श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?"
" दत्त मंदिरात जात आहे."
" पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे."
" अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! "
" गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?"
" अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले.
" गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो.
मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले,
" असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?"
" शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला.
" शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते.
" वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !"
ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता."
" रागावू नका. मी सत्य तेच सांगितले."
" आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले.
सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो.
हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे.
पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते.
समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते.
मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ?
या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात.
देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते.
यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ?
यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही.
पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो.
"आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे."
हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
****************************************************************
वर्गीकरण
वाचने
90500
प्रतिक्रिया
285
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावधान टोळधाड येत आहे .....
जो माणूस दुसर्या विचारसरणीला
In reply to सावधान टोळधाड येत आहे ..... by पगला गजोधर
स्वत:च्या बुद्धीने विचार करून
प्रत्येक मनुष्याच्या ठायी
In reply to स्वत:च्या बुद्धीने विचार करून by एस
ही गृहितके माझ्या प्रतिसादात
In reply to प्रत्येक मनुष्याच्या ठायी by arunjoshi123
ही गृहितके माझ्या प्रतिसादात
In reply to ही गृहितके माझ्या प्रतिसादात by एस
येथे तर्कबुद्धी आणि
In reply to ही गृहितके माझ्या प्रतिसादात by arunjoshi123
स्वत:च्या बुद्धीने विचार करून
स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. मी स्वबुद्धीचा आधार घेतलेला आहे. परमेश्वराचे अस्तित्व हे माझ्या अनुभवानुसार, माझ्या कॉमनसेन्सचा वापर करून आणि माझ्या बुद्धीने विचार करून मला पूर्णपणे पटले आहे आणि त्यामुळे मी तेच खरे मानतो. ते नाकारणे ही माझ्या अनुभवांशी, कॉमनसेन्सशी व स्वबुद्धीशी प्रतारणा ठरेल. यातच माझ्या माणुसपणाचा सन्मान आहे.लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक
+1
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
मूर्तीमध्ये प्राण नसेल कदाचित
In reply to +1 by सुबोध खरे
अहो पण.....
In reply to मूर्तीमध्ये प्राण नसेल कदाचित by श्रीगुरुजी
अहो पण जे देव प्रत्यक्ष
In reply to अहो पण..... by सतिश म्हेत्रे
पण...
In reply to मूर्तीमध्ये प्राण नसेल कदाचित by श्रीगुरुजी
मूर्तीला नमस्कार करा म्हणजेच
In reply to पण... by mayu4u
नमस्काराचा आग्रह
In reply to पण... by mayu4u
शत प्रतिशत सहमत!!!
In reply to +1 by सुबोध खरे
पण मी एक गोष्ट कटाक्षाने
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
अगदी बरोबर!
In reply to पण मी एक गोष्ट कटाक्षाने by उगा काहितरीच
माझी भूमिका
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
तुमची भूमिका योग्यच आहे असं
In reply to माझी भूमिका by यनावाला
ते निघून गेले आहेत. ते परत
In reply to तुमची भूमिका योग्यच आहे असं by arunjoshi123
चुकून ...यद्गत्वा न
In reply to ते निघून गेले आहेत. ते परत by श्रीगुरुजी
तसे केल्याने माझ्या अंगाला
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
सहमत...
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
माणुसकी म्हणजे काय व इतर टिपण्या
सफरचंद आणि संत्र्यांची तुलना...
In reply to माणुसकी म्हणजे काय व इतर टिपण्या by गामा पैलवान
विज्ञानाचे विषय आणि वैज्ञानिक दृष्टीकोन...
In reply to माणुसकी म्हणजे काय व इतर टिपण्या by गामा पैलवान
यनावालांचे गुणधर्म
" अन्य दिवसांच्या तुलनेत
"जाणार्यासी पुसों नये ’कोठे
" वा ! अगदी अचूक ! अन्य
मी सत्य तेच सांगितले.
अभिजीत अवलिया, आ.न. गामा
"कुठे जात आहात?" असा थेट
"कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते."कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न फक्त श्रद्धाळूंनाच नव्हे, तर इतर कोणासही केव्हाही विचारू नये. अशा चांभारचौकश्या करणाऱ्यांना 'भोचक' असे विशेषण आहे. समर्थांनी अत्यंत व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत (उदा. सांगे बापाची कीर्ति तो येक मूर्ख किंवा क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे). ही त्यातलीच एक. हा एक साधा व्यावहारिक शिष्टाचार आहे. त्याच्याशी अध्यात्माचा किंवा श्रद्धेचा ओढूनताणून संबंध लावणे हा खोडसाळपणा आहे.दासबोधाचा विषय निघाला म्हणून...
