बाप्पाचा नैवेद्यः खजूर शेंगदाणा लाडू
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते. हे लाडू इतरही उपासाला चालतात. पाहूया तर कृती
साहित्यः
अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट
१२ ते १५ बिया काढलेले खजूर
थोडेसे तूप
कृती:
शेंगदाणे भाजून त्याचे जाडसर कूट करून घ्यावे.
खजूर मऊ असेल तर बिया काढून हाताने कुस्करावा. फार मऊ नसेल तर तुकडे करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावे आणि कढईत किंचित परतून घ्यावे.
आवश्यकतेप्रमाणे तूप घालून (अर्धा एक चमचा पुरते, किंवा अजिबात घातले नाही तरी चालते.) सगळे नीट एकत्र करून छोटे लाडू वळावेत. या प्रमाणात ७/८ लाडू होतात.
करा तर सुरुवात!
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
वाचने
18090
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
एक नंबर !!!
आई ने सेम लाडु केलेयत.
आवडले लाडू.
लाडू मस्तच.
वा. छान लाडू आहेत. साखरेऐवजी
In reply to वा. छान लाडू आहेत. साखरेऐवजी by एस
मी lion चा
छान!!
वा. लाडू मस्तच एकदम
आहा...
In reply to आहा... by सविता००१
वा!
In reply to आहा... by सविता००१
किंवा मेल्टेड चॉकलेट मध्ये
In reply to किंवा मेल्टेड चॉकलेट मध्ये by सूड
हे अजून भारी!
सोपे आणि छान!
In reply to सोपे आणि छान! by कंजूस
बरं बरं
In reply to बरं बरं by पैसा
:)
हेच मिश्रण जर मोदकाच्या
नखे गुलाबी करण्यासाठी बेस्ट्
In reply to नखे गुलाबी करण्यासाठी बेस्ट् by अभ्या..
=))
लाडू मस्तच
भरपूर कामअसणाऱ्या ह्या दिवसात
मस्त ! पुढच्या वेळी काजूचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आला रे... आला रे गणेशा... :- Daddyभारीच !!!!!!
मस्तच!!
बदाम पावडर वाचा
वावा..
परवा करून पाहीले. उत्तम होतात
माझे आवडते लाडू :)
मस्त, हे पौष्टिक आहेत, लॉन्ग
मस्त आहे हा नैवेद्य, एकदम
अहा किती सोपय :)
सोपी आणि छान पाककृती :)
In reply to सोपी आणि छान पाककृती :) by सानिकास्वप्निल
+11आणि हेल्दी पण.
हे तर भूक लाडू. बाप्पाला
वाह!
सर्वांना धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद पैसाताई,
In reply to मनःपूर्वक धन्यवाद पैसाताई, by ज्ञानोबाचे पैजार
वा!