Skip to main content

मनुस्मृति (भाग १)

लेखक शरद यांनी रविवार, 23/07/2017 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति (भाग १) आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू. वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द. हा सगळा प्रकार कितीही श्रेष्ठ असला तरी सामान्य माणसांच्या रोजच्या व्यवहारात त्याला लागते साध्या साध्या नियमांची जंत्री माणसांनी एकमेकांशी, राजाने प्रजेशी आणि प्रजेने राजाशी, व्यापार्‍याने ग्राहकाशी, आई-वडिलांनी मुलांशी आणि त्यांनी आई-वडिलांशी, एका वर्णाने दुसर्‍या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही. हे नियम किंवा कायदे ज्या साहित्यात लिहले आहे ते साहित्य म्हणजे स्मृती. अध्यात्मदर्शनाचा पाया शुद्ध आचार आहे. तो आचार आणि त्याच्या नीतीरुपी, सदाचाररुपी सीमारेषा नियमबद्ध करणे हे स्मृतींचे कार्य. आचार शुद्ध रहावा, कायदे नीट पाळले जावेत म्हणून " प्रायश्र्चित्त " (दंड) आलेच. तर अशा या स्मृती. किती आहेत ? प्रमुख वीस. उदा. अत्री, आपस्तम्ब, पाराशर वगैरे. त्यातील सर्वात प्रमुख व ब्रिटिश शासन कालातही न्यायालयात वापरली जाणारी म्हणजे " मनुस्मृती ". एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं.. मी अशा विषयावर लिहतो तेव्हा सहसा संक्षिप्त स्वरूपात लिहतो. वाचणार्‍याला किती त्रास द्यावयाचा हा साधा हिशेब. पण आज जरा विस्ताराने लिहिन म्हणतो. लेख तीन भागात आहे. पहिल्या दोन भागात ग्रंथाची माहिती व तिसर्‍या भागात याच स्मृतीला प्रखर विरोध कां ? ते पाहू. तर आता सुरवात करू मनुस्मृती लिहणार्‍या मनुपासून. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र्र ही ओळख सोडली तर त्याचा ऐतिहासिक.काळ काही सापडत नाही. तेव्हा जरा वळसा घेवून मनुस्मृतीचा काळ कोणता ते पहिल्यांदी ठरवून मग तो काळ मनूचा असे म्हणावे लागते. इथेही अडचण अशी की आज आपल्यासमोर जी मनुस्मृती आहे ती मनूने लिहलेली नव्हेच. ती आहे एकामागून एक अशी संस्करणे झालेली. पण महाभारतात जर मनूची वचने दिली असतील तर ती त्यावेळी सर्वांना माहीत होती असे म्हणावयाचे. ती बुद्धपूर्व कालातील असणार. द्या सोडून. तेव्हा आज आपल्या समोर असलेल्या मनुस्मृतीकडे वळू. ग्रंथात १२ अध्याय व २६८४ श्लोक आहेत..प्रत्येक अध्यायातील महत्वाचे विचार बघू... आज ज्यांना मोठा विरोध आहे ते दोन मुदे (१) "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" आणि (२) शूद्र. पहिल्याचा आपण याच भागात योग्य ठिकाणी विचार करू व दुसर्‍याकरिता भाग ३ आहेच. (१) अद्याय १ (श्लोक ११९) परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने धर्मशास्त्र मनूला शिकवले. त्याने ते ऋषींना दिले. निमिषापासून युगापर्यंत कालगणना; कृतयुगात धर्म, त्रेतायुगात ज्ञान; द्वापारयुगत यज्ञ व कलीयुगात दान प्रधान आहेत; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण; अध्ययन,अध्यापन,यझ‘करणे-कराविणे दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे; प्रजेचे रक्षण दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन व इंदियजय ही क्षत्रियाची प्रधानकर्मे, गोपालन, दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, शेती ही वैश्याची प्रधानकर्मे तर शिल्पकर्मे (कलानिर्मिती व त्रिवर्णाची सेवा ) ही शूद्रांची कर्मे आहेत. सर्वांनी सदाचारीच असावे. (२) अध्याय २ (श्लोक २४९) ब्रह्मावर्त, ब्रह्मर्षी, मध्य देश यांच्या सीमा; पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत आणि हिमालय-विन्ध्यामधील प्रदेशास आर्यावर्त म्हणतात. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य याचे उपनयन क्रमश: ८ व्या, ११ व्या; १२ व्या वर्षी करावेत. भोजन एकाग्रचित्ताने अन्नाचा सन्मान करून करावे. अतिभोजन करू नये. पतिसेवा हाच स्त्रीसाठी गुरूकुलवास असून उत्तम रीतीने गृहकृत्ये करणे हाच साय़ंप्रातर्होम होय. प्रतिदिनी जो वृद्धांची सेवा करतो विनम्रभावाने नमस्कार करतो त्याचे आयुष्य, विद्या, यश व बल सर्वच वर्धिष्णु होते. मावशी, मामी, आत्या, काकू, सासू या सर्व मातेसमान आहेत. दहा उपाध्यायासमान आचार्य असतो, शंभर आचार्यासमान पिता असतो आणि पित्यापेक्षा मातेची थोरवी सहस्रगुणित असते. ब्राह्मणाने मानसन्मान विषवत् टाळावे व अपमानची अमृतवत् इच्छा करावी, तात्पर्य त्याने निर्द्वंद्व व्हावे. माता-पिता-आचार्य यांचा कधीही अनादर करू नये. हे तीन लोक, तीन आश्रम, तीन वेद आणि तीन अग्नी आहेत. (त्यांच्याप्रमाणे पवित्र आहेत. उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. विद्या, धर्म, सुचिता, उत्तम वचन इ.अनेक प्रकारच्या चिद्या ज्यांच्याकडून मिळतील त्यांच्याकडून घ्याव्यात. (३) अध्याय तीन (श्लोक २८६) गुरूकुलात ब्रह्मचर्यव्रताने राहून मग गुरूच्या आज्ञेनेच गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. ब्राह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, आसूर, गंधर्व, राक्षस आणि पैशाच्य हे विवाहाचे आठ प्रकार आहेत. यापैकी पहिले चार श्रेष्ठ आहेत. ज्ञानवान पित्याने द्रव्याच्या मोहाने आपल्या कन्येला कधीही विकू नये. स्त्रीचा सदैव आदरच केला पाहिजे.जेथे (ज्या कुळात) स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवता रमतात आणि जिथे स्त्रियांचे पूजन होत नाही, तेथे यज्ञादी सर्व क्रीया निरर्थक होतात. ज्या कुलातील स्त्रिया दु:ख करतात, शोक करतात, त्या कुलाचा तात्काळ नाश होतो स्त्रीला सन्मान वा शोभा असेल तरच त्या कुळाला शोभा आहे. देवता, अतिथी, सेवक, माता, पिता, या सर्वांचा गृहस्थाश्रमीने नित्य सन्मान केला पाहिजे. संपूर्ण जीव ज्याप्रमाणे वायूच्या आश्रयाने जगतात, त्याप्रमाणे सर्व आश्रम गृहस्थाश्रमाच्या आश्रयाने जगतात. सर्वांना जेवण दिल्यावरच पति-पत्नीने अन्नग्रहण करावे. (४) अध्याय ४ (श्लोक २६०) सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय. निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये. धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा. नोकर आपली छाया असतात, त्यांच्या मुखातून काही वाईट बोलले गेले तर त्याचा राग करू नये.. कन्या विशेष कृपापात्र असते. विद्वान पुरुषाने सदैव यम-नियमांचे सेवन करावे. तपाचरण करणार्‍याने अहंकार वाढू देऊं नये; यज्ञ करणार्‍याने असत्य बोलू नये; दु:ख असलेल्याने विप्रांची निंदा करू नये; दान देणार्‍याने दानाची वाच्यता करू नये अहंकाराने तपाचा, असत्याने यज्ञाचा, परनिंदेने आयुष्याचा व वाच्यतेने दानाचा नाश होतो. परलोक प्राप्त करतांना माता-पिता, पुत्र, पत्नी कोणीही उपयोगी येत नाही. केवळ एक धर्मच सहाय्यभूत होतो. जीव एकटाच जन्माला येतो व एकटाच मरतो. एकटाच सुकृत-दुष्कृताला भोगतो. उत्तमांचा संग धरावा आणि अधर्माचा संग टाळावा. (५) अध्याय ५ (श्लोक १६९) आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही. शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते. सन्मार्गाने द्रव्य मिळविणे श्रेष्ठ आहे.विद्वान क्षमेने, नदी वेगाने, शरीर जलाने, मन सत्याने, जीवात्मा विद्या व तपाने, बुद्धी ज्ञानाने व ब्राह्मण त्यागाने शुद्ध होतात. मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो. मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरातही काहीही स्वेच्छेने करू नये. बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पति वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात. म्हणून स्त्रीने स्वतंत्र राहू नये. पिता, भर्ता वा पुत्रापासून अलग झालेल्या स्त्रीची निंदा होते. पतिसेवेतच स्त्रीची सर्व व्रते, उपवास, यज्ञ समाविष्ट आहे. मन, वाणी व देह यांने पतीला दु:ख न देणारी स्त्री उत्तम लोकाला जाते. (२००० वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रीने जर पिता, भर्ता आणि पुत्र यांचा आश्रय सोडून स्वतंत्र रहावायाचे ठरविले तर तिला चरितार्थाचे साधन काय असणार ? संरक्षणाची व्यवस्था कोणती ? अशा स्त्रीची समाज निंदा करणार हे उघडच होते. मनूने इतर ठिकाणी स्त्रीची केलेली स्तुती पहाता त्याच्या मनात स्त्रीबद्दल आदरच होता असे दिसते.पण समाजाचा एक भाग म्हणून विचार केला तर त्या काळी स्वतंत्र स्त्री ही कल्पना अव्यवहार्य होती हे मान्य करावेच लागेल. आज काळ बदलला आहे. आज स्त्रीने स्वतंत्र रहावयाचे ठरविले तर ते शक्य आहे,सुरक्षित आहे की नाही हे अलग, तेव्हा या विधानाबद्दल मनूला किती दोष द्यावयाचा हे प्रत्येकाने वैयक्तिक ठरवावे.) (६) अध्याय ६ (श्लोक ९७) माणसाने गृहस्थाश्रमात नियमपूर्वक व जितेंद्रिय रहावे. वृद्धत्व आल्यावर वानप्रस्थाश्रमाचा आश्रय घ्यावा. शेवटी सन्यास घ्यावा. या अध्यायात प्रत्येक आश्रमात कसे रहावे याचे मार्गदर्शन केले आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व यती हे चार आश्रम गृहस्थाश्रमाधिष्ठित आहेत. धैर्य, क्षमा, दम अस्तेय, सुचिता, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, आत्मज्ञान, सत्य, अक्रोध ही दहा धर्मलक्षणे आहेत. यांच्या अनुसरणानेच मोक्षलाभ होतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 65734
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