In reply to "कुठे जात आहात?" असा थेट by श्रीगुरुजी
श्रद्धाळूनी वरील वाक्ये आहे
In reply to दासबोधाचा विषय निघाला म्हणून... by Duishen
विषय काढला म्हणून...
In reply to श्रद्धाळूनी वरील वाक्ये आहे by arunjoshi123
'मी नास्तिक आहे व तार्किक
आपण नास्तिक आहात ठीक आहे
त्यांनी फक्त त्यांचे मत
In reply to आपण नास्तिक आहात ठीक आहे by Ranapratap
कधीही या
In reply to त्यांनी फक्त त्यांचे मत by सतिश गावडे
"गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील
लेखक साहेब असं कधी कुणा
ह्याचसाठी केला होता अट्टाहास!
In reply to लेखक साहेब असं कधी कुणा by अमरेंद्र बाहुबली
१०० गणवेशातील मुलांपैकी
याला म्हणतात इन काइंड रिटर्न
In reply to १०० गणवेशातील मुलांपैकी by नेत्रेश
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले.स्वतःचा मुद्दा मांडण्यासाठी लेखकाने ओढूनताणून एक काल्पनिक प्रसंग व कथा रचलेली दिसते.लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे नक्की काय हे लेखकाला समजले आहे का याविषयी शंका आहे. कोणतीही गोष्ट/दावा विज्ञानाच्या सहाय्याने तपासून नंतरच ते सत्य आहे का असत्य हे ठरविणे याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे स्वतः प्रयोग करून स्वतः अनुभव घेतल्यानंतर निष्कर्ष काढणे हाच वैज्ञानिक दृष्टीकोन. परमेश्वर नावाचे काहीतरी अस्तित्वात आहे किंवा नाही हे प्रयोग केल्याशिवाय किंवा स्वतः शोध घेऊन स्वानुभव घेतल्याशिवाय कसे ठरविता येईल? परमेश्वर नावाची कल्पना माझ्या मनाला पटत नाही म्हणून तो अस्तित्वातच नाही व या कल्पनेवर विश्वास ठेवणारे निर्बुद्ध असा अंधअविश्वास बाळगणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. हा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक दृष्टीकोन आहे. आपण सर्वचजण रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात अंधश्रद्धाळूच असतो. उदाहरणार्थ आपण ज्यांना आपले आईवडील मानतो ते केवळ श्रद्धेपोटीच. किती व्यक्ती प्रयोगशाळेत जाऊन ज्यांना आपण आपले आईवडील मानतो तेच आपले खरे जैविक जन्मदाते आहेत याची चाचणी करून घेतात? तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले सुद्धा अशी चाचणी करून घेत असल्याचे ऐकिवात नाही. कोणी म्हणेल की गुणसूत्रांची चाचणी करून आपण आपल्या जन्यदात्यांविषयी खात्री करून घेऊ शकतो. हा दावा बरोबर वाटतो. परंतु गुणसूत्रांची चाचणी बरोबर आहे व ती चाचणी अगदी अचूकपणे जन्यदात्यांची खात्री करून देते यावर आपण स्वतः त्या चाचणीचा अभ्यास न करता डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा नाही का? आणि समजा ती चाचणी खरी असली तरी आजतगायत किती जणांनी आपण ज्यांना आईवडील मानतो त्यांच्या व आपल्या गुणसूत्रांची चाचणी करून हेच आपले जन्मदाते याची वैज्ञानिकदृष्ट्या खात्री करून घेतली आहे? रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात आपण डोळे झाकूनच दुसर्यांवर विश्वास ठेवत असतो व त्या गोष्टी आधी सिद्ध करा असे आव्हान देत नाही. परंतु परमेश्वर असा काही उल्लेख झाला की लगेच देव आहे हे सिद्ध करून दाखवा अशी मागणी सुरू होते. भारतीय समाजात काही ठाम स्वरूपाचे शिक्के ठरलेले आहेत. गणेशोत्सव साजरा करणे, सत्यनारायण पूजा इ. = अंधश्रद्धा मोहर्रम, ईद, ईस्टर इ. = घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य जत्रेत बळी = अंधश्रद्धा बकरी मारणे = कुर्बानी देशद्रोही घोषणा = अभिव्यक्ती स्वातंत्र्य वंदेमातरम् = बळजबरीने लादलेला राष्ट्रवाद देशद्रोही घोषणांना विरोध = अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळणे वंदेमातरमला विरोध = अल्पसंख्याकांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य हिंदूंच्या बाजूने बोलणे = जातीयवाद हिंदूंच्या विरूद्ध बोलणे = धर्मनिरपेक्षता मांसाहार करणे = पुरोगामी शाकाहारी असणे = प्रतिगामी