पुतळा म्हणजे....
In reply to छान! पुतळा म्हणजे... by अनन्त्_यात्री
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..हि ओळ विशेषतः आवडली. पुतळ्यांमध्ये, लोकमान्य टिळक प्रेरणा मुल्य शोधत. त्यांच्या मते व्यक्तीपुजा म्हणजे त्या व्यक्तिचे अंध-अनुकरण करणे नव्हे पण त्यातून केवळ प्रेरणा घेणे. टिळकांच्या मते पुतळा/मुर्ती बघणार्या हजारो व्यक्तींना प्रेरणा मिळत नाही पण एखाद्या व्यक्तीनेही प्रेरणा मिळाली आणि त्याच्या कडून काही चांगले घडले तर पुतळा संकल्पनेस यश येते. माझ्या मते , राजकीय पुढारी जेव्हा पुतळे बसवण्याचे राजकारण करतात तेव्हा त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रेरणा घेण्यापेक्षा, इतर अंधभक्तांना तुम्हा अनुयायांचा मी पुढारी हे सिद्ध करण्याचा / होण्याचा उद्देश असतो - हि शुद्ध धूळफेक असते. पुतळ्याच्या रुपाने व्यक्ती पुजा केली जाणार्या व्यक्तीची मते बर्ञाचदा कालसुसंगत अथवा प्रॅक्टीकल राहीलेली नसतात, काही/ बर्याच अनुयायांची अपेक्षा काळ आणि परिस्थिती बदलली तरी शब्द ग्रंथपुजेने अंधानुकरण होत रहावे अशी अपेक्षा असते. शब्द पुजा व्यक्ती पूजा उणीवग्रस्त असतात हे कळले तरी बर्याचदा वळत नाही. त्यामुळे ज्यांना प्रॅक्टीकल अथवा काळसूसंगत निर्णय घेण्याची गरज पडते असे त्या त्या काळातील नेतृत्वाने पुतळे बनवणे / मुर्तीकण करणे मुर्तीपूजेकडे ढकलणे रास्त असते म्हणजे अंधभक्तांना पुतळा/मुर्तीपूजेच्या कर्ममांडात गुंतवले की अंधभक्तांची पावती मिळते आपले नेतृत्व प्रस्थापीत करता येते आणि दुसरीकडे पुस्तकपूजा टाळून प्रॅक्टीकल निर्णय घेता येतात. पुस्तकांची काळानूरुप कालसुसंगतता राहत नाही आणि अनेक वेळा प्रॅक्टीकल अस्पेक्ट्स काँटेक्स्ट बदलले असतात -पुस्तकपूजा अनेकदा तापदायक ठरतात . पुस्तक पुजेपेक्षा पुतळा / मुर्तीपूजा बरी पडते. एकदा पुतळा/मुर्ती पूजा करुन झाली हार घालून झाला की प्रत्यक्षात व्यावहारीक गरजे प्रमाणे वागता येते आणि पुस्तकपुजे पेक्षा तेच बरे असते.
In reply to पुतळा म्हणजे हरवून गेल्या by माहितगार
In reply to सांगण्याचा मुद्दा असा की, by माहितगार
In reply to पुतळा/मुर्ती by चौथा कोनाडा
In reply to कमाल आहे, कुणी कुठे केव्हा by माहितगार
In reply to कमाल आहे, कुणी कुठे केव्हा by माहितगार
In reply to सहमत. by चौथा कोनाडा
पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते.बर्यापैकी सहमत, इथे प्रगल्भता शब्दा अर्थछटेसाठी काही पर्यायी शब्द सुचतो का म्हणून विचारात पडलोय .
