ह्रदयातुनी

शार्दुल_हातोळकर जे न देखे रवी...
धावत्या पायास माझ्या लाभु दे आता विसावा भाबड्या माझ्या मनाला श्रावणाचा साज यावा अंतरी आहेत ज्याही वेदना जाव्या विरुनी लाभुनी हळुवार माया घावही यावे भरुनी शोधतो आहे निवारा त्या रुपेरी काळजाचा वाटते यावा जरासा गारवा आता सुखाचा अंतरी वाहे झरा जो माझिया ह्रदयामधुनी अमृताचा गंध त्याला ओंजळीने घे भरुनी उगवु दे सूर्यास पुन्हा जाळुनी अंधार सारा संपण्या आता उन्हाळा बरसु दे श्रावणधारा सोसुनी चटके हजारो वाट मी चाले कधीचा शमविण्या ये तू खरोखर दाह माझ्या अंतरीचा - शार्दुल हातोळकर
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

11 टिप्पण्या 2,516 दृश्ये

Comments

ज्ञानोबाचे पैजार नवीन

धावणे दाही दिशांना मृगजळाचा ध्यास आहे, अंतरीचा दाह शमवी तो तुझ्या अंतरीच आहे पैजारबुवा,

तृप्ति २३ नवीन

खूप छान कविता आहे. मला खूप आवडली. तृप्ती http://www.truptiskavita.com

देशप्रेमी नवीन

खुपच सुंदर कविता.. सुरेख रचना.. मस्त मस्त मस्त ....:)

गौरी कुलकर्णी २३ नवीन

खूप छान काव्यरचना ! हळूवार अन् भावविभोर .....मनाची तरल अवस्था तरी सोबत कणखरता दिसून येते.

मुरारबाजी नवीन

उगवु दे सूर्यास पुन्हा जाळुनी अंधार सारा संपण्या आता उन्हाळा बरसु दे श्रावणधारा - मुरारबाजी