"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय"
अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे.
(१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
(१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?
ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का?
(२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.
(३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?
बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना?
(४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.
(५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? )
(६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)
(७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का?
[२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला
(२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला
(३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं
इतके किमान पर्याय संभवतात
तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती
(२) नव्ह्ती
इतके किमान पर्याय संभवतात
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]
एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्यांबद्द्ल प्रेम असणार्यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?
हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?
अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे
(१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.
वाचने
123536
प्रतिक्रिया
327
मिसळपाव
प्रतिक्रिया
21- मुझे विश्वास है कि मैं
अविनाशजी....
In reply to 21- मुझे विश्वास है कि मैं by अविनाशकुलकर्णी
एखाद्या महाराने शंकराचार्य
In reply to अविनाशजी.... by पगला गजोधर
महारच का?
In reply to अविनाशजी.... by पगला गजोधर
ते शंकराचार्य आणि पाय वगैरे
In reply to महारच का? by सुखीमाणूस
अहो ताई
In reply to ते शंकराचार्य आणि पाय वगैरे by एमी
ओ पंत, टेस्टमोनि आहे
In reply to अहो ताई by सुखीमाणूस
आजकाल काही चांगल सांगायला गेल
In reply to अहो ताई by सुखीमाणूस
+१
In reply to ते शंकराचार्य आणि पाय वगैरे by एमी
खर आहे अॅमी.
In reply to ते शंकराचार्य आणि पाय वगैरे by एमी
जे महार धर्मान्तर करून इसाई
In reply to अविनाशजी.... by पगला गजोधर
अविनाशजी,
In reply to जे महार धर्मान्तर करून इसाई by अविनाशकुलकर्णी
नसेलही. पण महारांना ते आपल्या
इकडच्या प्रतिक्रिया वाचुन 2
जर तुम्ही मुस्लीम असाल आणि
मनोगत आवडलं.
ऐकुन खरं वाटणार नाहि, पण
In reply to मनोगत आवडलं. by अर्धवटराव
तुमचे सगळे मुद्दे मान्य. पण...
In reply to ऐकुन खरं वाटणार नाहि, पण by अंतरा आनंद
पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः
In reply to तुमचे सगळे मुद्दे मान्य. पण... by अर्धवटराव
राममंदिर , गोमाता, लव-जिहाद,
In reply to पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः by अंतरा आनंद
पण त्यांच्या अस्मिता जोपर्यंत ...
In reply to पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः by अंतरा आनंद
केवळ दलीतांच्या अस्मीता
In reply to पण त्यांच्या अस्मिता जोपर्यंत ... by अर्धवटराव
अंतरा आनंद
In reply to पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः by अंतरा आनंद
वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय.यातून बाहेर पडायला आपले आपणच प्रयत्न केले पाहिजेत. संधी तर सगळ्यांनाच उपलब्ध आहेत, का अजूनही तुम्हाला म्हणायचंय की दलितांना मुद्दाम काही संधी नाकारल्या जात आहेत? म्हणजे पात्रता असूनही केवळ दलित आहेत म्हणून संधी दिली जात नाही अशी उदाहरणं द्या.उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली.भान यायला ही घटना घडायची काय गरज होती? यात सुद्धा मारणारे ब्राम्हण होते का? इंडियन एक्सप्रेस मधली ही बातमी वाचा. प्रत्येक घटनेला जातीय रंग द्यायची काय गरज आहे? उद्या मी एखाद्या निरुद्योगी माणसाला पैसे दिले आणि सांगितलं की एका चौकात जा आणि सांग मी xxx संस्थेचा कार्यकर्ता आहे आणि दगडफेक कर. मला त्या माणसाची जात/ धर्म माहित नाही आणि त्या माणसाला फक्त पैसे मिळण्याची कारण. कशाला दगड फेकायचेत, कोणावर फेकायचेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. मग बघणारे म्हणतात xxx संस्था जातीय आहे. पण सत्य काय आहे याचा शोध किती जण घेतात? माझं वैयक्तिक मत सांगतो - एखाद्या स्पर्धेत जो स्पर्धक मागे असतो त्याने पुढे जाण्याला महत्व दिलं पाहिजे. बाकी प्रेक्षक काय ओरडत आहेत, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला किती त्रास झाला, ऊन आज जरा जास्त आहे ई. ई. मागे ओढणाऱ्या अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये.नेमके मांडले आहे तुम्ही ट्रेडमार्क
In reply to अंतरा आनंद by ट्रेड मार्क
उत्तम व संतुलीत
माझं मत
आंबेडकर फक्त दहा वर्षं
In reply to माझं मत by गामा पैलवान
यनावाला
In reply to आंबेडकर फक्त दहा वर्षं by एमी
टॉन्ट पण कळेना का आता लोकांना
In reply to यनावाला by सुखीमाणूस
हिंदूंच्या पापाची काळजी
In reply to आंबेडकर फक्त दहा वर्षं by एमी
स्वतःच ज्या लिंका चिटकवताय
In reply to हिंदूंच्या पापाची काळजी by गामा पैलवान
तुम्हीच वाचा
In reply to स्वतःच ज्या लिंका चिटकवताय by एमी
धन्य आहात _/\_
In reply to तुम्हीच वाचा by गामा पैलवान
लोणकढी थाप
In reply to धन्य आहात _/\_ by एमी
अभ्यास वाढवा..
