अस्वस्थ न्यायव्यवस्था?
लेखनप्रकार
अस्वस्थ न्यायव्यवस्था?
विधिमंडळ,कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे या लोकशाहीच्या चार स्तंभांनी राज्यघटनेत अभिप्रेत स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांचे संवर्धन करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, संसद राजकारण्यांचा राजकीय आखाडा, प्रशासन सत्ताधाऱयांचे बटीक, तर प्रसारमाध्यमांमध्ये आरती ओवाळणारी व्यावसायिकता आल्याचा आरोप आज सर्रासपणे केला जातो. अशा अस्वस्थ वातावरणात न्यायपालिकेची टिकून असलेली विश्वासहर्ता जनसामान्यांसाठी मोठी दिलासादायक आहे. परंतु लोकशाहीचा महतवाचा स्तंभ असलेल्या न्यायदेवतेच्या घरातही अस्वस्थताच असल्याचे चित्र शुक्रवारी संपूर्ण देशाने अनुभवले. स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येत सद्यकालीन न्यायव्यवस्थेबाबतचे आपले आक्षेप टीकात्मक पद्धतीने नोंदविले. ज्यांच्याकडून 'न्याय'चा आधार जनतेला आहे, तेच जर न्याय मागण्यासाठी चक्क जनतेच्या न्यायालयात येत असतील तर ही बाब नुसती धक्कदायक नाही तर चिंताजनकही आहे. त्यामुळे जनता संभ्रमात पडू शकते. त्यांचा विश्वास डळमळीत होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण देशात यावर साधक बाधक चर्चा सुरु झाली आहे. आज चारपैकी दोन न्यायमूर्तीनी "आम्ही केवळ ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आहे" असं म्हणत वादावर पडदा पडणार असल्याचे सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वोच न्यायालयातील न्यायाधीशांमधील विसंवाद संपण्याचे संकेत आहेत. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी हा वाद लवकरात लवकर संपुष्टात यावा, हीच अपेक्षा.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश यांच्या कारभारावर टीका केली. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चाललेला नाही. न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही. खटले सुपूर्त करताना तत्त्वप्रणाली डावलून प्राधान्य असलेल्या पीठाकडे सोपविली जातात. न्यायालयाच्या कारभाराबद्दल लेखी तक्रार केल्यानंतर त्याकडेही दुर्लक्ष केले गेल्यामुळे अखेर प्रसारमाध्यमांसमोर आम्हास यावे लागले, असे स्पष्टीकरण या सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी दिले. एक सर्वोच्च न्यायाधीश आणि 25 न्यायाधीशांचे मंडळ यांनी युक्त असलेल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींची ही व्यथा अनेक गोष्टी उघड करते. सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये न्यायदान करण्यासाठी अनेकदा न्यायपीठाची नियुक्ती केली जाते. न्यायपीठ नेमण्याचा अधिकारी सरन्यायाधीशांचा असला तर यासाठी अनेक नियमांचे आणि परंपरांचे पालन अपेक्षित असते. मात्र सरन्यायाधीशांकडून याबाबत मनमानी होत असल्याचा आरोप पत्रपरिषेदत करण्यात आला. त्यामुळे अपेक्षित निर्णय सुकर व्हावा यासाठीच काही विशिष्ट खटले विशिष्ठ न्यायपीठांकडे सुपूर्त केले जात असावेत. तसे होत असेल तर ही बाब गंभीरही आहे आणि चिंताजनकही. त्यामुळे न्यायमूर्तीच्या नियुक्त्या, काही खटले याबाबत न्यायव्यवस्था राजकीय प्रभावाखाली आहे, असा जो आरोप केला जातो, त्याला यातून बळ मिळते. ज्या स्तंभावर लोकशाही टिकून आहे. त्यांना स्वतःचे घटनात्म्क अधिकारक्षेत्र असून यापैकी कोणीही दुसऱ्याच्या अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ करू नये असा संकेत आहे. अर्थातच या अधिकारांच्या सीमारेषा ठळक नसल्याने त्यांचे सहजतेने उल्लंघन होताना दिसते. परंतु सध्या हे सीमोल्लंघन वारंवार होत असल्याचा रोख न्यायमूर्तींच्या आरोपांवरून समोर येते.