हुसेनने काढलेली चित्रे = कलंदर कलावंताच्या कलेचा उस्फूर्त आणि अमूर्त आविष्कार चार्ली हेब्दोमध्ये प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे = मुस्लिमांना डिवचण्यासाठी केलेला खोडसाळपणा हुसेनच्या चित्रांना विरोध = फॅसिस्टांची सांस्कृतिक दडपशाही चार्ली हेब्दोमधील व्यंगचित्रांना विरोध = डिवचलेल्या समाजाची उस्फूर्त व स्वाभाविक प्रतिक्रिया १९८४ मधील दंगली = इंदिरा गांधींच्या हत्येमुळे आलेली जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया २००२ मधील दंगली = पूर्वनियोजित वांशिक हत्याकांड अगदी तसेच "आस्तिक" आणि "नास्तिक" असे दोन शिक्के ठरलेले आहेत. आस्तिक = अज्ञानी, स्वतःच्या बुद्धीने विचार न करणारा, कॉमनसेन्स न वापरणारा, शब्दप्रामाण्य/ग्रंथप्रामाण्य इ. मानणारा, प्रतिगामी इ. दुर्गुणांची खाण नास्तिक = वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा, बुद्धीप्रामाण्य मानणारा, स्वतःच्या बुद्धीने विचार करणारा, कॉमनसेन्स वापरणारा, ज्ञानवंत, पुरोगामी इ. गुणविशेषणांनी नटलेला समजा परमेश्वर नावाचे काही अस्तित्वातच नसेल तर निदान आस्तिकांना काही काळाने का होईना पण हे लक्षात येऊ शकते आणि त्यामागे त्यांचा स्वानुभव असेल कारण त्यांनी त्या मार्गाने स्वतः जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंत परमेश्वर नावाचे काही अस्तित्वात आहे किंवा नाही हे नास्तिकांना कधीही समजणार नाही कारण तसे काही अस्तित्वातच नाही असा त्यांचा ठाम अंधअविश्वास आहे व हा अंधअविश्वास स्वतः कोणतेही प्रयोग न करता, स्वतः शोध न घेता किंवा स्वतः वैज्ञानिक मार्गाने प्रयत्न करून परमेश्वर या कल्पनेचे अस्तित्व खोडून न काढता सुद्धा मनात ठाम रूजलेला आहे. अशा लोकांनी आपल्याला बुद्धीवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन इ. असलेले समजणे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे.आयला या शेवटच्या वाक्यासाठी
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
भारतीय समाजात काही ठाम
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
+++१
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
गुरुजींशी सहमत
In reply to +++१ by यश राज
गुर्जींना दंडवत. शेवटच्या
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
आपण सर्वचजण रोजच्या जीवनातील
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
+1
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
नास्तिकांचा अंधविश्वास...
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
(खूप कमी जणांचा)
In reply to नास्तिकांचा अंधविश्वास... by Duishen
निर्णय घेतांना आणि त्यानुरूप वागतांना ...
In reply to (खूप कमी जणांचा) by arunjoshi123
लहानपण
In reply to नास्तिकांचा अंधविश्वास... by Duishen
प्रामाणिकपणे सांगायचं तर माझी विचार करायची शक्ती लहानपणीच होती*.
In reply to लहानपण by arunjoshi123
प्रतिसाद आवडला
In reply to नास्तिकांचा अंधविश्वास... by Duishen
श्रीगुरुजी साहेबांच्या
+१११
In reply to श्रीगुरुजी साहेबांच्या by बोलघेवडा
प्रा. यनावाला , तुम्ही
खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही
. मुस्लीम दर शुक्रवारी ऑफिसात
In reply to खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही by जेडी
नास्तिकांपेका अस्तिक
In reply to खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही by जेडी
नास्तिकांनी आजपर्यंत काही
In reply to नास्तिकांपेका अस्तिक by arunjoshi123
सुरुवात
In reply to नास्तिकांनी आजपर्यंत काही by प्रकाश घाटपांडे
तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण
In reply to नास्तिकांपेका अस्तिक by arunjoshi123
<<<पत्रिकेच्या मुद्द्यावर पण
In reply to तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण by जेडी
हाहाहा...