In reply to लोणकढी थाप by गामा पैलवान
सूचनेबद्दल धन्यवाद.
In reply to अभ्यास वाढवा.. by शलभ
१९०२ शाहू महाराज, कोल्हापूर
In reply to सूचनेबद्दल धन्यवाद. by गामा पैलवान
घटनापूर्व घडामोडी
In reply to १९०२ शाहू महाराज, कोल्हापूर by एमी
म्हणजे घटनापूर्व काळात
In reply to घटनापूर्व घडामोडी by गामा पैलवान
+१
In reply to म्हणजे घटनापूर्व काळात by एमी
प्रत्यक्ष माहिती
In reply to घटनापूर्व घडामोडी by गामा पैलवान
त्यामुळे १९८२ मध्ये शैक्षणिक
In reply to प्रत्यक्ष माहिती by नितिन थत्ते
अंतरा आनंद,
लेखन चाळले.
एकविसाव्या शतकातील दोन दशकं
+१. काही मूर्ख लोकांमुळे
In reply to एकविसाव्या शतकातील दोन दशकं by अँड. हरिदास उंबरकर
मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित
In reply to +१. काही मूर्ख लोकांमुळे by आनन्दा
बाहेर या आता
In reply to मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित by पगला गजोधर
तथ्यमालिन्यशोधन
In reply to मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित by पगला गजोधर
बहुधा इथे झलेल्या बर्याचश्या
कंसय नं, जेंव्हा अटकेपार
बाप्रे
In reply to कंसय नं, जेंव्हा अटकेपार by पगला गजोधर
आणि पानिपत हारले तेव्हा ते
In reply to कंसय नं, जेंव्हा अटकेपार by पगला गजोधर
मराठा सैन्यात अठरापगड जातीची
In reply to कंसय नं, जेंव्हा अटकेपार by पगला गजोधर
शिवाजीराजे यांच्या काळात
In reply to मराठा सैन्यात अठरापगड जातीची by तेजस आठवले
गजोधर भैया
In reply to शिवाजीराजे यांच्या काळात by पगला गजोधर
सर,
In reply to गजोधर भैया by ट्रेड मार्क
यात अनाकलनीय काही नाही
In reply to सर, by पगला गजोधर
स्वाभाविक उद्रेक की पेटवलेली दंगल?
तुम्ही वरतीच म्हणालात ना कि
छे हो काहीतरीच तुमच
In reply to तुम्ही वरतीच म्हणालात ना कि by तेजस आठवले
शेणाचे पो मारणार्या
In reply to तुम्ही वरतीच म्हणालात ना कि by तेजस आठवले
आपण एकंदरीतच समाज म्हणून
चांगले विचार
In reply to आपण एकंदरीतच समाज म्हणून by तेजस आठवले
तेजससी/गामाजी,
अति क्रोध वाईट
In reply to तेजससी/गामाजी, by पगला गजोधर
नवा इतिहास तयार करायचा नाहिये हो
In reply to तेजससी/गामाजी, by पगला गजोधर
ब्राह्मण द्वेषाचे मूळ :
नेते आणि अनुयायी
स्कोर सेटलिंगचा अतिशय हास्यास्पद प्रयत्न
टिपिकल मोडस ऑपरेनडी ....
ट्रोजन म्हणजे काय रे भाऊ?
In reply to टिपिकल मोडस ऑपरेनडी .... by पगला गजोधर
पाठशाला प्रशिक्षित ब्लॉगर्स
In reply to टिपिकल मोडस ऑपरेनडी .... by पगला गजोधर
अगदी अगदी!