१. माझ्या मते ५-१५४ चा अर्थ वेगळा आहे. पती शीलभ्रष्ट, कामधर्जिणा, गुणहीन असला तरी त्याची नित्य सेवा करणारी स्त्री साध्वी समजली जाते. तत्कालीन स्त्री समोर दुसरा काय पर्याय होता? २.".....पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते" ही अत्युत्तम सुविधा आहेstrong> ...आणि पुरुषांनी काय करायचे...?... ३.ज्या स्त्रियांना पतीलोकाची इच्छा आहे अशांसाठीच हे व्रत सांगितले आहे. ज्यांना इच्छा नाही त्यांच्यासाठी इतर मार्ग खुले आहेत. पुरुषांना लग्न होऊनही सर्वच मार्ग त्याकाळी खुले होते..(आजही मोठ्या प्रमाणावर खुले आहेत... तशी सोयच करून ठेवली आहे ना!... उदा: देवदासी) ४. आणि ५ यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत. निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. मनुस्मृती मनामनात रुजली आहे ह्याचे हे द्योतक! म्हणून कुरुंदकर सरांचा मारावा जी ने दिलेला उतारा महत्त्वाचा ठरतो...आपल्या पुढील प्रतीक्रीयेंवर मत देण्यात काही अर्थ नाही.

