उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते
लेखनविषय:
काव्यरस
कां रक्त साचलेले पदरात लाल होते?
गर्भात कोंडलेले मौनी सवाल होते
जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण
आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते
तुम्ही परंपरांची मिरवाल कौतुकेही
उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते
रस्त्यात सांडल्या अन मातीस प्राप्त झाल्या
भाळावरी कळ्यांच्या कुठले गुलाल होते?
येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे
हतबुद्ध शायराचे फसले खयाल होते
© विशाल कुलकर्णी
वाचने
8291
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होतेसाले हे कळाते पण वळत नाही.. पुन्हा एकदा त्याची आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद... पैजारबुवा,
जबरदस्त रचना.... कमाल... कमाल.. कमाल...!
Sandy
विदीर्ण करून टाकणारी गझल !
भारीय.
"उरणार ना उद्या जे सत्य काल होते" ह्या ओळीला अडखळलो. "उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते" अशी वाचली तेव्हा बरोबर वाटली.
In reply to भारीय. by सूड
+१
In reply to भारीय. by सूड
धन्यवाद देवा ! इथे मला बदल करणे शक्य नाही. संपादक मंडळी मनावर घेतील तर बरे. पण माझ्याकडील मुळ प्रतीत बदल करुन घेइन.
अत्युत्तम भाऊराया!
फार तिडिकेनं मांडलंय..
In reply to अत्युत्तम भाऊराया! by राघव
धन्यवाद भाऊ !
In reply to अत्युत्तम भाऊराया! by राघव
+१
जबरदस्त!!!
खुप आवडली.
फार सुंदर लिहिली आहे.
भारी लिहिलेय !
मनःपूर्वक आभार मंडळी !
सुरेख! खूप दिवसांनी तुमची कविता वाचली.
आवडली...
धन्यवाद संपादक मंडळी !
प्रतिसादकांचेही मनःपूर्वक आभार.
पण पुनरागमन "चाबूक"अणि मार्मिक
कविप्रांत गरीब नवाज नाखु
In reply to बरेच दिवस अनुपस्थित by नाखु
अलिकडे एकंदरीतच इंतरनेटवरील वावर कमी झालाय देवा. धन्यवाद :)
छान गझल!
शेवटचे तीन शेर खासंच!
वा छान
वा छान
उत्तम रचना
धन्यवाद मंडळी ! मनःपूर्वक आभार _/|\_
येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचेसुंदर लिहिलेय !!
छान.
धन्यवाद !
धन्यवाद !
मस्त !!
कविता आवडली...