याचा वेग
In reply to भारीच by प्रसाद गोडबोले
दुव्यासाठी मनापासुन धन्यवाद ! हा व्हिडीयो बघितलेला आहे.
In reply to भारीच by प्रसाद गोडबोले
संबंधित पुस्तकांचे दुवे
In reply to दुव्यासाठी मनापासुन धन्यवाद ! हा व्हिडीयो बघितलेला आहे. by मारवा
महाभारत व रामायण यांच्या
In reply to दुव्यासाठी मनापासुन धन्यवाद ! हा व्हिडीयो बघितलेला आहे. by मारवा
अजून एक...
In reply to महाभारत व रामायण यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
खूप धन्यवाद
In reply to दुव्यासाठी मनापासुन धन्यवाद ! हा व्हिडीयो बघितलेला आहे. by मारवा
https://www.philosophybasics
In reply to डियर यनावाला by मारवा
आपल्याला बुवा तुकोबांच्या एक
In reply to डियर यनावाला by मारवा
होय तिथे काहि अस्तिक नास्तिक
In reply to आपल्याला बुवा तुकोबांच्या एक by आनन्दा
बाब्बो.....
हजारो नि कोट्यावधी
(No subject)
छान
In reply to (No subject) by मामाजी
मग इथल्या म्युझियममध्ये भाले
In reply to छान by manguu@mail.com
मोगा खान
In reply to छान by manguu@mail.com
अय्यो घोडा चतुर
In reply to मोगा खान by सुबोध खरे
काय सांगताय?
In reply to अय्यो घोडा चतुर by manguu@mail.com
गंमतच !!
In reply to काय सांगताय? by सुबोध खरे
मोगाखान ना दाढी कुरवाळायची
In reply to गंमतच !! by manguu@mail.com
छान
In reply to (No subject) by मामाजी
एक तो घोडा बोलो या चतुर बोलो
In reply to छान by manguu@mail.com
याला कोंच्याच मोगाकडे उत्तर
In reply to एक तो घोडा बोलो या चतुर बोलो by सुबोध खरे
माझा एक पर्रश्न इज्राइली जर
यनावाला मला तुमचे विचार
In reply to माझा एक पर्रश्न इज्राइली जर by Ram ram
रामायण नव्हे महाभारत !
अठरा अक्षौहिणी सैन्य राम-रावण
In reply to रामायण नव्हे महाभारत ! by यनावाला
अठरा अक्षौहिणी सैन्य राम-रावण युद्धात नव्हते. भारतीय युद्धात कुरुक्षेत्रावर होते.एक अक्षौहिणी सेना नौ भागों में बटी होती थी- १. पत्ती- 1 गज + 1 रथ + 3 घोड़े + 5 पैदल सिपाही २. सेनामुख (3 x पत्ती)- 3 गज + 3 रथ + 9 घोड़े + 15 पैदल सिपाही ३. गुल्म (3 x सेनामुख)- 9 गज + 9 रथ + 27 घोड़े + 45 पैदल सिपाही ४. गण (3 x गुल्म)- 27 गज + 27 रथ + 81 घोड़े + 135 पैदल सिपाही ५. वाहिनी (3 x गण)- 81 गज + 81 रथ + 243 घोड़े + 405 पैदल सिपाही ६. पृतना (3 x वाहिनी)- 243 गज + 243 रथ + 729 घोड़े + 1215 पैदल सिपाही ७. चमू (3 x पृतना)- 729 गज + 729 रथ + 2187 घोड़े + 3645 पैदल सिपाही ७. अनीकिनी (3 x चमू)- 2187 गज + 2187 रथ + 6561 घोड़े + 10935 पैदल सिपाही ९. अक्षौहिणी (10 x अनीकिनी)- 21870 गज + 21870 रथ + 65610 घोड़े + 109350 पैदल सिपाही (संदर्भ : http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E… १८ अक्षौहिणी = १८० अनकिनी इतक्या मोठ्या संखेने सैन्य असण्याइतकी लोकसंख्या त्यावेळेस होती आणि इतके मोठे सैन्य बाळगण्याइतके प्रबळ राजे त्यावेळेस होते, यावर आपला विश्वास बसला आहे, म्हणजेच पर्यायाने रामायण-महाभारत घडले यावरही आपला विश्वास आहे. हे वाचून धन्य धन्य होण्यात आले आहे ! "यक पे रेहना, या घोडा बोलो या चतुर", हे आठवले =)) =)) =))रामायण नव्हे महाभारत !