कुठ्ल्याही लेखाला काही एक उद्दिष्ट असतं. मला तुमच्या 'मनुस्मृती' ची ओळख करून देण्यामागचा हेतू काही समजला नाही. कृपया भारताला अंध:कारमय जीवन देणाऱ्या या मनुस्मृतीवर इथे संक्षेपाने देण्याच्या आपल्या उद्दिष्टावर प्रकाश टाकावा, एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं.. सबंध लेखात केवळ वरील नमूद वाक्य एव्हडेच काय ते तुमचे 'विवेचन' जाणवले. हा लेखाचा उद्देश आहे का? काही बाबी ह्या काळ कितीही लोटला आणि कुठल्याही भूभागावर घडल्या तरीही चूकच ठरतात कारण जर विश्लेषणाचे निर्देशक हे वैश्विक मूल्य असतील तर! स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संकल्पनेवर मनुस्मृती तपासली तर ती कुठल्याही काळावर किंवा भूभागावर चुकीचेच आहे. मनुस्मृतीला विरोध करणारे त्या काळातही असणारच पण जो जेता तोच इतिहास लिहितो!! क्रूरता जिंकली आणि सभ्यता हरली म्हणून क्रूरता गोंडस असते असे नाही! 'प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले असते' यासारखे वैचारिक फोलपणा असलेले वाक्य नाही. उदाहरण देतो - जगात सगळ्यात मोठा क्र. २ चा व्यापार कुठला...?...मुलींची आणि बालकांची वेश्याव्यवसायासाठी विक्री...आता आर्थिक निकषावर खूपच यशस्वी व्यवसाय, नाही का! जरा यात नेमके काय चांगले शोधायचे सांगता येईल का! ..यातून मिळणारा पैसा? एखाद्या अशा पिडीत स्त्रीला तीचे दु:ख विचारून बघा! एकुलता एक मानवी जन्म जेंव्हा पूर्णत: शोषणात जातो; काय चांगले शोधणार! कदाचित मनुस्मृती मानणारे शोधू शकतील; कारण अख्खी मनुस्मृती शोषणाची समर्थक आहे. सुटे सुटे श्लोक देऊन कदाचित त्यातील भव्यपणा जाणवू शकेल पण पूर्ण स्मृतीशी निगडीत त्या श्लोकांचा अर्थ घ्यावा लागेल. तुम्ही दिलेले उदा बघू - (४) अध्याय ४ (श्लोक २६०) सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय. निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये. धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा. सत्य म्हणजे काय? प्रिय बोल कसे असतात? जे जे धर्माधारित आहे किंवा धर्मात सांगितलेले आहे तेच सत्य आणि तेच प्रिय! आणि धर्मात काय सांगितले आहे...ते मनुस्मृतीत गठीत करून ठेवले आहे आणि मनुस्मृती काय सांगते तर स्त्री आणि शूद्रांचे शोषण! म्हणजे जे शोषणाविरुद्ध बोलतील ते असत्य आणि अप्रिय! सत्य बोलावे म्हणजे शोषणाचे समर्थन करणारे बोलावे; प्रिय बोलावे म्हणजे शोषणाच्या समर्थनार्थ बोलावे. आणि 'असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये' म्हणजे शोषणाविरुद्ध ब्र देखील काढू नये! मनुस्मृतीला काळाच्या परीप्रेक्ष्यात जरीही चूक किंवा बरोबर ठरवायचे झाले तरही चूकच ठरते!

'प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले असते' यासारखे वैचारिक फोलपणा असलेले वाक्य नाही. एक विधान चांगले आहे उदाहरणार्थ वरील मुळ लेखात शरदजींनी एक विधान दिलेले आहे. उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. वरील विधानातील "शुद्राकडुनही" यातील हीनतादर्शक भाव आपण सोडुन देऊ. जाउ द्या. पुढील वाक्य पहा स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर यातील अर्थ असा वाटतो की कुल जरी नीच असले तरी अशा स्त्री चा वरच्या वर्णाच्या पुरुषा ने पत्नी म्हणुन स्वीकारण्यास हरकत नाही असे मनु म्हणत आहे. एक प्रकारचा उदारपणा यातुन भासतो. की उच्च कुलीन ब्राह्मण वा क्षत्रिय अशा स्त्रीचा स्वीकार करु शकतो त्याला वर्णाचा अडथळा जणु नाहीच. पण असे खरेच मनुला अभिप्रेत होते का ? म्हणजे शरदजी एकच श्लोक देतात त्यांच्या वाचकांकडे फारसा वेळ ही नाही फारसा आता वरील शरदजींचा श्लोक लक्षात ठेउन मनु चे खालील छेद देणारे इतर श्लोक बघा. तिसर्या अध्यायात मनु विवाह कुठल्या स्त्री शी करावा कुठल्या नाही या संदर्भात मार्गदर्शन करत आहे. यस्यास्तु न भवेद् भ्राता न विज्ञायेत वा पिता । नौपयच्छेत तां प्राज्ञः पुत्रिकाऽधर्मशङ्कया ॥११॥ जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.) तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥ सवर्णाऽग्रे द्विजातीनां प्रशस्ता दारकर्मणि । कामतस्तु प्रवृत्तानामिमाः स्युः क्रमशोऽवराः ॥१२॥ शूद्रैव भार्या शूद्रस्य सा च स्वा च विशः स्मृते । ते च स्वा चैव राज्ञश्च ताश्च स्वा चाग्रजन्मनः ॥१३॥ द्विजांचा प्रथम विवाह कर्तव्य असता सवर्ण स्त्री श्रेष्ठ होय. पण केवल कामलोलुप होऊन विवाहास प्रवृत्त होतात त्यास ह्या पुढील क्रमाने प्रशस्त आहेत. ॥१२॥ शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥ न ब्राह्मणक्षत्रिययोरापद्यपि हि तिष्ठतोः । कस्मिंश्चिदपि वृत्तान्ते शूद्रा भार्यौपदिश्यते ॥१४॥ पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्‍या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥ हीनजातिस्त्रियं मोहादुद्वहन्तो द्विजातयः । कुलान्येव नयन्त्याशु ससन्तानानि शूद्रताम् ॥१५॥ मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥ शूद्रावेदी पतत्यत्रेरुतथ्यतनयस्य च । शौनकस्य सुतोत्पत्त्या तदपत्यतया भृगोः ॥१६॥ शूद्रां शयनमारोप्य ब्राह्मणो यात्यधोगतिम् । जनयित्वा सुतं तस्यां ब्राह्मण्यादेव हीयते ॥१७॥ शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥ सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥ दैवपित्र्यातिथेयानि तत्प्रधानानि यस्य तु । नाश्नन्ति पितृदेवास्तन्न च स्वर्गं स गच्छति ॥१८॥ वृषलीफेनपीतस्य निःश्वासोपहतस्य च । तस्यां चैव प्रसूतस्य निष्कृतिर्न विधीयते ॥१९॥ ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥ ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥ वरील काहीही वाचण्यास शरदजींच्या तरुण वाचकांस फारसा वेळ नसल्याने शरदजी त्यांना अगदी सार म्हणुन इतका एकच महत्वाचा श्लोक देतात तो म्हणजे स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा.

In reply to by मारवा

शरदजीचा हा धागा आणि भारतातील सर्व मनुस्मृती समर्थक हे सोयीचेच श्लोक, सोयीचेच उदाहरण समोर देऊन 'प्रत्येक साहित्यात काहीतरी चांगले असते' असे म्हणून त्यांच्या मनात रुजलेली मनुस्मृती समाजात नव्याने रुजविण्याचा प्रयत्न सतत करीत असतात असे जाणवत आहे. ...मुळात मनुस्मृतीची निर्मिती देखील ठराविक जातींच्या (केवळ पुरुषांच्या) सोयीसाठी झालेली आहे तेंव्हा असे सोयीचा धागा आणि सोयीचे श्लोक दिसत असले तर ते काही अगम्य नाही!

१- शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते. २-आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही. पहील्या विधानात शंभर अश्वमेध करणारया व्यक्ती इतकेच शाकाहारी ला मिळत असलेल्या पुण्याचे वर्णन आहे म्हणजे मास न खाउन राहील्यास त्या व्हेजीटेरीयन व्यक्तीस इतके मोठे पुण्य मिळते. इतकी पुण्यवान शाकाहारी व्यक्ती आहे. दुसरे विधान ही त्याचीच उलट बाजुने स्पष्ट समर्थन करत आहे. जर मांस खाल्ले तर इहलोकांतच नाही तर परलोकांत ही सुख मिळणार नाही. इतका मांसाहार वाईट आहे त्याज्य आहे. आता वरील दोन्ही विधानांना छेदुन खालील विधान येते ३- मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो. आता एकदम पलटी मारुन मांसाहारीला परलोकात ही सुख मिळणार नाही ची वार्निंग देणारा मनु सौम्य होत म्हणतो. मांस खाण्यात पाप नाही. इतकेच होते तर एक वेळ म्हटले असते ठिक आहे थकला असेल बिचारा सांगुन पण नाही खालील श्लोक पहा तं प्रतीतं स्वधर्मेण ब्रह्मदायहरं पितुः । स्रग्विणं तल्प आसीनमर्हयेत् प्रथमं गवा ॥३॥ ब्रह्मचार्‍याच्या धर्माचे अनुष्ठान केल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या, पित्यापासून ब्रह्मरूपी धनाचे हरण करणार्‍या, माळेच्या योगाने अलंकृत झालेल्या व उत्कृष्ट आसनावर बसलेल्या त्या वेदवेत्त्याची विवाहाच्या पूर्वी मधुपर्क विधीने पूजा करावी. यातील मधुपर्क हा मांसाशिवाय संभवतच नाही त्याची व्याख्याच मुळात नांमासो मधुपर्क भवति इतकी सुस्पष्ट आहे. मांस असल्याशिवाय मधुपर्क मधुपर्क च होत नाही. तर इथे विवाह्पुर्व मधुपर्क देऊन मांस देऊन पुजा करावी असा आदेश मनु देतो. ते ही महत्वाच्या शुभ प्रसंगी मांस खाण्यास प्रोत्साहन देत आहे. या विचीत्र चमत्कारीक विसंगती ला खुद्द ज्ञानेश्वर ही समजु शकत नाही. एकीकडे अहिंसेचे समर्थन एकीकडे मांसाहाराच्या विधी ला प्रोत्साहन या वैदीकांच्या दांभिकते वर ज्ञानेश्वर म्हणतात परी ते ऎसी देखा, जैशा खांडुनिया शाखा, मग तयाचियां बुडुखा, कुंप कीजे, । तैसी हिंसाची करुनि अहिंसा निफ़जविजे हा ऎसा, पै पुर्वमीमांसा निर्णो केला। जे अवृष्टीचेनि उपद्रवे, गादलें विश्व आघवें, म्हणोनि पर्जन्येष्टी करावे, नाना याग । तंव तिये इष्टीचा बुडीं, पशुहिंसा रोकडी, मग अहिंसेची थडी, कैंची दिसे। पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवैल काय अहिंसा, परि नवल बापा धिंवसा, या याज्ञिकांचा। (अ-१३ ओ-२१८ ते २२३) अर्थ- वृक्षाच्या फ़ांद्या तोडून मग त्यांचाच वापर करुन त्या वृक्षासाठी कुंपण करावे ( याला काय अर्थ आहे ?) त्याप्रमाणे प्रत्यक्ष हिंसाच करुन अहिंसा निर्माण करावी असा चमत्कारीक निर्णय पुर्वमीमांसाकारांनी केलेला आहे. पाऊस न पडल्याने सर्व प्राणी गांजले जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणुन विविध प्रकारचे यज्ञ करावेत. पण त्या यज्ञ-यागाच्या बुडाशी तर उघड उघड रोकडी पशुहिंसा च आहे मग अहिंसेची कड कशी लागणार ? जेथे केवळ हिंसाच जर पेरली जाते: तेथे शुद्ध अहिंसा कशी उगवेल ? परंतु या हिंसेला अहिंसा म्हणण्याच्या याज्ञिकांच्या धाडसाच नवल बघ बाबा संदर्भासाठी बुल्हर चा मूळ इंग्रजी अनुवाद 3. The meaning is, that the student who, after completing his term, has become a Snataka, shall receive first, i.e. before his marriage, the honour of the Madhuparka (Ap. II, 8, 5-9) from the person who instructed him. The phrase ' who has received his heritage, the Veda, from his father,' indicates, according to the commentators, that, as a rule, the father is to teach his son. As, however, the teacher is considered the spiritual father of his pupil, pitu/z might also be translated ' from his (spiritual) father.'

In reply to by मारवा

१- शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते. + १ २-आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही. + १ बाकी चालू द्या.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी आपला प्रतिसाद कळाला नाही. म्हणजे आपल्याला नेक्के काय म्हणावयाचे आहे ते थोडे विस्त्तारपुर्वक मांडावे. +१ म्हणजे वरील विधा नांच्या समर्थनार्थ आहे का ? तसेही + १ ची सांकेतीक भाषा मला समजत नाही खर म्हणजे आवडत ही नाही फारशी

मारवा जी आणि Duishen जी आपण इतका वेळ काढून सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल खरोखर आभार! खरंच मनुस्मृती इतक्या विकृत दर्जाचा असेल याविषयी माहिती नव्हती! आणि संस्कृत भाषा अवगत असणारे अगोदरच कमी असल्यामुळे आपल्याकडे किती लोकांना याविषयी माहिती असेल काय माहित... त्या काळातदेखील किती सामान्य लोकांना यातले कळत असेल? (म्हणूनच संस्कृत मर्यादित लोकांपर्यंत ठेवली गेलेली का?) आणि हे सगळे आपली घटना अस्तित्वात येईपर्यंत सुरु होते म्हणजे किती विकृती आपल्या समाजात होत्या(अजूनही आहेतच)... आणि या सगळ्यांना "धर्माच्या" नावाखाली चालवलं जात होत... विचार करूनच कसतरी होत... जेव्हा तथाकथित शूद्र लोकांना या स्मृतींबद्दल आणि त्यातल्या "अत्यंत" विषमतापूर्ण श्लोकांबद्दल माहिती कळाली असेल तेव्हा काय वाटले असेल! इतकी हजार वर्ष इतकी खराब वागणूक फक्त एका विशिष्ट घरात जन्म मिळाला म्हणून! (आता काही लोक म्हणतील वर्ण हा जन्मावर अवलंबून नव्हता! किती शूद्र ब्राम्हण झालेली उदाहरणे आहेत इतिहासात?) का विद्रोह करणार नाहीत ते... इथे ६०-७० वर्ष झाली आरक्षण देऊन तर पार जीव गेल्यासारख्या प्रतिक्रिया देतात लोक... क्षत्रिय असोत ब्राम्हण असोत इतिहासामध्ये अनेक लोकांची नाव आहेत महान राजा म्हणून कधी महान ज्ञानी म्हणून पण या लोकांची कुठे नाव आहेत का? त्यांना इतिहासामध्ये काही स्थान तरी दिल गेलाय का कधी? हे जाणून घ्यायला आवडेल... आताच्या मनुस्मृतीच्या समर्थकांना निषेध दर्शवण्यासाठी असले ग्रंथ जाळायलाच हवेत... आपल्या समाजात नवीन ग्रंथसंपदा निर्माण करण्याची आणि समतेच्या तत्वावर लिहिण्याची नक्कीच कुवत आहे. असले ग्रंथ फक्त इतिहासात आपण किती पाण्यात होतो आणि आता किती आहोत याचे विश्लेषण करायला राहतील. शरदजींनी ठराविक श्लोकच का घेतले आणि या लेखांमागे त्यांचा उद्देश काय आहे हे प्रश्न आहेतच...