आपल्या पसंतीच्या खंडपीठाकडे संवेदनशील खटले दिले जातात. यावर हा मुद्दा न्यायाधीश लोया यांच्याबाबत होता का, असा प्रश्न उपस्थित केला असता न्यायाधीश जोसेफ यांनी होय, असे त्याचे उत्तर दिले. त्यामुळे, न्यायव्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा चर्चेत येतो. सीबीआयचे न्यायाधीश बी. एच. लोया हे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे न्यायाधीश होते. न्या. लोया हाताळत असलेल्या या खटल्यात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आरोपी होते. नागपूर येथे एका लग्नसमारंभास न्या. लोया आले असता 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, कारण तो अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाला आहे, असे आक्षेप घेण्यात आले. कॅरव्हान या नियतकालिकाने हे संशयास्पद प्रकरण ऐरणीवर आणले आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा विशिष्ट खंडपीठाकडे दिल्याचा न्यायमूर्तींचा अनुरोध असेल तर हा निरपेक्ष न्यायदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आक्षेप म्हणावा लागेल. मध्यंतरी अनेक वरिष्ठ न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणांचे पडसाद ही या नाराजीमागचा एक चेहरा असू शकतो.
न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल, हे न्यायमूर्तींचे वाक्य ही तितकेच सूचक आणि प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारे आहे. लोकशाही टिकण्यासाठी न्यायव्यवस्था स्वतंत्र्य राहणे किती महत्वपूर्ण आहे, हे घटनाकारांनी घटनेतच विशद केलं आहे. दुर्दैवाने आज न्यायव्यस्थेच्या निरपेक्षपणवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जातेय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी अशा प्रकारे माध्यमांसमोर येऊन मत व्यक्त करणे योग्य कि अयोग्य ? यावर समांतर मतप्रवाह सर्व देशभरातून समोर येऊ लागला आहे. सरकार, विरोधक, जनता सर्व या घटनेनें हादरून गेले आहे. काही चुकीचे घडत असेल तर त्याची दुरुस्ती करण्यात यावीच. पण त्यातून न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. 'विश्वास' हा छोटा शब्द असला, लिहायला आणि वाचायला एक सेकंद जरी लागत असला, तरी तो निर्माण करण्यासाठी दशकं उलटावी लागतात. भारतीय न्यायव्यवस्थेने आपल्या कृतीतून असा विश्वास फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात निर्माण केला आहे. आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाचा गौरव केला जात असेल तर या लोकशाहीच्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी न्यायपालीकेचे विशेषतः सर्वोच्च न्यायालयाचे योगदान जगपातळीवर नावाजलेले आहे. न्यायालयाने कोणत्याही दबावाला बळी न पडता अनेकांना ताळ्यावर आणल्याची अनेक उदाहरणे देता येतील. त्याचमुळे तर जनतेला न्याय व्यवस्थेवर अंतिम विश्वास वाटतो. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी जपून पाऊले उचलावी लागणार आहेत..!!!
वाचने
31683
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
https://m.timesofindia.com
In reply to https://m.timesofindia.com by श्रीगुरुजी
ठिक आहे तरीही . विश्वासार्हता
न्यायव्यवस्था अस्वस्थ नसून
बाय द वे, जर एखाद्या प्रकरणात
In reply to बाय द वे, जर एखाद्या प्रकरणात by आनन्दा
माझे मत
न्यायालय व कंपूगिरी
In reply to न्यायालय व कंपूगिरी by गामा पैलवान
+1
In reply to न्यायालय व कंपूगिरी by गामा पैलवान
मोदी सत्तेवर आल्यावर कंपूबाज
In reply to मोदी सत्तेवर आल्यावर कंपूबाज by माहितगार
आणखी एक बाजू
In reply to मोदी सत्तेवर आल्यावर कंपूबाज by माहितगार
न्यायाधिशांनी टेलिव्हीजन अथवा
न्यायव्यवस्था
In reply to न्यायव्यवस्था by दिगोचि
आपण नमूद केलेल्या बातमीचा
In reply to आपण नमूद केलेल्या बातमीचा by माहितगार
सुप्रीम कोर्टाचा कारभार गेली
चर्चेत न्यायालयीन अवमानना
In reply to चर्चेत न्यायालयीन अवमानना by माहितगार
न्यायालयाचा अवमान का करू नये?
