लाज
लेखनविषय:
काव्यरस
*******************
पोर वेडी पोट पकडुन झोपते
माय दिसता भूक विसरुन नाचते
देव सांगा राहतो कुठल्या घरी?
बंद दाराच्या गजातुन शोधते
एकदा भेटायचे बाबा तुला
पत्र कोरे रोज हटकुन टाकते
ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे
पोर आहे..., माय विनवुन सांगते
भूक त्यां डोळ्यात आहे दाटली
वेळ थोडा पदर पसरुन मागते
भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा
त्याचसाठी देह वाटुन टाकते
रोज आत्मा खर्चते माझाच मी
लाज माझी मीच उधळुन सोडते
*******************
© विशाल विजय कुलकर्णी
वाचने
3957
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
थोड़ी आवश्यक सुधारणा..
लाज
पोर वेडी पोट पकडुन झोपते
माय दिसता भूक विसरुन नाचते
देव सांगा राहतो कुठल्या घरी?
बंद दाराच्या गजातुन शोधते
एकदा भेटायचे बाबा तुला
पत्र कोरे रोज हटकुन टाकते
ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे
पोर आहे..., माय विनवुन सांगते
भूक त्यां डोळ्यात आहे दाटली
वेळ थोडा पदर पसरुन मागते
भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा
त्याचसाठी देह वाटुन टाकते
रोज आत्मा खर्चते माझाच मी
लाज माझी मीच उधळुन सोडते
© विशाल विजय कुलकर्णी
सुन्न :(
In reply to सुन्न :( by पद्मावति
विषण्ण करून गेली कविता!
Sandy
_/!\_
सुन्न करणारी कविता!
.
काय प्रतिक्रिया लिहावी तेच समजत नाहीये.
पैजारबुवा,
...
:(
फार विषण्ण करणारी कविता..
_/!\_
आणि भेदक
अशा जखमा प्रकट आणि अव्यक्त ही अवतीभवती आहेत
माणसांच्या जंगलातला नाखु पांढरपेशा
In reply to टोकदार by नाखु
धन्यवाद नाखुशेठ !
थोड़ी आवश्यक सुधारणा..