मनुस्मृतीत सांगितले आहे म्हणून मी आज त्यातील अमूक अमूक गोष्टींचे पालन करतो असे सांगणारे किती लोक असतील?

मारवा, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.) तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥
विवाहेच्छुकाच्या कुळाची चौकशी अगदी आजही सगळेच करतात. जर अपत्याच्या गळ्यात आज्याचं श्राद्ध करायचं लोढणं बांधायचं नसेल तर काय खबरदारी घ्यायला हवी ते सांगितलं आहे. ज्यांना श्राद्धादि कार्ये करायची नाहीतच त्यांनी खुशाल कोणाशीही विवाह करावेत. २.
शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥
शूद्राला क्षात्रकन्या काय कामाची? आज कोणी आपल्या वरचढ बायको करतो का? नाकापेक्षा मोती जड कोणाला हवाय? शिवाय कोणती वधू आपल्याहून कमी स्तरावरील वर निवडेल? Women are hypergamous by nature. ३.
पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्‍या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥
इथे मनुचा संबंध येत नाही. तो इतर शास्त्रांत अमुक परिस्थितीचा उल्लेख नाही इतकंच सांगतो आहे. ४.
मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥
अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल? ५.
शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥
इथे मनु अत्री व गौतामांची मते पुनरोक्त करतो आहे. ६.
सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥
जो भोगलोलुप आहे तो खरंतर ब्राह्मणच नव्हे. यांत चुकीचं ते काय? ७.
ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥
श्राद्धादि कर्मे पार पाडण्यासाठी शुद्धीची अपेक्षा आहे. भोगलोलुपतेमुळे मन बिघडतं. बिघडलेल्या मनाने केलेलं कोणतं कार्य फलद्रूप होईल? पण जर शूद्र स्त्री उत्तम चालीरीतींची असेल (उदा. : शारंगी व अक्षमाला) तर कोणताच प्रत्यवाय नाही. ८.
ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥
हे असं मनुच्या वेळेस होतं. तुम्ही आजची शुद्धीकरण प्रक्रिया सांगा. आपण राबवू. असो. एकंदरीत ज्यांना पितृकर्मे वगैरे धडपणे पार पाडायची आहेत अशांसाठी मनुस्मृती आहे. ज्यांना अशी गरज वाटंत नाही त्यांनी खुशाल दुर्लक्ष करावं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥ अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल?

मारवा, तुमचे मन:पूर्वक धन्यवाद. तुमच्या मुद्देसूद प्रतिसादांमुळे इथल्या अट्टल टनाटनींचे बुरखे टराटर फाटले. त्यांना असेच उघड केले पाहिजे. ब्रम्हकपटी टनाटन्यांचा निषेध असो!

मारवा,
आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?
मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल. एक उदाहरण देतो. भारतात ढिगाने जातीजातींची संमेलनं भारतात. पण पहिलं अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मणसंमेलन नाशिकात भरलं होतं (२००५ साली? ) तेव्हा आख्ख्या भारतभर कोण प्रसिद्धी लाभली होती. लोकं आजूनही ब्राह्मणांचा आदर करतात. तो जातीने ब्राह्मण असलेल्यांचा नसून ते ज्या ब्राह्मण्याचं प्रतिनिधित्व करतात त्या ब्राह्मण्याचा आदर आहे. सांगायचा मुद्दा काये की जातीने ब्राह्मण असलेला माणूस ब्राह्मण्याने वागला तर आजही हिंदूंच्या आदरास पात्र होतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितीगार जी चा एक प्रश्न योग्य आहे की 'ब्राह्मण्य' म्हणजे काय. आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल? या प्रश्नाला तुम्ही खालील उत्तर दिले आहे - मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल... म्हणजे ब्राह्मण्याची मनुस्मृतीकृत व्याख्या आणि वर्तन तुम्हाला मान्य आहे. हरकत नाही, कारण ते तुम्ही मान्य केले नसते तरीही आपल्या एका कमेंट मधे आपण समस्त महिलावर्गाबाबत जे उद्गार काढले ते आपल्या विचारशैलीला अनुकूल असेच आहेत... विसाव्या शतकाच्या सुरवातीला 'हिंदू कोण?' अशी वाद / चर्चा आर्य समाज आणि तत्कालीन इतर हिंदू संघटनामधे मोठ्या प्रमाणावर झाली. जे वेद मानतात ते हिंदू की भगवतगीता मानतात ते हिंदू? ..आणि जे दोन्ही मनात नाहीत त्यांचे काय? मोठा कळीचा प्रश्न होता. शिवाय केवळ चार वर्णांचाच उल्लेख मग दलितांना कुठे बसवणार?...त्यांचा गुलाम म्हणून होणारा वापर सुखासुखी सोडवत नव्हता. पुन्हा प्रश्न राहिला तो आदिवासी समाजाचा, भटक्याचा... त्यांना गुलाम म्हणून कोठे बसवणार याचा! एक महत्त्वाची नोंद अशी की शिवाजी महाराजदेखील 'हिंदवी स्वराज्य' असा शब्दप्रयोग करतात; 'हिंदू स्वराज्य' असा नाही. सावरकरांची भू-राजकीय व्याख्या ही धार्मिक मानून हिंदू संघटनांची वाटचाल सुरु झाली... अजून एक वाद जो १९९५-९६ पर्यंत चालला; तो म्हणजे हिंदू हा धर्म की हिंदू ही संस्कृती... आणि त्यानंतर हिंदू म्हणवून घेणाऱ्या बहुतेक राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या 'विद्वत्ताप्रचुर' वाक्यावरून असे जाणवते की 'वेळ पडली तर संस्कृती म्हणून शब्द वापरावा आणि वेळ पडली तर धर्म म्हणून शब्द वापरावा'. तुमची हिंदूची व्याख्या काय? धार्मिक, सांस्कृतिक की भू-राजकीय?...१०० कोटी हिंदू असा उल्लेख केला म्हणून जिज्ञासा जागी झाली. पण असो! आपल्यापेक्षा श्री. मोहन भागवत सरांनी 'इंडियन एक्स्प्रेस' समूहाला दिलेली व्याख्या बघू. त्यांच्या मतानुसार 'जो हिंदुस्थानात राहतो तो हिंदू! इथला मुस्लीम, ख्रिचन, सिख, इसाई हे सर्व हिंदू!' किती व्यापक वाटत ना वाचून! पण ठराविक लोक काय मानतात यावरून देश नक्कीच चालत नाही... तुमचे १०० कोटीचे हिंदू मिथक बघू...२०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिम १३.४%; ख्रिश्चन २.३%; शीख १.९%; बौद्ध ०.८%; जैन ०.४%; इतर ०.६%; धर्म न सांगणारे ०.१% = १९.५%.... हे सर्व स्वत:ला हिंदू मानतात काय? ..तर उत्तर निखालसपणे 'नाही' असेच आहे. ही झाली सरकारी आकडेवारी... जरा आरक्षणावरून; ..पण हिंदूत्व नाकारणाऱ्याकडे बघू - दलित १५% पण यातील ०.८% बौद्ध सर्वच दलित होते असे गृहीत धरू आणि वगळू करण टक्केवारी दोनदा मोजायला नको... म्हणून दलित १४.२%; आदिवासी ७%; भटक्या आणि विमुक्त जाती-जमाती ३%; ओबीसी समाज ५२% असला तरीही त्यातील ५-६%% समाज जागृत होऊन हिंदू धर्म नाकारतोय अगदी महाराष्ट्र घ्या किंवा युपी! एका मिपाच्या धाग्यावर आणि महाजालातील काही संकेतस्थळावर भारतातील नास्तीकांची संख्या ३% असावी असा कयास व्यक्त केला आहे...म्हणजे आरक्षणातील आणि नास्तीकातील (१४,२%+७%+३%+५%+३%) = ३२.२% समाज स्वत:ला हिंदू समजत नाही. म्हणजे एकूण लोकसंख्येतील १९.५%+३२.२% = ५१.७% भारतातील समाज स्वत:ला हिंदू समजत नाही... शिवाय शिवधर्म स्वीकारणाऱ्याची टक्केवारी अजून उपलब्ध नाही. लिंगायत समाज हा स्वत:ला वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करतोय. तो स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ इच्छित नाही..... मग हे १०० कोटी आले कुठून? जात हे हिंदू समाजाचे व्यव्वछेदक लक्षण आहे तेंव्हा आदिवासी समजात फिरतांना त्यांना मी हिंदु असण्याविषयी विचारले होते.. तुम्हीपण विचारू शकता अगदी कातकरी, गोंड समाजांना! त्यातील अर्ध्याधिक जणांना हा शब्द माहिती माहिती पण नाही...ज्यांना माहिती आहे त्यांना मी त्यांचा वर्ण विचारला तर ते ही सांगता आले नाही कारण आदिवासी समाज हा निसर्गपूजक, वनस्पतीपुजक किंवा प्राणीपुजक आहे त्यांना हिंदू शब्दाशी काही देणे-घेणे नाही. तेंव्हा आदिवासींना कागदोपत्री हिंदू म्हणण्याचा निणर्य कधी झाला हे पाहणे रोचक ठरेल... आणि असा निर्णय भूभागवाचक असणार धर्मवाचक नव्हे! तेंव्हा १०० कोटीच्या मिथकाबाबत आपणास शुभेच्छा! "तेव्हा आख्ख्या भारतभर कोण प्रसिद्धी लाभली होती." मिडिया कुणाच्या हातात आहे याबाबत आपल्या विधानाने नि:शंक झालो.

