तिन वर्षापूर्वी शेतीमध्ये नवीन काहीतरी सुरू करायच्या उद्देशाने शोध घ्यायला सुरुवात केली. इंटरनेट वर बरीच काही नवीन प्रोजेक्ट्स उपल्बध होते त्याचा अभ्यास सूरु झाला पण कोणाचा प्रोजेक्ट सध्याच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीला अनकुल असा मला तरी वाटत नव्हता, कारण आपला शेतकरी बांधव कर्जाच्या अजगराच्या विळख्यात अडकला आहे तो जितका त्यातून सुटण्याचा प्रयन्त करेल तितका जास्त त्याच्या घट्ट अश्या विळख्यात अडकत आहे असे मला वाटते पण याला काहीतरी उत्तर असेल का म्हणून माझी शोध माहीम सुरूच ठेवाली.
एक दिवस इंटरनेट वर शून्य खर्चाची नैसर्गिक शेती बदल माहिती मिळाली . पहिल्यादा वाचल्यावर थोडे मनाला पटलेच नाहीं करण आपण एकीकडे शेतकरी आत्महत्या बदल दररोज मीडिया न्यूज पेपर इंटरनेट वर वाचतो, की शेती खर्चिक असल्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत.
मला सुरवातीला हे थोडे जादूच्या गोष्टी सारखे वाटले. कारण जो तो नवीन काहीं शोधून शेतकरायला लुबाडण्याचे षड्यंत्रत विकत होते. अमुक एक आमच्या कढून विकत घ्या आणि भरगोस फायदा मिळवावा जो की शेतकऱ्याला कधीच मिळाला नाहीं, पण या सर्वाचे मात्र भरगोस फायदा झाला असो....
उचुकता म्हणून वाचन सुरू केले आणि आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजीनि शोधलेल्या या अनोख्या आशा शेती प्रणाली वाचून भारावून गेलो. पण पुस्तकात शेती ही नेहमी सोपी वाटते प्रत्यक्षात कुठे आणि हे सर्व कसे समजेल याचा शोध सुरु झाला. एक दिवस असेच माझा मित्र विनोद पाटील शी बोलताना त्याने त्याचा मित्र संतोष याच्याबद्दल माहिती दिली जो काही दिवसांपासून याचा अभ्यास आणि अवलंब सुरू केला आहे . मग काय लगेच फोन करून मी , विनोद पाटील आणि विजय भेटायला गेलो. आमची चर्चा सुरू झाली संतोष ने प्रथम त्याचा या प्रवासाबद्दल माहिती दिली आणि नंतर या शेती प्रणालीबद्धल माहिती द्यायला सुरुवात केली आम्ही सर्व काही ऐकत होतो एक एक गोष्टी जादू सारखी वाटत होती. संतोष भारावून सर्व काही सांगत होता आम्ही मध्ये मध्ये आमचे प्रश्न विचारत होतो व संतोष त्याला योग्य ते उत्तर देत होता . 2 ते 3 तास कसे गेले समजलेच नाही संतोष ने आम्हाला त्याच्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये सामील करून घेतले व युट्युब (Youtube) वरील मिलिंद काळे यांनी रेकॉर्ड केलेली गुरुजीच्या शिबिराच्या विडिओ चा लिंक दिल्या . हे विडिओ म्हणजे जणू अल्लीबाबाच्या गुहेचा दरवाजा उघडावा आणि आतील हिरे माणिक दिसावे असे झाले . मग काय वेळ मिळेल तसे विडिओ बघायला सुरवात झाली. मी शेतीमध्ये खुप काही काम केले नसल्यामुळे समजायला थोडे अवघड जात होते पण गुरुजी एक एक मुद्दे पूर्ण मुद्देशीर समजवत होते.ऑफिस मध्ये मी आणि सत्यजित आणि विश्वचेतन चहाच्या सुटीत आम्हाला न समजलेल्या गोष्टी बदल बोलू लागलो संतोष ला कॉल करू लागलो ग्रुप मध्ये विचारू लागलो ग्रुप मध्ये केशव जी आम्हाला मार्गदर्शन करू लागले आणि आमचा प्रवास सुरु झाला.