In reply to न्यायालयाचा अवमान का करू नये? by arunjoshi123
साध्य काय ?
स्वत:हून राजीनामा द्यावा या
चर्चेत न्यायालयीन अवमानना
न्यायालयीन अवमान हा कागदी वाघ
In reply to न्यायालयीन अवमान हा कागदी वाघ by सुबोध खरे
न्यायालयीन अवमान हा कागदी वाघ
In reply to न्यायालयीन अवमान हा कागदी वाघ by माहितगार
करणन यांची केस साफ वेगळी होती
In reply to करणन यांची केस साफ वेगळी होती by सुबोध खरे
सत्य बोलणे हा न्यायालयाचा
In reply to सत्य बोलणे हा न्यायालयाचा by सुबोध खरे
अहो डॉक तुम्ही मिपाकर
In reply to अहो डॉक तुम्ही मिपाकर by माहितगार
नाही
In reply to सत्य बोलणे हा न्यायालयाचा by सुबोध खरे
नक्कीच, उचित संदर्भासहित सत्य
In reply to न्यायालयीन अवमान हा कागदी वाघ by सुबोध खरे
नाना पाटेकर यांच्या सिनेमात
In reply to नाना पाटेकर यांच्या सिनेमात by माहितगार
नाना पाटेकर यांच्या सिनेमात
In reply to न्यायालयीन अवमान हा कागदी वाघ by सुबोध खरे
हीच तक्रार राष्ट्रपतींकडे
In reply to हीच तक्रार राष्ट्रपतींकडे by अँड. हरिदास उंबरकर
माझे मत
In reply to हीच तक्रार राष्ट्रपतींकडे by अँड. हरिदास उंबरकर
..सर्वसाधारणपणे तो नेमणूक
In reply to हीच तक्रार राष्ट्रपतींकडे by अँड. हरिदास उंबरकर
घटनात्मक व्यवस्थेचा प्रमुख हा
न्यायव्यवस्था अस्वस्थ नसून
In reply to न्यायव्यवस्था अस्वस्थ नसून by अँड. हरिदास उंबरकर
एवढे अस्वस्थ होते तर आपला
In reply to न्यायव्यवस्था अस्वस्थ नसून by अँड. हरिदास उंबरकर
'न्यायाधीश' हा न्याय
In reply to 'न्यायाधीश' हा न्याय by माहितगार
नेमका काय परिणाम होईल ?
In reply to नेमका काय परिणाम होईल ? by अँड. हरिदास उंबरकर
भारतात चुकीचे न्यायदान लक्षात
मला एक विचारायचे आहे कि या
एक रोचक ट्रिव्हिआ:
In reply to एक रोचक ट्रिव्हिआ: by अनुप ढेरे
दुखरी बाजू आहे !
एक निसटता मुद्दा
(अ) देशभरातून सर्वोच्च
In reply to (अ) देशभरातून सर्वोच्च by डॉ सुहास म्हात्रे
लोक्सत्ता बंद केल्याचा आता
In reply to (अ) देशभरातून सर्वोच्च by डॉ सुहास म्हात्रे
संतोष कुलकर्णी
एक डाऊट
In reply to एक डाऊट by झेन
हे सरकारपक्षाचे कारस्थान आहे
In reply to हे सरकारपक्षाचे कारस्थान आहे by आनन्दा
मलाही हेच वाटतंय.