गामाजी आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल? अहो प्रतिसाद तरी नीट वाचा ना एकदा. हा प्रश्न श्री अरविंद कोल्हटकरांनी जस्टीस दीपक मिश्रा यांनी त्यांच्या निकालपत्रात जो मनुचा श्लोक दिलेला आहे त्यावर टीप्पणी करतांना विचारलेला प्रश्न आहे.

In reply to by मारवा

मारवा, माझ्या मते स्वं स्वं चरित्रं हा त्या श्लोकाचा गाभा आहे. ब्राह्मणाचं चरित्र हेच ब्राह्मण्य आहे. तेच जर नसेल तर उरलेल्या श्लोकास काही अर्थ उरंत नाही. अगदी अग्रजन्मन् जरी असला तरी त्याला चरित्र हवंच. प्रस्तुत श्लोकात कसलाही आदेश नाही. कसं असावं ही अपेक्षा मात्र व्यक्त केली आहे. हिलाच जर तुम्ही ब्राह्मण्याचा उदोउदो म्हणणार असाल तर शंभर कोटी हिंदूंना तो मान्य आहे. आ.न., -गा.पै.

मारवा,
म्हणजे द्विजानी शुद्र स्त्री शी विवाह केल्याने त्याचे अधपतन होइल त्याचा मान संपेल ?
वसिष्ठ व मंदपाल यांचा मान शूद्र स्त्रियांशी विवाह केल्याने संपला नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल? वसिष्ठ व मंदपाल यांचा मान शूद्र स्त्रियांशी विवाह केल्याने संपला नाही. वसिष्ठ व मंदपाल या वाघांनी गवत खाऊनही ?

In reply to by मारवा

तुमच्या चिकाटीला मनापासून दाद देतो. अार यू सिईंग एनी लाईट अॅट द एंड अाॅफ द टनेल?

तुमच्या चिकाटीला मनापासून दाद देतो. अार यू सिईंग एनी लाईट अॅट द एंड अाॅफ द टनेल?

When walking through the 'valley of shadows,' remember, a shadow is cast by a Light. Austin O' Malley

Duishen, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
तेंव्हा १०० कोटीच्या मिथकाबाबत आपणास शुभेच्छा!
माझं १०० कोटींचं ओझं तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतल्यानिमित्त आभार. असेच मला सहाय्य करत जा. २.
आपल्या एका कमेंट मधे आपण समस्त महिलावर्गाबाबत जे उद्गार काढले ते आपल्या विचारशैलीला अनुकूल असेच आहेत...
ते भाष्य काय आहे ते कळेल काय? तसेच त्यातून माझी कोणती विचारधारा प्रकाशित होते आहे तेही कळेल काय? गैरसमज झालेला असल्यास मी स्पष्टीकरण देण्याचा यथायोग्य प्रयत्न करेन. ३.
तुमची हिंदूची व्याख्या काय?
सत्य एक असून अनेक प्रकारे व्यक्त होतं. हे विधान ज्याला मान्य आहे तो हिंदू. अशी माझी हिंदुत्वाची व्याख्या आहे. ४.
मिडिया कुणाच्या हातात आहे याबाबत आपल्या विधानाने नि:शंक झालो.
देशद्रोही अफजल गुरू आणि याकूब मेमनसाठी गळा काढणारे हेच मिडियावाले ब्राह्मणांना कशासाठी एव्हढी प्रसिद्धी देताहेत? जनतेच्या मनात भयगंड उत्पन्न करायलाच ना? ५.
मग हे १०० कोटी आले कुठून?
१२५ कोटींमधले १९.५ % ( = सुमारे एक पंचमांश = २५ कोटी) कमी केल्यावर उरतात ते १०० कोटी. १९.५ % हा तुमचा आकडा आहे. १२५ कोटी ही भारताची २०१७ ची अंदाजे लोकसंख्या आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आपल्या एका कमेंट मधे आपण समस्त महिलावर्गाबाबत जे उद्गार काढले ते आपल्या विचारशैलीला अनुकूल असेच आहेत. मारवा यांना प्रतिसाद - 20 Oct 2017 - 8:59 या ठिकाणी मुद्दा क्र. ४, ५, ७, मधील आपले मत वाचावे. तसेच "...आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल? याचे उत्तर आपण "मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल..." असे दिले आहे. दोन्ही उत्तरातून आपण आपली प्रतिमा मनुस्मृती मानता आहात अशी समोर ठेवत आहात... माझा गैरसमज झाला असल्यास कृपया दूर करण्यास मदत करावी. १९.५ % हा तुमचा आकडा आहे. १२५ कोटी ही भारताची २०१७ ची अंदाजे लोकसंख्या आहे. शासनाची आकडेवारी १९.५% आहे माझी आकडेवारी ५१.७% आहे..