इथे पर्यंत सर्व काही सुरळीत सूर होते पुढील लढाई अवघड होती ज्याची कल्पना संतोष ने आधीच दिली होती, की आपल्या घरच्यांना हे सर्व समजून सांगणे आणि शेती मध्ये अवलंब करणे. पण जेव्हा तुमचो इच्छा शक्ती असते तेव्हा मार्ग मिळतो. लॅपटॉप वर सर्व विडिओ डाउनलोड केली आणि गावी गेल्यावर आमचे मोठे बंधू आनंद पाटील याला ते दाखवू लागलो. त्याचा शेती माधील अनुभव खुप आहे तो खुपच पद्धशिर रित्या शेती करतो पण रासायनिक तो गुंठ्याचा अडीच ते 3 टन उसाचे उत्पन्न घेतो. त्याला त्याबद्दल बक्षीसीज पण मिळाले आहे. गावातील आणि भागातील बरीच शेतकरी त्याचा शेतीसाठी मार्गदर्शन घेतात . त्याला माझ्या सारख्या सॉफ्टवेअर मध्ये काम करण्याने ज्याला शेती मध्ये कधीच आवड नव्हती त्याने शेती बदल सांगणे खुपच अवघड गोष्ट होती. प्रत्येक वेळी थोडे थोडे विडिओ दाखवू लागलो त्याचें प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयन्त करत होतो काही उत्तरे आमच्या ग्रुप मधून संतोष केशव देत होते. भाऊ मला बरेच उदाहरणे देत होता की अश्या सारख्या पद्धती कश्या गावातील लोकांनी अवलंबून त्याचा तोटा झाला आहे . आपल्या समाजात चांगली गोष्ट प्रसार व्हायला वेळ लागतो पण अपयशाची गोष्ट लवकर प्रसार होती . मी त्याला विचारले कि ज्याचा तोटा झाला त्याने सर्व पद्धतीचा अवलंब योग्य पद्धतीने केला होता का ?
ही वरील लढाई सुरू असताण मी माझ्या फ्लॅट मधील गच्चीवर माझे प्रयोग सुरू झाले. सुरवातीला माझ्या मंडळींना तयार करणे अवघड होते तिला तशी आवड होती पण फुलाच्या बागेची पण मी त्याला विरोध केला होता करण ती झाडे फार काळ टिकत न्हवती. मग तिनेच आणलेल्या कडीपत्याच्या बियापासून सुरवात केली कारण दररोज नेहमी फोडणी देताना त्याची आवर्जुन आठवण यायची कारण तो एक तर सुकलेला असायच किंवा नसायचा. गावाकडून माती आणली होती बिया टाकल्या या अनोख्या प्रोयोगाची सुरवात झाली.
आता जीवामृत कोठून कसे आणायचे हा मोठा प्रश्न होता पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा निसर्ग तुम्हाला आवश्यक गोष्टी चा पुरवठा करू लागतो. माझे सायकलिंग नुसतेच सुरू झाले होते आणि आम्ही घोरवडेश्वर ला जायला सुरवात केली होती तिथे तेथील एक रहिवाशी दररोज त्याच्या देशी गायी डोंगरावर चरायला सोडत होते. त्याची ओळख करून त्याच्या कडून शेन आणि गोमूत्र मिळाले ते घेऊन पहिल्यादा फ्लॅट मध्ये जिवामुर्त तयार झाले मला शेणाच्या वासाची सवय हाती पण सौ ना थोडा त्रास झाला. आमचा कडीपत्ता चे रोप तयार होते वांगी टॅमोटो भेंडी लावली होती सर्वाना जीवामृत दिले आणि काहीच दिवसात आम्हाला या पद्धतीची प्रचीती यायला सुरुवात झाली मुलांना पण खुप आनंद होत होता घरी असे काहीतरी पाहायला मिळत होते.


