In reply to टिपिकल मोडस ऑपरेनडी .... by पगला गजोधर
1 जानेवारीला ज्या तरुणांनी
In reply to अगदी अगदी! by एमी
लेख आवडला
९२-९३ च्या दंगलीत राजाच्या
In reply to लेख आवडला by मराठी कथालेखक
काय पन गजोधर
In reply to ९२-९३ च्या दंगलीत राजाच्या by पगला गजोधर
ढोराचं कातडं कमावून
पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे
In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
दलित संघटना समितीने आपल्या
In reply to पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to दलित संघटना समितीने आपल्या by पगला गजोधर
बाकी जाताजाता, गुजरातच्या
In reply to दलित संघटना समितीने आपल्या by पगला गजोधर
बाकी जाताजाता, गुजरातच्या जनेतला त्यांच्या राज्यात काय विकास झालाय हे सांगायला, दुसऱ्या राज्यातील (उत्तरप्रदेशातील) मुख्यमंत्री येतो .. हे पाहून करमणूक झाली...कॉंग्रेसी पप्पूचा कोणत्याच राज्याशी काहिच संबध नसताना देखिल तो सगळीकडे जातोच ना.(आता पप्पू ज्या-ज्या राज्यात जातो तिथे कॉंग्रेसचा दारुण पराभव होतो तो भाग वेगळा) मग योगी आदित्यनाथ गुजरातमध्ये गेले तर काय फरक पडतो. तसेही महाराष्ट्र व इतर राज्यात कॉंग्रेसचे दिल्लीतील ज्यांचा महाराष्ट्र व इतर राज्यांशी कसलाही संबध नाही ते निवडणुक प्रचाराला जातातच ना त्यांच्या बद्दल कोणी बोलल्याचे आजवर ऐकले नाही.तुम्हाला मुळ मुद्दा लक्षांत
In reply to बाकी जाताजाता, गुजरातच्या by प्रसाद_१९८२
दलितांच्यामधून सुशिक्षित
द्वेषाने आंधळा झालेला माणूस
केवळ "मोदी द्वेषा" साठी
साहेब,
In reply to केवळ "मोदी द्वेषा" साठी by सुबोध खरे
अंतराजी, लेख आवडला. काही
शांत गदाधारी भीम शांत.
ते जिग्नेश आणि उमर गेले आग
व्वा साहेब...
In reply to ते जिग्नेश आणि उमर गेले आग by अमर विश्वास
ज्यांनी आपला राजकीय स्वार्थ
In reply to व्वा साहेब... by पगला गजोधर
बाकी दलितांवर पूर्वी अन्याय
फक्त हे अजून किती वर्षे उगाळणार हे पण सांगा== == देवेंद्र फडणविसांची मुख्यमंत्रीपदावरुन जोपर्यंत उचलबांगडी होत नाही, तोपर्यंत. तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक ब्राम्हण मुख्यमंत्री होऊच कसा काय शकतो ?तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात
In reply to बाकी दलितांवर पूर्वी अन्याय by प्रसाद_१९८२
खरं आहे ..
नामांतराची दंगल उसळली होती
In reply to खरं आहे .. by अमर विश्वास
ते दोन वेगळे विषय आहेत.
In reply to नामांतराची दंगल उसळली होती by arunjoshi123
जात ही अंधश्रद्धा आहे ही
ज्यांनी कोणी भीमा कोरेगाव
२८ जानेवारी
प्लॉउजिबल डिनायेबिलिटी
त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा
ते म्हणतायत एव्हढा पुरावा
In reply to त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा by प्रसाद_१९८२
वरील प्रतिसाद plausible
In reply to ते म्हणतायत एव्हढा पुरावा by आनन्दा
निखिल वागले :D
In reply to वरील प्रतिसाद plausible by पगला गजोधर
"भीमा-कोरेगावचे खरे गुन्हेगार
In reply to वरील प्रतिसाद plausible by पगला गजोधर
पुरावे मागण्यापेक्षा हडपसर,
In reply to त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा by प्रसाद_१९८२
मनोहर भिडे (सबनीस), यांचे
In reply to पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, by विशुमित
भिडे गुरुजी यांच्या मोहिमेत...
In reply to पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, by विशुमित
तुम्हाला सगळे रेडीमेडच पाहिजे
In reply to भिडे गुरुजी यांच्या मोहिमेत... by mayu4u
तुम्हाला सगळे रेडीमेडच पाहिजे असतं असं माझं निरिक्षण आहे.
