मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग १

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत नाही. दूतावासाला फेसबुकवर ‘लाईक’ केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी ‘पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद साधतील’ असं फेसबुकवर कळलं. ‘अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा’ असंही एक आवाहन जाहीर झालं. मग मी दूतावासाशी संपर्क साधला. ऑगस्टच्या अखेरीस पंतप्रधानांच्या भेटीची तारीख जाहीर झाली. ६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांगोंमधल्या Thuwunna Indoor Stadium (तुवन्ना स्टेडियम) मध्ये जनतेशी संवाद साधतील असं जाहीर झालं. या स्टेडियमची आसनक्षमता बत्तीस हजार आहे (Economic Times च्या पाच सप्टेंबरमधल्या बातमीनुसार मात्र ही क्षमता आठ हजार आहे.) आणि एरवी या स्टेडियममध्ये ‘युवा क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ चालतं. इथं फुटबॉलचे सामने होतात, ऍथलेटिक्सच्या स्पर्धा होतात. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेतले फुटबॉल सामने इथं झाले होते. स्टेडियम अद्ययावत आहे असं ऐकून होते. म्यानमामध्ये फुटबॉल सामन्यांना स्त्रिया हजेरी लावत नाहीत, त्यामुळे माझंही तिथं अद्याप जाणं झालं नव्हतं. १ सप्टेंबर रोजी दूतावासाकडून आमंत्रण पत्रिका आली. invite प्रत्येक व्यक्तीला एक आमंत्रण क्रमांक दिला होता. गंमतीची गोष्ट अशी की दूतावासाकडं माझे दोन इमेल पत्ते होते – पर्यायी पत्ता त्यांनीच मागितला होता, त्यामुळे दोन पत्ते होते. मला या दोन्ही पत्त्यांवर आमंत्रणं आली आणि दोन्ही ठिकाणी वेगळे आमंत्रण क्रमांक होते. एक क्रमांक होता १२००० + तर दुसरा होता २३,००० +. इतके लोक भाषण ऐकायला खरंच येणार होते की नंबर दहा हजारपासून द्यायला सुरूवात केली आहे – असा एक प्रश्न मनात आला. पण गर्दी असण्याची शक्यता भरपूर आहे कारण यांगोंमध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे म्यानमा नागरिक मोठ्या संख्येने आहेत. पंतप्रधानांचं भाषण मी अलीकडं फारसं ऐकत नाही. शिवाय या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचं मी समर्थन करत नाही. वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला मी इमेल करून माझी विरोधी मतं कळवलेली आहेत. (त्या विरोधी मतांना पंतप्रधान कार्यालय काही दाद देत नाही हा भाग वेगळा!) हे ज्यांना माहिती आहे त्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी पंतप्रधानांचं भाषण ऐकायला चालले आहे याबद्दल आश्चर्य वाटत होतं. माझी भूमिका स्पष्ट आहे (होती आणि राहिलही). मी सध्या यांगोंमध्ये राहते आहे. भारतीय पंतप्रधानांचा यांगोंमध्ये जाहीर कार्यक्रम आहे. मी त्याला जात आहे कारण ते आपल्या देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान आहेत. अन्य कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान असते आणि त्यांच्या निर्णयांना माझा कितीही विरोध असला असता तरीसुद्धा मी भाषण ऐकायला गेलेच असते आणि जाईनही. आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे. ‘अरे वा, मोदी साहेबांना मानलं पाहिजे. चीनचा धोका लक्षात घेऊन म्यानमाला भेट देण्याची दूरदृष्टी दाखवणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ना ते’ असे गौरवोद्गार दोन-तीन लोकांनी काढल्यावर मी चकित झाले. मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं. (सोशल मीडिया झिंदाबाद किंवा जनतेची विस्मरणशक्ती झिंदाबाद!) पण भारत आणि म्यानमा यांच्यात गेली अनेक वर्ष सातत्याने ‘स्टेट विजिट्स’ होत आहेत. विद्यमान पंतप्रधानांची ही काही पहिली म्यानमा भेट नाही, स्टेट विजिट मात्र पहिली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये आसिआन (ASEAN- Association of South-East Nations) आणि अन्य बैठकांच्या (ASEAN Summit and Related Summits) निमित्ताने श्री. मोदी म्यानमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेपिटॉ (Nay Pyi Taw) या राजधानीच्या शहरात सुमारे तीनशे भारतीय नागरिकांशी संवादही साधला होता. किंबहुना म्यानमाला भेट देणारे मोदी काही पहिले भारतीय पंतप्रधान नाहीत, ते पाचवे पंतप्रधान आहेत. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी म्यानमाला भेट दिली होती. मे २०१२ मध्येही डॉ. सिंह म्यानमात आले होते. उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी २००९ मध्ये आले होते तर राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्च २००६ मध्ये तीन दिवसांच्या म्यानमा दौऱ्यावर आले होते. श्री. राजीव गांधी १९९८७ मध्ये बर्मात (बर्माचं म्यानमा असं नामांतरण १९८९ मध्ये झालं.) येऊन गेले. तत्पूर्वी श्रीमती इंदिरा गांधी जून १९६८ आणि मार्च १९६९ अशा दोनवेळा बर्मामध्ये येऊन गेल्या आहेत. त्याच्याही आधी श्री. लालबहादुर शास्त्री १९६५ मध्ये आले होते तर श्री. नेहरू १९५४ मध्ये आले होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाने म्यानमाला भेट दिली होती. श्रीमती सुषमा स्वराज २०१७ मध्ये आल्या होत्या तर श्री अजित डोवल २०१५ मध्ये आले होते. श्रीमती निर्मला सीतारामनही येऊन गेल्या आहेत. अशा भेटींची मोठी यादी देता येईल. म्यानमा (बर्मा) नेत्यांच्याही अनेक भारतभेटी झाल्या आहेत. जुलै २०१७ मध्ये म्यानमाचे लष्करप्रमुख मी आँग लाय (Min Aung Hlaing) आठ दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. म्यानमाच्या परराष्ट्रमंत्री आणि स्टेट कौन्सेलर आँग सान सू ची (Aung San Suu Kyi) ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. ऑगस्ट २०१६ मध्ये म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष ठिन च्यो (Htin Kyaw) भारतात येऊन गेले. लष्करप्रमुख तान् श्वे (Than Shwe) (तान हा शब्द चुकीचा आहे खरं तर – Tha चा उच्चार देवनागरीत कसा करायचा ते मला माहिती नाही) हे २००४ मध्ये आणि जुलै २०१० मध्ये भारतात आले होते. ऑक्टोबर २०११ आणि डिसेंबर २०१२ मध्ये म्यानमा राष्ट्राध्यक्ष तै सै (Thein Sein) भारतभेटीवर आले होते. १९८० मध्ये ने विन भारतात येऊन गेले. साधारणपणे प्रत्येक स्टेट विजिटमध्ये दोन-तीन करार होतात असं दिसतं. उदाहरणार्थ डॉ. सिंह यांच्या २०१२ च्या भेटीत बारा द्विपक्षीय करारांनर सह्या झाल्या. म्यानमा आणि भारत यांच्यात आजवर किती करार झाले हे शोधायला लागेल. १९८७ ते २०१२ या कालखंडात फारशा भेटी झाल्या नाहीत हे खरं, पण त्याला ऐतिहासिक कारणं आहेत. म्यानमामध्ये १९६२ मध्ये लष्करी उठाव झाला होता आणि त्यानंतर थेट २०१६ मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं (निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली) हे आपल्याला माहिती असेलच. ‘लोकशाही मार्गाने निवडून न आलेल्या सरकारशी जवळीक निर्माण न करण्याचं’ भारत सरकारचं धोरण त्या काळात होतं असं वाटतं. लष्करी दडपशाहीमुळे जगाने या काळात बर्मा-म्यानमाला वाळीत टाकलं होतं हे विसरता कामा नये. याचा पुरेपूर फायदा चीनने घेतला. आणि हे लक्षात घेऊन की काय पण १९९० मध्ये भारताच्या धोरणात बदल होऊन म्यानमामधल्या लष्करी सरकारशी भारत सरकारने संपर्क वाढवला. भारत-म्यानमा संबंधांवर काही लिहिण्याचा मोह टाळून मी परत पंतप्रधानांच्या भाषणाकडं येते. J पंतप्रधानांचा म्यानमा दौरा अडीच दिवसांचा आहे. त्यात नेपिटॉमध्ये म्यानमा सरकारबरोबर अधिकृत बैठका, बगान परिसरात आनंद मंदिराला भेट (२०१६ च्या भूकंपानंतर या मंदिराच्या पुनरूज्जीवनाचं काम Archeological Survey of India करत आहे) आणि मग यांगोला आगमन. यांगो शहरात श्वेडगो पगोडा, बोज्या आँग सान म्युझियम आणि संध्याकाळी नागरिकांशी संवाद असा कार्यक्रम आहे. दरम्यान दूतावासाकडू उद्याच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर सूचना आल्या आहेत. त्यानुसार दुपारी साडेतीनला प्रवेशद्वार उघडेल, खाण्या-पिण्याचे पदार्थ, कॅमेरा वगैरे गोष्टी आणायला परवानगी नाही (पाणीही नाही), ओळखपत्र आणि दूतावासाचं आमंत्रणपत्र सोबत आणावं .. वगैरे अकरा सूचना आहेत. साडेसहाला नागरिकांना प्रवेश बंद केला जाईल आणि सात वाजता पंतप्रधानांचं भाषण सुरू होईल असं दिसतं आहे. दूतावासाकडून आमंत्रण आलेल्या सर्व व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून इमेल पाठवण्यात आली. हे पत्र मात्र मला एकाच इमेल पत्त्यावर आलं -) ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- From: Narendra Modi | Add to Address book |This is not spam To: ------------------- ........... Subject: Namaste from Narendra Modi! Date: Mon, 04 Sep 2017 17:07:23 IST Dear Savita .......Ji, It is with great delight and enthusiasm that I begin my Myanmar visit from 5th September 2017. This two-day visit is my first bilateral visit to Myanmar, a valued neighbour and a close friend of India’s. My visit to Myanmar includes programmes in the historic city of Bagan and Yangon. On the evening 6th September, I will be addressing the Indian community in Yangon, where I look forward to seeing you. We take immense pride in our diaspora, which has made India proud on the global stage. The Indian diaspora in Myanmar has brought India and Myanmar a lot closer in the past decades. Do write to me on a specially created open forum on the Narendra Modi Mobile App with your thoughts and ideas. I would refer to some of the ideas received during my speech at the community programme. See you in Yangon on the 6th! Yours, Narendra Modi ---------------------------------------------------------------------------------------------------------------- मी ‘नरेंद्र मोदी’ अॅपवर ‘भारतात शिकणा-या म्यानमा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने विशेष शिष्यवृत्ती जाहीर कराव्यात’ असं सुचवलं. यातून दोन देशातल्या नव्या पिढ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील असं मला वाटतं. अशी योजना अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे मला माहिती आहे आणि त्यातून अफगाण-भारत संबंध स्थिरावायला मदत होते असं मला अफगाणिस्तानमध्ये आलेल्या अनुभवांवरून वाटतं. Sir, we need to declare special scholarships for Myanmar students studying in India. It will help to build bridges between the young generations of both the countries. In addition to this Myanmar needs a good pool of trained Civil Servants, which will help strengthening democracy. (via NMApp) माझ्याकडून तयारी सगळी झाली आहे. आता सहा सप्टेंबरची वाट पाहते आहे. :-)