मारवा,
वसिष्ठ व मंदपाल या वाघांनी गवत खाऊनही ?
ब्राह्मण भोगलोलुप झाल्यास त्यास वाघाने गवत खाणे म्हणता येईल. प्रस्तुत विवाहांत भोगलोलुपता नसल्याने हे तृणभक्षण नव्हे. पुण्यश्लोक माधवीने गालव ऋषींची इच्छापूर्ती व्हावी म्हणून स्वत:हून चार विविध राजांशी एकवार्षिक विवाह करून चार सुलक्षणी पुत्र उत्पन्न केले. द्रौपदीस पाच पती होते, जे मनुस्मृतीस अपेक्षित नाही. फार काय अगदी विवाह करायचीही आवश्यकता नाही. पराशर ऋषींनी मत्स्यगंधेशी फक्त शय्यासोबत केली होती. त्यातून महर्षी व्यास जन्मास आले. सांगायचा मुद्दा काये की वसिष्ठ, मंदपाल, पराशर, मत्स्यगंधा, माधवी, द्रौपदी हे गवतखाऊ भोगलोलुप नव्हेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही म्हणता पराशर ऋषींनी मत्स्यगंधेशी फक्त शय्यासोबत केली होती. त्यातून महर्षी व्यास जन्मास आले. सांगायचा मुद्दा काये की वसिष्ठ, मंदपाल, पराशर, मत्स्यगंधा, माधवी, द्रौपदी हे गवतखाऊ भोगलोलुप नव्हेत. पराशर ची कथा महाभारतात आणि त्याहुन अधिक डिटेल मध्ये देवी भागवतातील द्वितिय स्कन्धातील दुसया प्रकरणात येते. पराशरमुनी एक दिवस तिर्थयात्रा करत असतांना यमुनेच्या किनार्यावर येतो आणि तेथील कोळ्याला नदी पार करुन देण्याची विनंती करतो. तो कोळी आपल्या मुलीला मत्स्यगंधेला या पराशराला नावेतुन नदी पार करुन देण्यास सांगतो. नावेतुन जात असतांना पराशर तिच्यावर मोहित होतो. ( या अगोदर पराशराने कधीही मत्स्यगंधेला बघितलेले नाही सर्वस्वी अनोळखी स्त्री ला पहील्याच भेटीत वयात अंतर असुनही ( ओळखच नसल्याने प्रेम वगैरे असण्याचीही शक्यता नाही ) पराशराने कामुकतेत संयम सोडलेला आहे मुळ संबंधित संस्कृत श्लोकाचे इंग्रजी भाषांतर सोबत देत आहे . Once on an occasion, the highly energetic Muni Parāśara went out on pilgrimage and arrived on the banks of the Yamunā, and spoke to the religious fisherman who was taking his food then thus :-- “O fisherman! Take me on your boat and carry me to the other side of the river.” Hearing this, the fisherman spoke to the beautiful girl Matsyagandhā :-- “O beautiful smiling one! This religious ascetic intends to cross the river; so take the boat and carry him to the other bank.” Thus ordered by her father, the exceedingly beautiful Vasu girl Matsyagandhā began to steer the boat whereon sat the Muni. Thus while the boat was sliding on the waters of the Yamunā; the Muni Parāśara saw the beautiful-eyed damsel Matsyagandhā and became as if under the command of the great destiny, greatly enamoured of her. मत्स्यगंधेशी संभोग करण्यास आतुर झालेला पराशर तिचा हात धरतो. यावर मत्स्यगंधा काय पराशराला काय म्हणते बघण्यासारखे आहे. ती पराशराला म्हणते " तुझ्यासारखा धर्म जाणणारा तु हे मदनबाणाने घायाळ होऊन काय करत आहेस ? ही तुझी माझ्याप्रती निर्माण झालेली वासना तुला तुझ्या कुटुंबाला तुझ्या धर्माच्या ज्ञानाला तुझ्या तपस्येला लायक आहे का शोभा देते का ? तुझ्या सारखा वसिष्ठाच्या महान कुलात जन्मलेला ब्राह्मणाला हे योग्य वाटते का ? He desired to enjoy Matsyagandhā, full of youth and beauty and with his right hand caught hold of her left hand; the blue coloured Matsya looking askance spoke out smilingly in the following words :-- O knower of Dharma! What are you going to do, pierced by the arrows of Cupid? What you desire now, is it worthy of your family or your study of the Śāstras or worthy of your Tapasyā; see, you are born in the line of Vaśiṣṭha and you are well known as of good character. O best of Brāhmiṇs! You are quite aware that the attaining of a man-birth in this world is very rare; and over and above this the attainment of Brāhminhood is, as far as my knowledge goes, particularly difficult. त्यापुढे अजुन स्पष्टपणे ती स्वत:च्या शरीराला येत असलेल्या माशाच्या वासाचा ही हवाला देत त्याला रोखु पाहते. ती म्हणते तु कुलाने द्न्यानाने सर्वश्रेष्ठ आहे तुला धर्माचे ज्ञान आहे तरीही तु असे कसे करु पाहतो आहेस जे आर्याला शोभा देत नाही. माझ्या सर्वांगाला माशाचा वास येत असुनही तुला असे करावेसे का वाटत आहे ? 11-14. O Prince of Brāhmiṇs! You are the foremost and best as far as your family, goodness, and learning in the Vedas and other Śāstras are concerned; you are well versed in Dharma; how is it, then, that you are going to do this act, not worthy of an Ārya, though you see me possessed of this bad smell of fish throughout my body. तुला माझ्यात असे काय आढळले की तु माझ्याशी संग करण्यास आतुर होउन माझा हात धरत आहेस ? इतके बोलुन ती स्वत:शी विचार करते की " अरेरे ह्या ब्राह्मणाचे डोके फ़िरलेले आहे हा मला भोगण्याच्या नादात नाव बुडवुन टाकेल हा इतका कामातुर झालेला आहे की याला थांबवणे जगात कोणालाही अशक्य आहे. " अखेर ती थकुन म्हणते की " मुनिवर तुम्ही मला कमीत कमी मला तुम्हाला पलीकडच्या किनार्यावर तरी घेउन जाऊ द्या मग तुम्हाला काय हवे ते मजसोबत करा " O one of unbaffled understanding! O best of twice-born! What auspicious sign do you see in my body that you are stricken with passion on my account that you have caught hold of my hand to enjoy me? Why have you gotten your own Dharma? Thus saying, Matsyagandhā thought within herself :-- “Alas! This Brāhmiṇ has certainly lost his brains in order to enjoy me; certainly he will be drowned just now in his attempt to enjoy me in this boat; his mind is so much agitated with the arrows of Cupid that no body, it seems, can act against his will.” Thus thinking Matsyagandhā spoke again to the Muni :-- “O highly fortunate one! Hold patience! let me first take you to the other side of the river; then you may do as you please.” हे मत्स्यगंधेचे समजुतीचे चार शब्द ऐकुन पराशर तिचा हात सोडत थोडा वेळ स्वस्थ बसतो. पण थोडाच वेळाने पराशर पुन्हा कामविव्हल होऊन उठतो व मत्स्यगंधेचा हात पुन्हा धरतो. यावर मत्स्यगंधा त्याला विंनंती करते मुनिवर थांबा कृपया रात्रीचा काळोख होइपर्यंत तरी थांबा. सर्वजण आपल्याकडे बघत आहेत माझे वडील ही किनार्य़ावरुन आपल्याला पाहत आहेत या सर्वासमोर तरी असे रानटी कृत्य करु नका जे मला अजिबात सहन होणार नाही. वडिलधारे ज्ञानी लोकांनी दिवसा ढवळ्या संभोग करण्याला पाप म्हटलेले आहे. रात्र हीच संभोगासाठीची योग्य वेळ आहे. शिवाय इतक्या लोकांच्या नजरेसमोर संभोग करणे ? तुमच्या वासनेला आवर घाला किमान काही काळासाठी तरी आवर घाला " 20-34. Then the auspicious Satyavatī addressed Parāśara Muni, resolved to enjoy her, thus :-- “O Muni! Behold! all are looking at us; my father too, is there on the bank of the Yamunā; so, O Muni! wait till night this beastly act before all is highly unsatisfactory to me. The wise persons declare it a great sin to commit sexual intercourse during day they have ordained night time as the best time of intercourse for men not the day time; the more so that many person’s eyes are in this direction. So, O intelligent one! hold on your passion for a while; for the blame pronounced by the public is horrible.” Hearing these reasonable words, the liberal minded Parāśara created, by his influence of Tapasyā, a dense fog so that both the banks of the Yamunā became covered with darkness. एका मुलीला जिला आयुष्यात अगोदर कधीही पाहीलेले नाही, जिच्याशी कुठल्याही प्रकारचे प्रेमसंबंध प्रस्थापित झालेले नाही, जिच्या शरीराला माशाचा वास येत असुनही , ज्या मुलीने वारंवार पराशराला त्याच्या कुलाची तपस्येची धर्माची आठवण करुन देऊनही, जो स्वत:च्या कामवासनेला आवरु शकत नाही. ज्याचा संयम नाव पलीकडच्या किनार्याला लागेपर्यंतही टिकु शकत नाही, जो सरळ हात धरुन संभोगासाठी आतुर होतो, जो दिवसा ढवळ्या मुलीचे वडील व इतर लोक पाहत आहेत याचेही भान कामाच्या आवेगात विसरतो, जो काहीही करुन एका अनोळख्या मुलीला पाहताक्षणीच संभोगाला इतका जबर आतुर झालेला आहे तो पराशर हा भोगलोलुप नव्हता असे तुम्ही म्हणता तेव्हा त्या विधानाला काही अर्थ तरी असतो का ? पराशराने फ़क्त शय्यासोबत केली होती असे तुम्ही म्हणता तेव्हा भोगलोलुप नव्हता तर पराशर काय होता नेमका ? पराशरा इतका डेस्परेट कामावेगात वाहत जाणारा आपल्या कुल तपस्ये इ. ची आठवण करुन देऊनही न बधणारा धड किनारा येइपर्यंतही संयम न बाळगु शकणारा भोगलोलुप नाही तर काय संयमाचा पुतळा होता असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय ? व असे करुन तुमच्याच म्हणण्याप्रमाणे या द्विजाने गवत खाल्ले की नाही ? व मनुच्या म्हणण्याप्रमाणे मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥ तसा हा पराशर शुद्रत्वास पोहोचला का ?

