श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
In reply to सावधान टोळधाड येत आहे ..... by पगला गजोधर
स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.या परिच्छेदात लेखाचे सार आहे.
In reply to स्वत:च्या बुद्धीने विचार करून by एस
In reply to प्रत्येक मनुष्याच्या ठायी by arunjoshi123
In reply to ही गृहितके माझ्या प्रतिसादात by एस
ही गृहितके माझ्या प्रतिसादात आपण कोठून शोधून काढलीत हे माहीत नाही.लेखाचं सार काय असायला हवं हे सांगतं. पण नुसती बुद्धी आणि तर्क असून चालत नाही. एक पूर्ण मॉडेल असण्यासाठी विवेक, निर्णय प्रक्रिया आणि राबवण्याची यंत्रणा इ देखिल आवश्यक आहे हे लॉजिकल आहे.
तुम्ही मग कोणत्या गृहितकांवर जगाची मांडणी करणार आहात?बुद्धी आणि तर्काच्या अभावी वा कमी जास्त पणाने देखिल ईश्वरदत्त मानवी मूल्यांच्या आधारे जग उत्तम चालतं. त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गोंधळ जितका कमी तितकं ते उत्तम चालेल.
In reply to ही गृहितके माझ्या प्रतिसादात by arunjoshi123
स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. मी स्वबुद्धीचा आधार घेतलेला आहे. परमेश्वराचे अस्तित्व हे माझ्या अनुभवानुसार, माझ्या कॉमनसेन्सचा वापर करून आणि माझ्या बुद्धीने विचार करून मला पूर्णपणे पटले आहे आणि त्यामुळे मी तेच खरे मानतो. ते नाकारणे ही माझ्या अनुभवांशी, कॉमनसेन्सशी व स्वबुद्धीशी प्रतारणा ठरेल. यातच माझ्या माणुसपणाचा सन्मान आहे.
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
In reply to +1 by सुबोध खरे
In reply to मूर्तीमध्ये प्राण नसेल कदाचित by श्रीगुरुजी
In reply to अहो पण..... by सतिश म्हेत्रे
अहो पण जे देव प्रत्यक्ष पृथ्वीवर अवतरले नाहीत. त्यांच्या मूर्तीप्रती अशा भावना असू कशा शकतात.पृथ्वी कूठून अवतरली याचा विचार करताना कदाचित भावना जागृत होत असतील.
In reply to मूर्तीमध्ये प्राण नसेल कदाचित by श्रीगुरुजी
चित्राप्रती एखाद्याच्या भावना जशा असतात, तशाच भावना एखाद्या श्रद्धाळूच्या देवाच्या मूर्तीप्रती असतात.जसं चित्रावर थुंकत नाही तसं मूर्तीवर पण नाही. म्हणजे अपमान करत नाही. पण मग मनाविरुद्ध त्या मूर्तीला नमस्कार करा असा आग्रह कशाला? केवळ यजमानांचं मन जपावं म्हणून? याच न्यायाने, माझं मन जपावं म्हणून ते मला नमस्कार करायचा आग्रह न करतील, तर ते अधिक बरे नव्हे का? (प्रतिसाद कुणालाही उद्देशून नाही. कृपया वैयक्तिक घेऊ नये.)
In reply to पण... by mayu4u
In reply to पण... by mayu4u
पण मग मनाविरुद्ध त्या मूर्तीला नमस्कार करा असा आग्रह कशाला? केवळ यजमानांचं मन जपावं म्हणून? याच न्यायाने, माझं मन जपावं म्हणून ते मला नमस्कार करायचा आग्रह न करतील, तर ते अधिक बरे नव्हे का?माझ्या मते आपल्या देशात वंदे मातरम चा देखिल मनाविरुद्ध आग्रह होत नाही. त्यामुळं नमस्काराचा आग्रह बलप्रयोग मानता येत नाही. यजमानाला वाटतं देवानं तुम्हाला पण आशिर्वाद द्यावा म्हणून तो तुम्हाला भलं करून घ्यायचा आग्रह करत असतो. शिवाजीने औरंगजेबासमोर मान तुकवावीच अशी मानसिकता यजमानाची नसते, तो नास्तिकाचा वहम असतो. ================================ आणि ईश्वर नाही, त्याचा आशिर्वाद व्यर्थ आहे हे तुम्ही एकट्यानं, सवत्यानं ठरवलेलं मत असतं. यजमान आणि तुम्ही यांच्यामधे एक लवाद स्थापन होऊन दिलेला निर्णय (देव नसल्याचा) यजमान ठुकरावत आहे असं नसतं. तेव्हा इथे आग्रह होणं स्वाभाविक आहे. तुमची भूमिका चूक असू शकते ही शक्यता तुम्ही १००% नाकारताय, हे टाळणं बरं नव्हे का?
In reply to +1 by सुबोध खरे
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
पण मी एक गोष्ट कटाक्षाने पाळतो ती म्हणजे आस्तिक लोकांच्या श्रद्धेची चेष्टा करत नाही (तुम्ही करताय असे म्हणत नाही). आस्तिकांनी नास्तिकांना आस्तिक बनवण्याचा किंवा नास्तिकांनी आस्तिकांना नास्तिक बनवण्याचा प्रयत्न करू नये असे मला वाटते. जेव्हा असा प्रयत्न केला जातो तेव्हा विनाकारण वाद निर्माण होतात. त्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या मर्जीनुसार आस्तिक, नास्तिक काय व्ह्यायचे असेल ते व्हावे. गरजेनुसार शक्य असल्यास थोडीफार लवचिकता पण दाखवावी. म्हणजे मी नास्तिक आहे पण कुणाच्या घरी पूजेला किंवा गणपतीला बोलावले तर तिथे मांडलेल्या पूजेला, मूर्तीला नमस्कार करायला मला कमीपणा वाटत नाही. तसे केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत पण यजमानाला तर बरे वाटते ना? म्हणून मग करतो नमस्कार.यातील प्रत्येक शब्दांशी सहमत ! कुणावरही काही थोपवने हेच मुळात चूक आहे. आस्तीकपणाचा असो वा नास्तीकपणाचा , अट्टाहास नकोच. बरं जसं लोक "देव आहे" हे १००% सिद्ध करू शकत नाहीत तसं "देव नाही" हे पण तर सिद्ध करता येत नाही. आजच्या वैज्ञानिक ज्ञानाला सोडवताच येणार नाहीत असे असंख्य प्रश्न आहेत .बीजगणित , भुमिती, रसायनशास्त्र ,भौतिकशास्त्र यामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या की पुराव्याने सिद्ध करताच येत नाहीत तरीही "मानाव्या" लागतात. ते चालतं तर मग देव आहे हे मानायला का नको ? असो ! शेवटी आपापली इच्छा !!!
In reply to पण मी एक गोष्ट कटाक्षाने by उगा काहितरीच
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
In reply to माझी भूमिका by यनावाला
In reply to तुमची भूमिका योग्यच आहे असं by arunjoshi123
In reply to ते निघून गेले आहेत. ते परत by श्रीगुरुजी
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
तसे केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत पण यजमानाला तर बरे वाटते ना? म्हणून मग करतो नमस्कार.ज्या माणसाच्या विवेकाला, साज्जन्याला स्रोत लागत नाही त्याच्या नास्तिकपणाबद्दल अस्तिकांनी देखिल असहिष्णूता दाखवू नये. एक सहिष्णू अस्तिक म्हणून मी देखिल तुम्हाला बरं वाटावं म्हणून देवदेव टाळेन असं म्हणणारे अस्तिक देखिल हवेत.
In reply to लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक by अभिजीत अवलिया
खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत.विद्युत्पुंज (=इलेकट्रॉन) विषयी केलेलं कुठलंही विधान असत्यच असतं. तरीपण इलेक्ट्रॉनचा प्रत्यय येतोच ना? मग ईश्वरीतत्त्वाने काय घोडं मारलंय? त्यामुळे अमुक एका दिवशी तमुक देवतेचं तत्त्व जास्त प्रमाणावर असतं, हा विश्वासाचा भाग मानायला हरकत नसावी. २.
याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते.विद्युत्पुंजाच्याही (=इलेक्ट्रॉन) सगळ्या उपाध्या मोजता येत नाहीत. त्याचं वस्तुमान स्थिरवस्तुमान (= rest mass) म्हणून मोजलं जातं. पण व्यवहारांत विद्युत्पुंज स्थिर कधीच नसतो. समजा तो रजनीकांतने स्थिर केला असं मानूया. आता विद्युत्पुंज स्थिर आहे म्हणजे त्याची जागा निश्चित आहे. म्हणून हायझेनबर्गाच्या अनिश्चिततेच्या नियमानुसार त्याचा संवेग (= momentum) पराकोटीचा अनिश्चित असेल. आता, संवेग = वस्तुमान * वेग इथे संवेग पराकोटीचा अनिश्चित आहे. विद्युत्पुंज स्थिर असल्याने त्याचा वेग मात्र ० म्हणजे सुनिश्चित आहे. म्हणून संवेगातली अनिश्चितता पूर्णपणे वस्तुमानाच्या अनिश्चिततेमुळे उत्पन्न झालेली असणार. म्हणजेच स्थिर विद्युत्पुंजाचं वस्तुमान पराकोटीचं अनिश्चित असणार. तर मग rest mass of electron ही संज्ञा फसवीच नव्हे काय? सर जे.जे. थॉमसन यांना विद्युत्पुंजाचं भारवस्तुमान गुणोत्तर ( = charge to mass ratio) शोधून काढलं ते खोटं मानायचं का? सर जे.जे. थॉमसन यांची बुद्धी कुंठीत झालेली असेल का? ३.
दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो.विषाणूस्फटिक ( = cryallised viruses) स्वत:हून कसलीच हालचाल करंत नाहीत. ते सजीव मानावेत का? समजा असे विषाणू पाण्यासारख्या द्रवात विरघळवून ते पाणी मानवी शरीरात टोचलं आणि विषाणू कार्यरत झाले तर आपण काय म्हणणार? माणसातलं सजीव तत्त्व स्फटिकांत उतरलं असंच म्हणणार ना? मग दगडाच्या मूर्तीने कसलं घोडं मारलंय? ४.
पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते.असतेच मुळी. अशी इंद्रियबाह्य अनुभूती घेण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म. ५.
गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे.अगदी बरोबर. हे जर मान्य नसेल तर स्वत:च गुरू बनणे इष्टं. अध्यात्मात शिष्य म्हणून काही नसतं. एक गुरू दुसरा गुरुंच निर्माण करंत असतो. हे माऊलींनी स्वत:च सांगितलं आहे. नक्की श्लोक आठवंत नाही. साधारण अर्थ असाय की एका दिव्यावर दुसरा दिवा लावला की दोन्ही एकसारखेच झाले. ६.
तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे.आजिबात अशक्य नाही. ७.
मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही.प्रतिकार करणे हे मूर्तीचं काम नव्हे. ८.
प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते.विद्युत्पुंजाचं स्थिरवस्तुमान हीदेखील एक धूळफेकच आहे. विज्ञानाच्या पुरोहितांना धारेवर का धरंत नाही तुम्ही? कक्षापुंजीकरण हीसुद्धा धूळफेकच आहे. कोणाला धारेवर धरताय बोला. ९.
मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ?ज्याअर्थी इलेक्ट्रॉनची कक्षा स्थिर आहे त्याअर्थी तिचे पुंजीकरण झालेले असले पाहिजे, असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे माझ्यासारख्या कुणाही बुद्धिमान व्यक्तीला अनकॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या विज्ञानपुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या विज्ञानमार्तंडांना वाटत नाही काय ? १०.
या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.याच्याशी तीव्र असहमत. मी भाविक असून विज्ञानातल्या विसंगतींवर अचूक बोट ठेवतोय. यावरून माझी बुद्धी संवेदनाहीन झालेली नाही, हे सिद्ध होतं. मी श्रद्धावान असूनही स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा आहे. ११.
आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात.साफ चूक. अध्यात्मातला खरा अधिकारी माणूस महावाक्यांची अनुभूती आणून देतो. बिनबुडाची विधाने करंत बसंत नाही. हां, पण भोंदू मात्र सर्रास अशी विधाने करतात. १२.
एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल.तुम्ही तुमच्या डोक्यावरचं पारंपरिक न्यूटनीय पूर्वसंस्कारांचं गाठोडं कधी उतरवणार? पुंजवाद अभ्यासून बघा तर एकदा. १३.
माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते.वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे माझ्या आजवरच्या आयुष्यात काडीचाही वैयक्तिक फायदा झाला नाही. मग मी तो कशाला आचरणात आणू? तुमचा आग्रह आहे म्हणूनंच ना? मग तुमचा आग्रह ही नास्तिकाची श्रद्धाच झाली की! १४.
किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे."घटनेच्या ५१ व्या कलमात असा उल्लेख आहे खरा. पण हे कर्तव्य कसं पार पाडावं याविषयी काहीच मार्गदर्शन नाही. १५.
त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही.Orbital quantisation हे शब्दप्रामाण्यच आहे. कारण की ते दुसरं काहीच नाही. आणि अनुभवाचं म्हणाल तर ते इंद्रियांवर आधारित असतात. इंद्रियांना फसवणं अत्यंत सोपं आहे. तर्कबुद्धीच्या मर्यादा म्हणजे इंद्रियगम्य ज्ञानाच्या मर्यादा. या मर्यादा अतिशय त्रोटक आहेत. सदैव इंद्रियप्रामाण्याच्या मागे लागलं तर आयुष्य कमी पडेल. विज्ञानातसुद्धा शब्द आणि ग्रंथ प्रमाण धरावेच लागतात. एव्हढंच नव्हे तर शब्दाची पारंपरिक ज्ञानासोबत (= गतानुगतिकतेशी) सांगड घालावी लागते. याला कॉरस्पॉण्डन्स प्रिन्सिपल म्हणतात. घाऊक परिस्थितीत शब्दप्रामाण्य आणि गतानुगतिकता हातात हात घालून जायला पाहिजे यावर कटाक्ष हवा. १६.
स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.स्वबुद्धीचा आधार घ्यायला हरकत आजिबात नाही. मात्र ती आत्मानुगामी हवी. कुठलीही चिकित्सा करतांना आत्मतत्त्वाचा धांडोळा कसा घ्यावा यावर बुद्धी केंद्रित झाली पाहिजे. आ.न., -गा.पै.
In reply to माणुसकी म्हणजे काय व इतर टिपण्या by गामा पैलवान
In reply to माणुसकी म्हणजे काय व इतर टिपण्या by गामा पैलवान
खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात.आपले जे लेखामागचे सदुद्देश आहेत त्यांच्येशी मी सहमत आहे. आपला उद्देश सदुद्देश आहे याच्याशीही मी सहमत आहे. आपल्याला ज्या प्रकारचा संवाद हवा त्याचेशिही मी सहमत आहे. याउपर आपणांस मर्यादेत सदुद्देशप्रेरित थट्टा करायचा अधिकार आहे असंही माझं मत आहे. ==================================== यनावाला, आपण स्वतः कशाचे बनलेले आहात? ऑक्सीजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, कार्बन, इ इ चे ना? https://en.wikipedia.org/wiki/Composition_of_the_human_body मला सांगा, यातल्या कोणत्या मूलद्रव्यात तर्कतत्त्व, बुद्धितत्त्व, भावनातत्त्व, संवादतत्त्व, जाणिवतत्त्व, इ इ आहे? https://en.wikipedia.org/wiki/Carbon इथे उजव्या बाजूला दिलेल्या एकाही गुणधर्मात या कुठल्या तत्त्वांचा उल्लेख नाही. तर आपण मूळात संबंधहिन रेणूंचा संच आहात ना? आम्हा अस्तिकांना ब्रह्मांडातल्या प्रत्येक अस्तित्वात जे ईश्वरप्रणित कनेक्शन अभिप्रेत असतं, ते तसलं काही नसल्यामुळं आपण फक्त रँडमली एकत्र झालेल्या फिजिकल पार्टीकल्सचा गोळा आहात. या गोळ्यात वरच्या बाजूला एक छिद्र असलं, आणि त्यात धर्षण झालं म्हणून त्या छिद्रातून काही आवाज आला, तर त्याचं महत्त्व ते काय? ============================================== आपण जेव्हा मूलद्रव्यांच्या मूलभूत गुणधर्मांतूनच माझी जाणीव, भावना, बुद्धी, विचार, शक्ती, सुसंगतता, एकदिशा, इ इ निर्माण झालं आहे असं म्हणता वा मानता तेव्हा आपण जी उडी मारता ना ती शीवपींडित शिवतत्त्व आहे असं मानणारापेक्षा ५० पट लांबच असते. नसेल तर सांगा कनेक्शन. ================================================================= अजून एक सांगू ... तुम्ही नास्तिक ते जे बिग बँग पार्टिकल - सिंग्युलॅरिटी त्याचं नाव - मानता ना, त्यात सारं ब्रह्मांड साठलं होतं म्हणता. म्हणजे तुमचे ते दत्तभक्त मित्र आणि तुम्ही त्या अतिसुक्ष्म बिंदूमधे खेटून बसले होतात असं तुम्ही मानता. आणि तुम्ही आणि ते संपूर्णतः होमोजिनिअस मंजे जशास तसे होतात असंही तुम्ही मानता. ते अस्तिक का झाले आणि तुम्ही हुश्शार नास्तिक का झालात त्याचा काही पत्ता नाही. आपलं अस्तित्व कसलं आहे मानायची तुमची तर्हा नि त्यांची, फरक कायय?
" अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते."चंद्रतत्त्व म्हणून कैतरी असतं, वाढतं, कमी होतं यावर तरी सध्याला शास्त्रीय वर्तुळांत वाद आहे. https://www.psychologytoday.com/articles/200501/full-moon-crazy अजूनही मानसशास्त्रात याबद्दल बरीच चर्चा आहे.
"जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते.तशा बायका जुन्या काळात बाहेर जात नसत, पण गेल्याच, तर केवळ त्याची चर्चा आल्यावरच होत असे.
" वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !"मला पटलं नाही. शून्य काही नैसर्गिक अंक नाही. तो पूर्णांक आहे. अर्थात संज्ञांचा ढिसाळपणा सोडला तर शून्यने गुणणे, भागणे संशयास्पद आहे. ज्या संख्येने भागणे "व्याख्यिता येत नाही"* ती संख्याच मला मान्य नाही. ================================================= हा भागाकार अनंत नसतो. असा भागाकारच नसतो. का नसतो ते विचारायचं नाही. तो मानला तर सगळं बीजगणित बोंबलतं म्हणून विचारयचं नाही. बस्स.
मी सत्य तेच सांगितले.सत्य कशाशी खातात हे वैज्ञानिकांना कळेल तो सुदिन.
"कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते.
"कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न फक्त श्रद्धाळूंनाच नव्हे, तर इतर कोणासही केव्हाही विचारू नये. अशा चांभारचौकश्या करणाऱ्यांना 'भोचक' असे विशेषण आहे. समर्थांनी अत्यंत व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत (उदा. सांगे बापाची कीर्ति तो येक मूर्ख किंवा क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे). ही त्यातलीच एक. हा एक साधा व्यावहारिक शिष्टाचार आहे. त्याच्याशी अध्यात्माचा किंवा श्रद्धेचा ओढूनताणून संबंध लावणे हा खोडसाळपणा आहे. In reply to "कुठे जात आहात?" असा थेट by श्रीगुरुजी
In reply to दासबोधाचा विषय निघाला म्हणून... by Duishen
श्रद्धाळूनी वरील वाक्ये आहे तशी पाळावीत का?समलैंगिकाबद्दल घटनेत लिहिलं आहे (१४ ऑक्ट २०१७ रोजी) ते तुम्ही आहे तसं पाळता का? पाळावं का? ============================================================================= दासबोधात ब्राह्मणांना केलेले उपदेश, बंधने, शिक्षा, इ इ यांचं देखिल संकलन कराल काय? मंजे शेवटी ते सगळं जशास तसं पाळणाराच शेवटी ब्राह्मण उरतो. एवढ्या ओव्यांपुरतं असं लिहिलेले नाही कि Notwithstanding anything else written anywhere else in this Dasbodh, this will supersede. अशा प्रकारे काही ओव्या टाकणं कि अन्यत्र सर्वत्र ब्राह्मणांना फक्त माज करायला सांगीतला आहे याला काय अर्थ आहे? उदा. त्यांनी ब्रह्मचर्याची लै तारिफ केली आहे. पण अशानं त्याच पिढीत ब्राह्मण संपून गेले असते. ======================== एकूण धार्मिक साहित्य, त्यांच्यातले घोळ, विरोध, विसंगती हे खूप फ्लेक्सिबल असतं. ते सद्य भारतीय प्रशासनव्यवस्थेसारखं नसतं. खूप जाडजूड. खूप घोळ असणारं. खूप विसंगती असणारं. भयंकर रिजिड. आणि व्यवस्था ठप्प करणारं. ===================== "आजच्या" ब्राह्मणाचा दिवस कसा असावा याबद्दल काही वर्षांखाली एका शंकराचार्याने एक २-३ पानी मार्गदर्शन पत्र काढलं होतं. अर्ध्या ब्राह्मणांना तर ते वाचूनच हार्ट अॅटॅक आला असता. तुम्ही वर जे काय प्रिविलेज्स कोट केलं आहे त्याच्याकरता काय काय किंमत द्यायची रामदासांची आयडिया आहे, आणि इतर तसल्या लोकांची आहे हे देखिल पाहणं गरजेचं आहे. यात समतोल आहे का याचं उत्तर सब्जेक्टिव आहे. यात विचित्रपणा नक्कीच आहे पण आजच्या व्यवस्थांच्या विचित्रपणाच्या तुलनेत किती आहे हे महत्त्वाचं आहे. माझ्या मते ब्राह्मणांनी कसं वागावं आणि इअतरांनी त्यांचेशी कसं वागावं याची रामदासाची एकूण अपेक्षा फार विक्षिप्त नसेल. (त्यांचे साहित्य वाचणारे अंध नसलेले लोक काय म्हणतात यावरून. मी वाचलेलं नाही.)
In reply to श्रद्धाळूनी वरील वाक्ये आहे by arunjoshi123
In reply to आपण नास्तिक आहात ठीक आहे by Ranapratap
In reply to त्यांनी फक्त त्यांचे मत by सतिश गावडे
"गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ?नाही. बट आय डोन्ट केअर. मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास असल्या विचारांची आवश्यकता नसते. अशा धाग्यांवर नेहमी लिहितो तेच पुन्हा लिहितो. एकतर श्रद्धाळू (किंवा अंधश्रद्धाळू म्हणा हवे तर) असा किंवा नास्तिक असा. पण देवात / धर्मात आणि त्यातील कर्मकांडांमधे विज्ञान शोधणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे. विज्ञान अपनी जगह आणि धर्म अपनी जगह !
In reply to लेखक साहेब असं कधी कुणा by अमरेंद्र बाहुबली
In reply to १०० गणवेशातील मुलांपैकी by नेत्रेश
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले.
स्वतःचा मुद्दा मांडण्यासाठी लेखकाने ओढूनताणून एक काल्पनिक प्रसंग व कथा रचलेली दिसते.
लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे नक्की काय हे लेखकाला समजले आहे का याविषयी शंका आहे. कोणतीही गोष्ट/दावा विज्ञानाच्या सहाय्याने तपासून नंतरच ते सत्य आहे का असत्य हे ठरविणे याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे स्वतः प्रयोग करून स्वतः अनुभव घेतल्यानंतर निष्कर्ष काढणे हाच वैज्ञानिक दृष्टीकोन. परमेश्वर नावाचे काहीतरी अस्तित्वात आहे किंवा नाही हे प्रयोग केल्याशिवाय किंवा स्वतः शोध घेऊन स्वानुभव घेतल्याशिवाय कसे ठरविता येईल? परमेश्वर नावाची कल्पना माझ्या मनाला पटत नाही म्हणून तो अस्तित्वातच नाही व या कल्पनेवर विश्वास ठेवणारे निर्बुद्ध असा अंधअविश्वास बाळगणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. हा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक दृष्टीकोन आहे.
आपण सर्वचजण रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात अंधश्रद्धाळूच असतो. उदाहरणार्थ आपण ज्यांना आपले आईवडील मानतो ते केवळ श्रद्धेपोटीच. किती व्यक्ती प्रयोगशाळेत जाऊन ज्यांना आपण आपले आईवडील मानतो तेच आपले खरे जैविक जन्मदाते आहेत याची चाचणी करून घेतात? तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले सुद्धा अशी चाचणी करून घेत असल्याचे ऐकिवात नाही. कोणी म्हणेल की गुणसूत्रांची चाचणी करून आपण आपल्या जन्यदात्यांविषयी खात्री करून घेऊ शकतो. हा दावा बरोबर वाटतो. परंतु गुणसूत्रांची चाचणी बरोबर आहे व ती चाचणी अगदी अचूकपणे जन्यदात्यांची खात्री करून देते यावर आपण स्वतः त्या चाचणीचा अभ्यास न करता डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा नाही का? आणि समजा ती चाचणी खरी असली तरी आजतगायत किती जणांनी आपण ज्यांना आईवडील मानतो त्यांच्या व आपल्या गुणसूत्रांची चाचणी करून हेच आपले जन्मदाते याची वैज्ञानिकदृष्ट्या खात्री करून घेतली आहे? रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात आपण डोळे झाकूनच दुसर्यांवर विश्वास ठेवत असतो व त्या गोष्टी आधी सिद्ध करा असे आव्हान देत नाही. परंतु परमेश्वर असा काही उल्लेख झाला की लगेच देव आहे हे सिद्ध करून दाखवा अशी मागणी सुरू होते.
भारतीय समाजात काही ठाम स्वरूपाचे शिक्के ठरलेले आहेत.
गणेशोत्सव साजरा करणे, सत्यनारायण पूजा इ. = अंधश्रद्धा
मोहर्रम, ईद, ईस्टर इ. = घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य
जत्रेत बळी = अंधश्रद्धा
बकरी मारणे = कुर्बानी
देशद्रोही घोषणा = अभिव्यक्ती स्वातंत्र्य
वंदेमातरम् = बळजबरीने लादलेला राष्ट्रवाद
देशद्रोही घोषणांना विरोध = अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळणे
वंदेमातरमला विरोध = अल्पसंख्याकांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य
हिंदूंच्या बाजूने बोलणे = जातीयवाद
हिंदूंच्या विरूद्ध बोलणे = धर्मनिरपेक्षता
मांसाहार करणे = पुरोगामी
शाकाहारी असणे = प्रतिगामी
हुसेनने काढलेली चित्रे = कलंदर कलावंताच्या कलेचा उस्फूर्त आणि अमूर्त आविष्कार
चार्ली हेब्दोमध्ये प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे = मुस्लिमांना डिवचण्यासाठी केलेला खोडसाळपणा
हुसेनच्या चित्रांना विरोध = फॅसिस्टांची सांस्कृतिक दडपशाही
चार्ली हेब्दोमधील व्यंगचित्रांना विरोध = डिवचलेल्या समाजाची उस्फूर्त व स्वाभाविक प्रतिक्रिया
१९८४ मधील दंगली = इंदिरा गांधींच्या हत्येमुळे आलेली जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया
२००२ मधील दंगली = पूर्वनियोजित वांशिक हत्याकांड
अगदी तसेच "आस्तिक" आणि "नास्तिक" असे दोन शिक्के ठरलेले आहेत.
आस्तिक = अज्ञानी, स्वतःच्या बुद्धीने विचार न करणारा, कॉमनसेन्स न वापरणारा, शब्दप्रामाण्य/ग्रंथप्रामाण्य इ. मानणारा, प्रतिगामी इ. दुर्गुणांची खाण
नास्तिक = वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा, बुद्धीप्रामाण्य मानणारा, स्वतःच्या बुद्धीने विचार करणारा, कॉमनसेन्स वापरणारा, ज्ञानवंत, पुरोगामी इ. गुणविशेषणांनी नटलेला
समजा परमेश्वर नावाचे काही अस्तित्वातच नसेल तर निदान आस्तिकांना काही काळाने का होईना पण हे लक्षात येऊ शकते आणि त्यामागे त्यांचा स्वानुभव असेल कारण त्यांनी त्या मार्गाने स्वतः जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंत परमेश्वर नावाचे काही अस्तित्वात आहे किंवा नाही हे नास्तिकांना कधीही समजणार नाही कारण तसे काही अस्तित्वातच नाही असा त्यांचा ठाम अंधअविश्वास आहे व हा अंधअविश्वास स्वतः कोणतेही प्रयोग न करता, स्वतः शोध न घेता किंवा स्वतः वैज्ञानिक मार्गाने प्रयत्न करून परमेश्वर या कल्पनेचे अस्तित्व खोडून न काढता सुद्धा मनात ठाम रूजलेला आहे. अशा लोकांनी आपल्याला बुद्धीवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन इ. असलेले समजणे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे.
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
भारतीय समाजात काही ठाम स्वरूपाचे शिक्के ठरलेले आहेत.· · · ·
कॉमनसेन्स वापरणारा, ज्ञानवंत, पुरोगामी इ. गुणविशेषणांनी नटलेलाअसहमत. मनगढंंत प्रतिसाद.
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
In reply to +++१ by यश राज
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
आपण सर्वचजण रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात अंधश्रद्धाळूच असतो.टेक्निकली १००% ===============================
परंत परमेश्वर नावाचे काही अस्तित्वात आहे किंवा नाही हे नास्तिकांना कधीही समजणार नाही कारण तसे काही अस्तित्वातच नाही असा त्यांचा ठाम अंधअविश्वास आहे व हा अंधअविश्वास स्वतः कोणतेही प्रयोग न करता, स्वतः शोध न घेता किंवा स्वतः वैज्ञानिक मार्गाने प्रयत्न करून परमेश्वर या कल्पनेचे अस्तित्व खोडून न काढता सुद्धा मनात ठाम रूजलेला आहे.त्या फ्रेमवर्कची मर्यादा अशी आहे कि ते असं करू पण शकत नाहीत.