वाचने 26578 वाचनखूण प्रतिक्रिया 119

पुंबा Tue, 09/05/2017 - 15:11
भारी आहे लेख... भाषणाबद्दल तर लिहालच.. पण मोदींच्या दौर्‍याचे प्रतिबिंब म्यानमा मिडिया आणि सामान्य लोकांमध्ये कसे पडत आहे, शिवाय रोहिंग्या मुस्लिमांसंदर्भात जी भुमिका भारत सरकार घेत आहे त्याबद्दल जमल्यास लिहा..

योगी९०० Tue, 09/05/2017 - 15:15
छान...भेटीनंतर आणि मोदींच्या भाषणानंतर सविस्तर वृत्तांत लिहावा. पण तुम्ही तुमचा विजीटींग इन्वाईट कोड असा द्यायला नको होता असे वाटले. तुम्हाला दोन कोड आले आहेत असे म्हणता आणि दोन्ही कोड इथे टाईपले आहेत.

पंतप्रधान कसे का असेना पण नमनाला सविस्तर घडाभर तेल घालण्याचं नक्की प्रयोजन कळलं नाही काही अनपेक्षित अपेक्षित आहे का :) .. एका वाक्यात सांगायचं तर यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण ऐकण्यास आपण जाणार आहात बरोबर ना ?

In reply to by माझीही शॅम्पेन

अद्द्या Tue, 09/05/2017 - 17:45
लेखाच्या आधी प्रतिसाद वाचायची जुनी सवय अशी कामाला येते, वेळ वाचवल्या बद्दल धन्यवाद

कोंबडा Tue, 09/05/2017 - 18:07
एकूण काय तर मी म्यानमार राहतो. मला मोदींनी भाषण ऐकायला बोलावले आहे. विश्वास नाही बसत? हा घ्या तिकीटांचा फोटो. मेल पण आलेत दोन दोन. बघितलं? आता फुले वाहा

In reply to by मराठी कथालेखक

पैसा Tue, 09/05/2017 - 21:42
आतिवास ताई आणि तुम्ही म्हणताय ते "मला पहा फुलं वहा" वाले लेखक यात कुठेच साम्य/तुलना शक्य नाही. त्यांचे आधीचे सगळे लिखाण वाचून काढा आणि मग पिंका टाका. एवढे तटस्थ वृत्तीने अनुभव मांडणे फार थोड्यांना जमते.

In reply to by पैसा

मराठी कथालेखक Tue, 09/05/2017 - 23:22
एखाद्या लेखावर प्रतिसाद देताना (तुमच्या भाषेत पिंका) आधीचे लेख का वाचायला हवेत ? हा भाग १ आहे ना ? 'पुर्वग्रह करुन' प्रतिसाद देण्याची गरज वाटत नाही..असो.

In reply to by मराठी कथालेखक

पैसा Wed, 09/06/2017 - 06:42
पण यापूर्वी त्यांनी मिपावर प्रदीर्घ काळ भरपूर लेखन केलर आहे. त्या राजहंस प्रकाशन च्या मातब्बर लेखिका आहेत. आत्मप्रौढी मिरवायची त्यांना गरज नाही आणि त्यांनी ते यापूर्वी कधी केले नाही.