In reply to मलाही हेच वाटतंय. by गामा पैलवान
असो
In reply to मलाही हेच वाटतंय. by गामा पैलवान
मोदी गोगोईंना डावलून कुण्या
In reply to हे सरकारपक्षाचे कारस्थान आहे by आनन्दा
हे सरकारपक्षाचे कारस्थान आहे
In reply to हे सरकारपक्षाचे कारस्थान आहे by माहितगार
स्वतःविरुद्ध करस्थान नव्हे,
In reply to एक डाऊट by झेन
मला सिरीयसली एक शंका आहे,
In reply to मला सिरीयसली एक शंका आहे, by माहितगार
धन्यवाद
In reply to धन्यवाद by झेन
मा. सुप्रीम कोर्टात केस
एक डाऊट
In reply to एक डाऊट by झेन
डायरेक्ट पत्रकार परिषद म्हणजे
मला तर फक्त न्या. मदन लोकर
In reply to मला तर फक्त न्या. मदन लोकर by arunjoshi123
जर कधी तिसरी आघाडी होऊन
In reply to जर कधी तिसरी आघाडी होऊन by माहितगार
यांना फायदा रोकड्यात होणार.
In reply to यांना फायदा रोकड्यात होणार. by arunjoshi123
रोकड्याच्या दृष्टीने सर्वोच्च
राहुल गांधीला बलात्काराच्या
(संपादित)
In reply to (संपादित) by arunjoshi123
जरासे अतीरंजन होत असावे.
In reply to जरासे अतीरंजन होत असावे. by माहितगार
ज्या आईने (स्त्रीवाद्यांसाठी
राजा
In reply to राजा by गॅरी ट्रुमन
तो पुरोगामी न्या. चेलम्या
In reply to तो पुरोगामी न्या. चेलम्या by arunjoshi123
जिज्ञासूंसाठी हि ती लिंक
विशेष सूचना
विशेष सूचना
न्यायालय आणि न्यायमूर्ती यांच्याबद्दल मत मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र, ते करताना प्रतिसादाची भाषा, केवळ तात्विक असावी... वैयक्तिक, अवमानकारक किंवा भडक नसावी, कारण त्याने न्यायालयाचा अवमान होऊ शकतो व तसे करणे मिसळपावच्या घोरणात बसत नाही, हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.In reply to विशेष सूचना by संपादक मंडळ
न्यायालय अवमान न करायच्या
In reply to न्यायालय अवमान न करायच्या by arunjoshi123
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
https://indiankanoon.org/doc
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
मला वाटते धागा अॅड.
सरकारी कर्मचाय्रांना
In reply to सरकारी कर्मचाय्रांना by कंजूस
कंजूसजी आगे बंढो हम आपके साथ है : }
In reply to कंजूसजी आगे बंढो हम आपके साथ है : } by माहितगार
मी तर उलट म्हणेन
मी आडवळणाने विचारले की या
In reply to मी आडवळणाने विचारले की या by कंजूस
शेवटी सगळे कयासच
बय्राच खटल्यांची तड लागत नाही
In reply to बय्राच खटल्यांची तड लागत नाही by कंजूस
उत्तर जरासे अनुषंगिक
In reply to उत्तर जरासे अनुषंगिक by माहितगार
न्यायाधीशांचे सुद्धा काही
In reply to न्यायाधीशांचे सुद्धा काही by सुबोध खरे
https://timesofindia
In reply to https://timesofindia by सुबोध खरे
पार्श्वभूमी माहीत नसल्याने
हे चार जज कोर्टात आलेल्या
न्यायाधिशांचे विशिष्ट
तज्ञ मंडळीचा शेरा घेऊनच
नाही,तसं नाही. अमुक एक पुरावा
न्याय करणारा हा थोडासा
इतकं सोपं असतं तर तुम्ही आणि
नक्कीच. न्यायाधिश कोणीही होऊ
हे चारजण एकत्र येऊन त्यांनी