अशा प्रतिसादांनी आपल्याच
In reply to रामायण नव्हे महाभारत ! by यनावाला
याला "प्रायव्हेट लॉजिक"
In reply to अशा प्रतिसादांनी आपल्याच by प्रचेतस
महाभारताला कोणी काल्पनिक
In reply to रामायण नव्हे महाभारत ! by यनावाला
३,९३,६६० हत्ती आणि ११,८०,९८० घोडे युध्दाला जुंपले होते
यनावस्था प्रसंग
पूर्णज्ञानी असलेल्याला अजून
In reply to यनावस्था प्रसंग by arunjoshi123
यनावस्था प्रसंग
In reply to यनावस्था प्रसंग by arunjoshi123
महाभारत
#अज्ञानमूलक
In reply to महाभारत by यनावाला
दुर्दैवाने यनावालांचे
In reply to #अज्ञानमूलक by प्रसाद गोडबोले
दुर्दैवाने सहमत आहे. श्री.
In reply to दुर्दैवाने यनावालांचे by प्रचेतस
हरकत नाही
In reply to दुर्दैवाने सहमत आहे. श्री. by एस
अगदी द्वापारयुगापासूनच
In reply to दुर्दैवाने सहमत आहे. श्री. by एस
पण गांधारेय शंभर असणे
In reply to महाभारत by यनावाला
यनावालांच्या भुमिकेवर नेमका
In reply to महाभारत by यनावाला
भारतीय युद्ध झाले असणे शक्य आहे. म्हणून ते तत्त्वत: सत्य मानतो. ते वस्तुत: सत्य आहे की नाही हे ठरविण्याचे काम इतिहास संशोधकांचे आहे.एक इतिहास संशोधक म्हणुन इरावती कर्वे चे च उदाहरण घेतले तर Yuganta - The End Of An Epoch या त्यांच्या ग्रंथात अगदी सुरुवातीलाच त्या खालील शब्दात त्यांच्या मते महाभारत हे प्रत्यक्षात लढलेले युद्ध होते आणि त्याचा काळ साधारण ख्रि.पु. १००० होता असे विधान त्या करतात. What is Mahabharata?Mahabharata is the name of a book in the Sanskrit language telling in very simple verse form the story of a family quarrel ending in a fierce battle. According to this author and to Indians in general this is not an imaginary, made-up story, but represents a real event which took place about 1000 B.C.आता जे युद्ध झाले असे इतिहास संशोधिका इरावती कर्वे काळाचा ही स्पेसीफीक संदर्भ देउन ख्रि.पु.१००० ला झाले. असे म्हणतात ते त्याहुनही अधिक काळजीपुर्वक विधान करुन यनावाला केवळ तत्वतः मान्य करतात तर यात त्यांच्या भुमिकेत नेमकी चुक काय आहे ? २ यनावाला जरी तत्वतः महाभारत युद्ध प्रत्यक्षात झाले असावे असे मान्य करीत असले तरी म्हणून महाभारतातील प्रत्येक अतिशयोक्त गोष्ट त्यांना मान्य नाही. हे यनावाला वेगवेगळी उदाहरणे देउन त्यांनी स्पष्टपणे प्रतिसादात मांडलेले दिसतेय. (त्यांच्या या एकंदर भुमिकेवरुन ते १८ अक्षोहीणी सैन्याचे अस्तित्वही कदाचित मानत नसावेत अर्थात तसा त्यांनी त्या संदर्भात खुलासा केल्यास शंकेला जागा राहणार नाही) वर प्रतिसादात ते इतकच म्हणताना दिसतायत की अक्षौहिणी सैन्याचा उल्लेख रामायणात नसुन महाभारतात आहे. एखादी व्यक्ती इतकच म्हणत असेल की " रामसेतु" चा उल्लेख "कुराणात" नसुन रामायणात आहे. याचा अर्थ ती व्यक्ती "रामसेतु" असण्याला खरे मानत आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. ( यनावालांची आतापर्यंतची भुमिका पाहता ते केवळ निर्देश करत आहेत असे म्हणण्यास अधिक वाव आहे. त्यांच्या एकंदर मितप्रतिसादी शैलीने गैरसमज करुन घेण्याचे प्रमाण जास्त दिसते)अजुन एक शक्यता
In reply to यनावालांच्या भुमिकेवर नेमका by मारवा
जे यनावाला स्पष्टपणे लिहायचे
In reply to अजुन एक शक्यता by मारवा
सहमत आहे.
In reply to यनावालांच्या भुमिकेवर नेमका by मारवा
मारवा महोदय
In reply to सहमत आहे. by arunjoshi123
भारतीय युद्ध झाले असणे शक्य
In reply to यनावालांच्या भुमिकेवर नेमका by मारवा
सहमत अाहे
In reply to यनावालांच्या भुमिकेवर नेमका by मारवा
कमाल आहे राव. मी यना आणि
In reply to सहमत अाहे by स्वधर्म
काय अजो
In reply to कमाल आहे राव. मी यना आणि by arunjoshi123
परस्परसन्माम , सहिष्णूता नव्हे
In reply to काय अजो by स्वधर्म
रामायण
असं हो नाही हो नाही करत अख्खं
In reply to रामायण by यनावाला
थीम
In reply to रामायण by यनावाला
खास यनांसाठी - धर्म सोडल्यानं काय होतं.