In reply to by पैसा

मराठी कथालेखक Wed, 09/06/2017 - 12:15
तुम्ही म्हणताय ते सगळं खर असेल तरी जर हा लेख वाचताना वाचकाला असे वाटले तर त्याने ते व्यक्त का करु नये ? एखाद्या व्यक्तीचा स्वभाव काळानुरुप बदलू शकतो. पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे हा लेख निनावी अथवा नवीन आयडीने प्रकाशित झाला असता तर काय प्रतिक्रिया असती ? कोणताही लेख वाचताना त्यातील मजकूरास महत्व द्यावे असे मला वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

पैसा Wed, 09/06/2017 - 13:11
त्यांनी जे जसे घडले तसे लिहिले आहे. इतर १२/१५/२४ हजार लोकांप्रमाणे मला पास मिळाला असं लिहिले आहे तर त्यात आत्मप्रौढी कुठून आली? बाकी १०/५०/शंभर जण वगळून मलाच एकटीला पास आलाय असं म्हटलं तर आत्मप्रौढी म्हणता येईल, बरोबर ना?

In reply to by मराठी कथालेखक

arunjoshi123 Wed, 09/13/2017 - 17:48
पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे हा लेख निनावी अथवा नवीन आयडीने प्रकाशित झाला असता तर काय प्रतिक्रिया असती ?
या मुद्द्यात दम आहे. तेच सौजन्य पुढे चालू ठेऊन - मोदक यांनी विचारलेल्या प्रश्नात देखिल आहे.

In reply to by कोंबडा

arunjoshi123 Wed, 09/13/2017 - 17:42
बहुतेक इतक्या विचित्र प्रतिक्रियेमुळे त्यांनी पुढचे भाग मिपावर टाकले नसतील. ============= संशयाचा फायदा जरी द्यायचा म्हटला तरी त्यांनी असं काहीच लिहिलं नाही ज्यात आत्मप्रौढी आहे. ================= शिवाय अवांतर करण्यात तुम्ही मला खूपच टफ कंपिटिशन देत आहात. प्लिज बि काइंड.

मोदक Tue, 09/05/2017 - 19:48
आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे. उत्तम विचार. जशी तुम्ही विरोधी मते पंतप्रधान कार्यालयाला कळवता तशी एखाद्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय पक्षाची मते पटली नाहीत तर त्या त्या पक्षाला / व्यक्तीला कळवता का..? उदा - मणिशंकर अय्यरांनी मोदी विरोधात पाकिस्तानची मदत मागणे तुम्हाला पटले का..? मग हे पटले नसल्यास तसे काँग्रेसच्या कार्यालयाला / अय्यरांना कळवलेत का..? त्या विरोधी मतांना कितपत दाद मिळत आहे..?

In reply to by मोदक

पिलीयन रायडर Tue, 09/05/2017 - 19:56
लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये नाहीत म्हणून ह्या लेखाला अशा विचित्र प्रतिक्रिया मिळत आहेत का? गँग अप केल्यासारखं वाटतंय बरं का आता. आता त्या भाषण ऐकून काही टीका करतील तर तुटूनच पडाल. त्यांना जे वाटलं त्या ते करत आहेत. मग तुम्ही हे केलंत का? ते का नाही केलंत? असे प्रश्न कशाला? त्याने काय फरक पडतो? जे पटत नाही ते कळवणं किंवा एखादी गोष्ट सुचवणं हे देखील पुष्कळ आहे की. अनेक जण ते ही करत नाहीत.

In reply to by पिलीयन रायडर

मोदक Tue, 09/05/2017 - 20:11
?? मी मोदीविरोधाचा मुद्दा घेतलाच नाहीये. स्वच्छ साधा प्रश्न विचारला आहे. त्यांना जे वाटलं त्या ते करत आहेत. मग तुम्ही हे केलंत का? ते का नाही केलंत? असे प्रश्न कशाला? त्याने काय फरक पडतो? जे पटत नाही ते कळवणं किंवा एखादी गोष्ट सुचवणं हे देखील पुष्कळ आहे की. अनेक जण ते ही करत नाहीत. इतक्या अभ्यासू, बॅलन्स्ड आणि अनुभवी व्यक्तीकडून सिलेक्टिव्ह विरोध होणार नाही याची खात्री आहे मग विरोधाला प्रतिसाद काय आला याची उत्सुकता आहे इतकेच..!

In reply to by मोदक

पिलीयन रायडर Tue, 09/05/2017 - 21:50
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची स्तुती केली असती तर तू हे प्रश्न विचारले असतेस का? नक्कीच नाही. मला स्वतःला उत्तर मिळालेले आणि मोदींना भेटलेले लोक माहिती आहेत पण ते भाजपचे कार्यकर्तेही होते जुने, त्यामुळे मी सरसकट सगळयांना पोच मिळते असं म्हणणार नाही. मिळत नाहीच असंही नाही. पण त्या इतकच म्हणत आहेत की त्यांना नाही मिळाली. हे तर सत्य आहे ना? मग कुठे आहे सिलेक्टिव्ह विरोध? मोदींवर लेख आहे तर तेच अनुभव येणार ना लेखात?

