मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाज

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
******************* पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते ******************* © विशाल विजय कुलकर्णी

वाचने 3957 वाचनखूण प्रतिक्रिया 11

विशाल कुलकर्णी 15/02/2018 - 10:04
थोड़ी आवश्यक सुधारणा.. लाज पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते © विशाल विजय कुलकर्णी

In reply to by पद्मावति

चांदणे संदीप 15/02/2018 - 14:52
विषण्ण करून गेली कविता! Sandy

विशाल कुलकर्णी 15/02/2018 - 15:26
_/!\_

ज्ञानोबाचे पैजार 16/02/2018 - 14:53
. काय प्रतिक्रिया लिहावी तेच समजत नाहीये. पैजारबुवा,

समाधान राऊत 16/02/2018 - 15:38
...

विशाल कुलकर्णी 19/02/2018 - 13:49
_/!\_

नाखु 19/02/2018 - 22:50
आणि भेदक अशा जखमा प्रकट आणि अव्यक्त ही अवतीभवती आहेत माणसांच्या जंगलातला नाखु पांढरपेशा