या प्रवासमध्ये खुप काही शिकायला मिळाले सुरवात होती त्यामुळे चुका ही झाल्या त्या येत्या प्रवासात सुधारण्याचा प्रयत्न करेन माझे यामध्ये फारच कमी सहभाग होता माझा भाऊ आनंद पाटील आई बाबा वहिनी भावाची मुले यांचे कष्ट या मागे होत तसेच माझी बायको आणि मुले आणि या माझा वेडा ला समजून घेतले आणि साथ वेळ दिला. मी प्रथम आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजींचे आभार मानतो ज्यांनी सुंदर अशी शेती पद्धती शेतकऱ्यांना शोधून दिली आहे मला वाटते हीच पद्धत शेतकऱ्याला या आत्महत्येच्या अजगराच्या विळख्यातून सुटका करू शकेल तसेच संतोष केशशवजी याच्या अमूल्य अश्या मार्गदर्शन आणि कौतुकबद्दल मनपूर्वक आभार मानतो मिलिंद काळे यांचे खुप खुप आभार ज्यांनी zbnf ची विडिओ इंटरनेट वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत सत्येजीत पाटील आणि विश्वाचेतन याची या प्रवासमधील मोलाची साथ मिळाली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार तसेच प्रत्येक्ष वा अप्रत्येक्ष ज्यांनी या प्रवासात मदत कौतुक आणि साथ दिली त्याचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानून माझ्या या स्वप्न प्रवासाचे लेखन पूर्ण करतो

वाचने
221638
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप छान, आणि स्फुर्तीदायक.
ढोबळ हिशोब सांगितला दिला आहे
In reply to खूप छान, आणि स्फुर्तीदायक. by खटपट्या
फारच छान! शुभेच्छा..
तुमच्या धाडसाचे व कष्टांचे
अत्यंत स्पृहणिय उपक्रम !
उत्तम उपक्रम .. असेच नवीन
झीरो बजेट ही कन्सेप्ट
In reply to उत्तम उपक्रम .. असेच नवीन by गवि
अरे वा! कालच श्री सुभाष
अत्यंत स्पृहणिय, अभिनंदन !
आभारी आहे
In reply to अत्यंत स्पृहणिय, अभिनंदन ! by शेखरमोघे
अभिनंदन
मनःपूर्वक शुभेच्छा!
मनापासून अभिनंदन
- जीवामृत किती वापरावे लागवे?
- किडीच्या प्रादुर्भावावर काय उपाय केलात?
- भाज्या काढल्यानंतर उरलेला ओला कचरा शेतातच जिरवलात का कसं?
- रासायनीक शेतीच्या तुलनेत पाणी कमी लागतं का जास्त?
अजूनही आहेत. नंतर विचारेन.आणखी एक राहिलं
In reply to मनापासून अभिनंदन by महेश हतोळकर
आभारी आहे
In reply to मनापासून अभिनंदन by महेश हतोळकर
फार फार अभिनंदन अजित साहेब.
माहितीपूर्ण लेख
तुमची चिकाटी, जिद्द आणि
खुपच छान
In reply to तुमची चिकाटी, जिद्द आणि by जागु
मी पण घरी लागवड केलेल्या
In reply to खुपच छान by अजित पाटील
मी पण घरी लागवड केलेल्या
In reply to खुपच छान by अजित पाटील
शुभेच्छा!
. . ..
अभिनंदन. इथे शेअर केल्याबद्दल
अजित पाटील जी..
y
In reply to अजित पाटील जी.. by विशुमित
सगळे करून झाले आहे.
In reply to y by काजुकतली
ग्राउंड लेव्हलवर चित्र काही
In reply to सगळे करून झाले आहे. by विशुमित
बरोबर आहे. शेतीच्या नावावर
In reply to ग्राउंड लेव्हलवर चित्र काही by मार्मिक गोडसे
y
In reply to अजित पाटील जी.. by विशुमित
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा !
हे शाबास!
+1
In reply to हे शाबास! by पैसा
खुप छान प्रयोग...
अभिनंदन
मस्त हो....