In reply to by पिलीयन रायडर

मोदक Tue, 09/05/2017 - 22:08
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची स्तुती केली असती तर तू हे प्रश्न विचारले असतेस का? नक्कीच नाही. हे कशावरून म्हणत आहेस पिरा..? पण त्या इतकच म्हणत आहेत की त्यांना नाही मिळाली. हे तर सत्य आहे ना? मग कुठे आहे सिलेक्टिव्ह विरोध? मोदींवर लेख आहे तर तेच अनुभव येणार ना लेखात? मी कुठे त्यांचा अनुभव नाकारत आहे? पोच मिळायलाच हवी अशी माझी भूमीका आहे. तसेच त्यांच्या तटस्थतेला "उत्तम विचार" असेही संबोधले आहे. त्यांचा मोदींना सिलेक्टिव्ह विरोध आहे मी म्हणाले आहे का..? (माझे वाक्य - इतक्या अभ्यासू, बॅलन्स्ड आणि अनुभवी व्यक्तीकडून सिलेक्टिव्ह विरोध होणार नाही याची खात्री आहे) हा लेख मोदींच्या भेटीबद्दल असताना लेखातले अनुभव मोदींबद्दल येणार याबद्दल माझ्याही मनात कोणताही संदेह नाही. उलट तेच यावेत अशी अपेक्षा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

पगला गजोधर Tue, 09/05/2017 - 23:17
लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये नाहीत म्हणून ह्या लेखाला अशा विचित्र प्रतिक्रिया मिळत आहेत का? गँग अप केल्यासारखं वाटतंय बरं का आता. अतिप्रचंड तिव्रपणे सहमत पीरा बरोबर.....

In reply to by arunjoshi123

पगला गजोधर Wed, 09/13/2017 - 14:30
पिरा, पग नि जेवां नी जे केले आहे त्याला देखिल गँग अप असे म्हणता येईल का?
हो खुशाल म्हणा हवं तर तसं !... पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय ....असं वाटतंय तुम्हाला काका ?

In reply to by arunjoshi123

जेम्स वांड Wed, 09/13/2017 - 15:53
माझ्या प्रतिसादाची जबाबदारी माझ्या एकट्याचीच. कोणी सहमत असले सोबत असले नसले तरी फरक पडत नाही. जस्ट फॉर पोस्टरिटी

In reply to by पिलीयन रायडर

arunjoshi123 Wed, 09/13/2017 - 17:31
आता त्या भाषण ऐकून काही टीका करतील तर तुटूनच पडाल.
असं का होऊ नये? मोदींचे कट्टर समर्थक असणे चूक आहे का?

In reply to by मोदक

+27381. पंतप्रधान कार्यालय काय प्रत्येक पत्राची पोहोच द्यायला बनवलय का? बाकी भाषणानंतरचा लेख वाचायला उत्सुक आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मोदक Tue, 09/05/2017 - 20:16
पंतप्रधान कार्यालय काय प्रत्येक पत्राची पोहोच द्यायला बनवलय का? हो. पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येक पत्राला / सूचनेला / मताला उत्तर दिले पाहिजे - हे बंधनकारक असलेच पाहिजे. माझा अनुभव असा आहे की, आपण योग्य मार्गाने सूचना दिली आणि त्यावर एखादी कार्यवाही आवश्यक असेल तर ती सूचना त्या त्या खात्याकडे वर्ग केली जाते. संबंधित अधिकार्‍याचा मेल आयडी आणि फोन नंबर दिला जातो. नंतर त्या अधिकार्‍यासोबत पाठपुरावा केला तर उत्तर लगेचच मिळते. जर एखादी नवीन कल्पना सुचवली तर सेक्रेटरी कडून "सूचना स्वीकारली आहे" असा शेरा येतो. याचे पुढे काय होते माहिती नाही.

सुबोध खरे Tue, 09/05/2017 - 20:15
आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचे आहे. हीच शिकवण लष्करी अधिकाऱ्यांना आवर्जून दिली जात असे याची आठवण झाली. परदेशी दौऱ्याला जाण्याअगोदर तेथे आपण आपल्या देशाला कमीपणा आणेल असे न वागण्याची आवर्जून आठवण करून दिली जात असे /जाते सरकार कोणतेही असो परराष्ट्र धोरण सहसा देशाच्या हिताचेच असे आणि असते ( आणि असायला पाहिजे). राजदूताची व्याख्या -- स्वदेशाच्या हितासाठी परदेशात खोटे बोलणारा "प्रामाणिक" मनुष्य. श्री मोदी यांचे परराष्ट्र धोरण जास्त स्वयंप्रेरित ( proactive) आहे असे वाटते.

श्रीगुरुजी Tue, 09/05/2017 - 22:19
इथले काही प्रतिसाद खूपच विचित्र वाटले. आतिवासताई प्रामाणिकपणे लिहीतात. "मला पहा फुलं वहा" असे किंवा अशा अर्थाचे या लेखात कोठेही नाही. काहीजण त्यांना विनाकारण का टोमणे मारत आहेत ते समजत नाही.