हं...
In reply to खास यनांसाठी - धर्म सोडल्यानं काय होतं. by arunjoshi123
नव्हतेच मुळी
In reply to हं... by manguu@mail.com
छान
In reply to नव्हतेच मुळी by गामा पैलवान
हि सेल्फी का पाठवली इथे?
In reply to छान by manguu@mail.com
ठ्ठोsss =)) =)) =))
In reply to हि सेल्फी का पाठवली इथे? by सुबोध खरे
प्रिय मंगू,
In reply to हं... by manguu@mail.com
इथे ख्रिश्चनांना मधे ओढणे चूक
In reply to हं... by manguu@mail.com
सारांश एकदम चपखल.
धार्मिक युद्धे, धर्माधारित रक्तपात, धार्मिक अत्याचार
तावातावाने दुसर्याचे दुर्गुण उगाळण्यात अर्थ नाही.
In reply to धार्मिक युद्धे, धर्माधारित रक्तपात, धार्मिक अत्याचार by यनावाला
अल्लाउद्दिन खिलजी अवघ्या
In reply to धार्मिक युद्धे, धर्माधारित रक्तपात, धार्मिक अत्याचार by यनावाला
तात्त्विक आणि व्यावहारिक सत्य
आता समजा "क" म्हणाला की
In reply to तात्त्विक आणि व्यावहारिक सत्य by यनावाला
हिंदू धर्माविषयी असलेल्या गैरसमजांचं निराकरण
गामाजी
In reply to हिंदू धर्माविषयी असलेल्या गैरसमजांचं निराकरण by गामा पैलवान
किती सविस्तर लेख लिहावेत?
In reply to गामाजी by मारवा
साने नास्तिक आहेत हे कुणी
In reply to किती सविस्तर लेख लिहावेत? by arunjoshi123
साने (आणि शाणे) नास्तिक आहेत
In reply to साने नास्तिक आहेत हे कुणी by पुंबा
ते इहवादी आत्मविद्या वादी
In reply to साने (आणि शाणे) नास्तिक आहेत by arunjoshi123
https://www.loksatta.com
In reply to ते इहवादी आत्मविद्या वादी by पुंबा
बडबडण्याच्या ओघात
In reply to साने नास्तिक आहेत हे कुणी by पुंबा
समजा एका घरात वास्तुशांतीवर
In reply to हिंदू धर्माविषयी असलेल्या गैरसमजांचं निराकरण by गामा पैलवान
परिपूर्ण प्रतिसाद, आवडला!
In reply to समजा एका घरात वास्तुशांतीवर by arunjoshi123
यना प्राध्यापक आहेत. पदवीदान
In reply to समजा एका घरात वास्तुशांतीवर by arunjoshi123
त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते
In reply to यना प्राध्यापक आहेत. पदवीदान by माहितगार
काही शक्यता
In reply to त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते by arunjoshi123
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या
In reply to काही शक्यता by माहितगार
...माझा रोख सध्या गात
In reply to आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या by arunjoshi123
(समजा हो ना हो आकाश गंगेची
In reply to ...माझा रोख सध्या गात by माहितगार
छान
In reply to (समजा हो ना हो आकाश गंगेची by arunjoshi123
वैज्ञानिक दॄष्ट्या तरी
In reply to छान by manguu@mail.com
...उरलेल्यांनी इथिओपियामधे
In reply to वैज्ञानिक दॄष्ट्या तरी by arunjoshi123
अर्थात काही
In reply to ...उरलेल्यांनी इथिओपियामधे by माहितगार
ब्राह्मणांनी भारतीय भाषा,
In reply to समजा एका घरात वास्तुशांतीवर by arunjoshi123
सर्व व्यवसायात नाडणारे असतात
In reply to ब्राह्मणांनी भारतीय भाषा, by माहितगार
वालावलकरसेठ....
नास्तिक हे अक्कलनामशून्य
In reply to वालावलकरसेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देव- बीव काय नसतं
In reply to वालावलकरसेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरील दोन्ही प्रतिसादांत
In reply to वालावलकरसेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवे लेख
In reply to वालावलकरसेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शतक
शुभेच्छा हे अस्तिकी लक्षण आहे
In reply to शतक by राही
उचलले बोट आणि लावले कळपटाला !
प्रचलित अर्थानेच परीस हा एक
In reply to उचलले बोट आणि लावले कळपटाला ! by यनावाला
तसेच लोखंडाचे सोने बनविण्याचे
In reply to उचलले बोट आणि लावले कळपटाला ! by यनावाला
शिसे ते सोने.
In reply to तसेच लोखंडाचे सोने बनविण्याचे by arunjoshi123
यना, राजीव साने तुमच्या