साक्षात
मी गेली २ वर्षे. एकही हरित
In reply to साक्षात by नाखु
मी पण ओल्या कचर्यातल एकही
In reply to मी गेली २ वर्षे. एकही हरित by तेजस आठवले
मक्याचे कणीस हातोड्याने बारीक
In reply to मी गेली २ वर्षे. एकही हरित by तेजस आठवले
सत्तरच्या काळात ट्रॅक्टरचा
तुमचा प्रयोग यशस्वी
झकास!तुमचे आणि या तुमच्या
...
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
खूप खूप अभिनंदन. इतकं
अभिनंदन
अभिनन्दन
जीवामृतच हवे अशी गरज नाही.
In reply to अभिनन्दन by अरविंद कोल्हटकर
मानवी मल आणि मूत्र वापरुनही
In reply to जीवामृतच हवे अशी गरज नाही. by कलंत्री
आभारी आहे
In reply to अभिनन्दन by अरविंद कोल्हटकर
एका काडातून क्रांती.
हे घ्या मराठी आवृत्ती..
In reply to एका काडातून क्रांती. by कलंत्री
या
शून्य बजेट कसे? - तर मुख्य
आंतरपीक सर्वमान्य कन्सेप्ट
In reply to शून्य बजेट कसे? - तर मुख्य by काजुकतली
अवघड नाही
In reply to आंतरपीक सर्वमान्य कन्सेप्ट by विशुमित
शून्य बजेट कसे? - तर मुख्य
>>> ज्यांना रस आहे त्यांनी
In reply to शून्य बजेट कसे? - तर मुख्य by काजुकतली
28 एप्रिल ते 3 मे ह्या तारखा
In reply to >>> ज्यांना रस आहे त्यांनी by पिंगू
मला आज ही माहिती मिळाली आहे.
In reply to 28 एप्रिल ते 3 मे ह्या तारखा by काजुकतली
उत्तम माहिति
झिरो बजेट
पृथ्वीवर झालेल्या प्रचंड
In reply to झिरो बजेट by काजुकतली
हवामान बदल ह्याच कारणामुळे
In reply to पृथ्वीवर झालेल्या प्रचंड by विशुमित
खुपच सुंदर
In reply to झिरो बजेट by काजुकतली
जमिनीत आवश्यक असलेले जीवजंतू
ही माहितीही आहे पण मला
In reply to जमिनीत आवश्यक असलेले जीवजंतू by मार्मिक गोडसे
आता देशी गायी आणायच्या कुठून
३० एकरासाठी १ गाय पुरेशी आहे
In reply to आता देशी गायी आणायच्या कुठून by कंजूस
देशी गायी दूध कमी देतात हा
In reply to आता देशी गायी आणायच्या कुठून by कंजूस
गीर गाय देशीच आहे ना? मग तिचा
In reply to देशी गायी दूध कमी देतात हा by काजुकतली
गीर गाय दूध भरपूर देते. पण
In reply to गीर गाय देशीच आहे ना? मग तिचा by मार्मिक गोडसे
ह्या धाग्यावर थोडक्यात
जीवजंतूंची नावे आढळली नाहीत.
जीवजंतूंची नावे कश्याला
In reply to जीवजंतूंची नावे आढळली नाहीत. by डँबिस००७
काहीही हरकत नाही. मी सध्या
In reply to जीवजंतूंची नावे कश्याला by मार्मिक गोडसे
धन्यवाद.
In reply to काहीही हरकत नाही. मी सध्या by काजुकतली
देशी गाय वापरून गुरुजी भलतेच
जाऊ द्या
In reply to देशी गाय वापरून गुरुजी भलतेच by डँबिस००७
मानवी मल आणि मूत्र वापरुनही
दाभोळकरांचे पुस्तक वाचा.
In reply to मानवी मल आणि मूत्र वापरुनही by डँबिस००७
इतक्या शास्त्रीय पद्धतीने
नक्की आठवत नाही पण मागे
बरोबर आहे. झाडांच्या
In reply to नक्की आठवत नाही पण मागे by मनो
ह्या लेखातील प्रतिसादात ती
वेळ काढून लेख लिहील्याबद्दल
२८ अप्रिल ते ३ मे शिबिर