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
In reply to माझ्या परिचयाचे एक गृहस्थ by श्रीगुरुजी
In reply to नास्तिकांचा अंधविश्वास... by Duishen
(खूप कमी जणांचा)का? मानवाच्या स्वभावात खोट आहे? इगोमधे? कि मूळात सत्य कळायची अक्कलच मॅक्झिमम मानवांना नसते?
In reply to (खूप कमी जणांचा) by arunjoshi123
In reply to नास्तिकांचा अंधविश्वास... by Duishen
बालपणापासून देवासमोर हात जोडण्याचे संस्कार झाले की मग विचार करण्याची गरज उरत नाहीहा तर प्रचंड महान शोध आहे. म्हणजे माणसाचे विचार बालपणी फ्रिज होतात? मग नास्तिक हे केवळ जन्मजात (आणि जेनेटीक???) असतात कि काय? किंवा जे अस्तिक मायबापांचे मूल नास्तिक बनते ते विचार न करताच बनते कि काय? ================================================================ लहानपणापासून माझ्यावर सिगारेट आणि दारू पिऊ नये असा ३६० डिग्री सज्जड संस्कार झालेला. आता मी दोन्ही पितो. प्रामाणिकपणे सांगायचं तर माझी विचार करायची शक्ती लहानपणीच होती*. आता गेली. किमान या बाबतीत. --------------------------------- *कोणा मद्यप्रेमीच्या भावना आहत करायची इच्छा नाही. हा हा. =================================================================== बालपणापासून देवासमोर हात न जोडण्याचा संस्कार होतो, तेव्हा त्या जागी जीवनात फक्त आणि फक्त उत्कर्ष आणि यश प्राप्त करण्याचा संस्कार होतो. आजचं जग हे अशाच यशाच्या शिखरावर जायला निघालेल्या सेमी-नास्तिक लोकांच्या हातात आहे. इतके बुद्धीमान, इतके संस्कारी, इतके विकसित, इतके व्यवस्थित, इतके अनुभवी, इ इ लोक सर्व सामाजिक संस्थांच्या उच्चपदी असून जो गोंधळ चालला त्याचं काय स्पष्टीकरण आहे? माणसं म्हणून आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्यापुढे आपल्या समस्या न के बराबर आहेत. मग प्रॉब्लेम काय आहे? तर आपली नवाविष्कृत नास्तिकता, क्वाझी-नास्तिकता, सेमी-नास्तिकता, स्युडो-अस्तिकता, इ इ.
In reply to लहानपण by arunjoshi123
In reply to नास्तिकांचा अंधविश्वास... by Duishen
In reply to श्रीगुरुजी साहेबांच्या by बोलघेवडा
In reply to खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही by जेडी
. मुस्लीम दर शुक्रवारी ऑफिसात कितीही महत्वाचे काम असुदे तरी दुपारचा नमाज पढायला जातातचतुमचं निरिक्षण बहुतांशी खरं असेलही कदाचित पण त्यामागचं कारण नेहमीच पुर्णपणे धार्मिक आहे का हा एक प्रश्न आहे.. माझा याबाबतीतला एक अनुभव सांगतो. मी एका मोठ्या कंपनीत नुकताच रुजू झालो होतो, तिथे मला जुन्या थोड्याफार ओळखीचा मुस्लिम मुलगा भेटला. तोही तिथे नवखाच होता, लवकरच आमची मैत्री झाली. रोज जेवायला वगैरे एका छोट्या कंपूत बरोबरच जात असू. पुढे काही महिन्यांनी तो शुक्रवारी आमच्यासोबत जेवायला न येता नमाजकरिता जावू लागला. त्याला मी विचारलं "अरे तु आधी तर नाही जायचास ना.. आता जावू लागलास" या प्रश्नावर उत्तरला "अरे माझ्या लक्षात रहात नसे, पण आता मला या कंपनीत माझ्या दूरच्या नात्यातले (की ओळखीचे) एकजण भेटलेत , ते आठवण करुन देतात मग जातो" त्याला स्पष्ट उत्तर देणे कठीण गेले तरी ..मी काय समजायचे ते समजलो :) बाकी रोजाच्या उपासाबाबतही त्याचं म्हणणं "मी महिनाभर रोज नाही करत पण कधी कधी करतो..." ते कधी कधी आम्हाला कधी दिसलं नाही :) पण तो भेटण्यापुर्वी इतर लोकांकडून ऐकून माझा असाच ग्रह होता की मुस्लिम हे अगदी १००% काटेकोरपणे रोजाचे उपवास करतातच.
In reply to खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही by जेडी
नास्तिकांपेका अस्तिक नास्तिकांना खुप छळतात.छळ वेगळा असतो. टोमण्यांना छळ म्हणत नाहीत. शिवाय आजीचे मते ती टोमणे तुमचे नुकसान व्हावे या उद्देशाने मारायची का? ================= नास्तिकांनी आजपर्यंत काही कोटी अस्तिकांना जीवे मारलं आहे.
In reply to नास्तिकांपेका अस्तिक by arunjoshi123
नास्तिकांनी आजपर्यंत काही कोटी अस्तिकांना जीवे मारलं आहे.ऒ! ही काय भानगड आहे
In reply to नास्तिकांनी आजपर्यंत काही by प्रकाश घाटपांडे
In reply to नास्तिकांपेका अस्तिक by arunjoshi123
In reply to तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण by जेडी
In reply to <<<पत्रिकेच्या मुद्द्यावर पण by विशुमित
In reply to तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण by जेडी
हिंदु धर्म स्त्रियांना सोशिकता शिकवतोसोशिकता काही वाईट गुण नाही. तुम्ही नास्तिक देखील बायकांना तापटपणा शिकवू नकात.
त्यामुळे स्त्रियांनी नवरा मेल्यावर सुद्धा दुसरे लग्न करु नये.लग्न ही संकल्पनाच अवैज्ञानिक आहे. नै का? त्यामुळे एक अवैज्ञानिक वर्तन करू दिले आणि दुसर्यांदा करू दिले नाही ही नास्तिकांकडूनची मागणी विचित्र आहे.
पत्रिकेच्या मुद्द्यावर पण तुम्ही काहीच बोलत नाही आहातजगातल्या सर्व प्रकारच्या मूर्खांचा सर्व प्रकारचा मूर्खपणा मला मान्य आहे. अर्थात पत्रिका पाहणे, मला त्यात असलेल्या गतीनुसार, एक विशुद्ध मूर्खपणा आहे. जेव्हा आय कार्ड नव्हते तेव्हा नाव, लिंग, वय, जन्मस्थान, पालक, इ इतकी महत्त्वाची माहीती त्यात असायची तेव्हा त्याचा थोडा उपयोग देखिल असे. त्यावेळेस प्रेमस्वातंत्र्य, साथीदारस्वातंत्र्य नव्हतं असं आपलं म्हणणं असेलच, तेव्हा पत्रिकेनुसार मिळाला काय आन बिनपत्रिकेचा मिळाला काय, जोडिदार मिळाला मंजे झालं. पत्रिका पाहणं कंपल्सरी असलं तरी पत्रिकेत पास झालेला पोरगा वरावाच असा कै नियम नव्हता. शिवाय पत्रिका पाहिली की लग्न तुटतं असा काही नियम नाही. ---------------------------- आमच्या व्यक्तिगत निरिक्षणात पत्रिका मंजे काय ते माहित पण नसलेले ३५-३५ वर्षांचे झालेत, बिनलग्नाचे नि लग्नेच्च्छु. त्यामुळे बिनपत्रिकेचा वेळ वाचतो असंही नाही. लोकांनी आपल्याला हव्या असलेल्या "गुणांची" एक वेगळी पत्रिका बनवलेली आहे. अर्थातच ती कायदेशीर आणि आधुनिक आहे, मात्र अनेकदा मागची पत्रिका बरी वाटावी इतकी अनैतिक असते. -------------------------------------------- तुम्ही तुमचं वय मोजता का? कशाला जन्मापासून पृथ्वीने सूर्याला प्रदक्षणा किती घातल्या ते मोजता? मागे सगळे लोक जसे पत्रिका पाहायचे, तसा आता सगळे लोक हा मूर्खपणा करत आहेत. आपण हे टाळाल?
In reply to हिंदु धर्म स्त्रियांना by arunjoshi123
In reply to पुरुषांना सोशिकता गरजेची नसते का? by जेडी
फक्त बायकांनीच सोशिकता शिकावी का? पुरुषांना सोशिकता गरजेची नसते का?वैज्ञानिकतेच्या नावाखाली १००% लोकांनी तापट असल्यापेक्षा धर्माच्या नावाखाली ५०% च लोक तापट असलेले बरे. ==============
मी असे म्हटलेले नाही.विज्ञान असं अर्धवट नकात पाळू. =============
का नाही टाळणार?याबद्दल आनंद आहे. सगळ्याच नास्तिकांनी टाळलं तर अजूनच आनंद आहे.
In reply to तुम्ही आजीचा सद्हेतु उचलला पण by जेडी
In reply to खरे तर मी पुर्ण नास्तिक नाही by जेडी
In reply to नास्तिकांपेका अस्तिक नास्तिकांना खुप छळतात. by Duishen
नास्तिकांचा मुद्दा समजून घेण्याची सहिष्णुता फारच कमी आस्तिक लोकांमध्ये आढळली.बाय द वे, काय मुद्दा आहे?
In reply to नास्तिकांचा मुद्दा समजून by arunjoshi123
In reply to यनावाला यांचा प्रयत्न असा by जयन्त बा शिम्पि
अशा " आस्तिकांबद्दल " जाने भी दो यारो " असेच धोरण ठेवावे असे मला वाटते.नैतिक वा तात्विक दृष्ट्या असो, तार्किक , व्यावहारिक दृष्ट्या भूमिका योग्य आहे असे वाटते.