In reply to <<<पत्रिकेच्या मुद्द्यावर पण by विशुमित
हिंदु धर्म स्त्रियांना
In reply to तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण by जेडी
पुरुषांना सोशिकता गरजेची नसते का?
In reply to हिंदु धर्म स्त्रियांना by arunjoshi123
फक्त बायकांनीच सोशिकता शिकावी
In reply to पुरुषांना सोशिकता गरजेची नसते का? by जेडी
आमच्या हजारो वर्षे जुन्या
In reply to तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण by जेडी
नास्तिकांपेका अस्तिक नास्तिकांना खुप छळतात.
In reply to खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही by जेडी
नास्तिकांचा मुद्दा समजून
In reply to नास्तिकांपेका अस्तिक नास्तिकांना खुप छळतात. by Duishen
मुद्दा लेखकाने लेखात लिहिलेला
In reply to नास्तिकांचा मुद्दा समजून by arunjoshi123
यनावाला यांचा प्रयत्न असा
अशा " आस्तिकांबद्दल " जाने भी
In reply to यनावाला यांचा प्रयत्न असा by जयन्त बा शिम्पि
जाने भी दो यारो वरुन
In reply to अशा " आस्तिकांबद्दल " जाने भी by arunjoshi123
ते कविचे नाव वाचून "गँग्स ऑफ
In reply to जाने भी दो यारो वरुन by मारवा
यनावालाजी पण...
समजा एखाद्या मुलाला
In reply to यनावालाजी पण... by मारवा
अहो मोठा स्कोप आहे ना
In reply to समजा एखाद्या मुलाला by arunjoshi123
मारावाजी प्रतिसाद आवडला.
In reply to अहो मोठा स्कोप आहे ना by मारवा
सर्वात महत्वाचे तो ईश्वर
In reply to अहो मोठा स्कोप आहे ना by मारवा
काही विषय न चर्चिलेलेच बरे..
आपण उत्तरोत्तर शहाणे बनण्याची
In reply to काही विषय न चर्चिलेलेच बरे.. by चौकटराजा
जो आपल्या विचारांचा नाही तो
In reply to काही विषय न चर्चिलेलेच बरे.. by चौकटराजा
फायदा
हा हा तिमा साहेब,
In reply to फायदा by तिमा
आपण जो दावा केला आहे त्यामागे
In reply to हा हा तिमा साहेब, by चौकटराजा
१०० टक्के दावा नाही .. यासाठी तर.....
In reply to आपण जो दावा केला आहे त्यामागे by श्रीगुरुजी
माझ्या पुरती माझी खात्री आहेच
In reply to १०० टक्के दावा नाही .. यासाठी तर..... by चौकटराजा
माझ्या पुरती माझी खात्री आहे म्हणजे
In reply to माझ्या पुरती माझी खात्री आहेच by arunjoshi123
आपण एक अस्तिक आहात.
In reply to माझ्या पुरती माझी खात्री आहे म्हणजे by चौकटराजा
आणखी एक ..
In reply to माझ्या पुरती माझी खात्री आहे म्हणजे by चौकटराजा
आज गुरूत्व लहरीचे काल्पनिक
In reply to आणखी एक .. by चौकटराजा
२०१७ चे भौतिक शास्त्राचे नोबेल
In reply to आज गुरूत्व लहरीचे काल्पनिक by arunjoshi123
धन्यवाद
In reply to २०१७ चे भौतिक शास्त्राचे नोबेल by चौकटराजा
फिल्म पाहिली.
In reply to धन्यवाद by arunjoshi123
ग्रॅवीटी वेवचं डिटेक्शन ही
In reply to फिल्म पाहिली. by चौकटराजा
१०० टक्के चिकित्सक वा १००
In reply to फिल्म पाहिली. by चौकटराजा
विज्ञान हे चूक मान्य करते व
In reply to फिल्म पाहिली. by चौकटराजा
अगदी अगदी!