In reply to by मारवा

संदर्भ तपासुन पाहण्यासाठी मुळ संस्कृत ग्रंथ इथे मिळु शकतो https://archive.org/details/SrimadDeviBhagavatamSanskrit मुळ संस्कृत श्लोकांच्या इंग्रजी भाषांतरासाठी https://www.wisdomlib.org/hinduism/book/devi-bhagavata-purana/d/doc5712… आणखी संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Satyavati

In reply to by मारवा

मारवा, तुमचा प्रश्न अगदी समर्पक आहे.
पराशराने फ़क्त शय्यासोबत केली होती असे तुम्ही म्हणता तेव्हा भोगलोलुप नव्हता तर पराशर काय होता नेमका ?
मूळ महाभारतात थोडा वेगळा प्रसंग आहे. इतरेजन बघताहेत हे पाहून पराशर ऋषींनी योगसामर्थ्याने धुके व अंधार निर्मिला. माझ्या आकलनाप्रमाणे पराशर ऋषींचा बीजसंयोग मुहूर्त टळून चालला होता. म्हणून त्यांना घाई झाली होती. ही घाई अन्यांना कामविव्हलता वाटली. पुढे व्यासांचा जन्म झाला यातून पराशर ऋषींचं रेत उच्च योग्यतेचं असल्याचं दिसतं. असा ऋषी वाट्टेल त्या स्त्रीकडे रतिदान मागणार नाही. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माझ्या आकलनाप्रमाणे पराशर ऋषींचा बीजसंयोग मुहूर्त टळून चालला होता. म्हणून त्यांना घाई झाली होती. ही घाई अन्यांना कामविव्हलता वाटली. गामाजी आपले एक एक प्रतिसाद जस जसे वाचत गेलो मला हा शेर आठवला सरकती जाये है रुख से नक़ाब आहिस्ता आहिस्ता

In reply to by मारवा

मारवा, जर व्यासांसारख्या विद्वानाची उत्पत्ती होणार असेल तर रुखावरून नकाब सरको वा न सरको. काही फरक पडंत नाही. आ.न., -गा.पै.