In reply to अशा " आस्तिकांबद्दल " जाने भी by arunjoshi123
In reply to जाने भी दो यारो वरुन by मारवा
In reply to यनावालाजी पण... by मारवा
समजा एखाद्या मुलाला बालपणापासुनच देव मंदिर इ. बाबींविषयी काहीही सांगितल नाही.आपल्याला अनेक संकल्पना खूप खूप उशिरा कळतात. कधीच न कळताच जीवन संपतं. अन्य काही प्रस्थापित माहिती नसेल तर आपल्याला अनुभवास येणार्या जगाचे आपण आपल्या ज्ञानामाहितीनुसार "मत" बनवतो. हा मुलगा अनेक विचित्र कार्यकारणभावांची लिस्ट देईल आपलिकडे काही अपेक्षित नाही. ================================ नास्तिकांनी अगोदर जगात एक अख्खी नास्तिक संस्कृती शोधली. मिळाली नाही. मग आदिवासी शोधले. मिळाले नाही. मग इतिहास खंगाळला. पुन्हा तेच. मग पुरातत्त्व पुरावे शोधले आणि किमान २ ते ७ हजार वर्षांपूर्वीचे लोक नास्तिक होते हे सिद्ध करायचा प्रयत्न केला. त्यात ही अपयश आलं. सध्याला त्यांची होप पाषाणयुग इ इ च्या लोकांवर आहे. पण ते काय मानायचे आणि काय नाही याचा काही पत्ता नाही.
In reply to समजा एखाद्या मुलाला by arunjoshi123
In reply to अहो मोठा स्कोप आहे ना by मारवा
In reply to अहो मोठा स्कोप आहे ना by मारवा
सर्वात महत्वाचे तो ईश्वर नावाचा "डंपिंग फोल्डर जे जे मला समजु शकत नाही ते त्यात जसे आस्तिक लोक टाकतात तसा वापरुच शकणार नाही कारण ती मुभाच त्याच्याजवळ संस्कारमुक्त असल्याने कंडिशनींगलेस असल्याने होइल.त्याला डंपिंग फोल्डरच नसेल का? डंपिंग फोल्डरचं नाव आणि काही संकल्पनात्मक गुणधर्म बदलल्याने फार काही फरक पडणार नाही. मूळात पिढ्यान पिढ्या या डंपिंग फोल्डरचं संकल्पनात्मक स्वरुप दृढ होतं नि त्यातनं देव, धर्म बनतात. मग हा निसर्गात झालेला प्रत्यक्ष इतिहास प्रयोगानं रिपिट करायची काय गरज आहे? वन्य प्राणी, वनस्पती संस्कारशून्य आणि कंडीशनींगमुक्त असतात. शेवटी मानव एक प्राणी आहे. सदर मुलगा एका प्राण्याप्रमाणे वागेल. तुमच्या नागरी संस्कृतीतला ईश्वरच सोडा, त्याला प्रशासन, अर्थव्यवस्था, संस्कृती, राज्यव्यवस्था, कायदा, समाजव्यवस्था, शिक्षण, विज्ञान, मानवी मूल्यं, इ यांचे कुठलेही नियम, संकेत अमान्य असतील. या सर्व व्यवस्थांत आपलं सौख्य, सर्वस्व, वेगळेपण आहे असं आपण मानतो. आणि यातलं काहीही "अस्तित्वात" नसतं. फक्त देवच पकडून नास्तिक अस्तित्वाच्या पुराव्याचा बाऊ कशाला करतात हे मला कधीच उमगलं नाही. ============================== विज्ञानाचा बाऊ होण्यापूर्वी या सर्व प्रणालींना जोडणारी एक धर्मप्रणाली होती. तिच्या स्कोपबाहेर काहीही नव्हतं. आता ती प्रणाली त्याज्य मानली जात आहे. आणि बाकीच्या प्रणाली स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत. यातनं उत्पन्न होणार्या अनागोंदीची प्रचंड किंमत आजच आपण देत आहोत. नंतर काय होणार आहे याची कल्पना करवत नाही. ===================================== तुम्ही जे दोन पर्याय दिलेत त्यामागे बहुतेक ईश्वर मानल्यानं कार्यकारणभाव हुकतो असं काहीतरी "मानलेलं" दिसतंय. प्रयोगाचा हा आधारच बिनबुडाचा आहे. (कोण्या एका शहरात ५०% लोक नास्तिक आहेत, मात्र शास्त्रज्ञ २५% नास्तिक आहेत!!! शास्त्रज्ञांत नास्तिक जास्त असतात अशी एक अवधारणा उगाच माजवून दिली आहे.) मूळात कोणतंही एक विधान मांडताना, त्याचा कार्यकारणभाव पाहताना, हायपोथेसिस मांडताना, संदर्भ मांडताना, गृहितके मांडताना, व्याख्या मांडताना इतकं काही गृहीत धरावं लागतं कि विचारता सोय नाही. एक व्याख्या करायला पहिलेपासून माहित असलेले किति शब्द गृहित धरावे लागतात? खूप सारे! मग विज्ञानातली पहिली व्याख्या कशी करणार? तांत्रिकदृश्ट्या तुम्ही विज्ञानाचा अभ्यास देखिल "चार गोष्टी मानल्याशिवाय" चालू करू शकत नाही. अगदी न्यूटन महाराज पण पहिल्या लॉ मधे फोर्स शब्द वापरून घेतात आणि दुसर्या लॉ मधे त्याची व्याख्या करतात!!! असलं काय विज्ञान असतं का? ==========================
शिवाय त्याला स्वतःच्या कृत्यांची जबाबदारी स्वतःच्याच शिरावर घ्यावी लागेल. त्याला तो भार ईश्वर नावाच्या आरामलोडावर टाकता येणार नाही.याचा फायदा काय? मूळात स्वतःची कृत्ये इतकी स्वतंत्र असतात का की त्याची जबाबदारी एकट्याने घ्यावी? ==============================
In reply to काही विषय न चर्चिलेलेच बरे.. by चौकटराजा
आपण उत्तरोत्तर शहाणे बनण्याची प्रक्रिया चालू ठेवणेच इष्ट.ज्या व्यक्तिला आपले विचार चूक असू शकतात, आपणच इतरांना शहाणे करायचे नसते (ते म्यूच्यूअल असतं), लोक वाद हा जिंकण्यासाठी करतात असे नसते, मूळात हा एक बुद्धी सिद्ध करायचा वाद आहे असं मानू नये, समोरच्यांचा इगो अजिंक्य आहे असं मानू नये, आपण कोणीतरी रेअर नसतो, हाताशी घेतलेल्या मुद्द्याच्या आपण सुसुत्र आणि संपूर्ण विचार केलेला नसावा, चिंतनाची फ्रेमवर्क आपण माहीती करून घेतलेली नसू शकते, चर्चेत प्रारंभी एक बाजू सुरुवात म्हणून घ्यायची असते आणि त्यापलिकडे तिचं महत्त्व नसतं हे उमगलेलं नसतं .... त्याला हा प्रवास खडतर जातो. ===================================================== यनावाला जर लातूरच्या संरपंचाच्या निवडणूकीत मतदान करायला जाणार्या आदिवासी म्हातारीला हटकून लोकशाही प्रकिया एक शासनपद्धती म्हणून अर्थहीन म्हणू लागले तर धन्य म्हणायचं. मुद्दा असा आहे कि चर्चा (वाद पण नाही) कशी करावी हाच विषय प्रचंड गहन आहे (चर्चेतला जो विषय आहे तो किती गहन आहे हे वेगळे). मी ६४ वर्षांचा होईपर्यंत तितकं जरी शिकलो धन्य मानेन.
In reply to काही विषय न चर्चिलेलेच बरे.. by चौकटराजा
In reply to फायदा by तिमा
In reply to हा हा तिमा साहेब, by चौकटराजा
In reply to आपण जो दावा केला आहे त्यामागे by श्रीगुरुजी
In reply to १०० टक्के दावा नाही .. यासाठी तर..... by चौकटराजा
माझ्या पुरती माझी खात्री आहेच.डॉ. आंबेडकर, गांधीजी, डॉ. कलाम हे तिघे देशातले चिरंतन सर्वप्रिय नेते असावेत (क्लेम नाही). हे तिघेही नास्तिक नव्हते असा माझा दावा आहे. ================================ https://en.wikipedia.org/wiki/Irreligion_in_India योगायोगाने १:४०० हे बरोबर आहे. तुमची सोसायटी टिपिकल आहे. ========================================== बादवे, नास्तिकता मंजे योगायोगवाद हे माहीत आहे का?
In reply to माझ्या पुरती माझी खात्री आहेच by arunjoshi123
In reply to माझ्या पुरती माझी खात्री आहे म्हणजे by चौकटराजा
In reply to माझ्या पुरती माझी खात्री आहे म्हणजे by चौकटराजा
In reply to आणखी एक .. by चौकटराजा
आज गुरूत्व लहरीचे काल्पनिक विवेचन मांडणारे हयात नाहीत परंतू त्याचे प्रयोगसिद्ध स्वीकृती होण्यास इतकी वर्षे लागली.गुरुत्व लहरींचं नक्की काय शोधलं गेलं आणि कसं ते कळलं तर बरं होईल.
In reply to आज गुरूत्व लहरीचे काल्पनिक by arunjoshi123
In reply to २०१७ चे भौतिक शास्त्राचे नोबेल by चौकटराजा
In reply to धन्यवाद by arunjoshi123
In reply to फिल्म पाहिली. by चौकटराजा
In reply to फिल्म पाहिली. by चौकटराजा
१०० टक्के चिकित्सक वा १०० टक्के श्रद्धाळू असा माणूस जगात नसतोच. कारण मानवी मनाला नोंदी ठेवण्याला फार मर्यादा आहेत.सहमत आहे. ठार अश्रद्ध जरी म्हटल तरी त्याला भावना नावाचा फॅक्टर असल्यामुळे तो १०० टक्के रॅशनल असू शकत नाही
In reply to फिल्म पाहिली. by चौकटराजा
विज्ञान हे चूक मान्य करते व सुधारणा करते.धर्मसंस्था विज्ञानापेक्षा फास्ट चूक मान्य करते नि सुधारणा करते.
In reply to विज्ञान हे चूक मान्य करते व by arunjoshi123
आणि या धाग्यावर जे होत आहे ते!