In reply to पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या by माहितगार
In reply to पुतळा/मुर्ती by चौथा कोनाडा
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौको. by प्राची अश्विनी
In reply to धन्यवाद. by चौथा कोनाडा
मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे..... आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच !'निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे ' हा वाक्प्रयोग आपण आधीच्या प्रतिसादातून केला आहे. सकारात्मक अनुभूती पावित्र्य, मांगल्य, श्रद्धेय बनवण्यास साहाय्यक असते, पण अनुभूती आणि पूजा यात अल्प अंतर असावे. दुसरे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपॉल्जीकल सिक्वेन्स पाहिला तर पूजांची सूरवात निसर्ग झाली असावी. त्यानंतर पूर्वज पूजा आली असावी. निसर्गाचे मानवीकरण किंवा पर्सोनीफीकेशन होतानाची स्टेज ऋग्वेदात दिसून येते (चुभुदेघे) . निसर्गपूजेचा एक उपप्रकार नैसर्गिक शक्तींना स्पिरीट आपण जसे पंच महाभूते कल्पतो तसे काहीसे समजून झाल्याचे दिसून येते. नास्तिक सुद्धा निसर्गाच्या पंच महाभूतांनी रुद्ररुप धारण करु नये अशीच इच्छा करेल. समोरच्यांना नमवण्याची निसर्गाची क्षमता आजही असीम आहे असे वाटते. पण निसर्गाने रौद्ररुप धारण करणे काहीसे परिस्थिती जन्य आहे. सर्वसामान्य मानवास रोजच्या समस्यातून सुटका हवी यासाठी तो इतर विवीध श्रद्धांचा आसरा घेताना दिसतो त्यातच मुर्तीपूजेचाही समावेश होतो. मूर्ती पूजा पूजांच्या स्वरुपात बरीच उशीरा आलेली दिसते. निसर्ग पूजा ते ओबड धोबड खडकांची पूजा एका बाजूला दुसर्या बाजूला वृक्ष पूजा (ते काठी पूजा) तिसरी पूर्वज पूजा असे पूजेचे स्वरुप विकसीत झाले असावे. सर्वसाधारण पूजा असो की मुर्ती पूजा , पूजा होण्यासाठी श्रद्धा निर्माणास साहाय्यक कथासूत्राची किमान आरंभीच्या क्षणी गरज असावी, किमान पक्षी एखादी गोष्ट पावू शकेल अथवा एखादी गोष्ट कोपू शकेल अशी भावना बळ पकडली की तिथून पुढे पुजेची कर्मकांडे आकारास येतात. अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते. असो
In reply to असो. by माहितगार
In reply to असो. by माहितगार
अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते.बरोबर. सुंदर प्रतिसाद.
In reply to या वरून एक by चौथा कोनाडा
In reply to हो आणि कुसुमाग्रजांची आहे ती, by प्राची अश्विनी
In reply to आपली पावर दाखवायचे साधन by पैसा
In reply to मला कधीच पुतळे असे ऑड किंवा by अभ्या..
बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे.यासाठी अजून +१०००००००.
In reply to मला कधीच पुतळे असे ऑड किंवा by अभ्या..
In reply to मला कधीच पुतळे असे ऑड किंवा by अभ्या..
In reply to मला कधीच पुतळे असे ऑड किंवा by अभ्या..
In reply to अभ्याजी यांच्याशी सहमत ! by चौथा कोनाडा
In reply to भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा... by बबन ताम्बे
In reply to शिल्प बांधायच्या आधी तिथे by विशुमित
In reply to परवानगीचा प्रश्न नाही, माझ्या by चौथा कोनाडा
In reply to भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा... by बबन ताम्बे
In reply to होय सर. इमारती व्ह्यायच्या by चौथा कोनाडा
In reply to तुमच्या सौंदर्य दृष्टीशी १००% by विशुमित
पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ?फारच गंभीर प्रश्न आहे हा. मैदाने व मोकळ्या जागा इ अतिक्रमण / कमर्शियलाझेशन ने व्यापून टाकल्या जाताहेत. भविष्यात अवघड आहे. गणेश तलावाचा वापर करून त्याभोवती सुंदर उद्यानाची (लॅण्डस्केपड गार्डन) रचना केलेली आहे. हे वीर सावरकर उद्यान प्राधिकरणातला आकर्षण बिंदू आहे. आंजावर फोटो आहेत. पाहता येतील. योग आलयास नक्की भेट द्या. माझ्या माहिती नुसार गणेश तलावाला एन्ट्री फी नाहीय, फक्त वीर सावरकर उद्यानाला आहे. दोन्हीची कंपाऊंडस वेगवेगळी आहेत. दोनतीन वर्षापुर्वी तिथं मिपाचा कट्टा झाला होता. मी पहिल्यांदाच मिपाकट्टयाला उपस्थित राहिलो. ज्याम धमाल आली होती त्याची आठवण झाली. डॉ सुहास म्हात्रे यांनी सावरकर उद्यानाचे काही सुंदर फोटो कट्ट्याच्या वृतांतात प्रतिसादात टाकलेले आहेत ते खालील लिंक वर दिसतील. प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
In reply to कविता खुप आवडली. by पुंबा
आणि पुतळा म्हणजे हत्ती देखील....