रमेश आठवले Wed, 09/06/2017 - 04:55
म्यानमा भारताशी जोडलेला देश आहे. आपल्या येथे आतंकी कारवाया करून तेथे आसरा घेणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे. तसेच आता त्याहून भारतात येणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांचा नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन्ही देशाचे सम्बन्ध अधिक सुधारण्याच्या दृष्टीने आपण मोदींना केलेल्या सूचना चांगल्या वाटतात. त्यांची एक प्रत दूतावासाला द्यावी असे वाटते. मोदी ज्या ज्या देशात जातात तेथील भारतीयांशी वेळात वेळ काढून संवाद साधतात याचे कौतुक वाटते . या भारतीयांत बहुसंख्य भारतात मते देणारे नसतात. "Sir, we need to declare special scholarships for Myanmar students studying in India. It will help to build bridges between the young generations of both the countries. In addition to this Myanmar needs a good pool of trained Civil Servants, which will help strengthening democracy."

In reply to by रमेश आठवले

सुबोध खरे Wed, 09/06/2017 - 09:13
या भारतीयांत बहुसंख्य भारतात मते देणारे नसतात.] उद्या भारताच्या बाजूने बोलणे किंवा तेथे भारताच्या हितासाठी प्रयत्न करणारे हेच लोक असतील हे लक्षात ठेवा. इस्रायलने जगातील ज्यूंचे असेच वर्गीकरण केले आहे १) तटस्थ २) इस्रायलबद्दल सहानुभूती असणारे ३) इस्रायलच्या हितासाठी सक्रिय कार्य करण्याची तयारी असणारे. आणि या लोकांच्या माध्यमातून इस्रायल परदेशात आपल्या देशाचे हित साधत असतो. याच विचारामुळे श्री मोदी हे अनिवासी भारतीयांशी संवाद साधत असतात. हे दूरगामी विचार केल्यास राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. अर्थात मोदिरुग्ण त्यांच्या सततच्या परदेश दौऱ्याबद्दल गरळ ओकत असतात ते केवळ द्वेषापोटी. ते सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

वरुण मोहिते Wed, 09/06/2017 - 09:28
जगभरातील ज्यू विविध देशात काय कामे करतात , कसे एजंट असतात माहित असेलच कि . भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला हे शक्य नाही त्यामुळे उदाहरण गैरलागू आहे .प्रतिसाद मोदीप्रेमापोटी आहे आपला .

In reply to by वरुण मोहिते

सुबोध खरे Wed, 09/06/2017 - 09:46
हा प्रतिसाद निवासी भारतीयांबद्दल नसून अनिवासी भारतीयांबद्दल आहे. यातून आपला फक्त मोदी द्वेष दिसत आहे. वर मी म्हणालोच आहे कि परराष्ट्रीय धोरण हे पक्षातील असते म्हणजेच सरकार कोणत्याही पक्षाचे असो परराष्ट्र धोरण देश हिताचेच असते. मोदी साहेब जास्त सक्रिय आहेत एवढेच. भारताचे "पूर्वेकडे पहा"(LOOK EAST) हे धोरण श्री नरसिंह राव यांच्या सरकारपासून चालू झाले आहे आणि तेच धोरण श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी हिरीरीने राबविले. आता याच धोरणाचे पुढचे पाऊल म्हणून मोदी सरकारने पूर्वेकडे सक्रिय व्हा (ACT EAST) हे धोरण चालू केले आहे. https://en.wikipedia.org/wiki/Look_East_policy_(India)

सुनील Wed, 09/06/2017 - 08:19
चांगली सुरुवात. अफगाणिस्थानप्रमाणे म्यानमारबद्द्लही लेखमाला लिहावी, ही विनंती.

बाजीप्रभू Wed, 09/06/2017 - 08:32
पुढल्या भागांसाठी शुभेच्छा... मोदींसोबत म्यानमारचीही माहिती लिहा... स्पेशली म्यानमारवासीयांच्या नजरेतून मोदी भेट.

मृत्युन्जय Wed, 09/06/2017 - 10:40
वाह. मोदींनी म्यानमार सुद्धा काबीज करायचे ठरवलेले दिसते आहे आता. गुड. बाकी मोदींचे भाषण कसे झाले, त्यांनी भाषणात तुम्ही दिलेल्या सूचनेबद्दल गौरवपर उद्गार काढले की नाही, भाषणात कुठले मुद्दे अंतर्भूत होते हे नक्की सांगा. आणि हो हे पण नक्की सांगा की नंबरांची सुरुवात १०००० पासुन केली होती की १२००० पासुन की २३००० पासुन.

अनिंद्य Wed, 09/06/2017 - 11:36
@ आतिवास, तुमचे लेखन वाचले आहे. तुमच्या संवेदनशील मनाने टिपलेल्या घटना आणि त्यावरचे तुमचे सहज-समर्पक भाष्य ह्या तुमच्या फॉरमॅटचा मी चाहता आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचे प्रत्यक्ष वर्णन आणि मत वाचायची प्रतीक्षा आहे, अवश्य लिहा. - अनिंद्य

निशदे Wed, 09/06/2017 - 21:22
तुमचे लेख वाचण्यास कायमच उत्सुक असतो. तुमचे विचार माझ्या राजकीय व सामजिक विचारसरणीबरोबर दरवेळी जुळतात असे नाही पण तुमच्या लेखनातील संवेदनशीलता आणि बहिर्मुखी विचार करण्याची पद्धत मला आवडते. पुभाप्र.