In reply to अगदी अगदी! by शब्दबम्बाळ
In reply to अगदी अगदी! by शब्दबम्बाळ
म्हणजे वाट्टेल ते फेकता अगदी! :Dहे
प्रश्न विचारणाऱ्याला जणू गुन्हा केल्या सारखा बघतोचं उदाहरण आहे. =================================== या धाग्यावर नास्तिकांना इतके प्रश्न विचारले आहेत. २-४ अपवाद सोडले तर बाकीच्यांची मनोवृत्ती (उत्तर देण्याची लायकी असो) गुन्हा केल्यासारखा बघण्याचीच आहे. तुम्हाला धरून. शिवाय अस्तिक असं बघण्यात बरोबर असू शकतात ही शक्यताच तुम्हा महान चिकित्सक नास्तिकांना अमान्य आहे. ==================
आता साधं दिवाळीच्या फटाक्यांचा उदाहरण घ्या!या निर्णयाची योग्यायोग्यता असो, याच्या विरोधात केवळ अस्तिक आहेत असं म्हणता? आणि समर्थनाथ केवळ नास्तिक? =============================================
Taught to young childrenतसं विज्ञानही बालपणीच शिकवतात आणि माणूस देव देव अध्यात्म इ इ विचार करायला लागतो तेव्हा सारं शिक्षण संपलेलं असतं. पण तरीही तुमचं म्हणणं मानू. विज्ञानाच्या नियमानुसार माणसाला मोठेपणी अक्कल येते ना? का लहानपणीची सगळी मतं तशीच राहायलाच पाहीजे? आणि आता ज्या नास्तिकांच्या घरी मुलं लहानपणापासून विज्ञान शिकताहेत त्यांचे विचार अंध मानले पाहिजेत का? उगाच आपलं कैतरी.
Told to believe on evidence.चला, ईश्वर आहे वा नाही हे ठरवायला, विश्वातल्या कोणत्याही गोष्टीसाठी "अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असलेली वैश्विक कसोटी" कोणती? तुम्हाला विज्ञानाचं आणि धर्माचं कंपॅरिजन करायला दोन्ही गोष्टींचा प्राथमिक अभ्यास तरी अपेक्षित आहे. तुम्हाला हे तरी माहित आहे का कि वैज्ञानिक सत्ये आणि मानवी बुद्धी, तर्क यांचा अधिकृतरित्या संबंध नाही. विज्ञान मानणं म्हणजे तर्काला न पटणार्या गोष्टी एकत्र मानणं. https://www.forbes.com/sites/startswithabang/2017/06/01/break-the-standard-model-an-ultra-rare-decay-threatens-to-do-what-the-lhc-cant/#286365a85e7e आज आपण "आजच अस्तित्वात असलेल्या विसंगतींसोबत" स्टँडर्ड मॉडेल मानतो. एक विसंगती मॉडेल खारिज करायला पुरे आहे. आणि मी या क्षेत्रातला नाही, पण माझ्या एकूण वाचनात मूलभूत भौतिकशास्त्रात विसंगतींचं भंडार आहे. ==================== मी शाळेत खूप विज्ञान शिकलो आहे. दिलेले ज्ञान गुपचूप घ्यावे असाच प्रघात असे. त्यापेक्षा जास्त प्रश्न आम्ही इतिहासाच्या किंवा मराठीच्या तासात विचारत असू. त्यामुळे शंका घेण्यास फक्त तिथेच वाव आहे असं नाही. एका उपनिषदात देव आहे का असा प्रश्न आहे असं मी ऐकलं आहे. ========================
May get Nobel prize if they find an errorअगोदर एक सत्य नीट शोधा, मग चूक काढण्याचं बघू. आम्ही आमच्या चुका बदलून नवी भूमिका घेतो हे वर्तन इ म्हणून छान आहे, पण यात शास्त्रीय काय आहे? आम्हाला प्रत्येक चूक माफ = विज्ञान असा प्रकार झालाय तो. फायनल पोझिशनच घ्यायची नाही तर किमान टेंपररी पोझिशन संपूर्ण सुसंगत घ्यायची. ---------------- उद्या मला देव दाखवण्याचं नोबेल मिळण्यासाठी आज तुम्ही ओपन आहात असा या कोटचा अर्थ होतो. ======================================================= असो. ही अशी अनेक वचनं फॅशन फॅशन मधे बनून जातात. फार सिरियसली घ्यायची नसतात.
In reply to म्हणजे वाट्टेल ते फेकता अगदी! by arunjoshi123
उद्या मला देव दाखवण्याचं नोबेल मिळण्यासाठी आज तुम्ही ओपन आहात असा या कोटचा अर्थ होतो.तोच अर्थ आहे इतकं तरी समजून घ्या!
या निर्णयाची योग्यायोग्यता असो, याच्या विरोधात केवळ अस्तिक आहेत असं म्हणता? आणि समर्थनाथ केवळ नास्तिक?सोयीचं करून बोलू नका! दिवाळीत फटाके फोडायला धर्माचे लेबल लावून समर्थन देणारे, किती का असेनात पण "आस्तिकच" आहेत ना? कुठला नास्तिक त्याला समर्थन देतोय ते दाखवा बघू जरा! लग्नात फटाके फोडायला बंदी घातलेली तेव्हा तो विषय धर्मापर्यंत आला नव्हता म्हणून तिथे आस्तिक/नास्तिक वाद न येता तो मानला गेला.
विज्ञानाच्या नियमानुसार माणसाला मोठेपणी अक्कल येते ना? का लहानपणीची सगळी मतं तशीच राहायलाच पाहीजे? आणि आता ज्या नास्तिकांच्या घरी मुलं लहानपणापासून विज्ञान शिकताहेत त्यांचे विचार अंध मानले पाहिजेत का? उगाच आपलं कैतरी.काय लिहिताय?? माणसाला अक्कल अशी अचानक उगवत नाही, लहानपणापासून ज्या काही गोष्टी पहिल्या/शिकवल्या जातात त्यातून तो शिकतो. विज्ञानाची प्रमेय/ अणू-रेणू आधी देव/राक्षस, स्वर्ग/नरक अशा कल्पना मुलांच्या विश्वात येतात. मग मोठं झालं आणि अक्कल "आली" कि काही लोक यासगळ्यावर विचार करू लागतात आणि स्वतःचा असा मार्ग बनवू पाहतात. नास्तिकाच्या घरी जन्मलेल्या मुलाला देव हे जर कुणीच कधी सांगितले नाही तर त्याला अशी काही गोष्ट असते हे आयुष्यभर कळायचं देखील नाही. आणि तरी देखील तो प्रगती करू शकेल काय फरक पडेल त्याने? आणि हो तुम्ही प्रश्न विचारला नव्हता वरती... हे असेच विधान टाकले होते ज्याला काहीच संदर्भ नाही! त्यावर मी प्रतिसाद दिला होता. उगीच आता काहीतरी विधान करू नका. गुन्हा केल्यासारखी वागणूक वगैरे देण्यात येतीये म्हणून..
In reply to उद्या मला देव दाखवण्याचं by शब्दबम्बाळ
उद्या मला देव दाखवण्याचं नोबेल मिळण्यासाठी आज तुम्ही ओपन आहात असा या कोटचा अर्थ होतो.सत्याला अंतिम स्वरुप नसतं हा नविनच सिद्धांत ऐकला.तोच अर्थ आहे इतकं तरी समजून घ्या!
कुठला नास्तिक त्याला समर्थन देतोय ते दाखवा बघू जरा!घटनेतलं धर्मस्वातंत्र्य ज्या ज्या नास्तिकांना मान्य आहे त्या सर्वांचं समर्थन आहे.
माणसाला अक्कल अशी अचानक उगवत नाही, लहानपणापासून ज्या काही गोष्टी पहिल्या/शिकवल्या जातात त्यातून तो शिकतो. विज्ञानाची प्रमेय/ अणू-रेणू आधी देव/राक्षस, स्वर्ग/नरक अशा कल्पना मुलांच्या विश्वात येतात.लहानपणावरचा नास्तिकांचा रोष अगम्य आहे. लोक लहानपणी खेड्यात राहतात, नंतर शहरात राहतात, तेव्हा जे शिकावं लागतं ते सगळं शिकतात ना? का लहानपणी आम्हाला असं वाटायचं म्हणून नव्या गोष्टी स्वीकारत नाहीत? ---------------- आणि मूळात आई वडिल करताता तेच मुलं करतात असा निसर्ग का बनला आहे?
नास्तिकाच्या घरी जन्मलेल्या मुलाला देव हे जर कुणीच कधी सांगितले नाही तर त्याला अशी काही गोष्ट असते हे आयुष्यभर कळायचं देखील नाही.अनेक लोकांना असंच क्वांटम फिजिक्स पण असतं हे आयुश्यभर माहित होत नाही. पण ते जग काय नसतंच का?
In reply to उद्या मला देव दाखवण्याचं by arunjoshi123
सत्याला अंतिम स्वरुप नसतं हा नविनच सिद्धांत ऐकला.विज्ञान हे अंतिम सत्यच सांगते हे आज तुमच्याकडून कळाले. धन्यवाद. सिद्धांत वगैरे तर फार उत्तम विनोद.