In reply to विज्ञान हे चूक मान्य करते व by arunjoshi123
हे आवडलं
In reply to अगदी अगदी! by शब्दबम्बाळ
म्हणजे वाट्टेल ते फेकता अगदी!
In reply to अगदी अगदी! by शब्दबम्बाळ
उद्या मला देव दाखवण्याचं
In reply to म्हणजे वाट्टेल ते फेकता अगदी! by arunjoshi123
उद्या मला देव दाखवण्याचं
In reply to उद्या मला देव दाखवण्याचं by शब्दबम्बाळ
सत्याला अंतिम स्वरुप नसतं हा
In reply to उद्या मला देव दाखवण्याचं by arunjoshi123
उत्तम! आणि सहमत!!!
In reply to अगदी अगदी! by शब्दबम्बाळ
तुमच्या लॉजिकमधेच खोट आहे.
In reply to हा हा तिमा साहेब, by चौकटराजा
तुमच्या म्हणाण्याप्रमाणे
In reply to हा हा तिमा साहेब, by चौकटराजा
आस्तिकांना कधीही उपदेश करायला
In reply to फायदा by तिमा
काय मग शेवटी आपल्याला कोण
इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला
In reply to काय मग शेवटी आपल्याला कोण by प्रकाश घाटपांडे
काय मग शेवटी आपल्याला कोण व्हायचयं? अस्तिक नास्तिक की अज्ञेयवादी?मी आस्तिक आहे आणि मला आस्तिकच रहायचं आहे. जे नास्तिक आहेत त्यांना मी तुम्ही आस्तिक व्हा असे शहाजोगपणे सांगायला जात नाही किंवा त्यांच्या बुद्धीची हेटाळणी करीत नाही. तुम्ही नास्तिक असलात तरी हरकत नाही. तुमच्यावर आस्तिक होण्याची बळजबरी नाही. परंतु आस्तिकांच्या विश्वासाला अंधश्रद्धा, असत्य विधाने, कॉमनसेन्स न वापरणारे, स्वतःची बुद्धी न वापरणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन नसणारे असे शब्द वापरून स्वतःच्या आस्तिकतेची प्रौढी मिरवू नका किंवा त्यांना तुम्ही आमच्यासारखे नास्तिक व्हा असे न मागता सल्लेही देऊ नका, कारण स्वतःला नास्तिक म्हणविणारे आस्तिकांपेक्षाही जास्त अंधश्रद्ध, जास्त अवैज्ञानिक दृष्टीकोन असलेले व कॉमनसेन्स न वापरणारे असतात.+१
In reply to इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला by श्रीगुरुजी
सरसकटीकरण
In reply to इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला by श्रीगुरुजी
एका प्रतिसादातील दोन वाक्य! :D
In reply to इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला by श्रीगुरुजी
यनावालाजी क्रिएटीव्हीटीचे महत्व आहे
यनावालाजी क्रिएटीव्हीटीचे महत्व आहे
सेव्हन हॅबिटस मध्ये मॉर्मन
In reply to यनावालाजी क्रिएटीव्हीटीचे महत्व आहे by मारवा
वैज्ञानिक विचारसरणीने जगत
In reply to यनावालाजी क्रिएटीव्हीटीचे महत्व आहे by मारवा
इथे आणखीन एक मुद्दा मांडू
मोदींच्या
'मार्क्स'वाद कालबाह्य
In reply to मोदींच्या by धर्मराजमुटके
मधल्या काळात पूर्णपणे
In reply to मोदींच्या by धर्मराजमुटके
आता प्रतिसादामधे आस्तिक लोक
सिरिअसली?! तुम्ही विनोद करत असाल अशी आशा आहे!
In reply to आता प्रतिसादामधे आस्तिक लोक by palambar
यावरून तो निष्कर्ष काढतो:
In reply to सिरिअसली?! तुम्ही विनोद करत असाल अशी आशा आहे! by शब्दबम्बाळ
एका स्वर्गीय आयडी ची आठवण झाली
ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी
पिरा ताई..
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
+++११११ पर्फेक्ट पिराताई..
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
सहमतीच्या टाळ्या !
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
सहमतीच्या टाळ्या2 !
