Skip to main content

महामानव

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 24/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6333
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

वाह वाह पण ह्या वसुंधरे वर श्रीराम, लंकेश्वर रावण ते आजचे छान छान नेते हे सगळे मानवच अपवाद तो एकच त्या महामानवाचा.

अतिशय सुरेख लिहिली आहे. विशेषतः
भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
ह्या ओळी तर फारच आवडल्या पैजारबुवा,

जबरदस्त !! कमीत कमी ओळींमधे जास्तीत जास्त अर्थ दर्शविण्याची तुमची हातोटी विँलक्षण आहे. "निळावन्ती" कविता देखील अतिशय आवडली होती.