In reply to अगदी अगदी! by शब्दबम्बाळ
In reply to हा हा तिमा साहेब, by चौकटराजा
In reply to हा हा तिमा साहेब, by चौकटराजा
In reply to फायदा by तिमा
आस्तिकांना कधीही उपदेश करायला जाऊ नये. उलट त्यांच्या आस्तिक रहाण्यातच आपल्या सारख्यांचा फायदा आहे.मुळात हे जे ओरियंटेशन आहे ना, ते वाईट आहे, आणि त्याचा स्रोत तुमचा व्यक्तिगत स्वभाव इ नसून तुमची नास्तिकता आहे. मानवी जीवनाचा उद्देश फायदा करून घेणे हा आहे असं नास्तिकी तत्त्वज्ञानाचं सार निघतं. निघू शकतं. फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून, जो लेखकाने (आणि भारतीय राज्यघटनेने देखिल) सांगीतला आहे पाहिलं तर तुम्ही एक पशू आहात आणि ते जसे फायदे करून घेत फिरत असतात तसं तुम्ही पण फिरावं असं नास्तिकवाद सांगतो. पण शुद्ध नास्तिकवाद असतो कसा हे कळू शकत नाही कारण आजूबाजूला अस्तिकांची प्रचंड मांदियाळी आहे आणि नास्तिक धरून सर्व मानवांच्या मूल्यांवर ईश्वरप्रणित धर्मसंस्थेचे घट्ट संस्कार आहेत. धर्माच्या लेगासीमुळे "जगात कधीच कुठेच धर्म नावाचा प्रकार नसताच तर" या सदरातला नास्तिकवाद कल्पता येत नाही. ========================== अर्थात म्हणून आपले फायदे मंदिराचे वातावरण, नक्षी, इ इ पर्यंत सिमित आहेत. पण हळूहळू नास्तिकवादाला धार येणार आहे. आजच मिलिटंट अथेइझम नावाचा एक प्रकार आहे. http://www.conservapedia.com/Militant_atheism#Criticism_of_the_position त्यातला एक पॅरा इथे देत आहे.
Kurtz has criticized the militant atheism of the Soviet Union, which he stated "persecuted religious beleivers, confiscated church properties, executed or exiled tens of thousands of clerics, and prohibited believers to engage in religious instruction or publish religious materials"Kurtz has criticized the militant atheism of the Soviet Union, which he stated "persecuted religious beleivers, confiscated church properties, executed or exiled tens of thousands of clerics, and prohibited believers to engage in religious instruction or publish religious materials"=================================== पण माझी चिंता नास्तिक अस्तिकांचे काय करतील ही नाही. एकदा सगळे अस्तिक संपले कि नास्तिक एकमेकांचे काय करतील हा खरा चिंतेचा विषय आहे. सध्याला नास्तिकवाद प्रचंड वेगाने फोफावत आहे. जितकी कमी अक्कल तत्त्वज्ञान स्वीकारायला लागेल तितका धर्म फास्ट फोफावतो हा धर्मांतरणाचा लॉ असावा. नास्तिक व्हायला अजिबातच अक्कल लागत नसल्यानं ते सर्वात सोपं आहे. देव डोळ्यानी दिसला नाही की झाला नास्तिक इतकं ते सोपं आहे. त्यात विश्वकारण घुसडलं तर पाल्हाळ इतकं लांबतं की त्याचा धर्म होऊन जातो. आणि हे काय कुणाला झेपत नाही. तितका रस नाही. वेळ नाही. पैसा नाही. किचकटपणा झेलायला फ्रेश डोकं नाही. म्हणून शिक्षण, सत्ता, विज्ञान, पैसा, उद्योग, इ इ हे ज्यांच्या हातात आहे त्यांचं नास्तिकीकरण फास्ट होत आहे, शेवटी एक दिवस अस्तिक लोक मायक्रोमायनॉरिटी असतील. पर्यटन, प्रयोग वैगेरे म्हणून त्यांना तसे राहू दिले जाईल. अशावेळी नास्तिकांचे काय चालले असेल हा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्हा अस्तिकांसाठी महत्त्वाचा यासाठी आहे की आम्ही त्यांना परके मानत नाहीत. समाजात २-३% नास्तिक असलेले बरे. ते हुशार असलेलेही बरे. त्याने धर्मव्यवस्था सुधारत असते. पण एक अस्तिक म्हणून, पुढचे सत्य १००% नास्तिक समाज हे असले तरी, त्यांचे कसे भले होइल, याचा विचार करणे आवश्यक आहे. ======================================== एकाच ईश्वराची नसलेली ही लेकरे, पुण्य कमवून स्वर्गात जायचे नसणारी, चांगले वागायला कारणच नसलेले, सद्वर्तन ही मनुष्याची अंतःप्रेरणा इ इ नाही असा शोध लावून बसलेले, भौतिक सुख मॅक्सिमाईज करण्याची अंतःप्रेरणा मान्य असलेले, स्वतःस योगायोगाने रासायनिक, इ प्रक्रियांतून बनलेले किचकट रेणूसंच मानणारे, पण आजच्या दृष्टीने आमचेच असलेले हे नास्तिक भविष्यात कोणती मानवी मूल्ये पाळणार आहेत? का? कशाच्या आधारावर? विज्ञानाने तर "कायमचे" हात झटकले आहेत कि हे मूल्य बिल्य आपला प्रांत नाही. शिवाय यांच्याकडे पर्यायी काहीही शास्त्र नाही जे या गोष्टींची चर्चा करतं. तुम्ही फायदे हा शब्द फार इनोसेंटली वापरला आहे, पण अशा भविष्यात नास्तिकांची फायदाप्रणित मानवता जगातला सर्वात काळा काळ असेल. ऑफिशियली सगळं गोग्गोड असलेल्या धर्मसंस्थेची आज ही हालत आहे, तर जिथे चांगलेपणाला कसलाच आधार नसेल तिथे काय होइल? तुम्ही एकमेकांच्या "श्रद्धांच्या" टवाळ्या करत राहिलात तर ठिक आहे, पण "कोणत्याही थराला जाऊन" स्वतःचा फायदा करू लागतात तर अवघड होईल. ====================== त्यावेळी तुम्ही आम्हाला स्मरून फुक्कटच "चांगली" मूल्ये पाळणार असाल तर तुम्ही विश्वातले सर्वात मोठे श्रद्धावंत, अंधश्रद्धाळू आणि दांभिक. ====================== आजची घडी पाहिली तर आजचे नास्तिक अस्तिकांपेक्षा सद्गूणी आहेत असं माझं व्यक्तिगत निरिक्षण आहे. याचं प्रमुख कारण ते कमी आहेत, विचारी आहेत, सखोल विज्ञानाचा नि त्यांचा संबंध नाही, लेगसी तून आलेल्या अधिकृत अस्तिक मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे, त्यांच्या विचारांचं नि वर्तनांचं सुसुत्र स्पष्टीकरण त्यांना कोणी विचारत नाही, नास्तीक असण्यामागची त्यांची प्रेरणा रिअॅक्शनरी आहे, धर्मात चूका आहेत म्हणून नास्तिक बनावे, अशी आहेत. त्यामुळं ते इतकेच राहिले आणि असाच विरोध करत राहिले तर अस्तिकांनी विरोध करायचं कारण नाही. =============== मात्र ही केस नाही. ते फार भयानक संख्येने वाढत आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Growth_of_religion इथे गेल्या शतकात जगात अज्ञेयवाद आणि नास्तिकवाद पाळणारे एकूण लोकसंख्येच्या ०.२% पासून १२% झाले आहेत. हि वाढ १२% पासून २२% झालेल्या इस्लामला लाजवील अशी आहे. यावर आज असं मानलं जात आहे कि (चीन इ चा असोच) नास्तिकवाद नीट मोजला जात नाहीय. कारण या गणनेत भारतासारख्या देशातले नास्तिक शून्यच मानले आहेत. म्हणजे हा आकडा अजून मोठा आहे. शिवाय अस्तिकवाद हा इतक्या शॅलो पद्धतीने पाळला जात आहे कि लोक फक्त नाव सांगायलाच अस्तिक. म्हणून क्वालिटेटिव डिग्रेडेशन पण आहे. त्यात उद्याचं क्वांटिटेटिव पोटेंशियल आहे. म्हणून हे नास्तिक लोक जे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतात ते "मी चांगलं का वागावं?" अशी चिकित्सा करू लागले तर काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशी चिकित्सा धर्मसंस्थेमधे एकतर बॅन आहे किंवा कंक्लूडेड आहे. वास्तविक आजदेखिल अशी चिकित्सा करून अनेक क्वाझी-नास्तिक लोक आरामात फ्रॉड करत आहेत. समाज बिघडला कसा त्याचं बरंच उत्तर त्यात आहे. ================================================================== आणि तिमाजी, तुम्ही नास्तिक असल्याचे आम्हा नास्तिकांना चिकार फायदे असतात. उदा. रोज सकाळी फूले आमच्या हाताला लागतात. तुम्ही नास्तिक असल्यामुळं आम्हाला ती स्वस्त पडतात. प्रत्येक सणासुदीला, पूजेला आम्ही सगळे जमतो, भेटतो, तुम्ही त्यावेळेस शुक्रसंध्या इ इ साजरी करत असाल तर आम्हाला बसमधे जागा जास्त मिळते. पण तरीही आम्हाला वाटतं कि तुम्ही पूजेले आले असते तर बरं झालं असतं! शेवटी आम्ही अस्तिक!!
In reply to काय मग शेवटी आपल्याला कोण by प्रकाश घाटपांडे
काय मग शेवटी आपल्याला कोण व्हायचयं? अस्तिक नास्तिक की अज्ञेयवादी?
मी आस्तिक आहे आणि मला आस्तिकच रहायचं आहे. जे नास्तिक आहेत त्यांना मी तुम्ही आस्तिक व्हा असे शहाजोगपणे सांगायला जात नाही किंवा त्यांच्या बुद्धीची हेटाळणी करीत नाही. तुम्ही नास्तिक असलात तरी हरकत नाही. तुमच्यावर आस्तिक होण्याची बळजबरी नाही. परंतु आस्तिकांच्या विश्वासाला अंधश्रद्धा, असत्य विधाने, कॉमनसेन्स न वापरणारे, स्वतःची बुद्धी न वापरणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन नसणारे असे शब्द वापरून स्वतःच्या आस्तिकतेची प्रौढी मिरवू नका किंवा त्यांना तुम्ही आमच्यासारखे नास्तिक व्हा असे न मागता सल्लेही देऊ नका, कारण स्वतःला नास्तिक म्हणविणारे आस्तिकांपेक्षाही जास्त अंधश्रद्ध, जास्त अवैज्ञानिक दृष्टीकोन असलेले व कॉमनसेन्स न वापरणारे असतात.
In reply to इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला by श्रीगुरुजी
In reply to इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला by श्रीगुरुजी
स्वतःला नास्तिक म्हणविणारे आस्तिकांपेक्षाही जास्त अंधश्रद्ध, जास्त अवैज्ञानिक दृष्टीकोन असलेले व कॉमनसेन्स न वापरणारे असतात.याविषयी बोलतोय.