In reply to सहमतीच्या टाळ्या ! by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to सहमतीच्या टाळ्या ! by डॉ सुहास म्हात्रे
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.+१ आपल्याला हिंदू समाजाला सुधारायचा ठेका मिळालेला आहे अशी नास्तिकांची गाढ श्रद्धा असते. परंतु समाजाला सुधारण्यासाठी भारतीयांच्या अत्यंत गंभीर व समाजघातक अंधश्रद्धांवर (उदा. सणाला दिले जाणारे प्राणीबळी, स्त्रियांची कौमार्यपरीक्षा इ.) बोलण्याऐवजी सत्यनारायण पूजा, उपासतापास असल्या निरूपद्रवी गोष्टींना लक्ष्य करून आपण बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकवादी, विचारवंत वगैरे आहोत हे मिरविण्यातच आणि नास्तिकांना टोमणे मारण्यातच यांचे आयुष्य जाते. वास्तविक पाहता या निरूपद्रवी गोष्टींनी समाजाचे काहीही नुकसान होत नसते. या लेखातील सुरवातीला वर्णन केलेल्या काल्पनिक प्रसंगातील देवतत्व वगैरेचा उल्लेख हा त्याचाच भाग आहे. या काल्पनिक प्रसंगातील गृहस्थांनी गुरूपौर्णिमेला मूर्तीतील देवतत्व वाढते अशी श्रद्धा ठेवली असेल तर त्यात लेखकाचे काय चार चव्वल गेले का? या श्रद्धेने लेखकाचे किंवा समाजाचे काही नुकसान झाले आहे का? अशी श्रद्धा बाळगल्याने कोणावर अन्याय झाला आहे का? असे काही नसताना सुद्धा विनाकारण त्यावर टीकेचे आसूड झोडून त्यावर "श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. " असली मल्लीनाथी करणे हीच यांची वैज्ञानिक दृष्टी आहे. ज्यांना अशी श्रद्धा बाळगायची आहे त्यांनी ती बाळगू देत की, पण त्यात तुमचं काय गेलं? सणाला नवस किंवा कुर्बानी नावाखाली क्रूरपणे केलेली प्राण्यांची हत्या, लहान मुलींची धार्मिक कारणावरून केलेली सुंता असल्या धार्मिक अंधश्रद्धा समाजासाठी अत्यंत घातक आहेत. मात्र याबाबतीत बोलायला यांची दातखिळ बसलेली असते. अगदी तोंडात उलथने घालून सुद्धा या भंपकांची त्यावेळी दातखिळ उचकटत नाही. खरं सांगायचं तर आपण विज्ञानवादी आहोत, बुद्धीप्रामाण्यवादी आहोत हा यांना भ्रम झालेला आहे व यांच्या मेंदूतील या केमिकल लोच्यामुळेच यांची बुद्धी कुंठित झालेली असून विचारशक्ती बधिर झालेली आहे.श्रीगुरुजी आपला मुद्दा
In reply to लेख लिहून बोलायचं असेलच तर मी by श्रीगुरुजी
पीरा , मला तू , तुझे लिखाण
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
सहमत आहे
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
अत्यंत उत्कृष्ट व संतुलित
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो.या वाक्यांना पुष्टी देणारी अनेक वाक्ये या लेखात आहेत. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. लेखातील वरील वाक्यातून लेखक असे दाखवून देत आहे की श्रद्धावान निर्बुद्ध आहेत, त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे, त्यांची विचारशक्ती बधीर झाली आहे, ते तर्कबुद्धीने विचार करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धा हास्यास्पद आहेत इ. इ. आणि मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करतो, मी बुद्धीप्रामाण्यवादी, तुम्हाला सुधारायची जबाबदारी माझ्यावर आहे इ. इ. आपण काहीतरी महान कृत्य करीत आहोत असा आव आणून एक काल्पनिक कथा रचून लेखकाने लेख टाकून श्रद्धावाल्यांची हेटाळणी केली. परंतु काही थोडे अपवाद वगळता इतर सर्वांनी लेखाची व लेखकाची पिसे काढल्यानंतर लेखकाने कोणतेही स्पष्टीकरण न देता धाग्यावरून काढता पाय घेतला आहे.श्रद्धावान निर्बुद्ध आहेत,
In reply to अत्यंत उत्कृष्ट व संतुलित by श्रीगुरुजी
प्रतिसाद आवडला.
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
एका वाक्यातून इतके (विपरीत)
In reply to लेख लिहून बोलायचं असेलच तर मी by arunjoshi123
एका वाक्यातून इतके (विपरीत)
In reply to एका वाक्यातून इतके (विपरीत) by पिलीयन रायडर