ह्रदयातुनी

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
18 Sep 2017 - 11:45 pm

धावत्या पायास माझ्या
लाभु दे आता विसावा
भाबड्या माझ्या मनाला
श्रावणाचा साज यावा

अंतरी आहेत ज्याही
वेदना जाव्या विरुनी
लाभुनी हळुवार माया
घावही यावे भरुनी

शोधतो आहे निवारा
त्या रुपेरी काळजाचा
वाटते यावा जरासा
गारवा आता सुखाचा

अंतरी वाहे झरा जो
माझिया ह्रदयामधुनी
अमृताचा गंध त्याला
ओंजळीने घे भरुनी

उगवु दे सूर्यास पुन्हा
जाळुनी अंधार सारा
संपण्या आता उन्हाळा
बरसु दे श्रावणधारा

सोसुनी चटके हजारो
वाट मी चाले कधीचा
शमविण्या ये तू खरोखर
दाह माझ्या अंतरीचा

- शार्दुल हातोळकर

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2017 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार

धावणे दाही दिशांना
मृगजळाचा ध्यास आहे,
अंतरीचा दाह शमवी
तो तुझ्या अंतरीच आहे

पैजारबुवा,

शार्दुल_हातोळकर's picture

19 Sep 2017 - 9:00 pm | शार्दुल_हातोळकर

मनापासुन धन्यवाद पैजारबुवा !! __/\__

तृप्ति २३'s picture

20 Sep 2017 - 8:37 pm | तृप्ति २३

खूप छान कविता आहे. मला खूप आवडली.

तृप्ती
http://www.truptiskavita.com

शार्दुल_हातोळकर's picture

30 Sep 2017 - 1:58 pm | शार्दुल_हातोळकर

वाचल्या तुम्ही दिलेल्या लिंक वर....

अनिंदिता's picture

26 Sep 2017 - 2:26 pm | अनिंदिता

बाल कवी , अतिशय सुंदर कविता आहे !!!

देशप्रेमी's picture

29 Sep 2017 - 12:52 am | देशप्रेमी

खुपच सुंदर कविता.. सुरेख रचना..
मस्त मस्त मस्त ....:)

गौरी कुलकर्णी २३'s picture

29 Sep 2017 - 12:38 pm | गौरी कुलकर्णी २३

खूप छान काव्यरचना ! हळूवार अन् भावविभोर .....मनाची तरल अवस्था तरी सोबत कणखरता दिसून येते.

शार्दुल_हातोळकर's picture

30 Sep 2017 - 1:56 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद तृप्ति, अनिंदिता, देशप्रेमी, गौरी !! __/\__

पद्मावति's picture

30 Sep 2017 - 2:06 pm | पद्मावति

सुंदर.

मुरारबाजी's picture

3 Oct 2017 - 4:33 pm | मुरारबाजी

उगवु दे सूर्यास पुन्हा
जाळुनी अंधार सारा
संपण्या आता उन्हाळा
बरसु दे श्रावणधारा

- मुरारबाजी

शार्दुल_हातोळकर's picture

6 Oct 2017 - 12:26 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद पद्मावति आणि मुरारबाजी.