In reply to तुम्हाला सगळे रेडीमेडच पाहिजे by विशुमित
बाकी भिडे गुरुजींनी संभाजी
In reply to पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, by विशुमित
भिमा कोरेगाव प्रकरणात
@विशुमती
In reply to भिमा कोरेगाव प्रकरणात by विशुमित
विशुमित
प्लॉउजिबल डिनायेबिलिटी
लेखाशी सहमत
२०० वर्षांपूर्वीचा अन्याय
In reply to लेखाशी सहमत by राही
आत्यन्त नम्रपणे सांगु इच्छित आहे
In reply to लेखाशी सहमत by राही
अत्यंत विनम्रपणे आपणास कथन
In reply to आत्यन्त नम्रपणे सांगु इच्छित आहे by सुखीमाणूस
याचे माझ्याबाबतीतील उदाहरण
In reply to अत्यंत विनम्रपणे आपणास कथन by पगला गजोधर
आणि माझ्या मिपावरील
In reply to याचे माझ्याबाबतीतील उदाहरण by पगला गजोधर
भक्तप्रशंसक, नेहमीच माझ्यावर ब्राम्हण विरोधी ठपका ठेवायची संधी सोडत असावेत...हा लेख छान आहे.http:/
मेन प्रॉब्लेम
In reply to हा लेख छान आहे.http:/ by अनुप ढेरे
मनुवाद्यांचा में प्रॉब्लेम हा
In reply to मेन प्रॉब्लेम by राही
ब्रिगेडी लोक दुसर्यांना
In reply to मनुवाद्यांचा में प्रॉब्लेम हा by पगला गजोधर
मनुवादी म्हणजे नक्की कोण?
In reply to मनुवाद्यांचा में प्रॉब्लेम हा by पगला गजोधर
लोक चळवळीतून पुढे येऊन, भारतीय निवडणूक लढवूनही जर, जिग्नेश देशविघातक मग त्याला मत देणारे काय देशद्रोही का ?कसा का होईना निवडून आलाय याचा आनंद आहे. समस्त दलित नेते दलित एकतेसाठी आवाहन करत असताना खालच्या जातीतीलच पंतप्रधानांवर नको ती शेरेबाजी करून दुही कशाला माजवतोय? वेळ आणि वाफ कशाला वाया घालवतोय? दलितांनी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे अशी भाषणे कशाला करतोय? आता संधी मिळाली आहे तर त्याचा वापर विधायक कार्यासाठी करावा, ज्या लोकांनी त्याला निवडून आणलाय त्यांचा उद्धार करावा. अशी भाषणं देण्यापलीकडे आणि पंतप्रधानांवर टीका करण्यापालिकडे त्याने कुठली विधायक कामं केली आहेत ते सांगा.उमर खालिदवर/कन्हैयावर भरपूर राजद्रोहाचे खटले भरले, न्यायालयात त्याचं पुढं काय झालं ? न्यायालयानं जर त्याला देशद्रोही ठरवलं नाहीमाझ्या माहितीप्रमाणे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडलं का? अजून एक मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतः खरी मनुस्मृती वाचली आहे का? दुसऱ्या कोणीतरी तिसऱ्याने लिहिलेलं काहीतरी वाचून स्वतःच्या आकलनाप्रमाणे लिहिलेलं नव्हे. ती ओरिजिनल मनुस्मृती वाचली असेल तर त्याची पानं स्कॅन करून ज्यात आक्षेपार्ह मजकूर आहे असे उतारे इथे दाखवा.इथे कम्युनिस्ट पक्ष
In reply to मेन प्रॉब्लेम by राही
देश -दलित- विनाश
In reply to इथे कम्युनिस्ट पक्ष by अनुप ढेरे
राही, सगळेच मुद्दे +१
In reply to देश -दलित- विनाश by राही
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
In reply to राही, सगळेच मुद्दे +१ by अंतरा आनंद
अं !!!!!
In reply to राही, सगळेच मुद्दे +१ by अंतरा आनंद
कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे
In reply to राही, सगळेच मुद्दे +१ by अंतरा आनंद
कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने
In reply to कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे by अनन्त अवधुत
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
In reply to कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने by अंतरा आनंद
नावं काहिही घेतली तरी आघाडी
In reply to कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया by अनुप ढेरे
'कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने
In reply to कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने by अंतरा आनंद
>>भांडवलशाहीचे सगळे फायदे
In reply to 'कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने by अनन्त अवधुत
अर्थात.
In reply to >>भांडवलशाहीचे सगळे फायदे by नितिन थत्ते
काय बिघडतं हे कम्युनिस्टांचा
In reply to देश -दलित- विनाश by राही
प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक
In reply to काय बिघडतं हे कम्युनिस्टांचा by अनुप ढेरे
प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक
In reply to प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक by पगला गजोधर
,
In reply to हा लेख छान आहे.http:/ by अनुप ढेरे
जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था
गामाजी,
In reply to जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था by गामा पैलवान
कपालहस्तमुद्रा माझी!
In reply to गामाजी, by पगला गजोधर
आरक्षणाचा इतिहास
बाकी अँमीजी, कोरगाव भीमा या
In reply to आरक्षणाचा इतिहास by गामा पैलवान
रोचक विधान आहे
In reply to बाकी अँमीजी, कोरगाव भीमा या by पगला गजोधर