In reply to इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला by श्रीगुरुजी
जे नास्तिक आहेत त्यांना मी तुम्ही आस्तिक व्हा असे शहाजोगपणे सांगायला जात नाही किंवा त्यांच्या बुद्धीची हेटाळणी करीत नाही.
कारण स्वतःला नास्तिक म्हणविणारे आस्तिकांपेक्षाही जास्त अंधश्रद्ध, जास्त अवैज्ञानिक दृष्टीकोन असलेले व कॉमनसेन्स न वापरणारे असतात.हि नास्तिकांची हेटाळणी नव्हे हा, स्तुती आहे... विचारांची कन्सिटन्सी भारीच आहे! :D
In reply to यनावालाजी क्रिएटीव्हीटीचे महत्व आहे by मारवा
In reply to यनावालाजी क्रिएटीव्हीटीचे महत्व आहे by मारवा
वैज्ञानिक विचारसरणीने जगत जीवन किती सुंदर तणाव रहीत मुक्त जगता येइल त्यासाठी काय करावे लागेल.वैज्ञानिक विचारसरणीने जीवन जगताच येत नाही.
In reply to मोदींच्या by धर्मराजमुटके
In reply to मोदींच्या by धर्मराजमुटके
In reply to आता प्रतिसादामधे आस्तिक लोक by palambar
In reply to सिरिअसली?! तुम्ही विनोद करत असाल अशी आशा आहे! by शब्दबम्बाळ
यावरून तो निष्कर्ष काढतो: "बेडकाचे चारीही पाय कापले कि त्याला ऐकू येत नाही!"याला वैज्ञानिक प्रयोग म्हणतात.
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
In reply to सहमतीच्या टाळ्या ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सहमतीच्या टाळ्या ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.
+१
आपल्याला हिंदू समाजाला सुधारायचा ठेका मिळालेला आहे अशी नास्तिकांची गाढ श्रद्धा असते. परंतु समाजाला सुधारण्यासाठी भारतीयांच्या अत्यंत गंभीर व समाजघातक अंधश्रद्धांवर (उदा. सणाला दिले जाणारे प्राणीबळी, स्त्रियांची कौमार्यपरीक्षा इ.) बोलण्याऐवजी सत्यनारायण पूजा, उपासतापास असल्या निरूपद्रवी गोष्टींना लक्ष्य करून आपण बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकवादी, विचारवंत वगैरे आहोत हे मिरविण्यातच आणि नास्तिकांना टोमणे मारण्यातच यांचे आयुष्य जाते.
वास्तविक पाहता या निरूपद्रवी गोष्टींनी समाजाचे काहीही नुकसान होत नसते. या लेखातील सुरवातीला वर्णन केलेल्या काल्पनिक प्रसंगातील देवतत्व वगैरेचा उल्लेख हा त्याचाच भाग आहे. या काल्पनिक प्रसंगातील गृहस्थांनी गुरूपौर्णिमेला मूर्तीतील देवतत्व वाढते अशी श्रद्धा ठेवली असेल तर त्यात लेखकाचे काय चार चव्वल गेले का? या श्रद्धेने लेखकाचे किंवा समाजाचे काही नुकसान झाले आहे का? अशी श्रद्धा बाळगल्याने कोणावर अन्याय झाला आहे का? असे काही नसताना सुद्धा विनाकारण त्यावर टीकेचे आसूड झोडून त्यावर "श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. " असली मल्लीनाथी करणे हीच यांची वैज्ञानिक दृष्टी आहे. ज्यांना अशी श्रद्धा बाळगायची आहे त्यांनी ती बाळगू देत की, पण त्यात तुमचं काय गेलं? सणाला नवस किंवा कुर्बानी नावाखाली क्रूरपणे केलेली प्राण्यांची हत्या, लहान मुलींची धार्मिक कारणावरून केलेली सुंता असल्या धार्मिक अंधश्रद्धा समाजासाठी अत्यंत घातक आहेत. मात्र याबाबतीत बोलायला यांची दातखिळ बसलेली असते. अगदी तोंडात उलथने घालून सुद्धा या भंपकांची त्यावेळी दातखिळ उचकटत नाही.
खरं सांगायचं तर आपण विज्ञानवादी आहोत, बुद्धीप्रामाण्यवादी आहोत हा यांना भ्रम झालेला आहे व यांच्या मेंदूतील या केमिकल लोच्यामुळेच यांची बुद्धी कुंठित झालेली असून विचारशक्ती बधिर झालेली आहे.
In reply to लेख लिहून बोलायचं असेलच तर मी by श्रीगुरुजी
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो.
या वाक्यांना पुष्टी देणारी अनेक वाक्ये या लेखात आहेत.
खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते.
श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते.
यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल.
लेखातील वरील वाक्यातून लेखक असे दाखवून देत आहे की श्रद्धावान निर्बुद्ध आहेत, त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे, त्यांची विचारशक्ती बधीर झाली आहे, ते तर्कबुद्धीने विचार करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धा हास्यास्पद आहेत इ. इ. आणि मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करतो, मी बुद्धीप्रामाण्यवादी, तुम्हाला सुधारायची जबाबदारी माझ्यावर आहे इ. इ.
आपण काहीतरी महान कृत्य करीत आहोत असा आव आणून एक काल्पनिक कथा रचून लेखकाने लेख टाकून श्रद्धावाल्यांची हेटाळणी केली. परंतु काही थोडे अपवाद वगळता इतर सर्वांनी लेखाची व लेखकाची पिसे काढल्यानंतर लेखकाने कोणतेही स्पष्टीकरण न देता धाग्यावरून काढता पाय घेतला आहे.
In reply to अत्यंत उत्कृष्ट व संतुलित by श्रीगुरुजी
श्रद्धावान निर्बुद्ध आहेत, त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे, त्यांची विचारशक्ती बधीर झाली आहे, ते तर्कबुद्धीने विचार करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धा हास्यास्पद आहेत इ. इ.कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाणार्या लोकांसाठी कठोर विशेषणांचा वा उपायांचा एका हद्दीपर्यंत स्वीकार्य मानायला हरकत नाही. व्यक्तिशः मला वैज्ञानिक दृष्टीकोनाचं आजचं नि भविष्यातलं स्वरुप हे धार्मिक दृष्टिकोनापेक्षा भयंकर घातक वाटतं. इथे कुणाच्याही विचारशक्तीला काहीही झालेलं नाही मात्र फॅशन पाळायची आणि होलिस्टिक विचार करायचा नाही हा चॉइस दिसतो. ===================== बाय द वे, यनावाला, त्या विचारशक्ती बधीर दत्तभक्ताला त्याची प्रॉपर्टी मला दान करायचं सांगता का जरा? बुद्धी विचार आणि तर्क यांच्या बाबतीत त्यांची अवस्था पाहून हे अवघड नसावं. आणि नसलात तर तुमची करा.
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.त्याच वेळी स्त्रीयांचे पोटासाठी, चोचल्यांसाठी, हौसेसाठी, देहासाठी वा स्वतःचे स्वातंत्र्य म्हणून वेश्या बनण्याचे समर्थन करेन, मांसाहारासाठी दररोज कारखान्यांत प्राण्यांचे जीव जात असतील त्याला पाठींबा देईन? ते सगळं देवदासी आणि बळी यांच्यापेक्षा फिजिकली वेगळं नाही, नास्तिकांचं त्याच पापांचं व्हर्जन आहे, आणि त्याला धर्माचं लेबल नाही म्हणून सोईचं आहे. धर्माचं कवच काढलं की सगळी पापं कशी आधुनिक दिसतात!! कायदेशीर!!! ============================ मंदिरात जाऊन पाया पडण्यावर घेतलेलं ऑब्जेक्शन हेच अस्तिकांवरचं सर्वश्रेष्ठ ऑब्जेक्शन आहे.
In reply to लेख लिहून बोलायचं असेलच तर मी by arunjoshi123
In reply to एका वाक्यातून इतके (विपरीत) by पिलीयन रायडर
एका वाक्यातून इतके (विपरीत) अर्थ काढण्याचं तुमचं कसब माझ्याकडे नाही बुवा. देवदासींना ऑब्जेक्शन घेतलं पण वेश्या व्यवसायाला समर्थन आहे वगैरे.. अहाहा!!तुमची स्वतःची भूमिका काय आहे यावर माझा प्रतिसाद नव्हता. प्रतिसाद आपल्याला उद्देशून आहे हा भाग वेगळा, त्यामुळे माझं मत तुमच्या विचारांवरच आहे असं वाटणं साहजिक आहे, ते मला मान्य आहे. मी एक सामान्य निरिक्षण मांडलं - भौतिक स्वरुप तेच असलेल्या गोष्टि जेव्हा धर्माच्या नावाने होतात तेव्हा पुरोगामी विरोध करतात, अन्यथा करत नाहीत हा दांभिकपणा आहे. लैंगिक स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, आहारस्वातंत्र्य या नावांखाली पुरोगामी लोकांत जेव्हा देवदासी आणि बळी हे प्रकार होतात तेव्हा ते राजरोसपणे खपतात, त्यांना आधुनिक मानण्यात येतं, ते पुरोगाम्यांच्या रडारवर नसतात हा मी मांडलेला छोट्टासा मुद्दा आहे. हे माझं जनरल समाजातलं निरिक्षण आहे. ===================================================== तुमची व्यक्तिगत मतं कशी चूक आहेत हे सिद्ध करण्यात मला काही रस नाही. ती गैर, अवाजवी आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. "तुम्ही" हा माझ्या प्रतिसादाचा विषय नाही. ======================= अंततः पुन्हा सांगतो, तुमच्या विधानाचा तुम्हाला अभिप्रेत नसलेला कोणताही अर्थ काढण्याची मला इच्छा नाही. नसते. दॅट इज नॉट हाऊ आय आर्ग्यू. ज्या विचारसरणींस ते लागू आहे त्यांनी प्रतिवाद करावा.
सावधान टोळधाड येत आहे .....