गामा पैलवान Fri, 09/08/2017 - 02:41
अतिवासताई, माझा हा प्रतिसाद म्हणजे सरळसरळ लहान तोंडी मोठा घास आहे. कारण की कर्तृत्वाने मी तुमच्या पासंगालाही पुरणारा नाही. तुमचा लेख आणि त्यावरची मतमतांतरे वाचली. लेख बराचसा पटला. विशेषत: मोदी आपले शत्रू नाहीत हा भाग अधिकंच समर्पक वाटला. पण गाडी एका वाक्यापाशी अडली. हेच ते वाक्य :
मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं.
हे असं का वाटतं यामागील कारण तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? केला असल्यास विचारप्रक्रिया व/वा निष्कर्ष वाचायला आवडतील. लोकं अज्ञ आहेत हे खरं कारण नव्हे, हे तुम्हाला माहिती आहे. असो. मोदींना विरोध करणे चुकीचे नाही. मात्र यासाठी भरभक्कम वैचारिक चौकट हवीच. तुम्ही ज्या डाव्या वैचारिक भूमिकेतून मोदींना विरोध करू पाहताहात, ती वैचारिक चौकट नसून शुद्ध भंपकपणा आहे. तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेतूनंच करावा लागेल. डावी भूमिका या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी आहे. वैचारिक चौकटीच्या अभावामुळे तर उपरोक्त प्रथमघटनाविधान जन्माला आलं नाहीये? माझी आपली उगीच शंका! तसं असेल तर हा धोक्याचा इशारा समजा. ही घसरगुंडी नाही, पण सुरुवात नक्कीच आहे म्हणून समजा. तुम्हाला बरंच आत्मचिंतन करावं लागेल. डाव्या वैचारिक चौकटीचा कसा व का बोजवारा उडाला हे जाणून घ्यावं लागेल. हा खडतर प्रवास आहे. बऱ्याच ठिकाणी यशस्वी माघारही घ्यावी लागेल. वेळ पडली तर घ्या बिनधास्त. तुमचा म्हाग्रू होऊ नये इतकीच इच्छा आहे. अर्थात म्हाग्रू पार पुढची स्थिती आहे हे मान्य. पण म्हणतात ना मम मन चिंती ते वैरी न चिंती .... ! शुभास्ते पन्थान: सन्तु. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोदक Fri, 09/08/2017 - 08:28
तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेतूनंच करावा लागेल. डावी भूमिका या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी आहे. असहमत. तटस्थ राहूनही विरोध करता येईल की. अर्थात यामध्ये मोदींनी केलेल्या कामाचे श्रेय त्यांनाच देण्याची आणि फिरवाफिरवी न करता कन्स्ट्रक्टिव्ह विरोध करण्याची तयारी हवी - ही गोष्ट वरवर पाहता साधीसोपी वाटली तरी सर्वच विचारवंतांना जमेल असे नाही.

In reply to by मोदक

गामा पैलवान Fri, 09/08/2017 - 13:36
मोदक, तटस्थ राहून विरोध केला तर तो केवळ मोदी या माणसाचा विरोध होईल. जर विचारसरणीला विरोध करायचा असेल तर वैचारिक पाठबळ हवंच. तिथे तटस्थता कामाची नाही. माझ्या मते लेखिकेचा विरोध दुसऱ्या (= वैचारिक) प्रकारचा आहे. पण वैचारिक रसद नसल्यामुळे पहिल्या प्रकाराकडे (= व्यक्तीविरोधाकडे) झुकतो आहे. आपण मोदींना विरोध कशासाठी करायचा यावर लेखिकेस बरंच विचारमंथन करावं लागेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोदक Fri, 09/08/2017 - 13:58
गापै.. तुमच्या मतावर थोडा विचार करून व्यक्त होईन. पण वरील प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की सगळे तुम्हीच ठरवत आहात आणि सरळ सरळ निर्णय देत आहात. आपण एक काम करूया - लेखिकेची या धाग्यावर उत्तरे येऊदेत. मगच आपण त्यांच्या भूमीकेविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.

In reply to by गामा पैलवान

मराठी कथालेखक Fri, 09/08/2017 - 17:22
वैचारिक चौकटीच्या अभावामुळे तर उपरोक्त प्रथमघटनाविधान जन्माला आलं नाहीये?
बाकी सगळं ठीक आहे.. पण मला तुमची ही स्वतःच्याच पोस्टमधील विधानाला केलेली लिंक आवडली. कसं करायचं हे ?मी पण प्रयोग करुन बघतो.

मनिमौ Fri, 09/08/2017 - 06:42
ताई. भय ईथले पासुन मला तुमची लेखन शैली आवडते. पुढच्या भागात मोदींच्या भाषणात काय झाले हे वाचण्यास उत्सुक आहे. त्याचप्रमाणे नंतरच्या काही महिन्यात पंतप्रधान भेटी मुळे म्यानमार मधे जर काही बदल घडले तर तःही वाचायला आवडेल

चामुंडराय Fri, 09/08/2017 - 07:25
सविता ताई, भाषणाचा वृत्तांत जरूर लिहा. वाचायला आवडेल. बाकी भाषण ऐकून ब्रह्मदेशातील लोकांची अजि म्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था झाली असेल कि काय न कळे.

यशोधरा Fri, 09/08/2017 - 07:30
तुमचे लेख नेहमीच आवडतात, पण, ह्या लेखात भट्टी जरा जमली नाही, असं कुठेतरी वाटत राहिलं. आतापर्यंत तुमचं लेखन वाचलं आहे ते बर्‍यापैकी तटस्थ भूमिकेतून लिहिल्याचं जाणवतं, पण ह्या लेखात मात्र तसं वाटलं नाही. अर्थात, तुमची मतं लिहायचा तुम्हांला अधिकार आहेच पण वाचताना मला काहीतरी खटकत राहिलं हे मात्र निश्चित.

जेम्स वांड Fri, 09/08/2017 - 09:03
पण, ऐकणार असाल तर एकच सल्ला देतो ताई, नका लिहू. पुढं काय होणार माहिती असताना त्यात ठरवून उडी घेण्यात काय पॉईंटे? मी विकाससमर्थक पर्यायाने मोदी समर्थक आहेच, पण म्हणून मी वरच्या काही विचित्र अन औचित्यहीन कॉमेंट्सना सपोर्ट करणार नाही. तुम्ही अफगाणिस्तानमध्ये काम केल्याचं भय इथले वाचून कळले, त्याबद्दल कौतुक, बाकी मनापासून सांगता, लिहू नका पुढला भाग.

गामा पैलवान Fri, 09/08/2017 - 14:35
मोदक,
पण वरील प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की सगळे तुम्हीच ठरवत आहात आणि सरळ सरळ निर्णय देत आहात.
यू आर अब्सोल्यूटली राईट! हे सगळं मीच करंत असून मीच माझा निर्णय देत आहे. नेमकं हेच मला अतिवासताईंनी त्यांच्या स्वत:च्या बाबतीत करायला हवंय. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 21:23
मोदक,
आपण एक काम करूया - लेखिकेची या धाग्यावर उत्तरे येऊदेत. मगच आपण त्यांच्या भूमीकेविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.
कार्रेक्ट ! लेखिकेची उत्तरे आली तर स्वागतच आहे. मात्र तशी येण्याची अपेक्षा नाही. कारण की माझ्या कथनाचा भर आत्मचिंतनावर आहे. ते केल्यावर मिळालेली उत्तरं इथे थेटपणे मांडण्याची गरज लेखिकेला नसावी. पण मांडलीच तर स्वागत आहे. :-) कदाचित स्वतंत्र धाग्याच्या स्वरूपातही येऊ शकतात. पण जे काही येईल ते कसदार असेल. आ.न., -गा.पै.

आदिजोशी Tue, 09/12/2017 - 15:56
भाषण भाग १ मधे भाषणाविषयी काहीच नाही? असो. मुळात मोदी आवडत नसल्याने बर्‍याच न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात पहिला भाग खर्ची पडलाय. काँग्रेस जसं मोदींनी काहीही केलं तरी आम्ही पण हे करत होतो... हे असलं काही पहिल्यांदाच होत नाहीये... वगैरे वगैरे बोलून घेतं तसा हा भाग वाटला. असं असलं तरी दुसर्‍या भागाविषयी उत्सुकता आहे. होपफुली त्यात भाषणाबद्दल थोडं फार असेल. नाही तर ३:३० ते ७:०० पर्यंतचा वॄत्तांत असायचा.

कपिलमुनी Wed, 09/13/2017 - 15:04
सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि मिपा वरील मोदी विरोधी लिखाण केल्यावर आयडीच्या झालेल्या हत्या किन्वा सन्यास यात कमालीचे साम्य जाणवत आहे.

In reply to by कपिलमुनी

मोदक Wed, 09/13/2017 - 15:19
आयडीची हत्या..?? आयडीची उडवण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे आहेत -तुम्ही संपादक मंडळावर पक्षपातीपणाचे आरोप करत आहात याचे भान आहे ना..? संपादक मंडळ - कृपया लक्ष घालावे.

In reply to by मोदक

कपिलमुनी Wed, 09/13/2017 - 15:45
काही आयडी कैलासवासी झाले , काही वामा झाले तर काहींनी लिहिणे बंद केले आहे. इथे उगाच सं मं चा नाव घेऊन शिमगा क्रू नै

In reply to by मोदक

कपिलमुनी Wed, 09/13/2017 - 16:49
आयडी उडवला तर दुसरा घेता येतो आणि बरेचजण घेतात पण लिहिणे बन्द करयला भाग पाडणे यालाच जालीय हत्या मी मानतो.

In reply to by कपिलमुनी

मोदक Wed, 09/13/2017 - 16:57
बरोबर.. कन्हैय्या आणि उमर खलिद पण तुमच्या लेखी क्रांतीकारक असतील, आता यावर आंम्ही आक्षेप घेतला तर लगेच भावना दुखवून लिखाण बंद करू नका इतकेच.