बाप्पाचा नैवेद्यः खजूर शेंगदाणा लाडू
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते. हे लाडू इतरही उपासाला चालतात. पाहूया तर कृती
साहित्यः
अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट
१२ ते १५ बिया काढलेले खजूर
थोडेसे तूप
कृती:
शेंगदाणे भाजून त्याचे जाडसर कूट करून घ्यावे.
खजूर मऊ असेल तर बिया काढून हाताने कुस्करावा. फार मऊ नसेल तर तुकडे करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावे आणि कढईत किंचित परतून घ्यावे.
आवश्यकतेप्रमाणे तूप घालून (अर्धा एक चमचा पुरते, किंवा अजिबात घातले नाही तरी चालते.) सगळे नीट एकत्र करून छोटे लाडू वळावेत. या प्रमाणात ७/८ लाडू होतात.
करा तर सुरुवात!
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
वाचने
18090
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
एकदम करायला सोपे वाटत आहे.
खूप छान दिसत आहेत.
आई ने सेम लाडु केलेयत. दाण्याचा कुट लावल्याने भावाने टेस्ट सुध्दा नाहि केले पण मि संपवणार आहे.
आवडले लाडू.
लाडू मस्तच.
वा. छान लाडू आहेत. साखरेऐवजी खजूर वापरण्याची कल्पना चांगली आहे. खजुरात कधीकधी किंचित माती किंवा खडे वगैरे निघतात. ते कसे साफ करतात?
In reply to वा. छान लाडू आहेत. साखरेऐवजी by एस
मी lion चा खजूर वापरते. तो साफ असतो. पण बिया सुट्या करताना काडीकचरा काढता येईल. किंवा हलक्या हाताने थोड्या पाण्यात धुवून मऊ कपड्याने टिपून घ्यायचे.
तोंडाला पाणी सुटलं..
वा. लाडू मस्तच एकदम
मस्तच.
अजून एक अॅडिशन केली तर चालेल का पैसाताई इथेच?
हेच लाडू दाण्याच्या कुटाऐवजी तू म्हणतेस तसं सुकामेवा घालून बनवायचे आणि किंचित नेसकॅफे किंवा ब्रू कॉफीत घोळवायचे. खूप नाही वापरायची कॉफी.नाहीतर कडसर होतील.पण याने या लाडूंना अजून भारी चव येते.
In reply to आहा... by सविता००१
मस्त आयडिया!
In reply to आहा... by सविता००१
किंवा मेल्टेड चॉकलेट मध्ये बुडवून मग रोस्टेड बदामाच्या चुर्यात घोळवून थोडा वेळ फ्रीझ करायचे.
In reply to किंवा मेल्टेड चॉकलेट मध्ये by सूड
हे अजून भारी!
सोपे आणि छान!
शेंगदाणे नसले तर सुकामेवा घातलेले मी चालवून घेतो.
(सुकामेवा गोड केलेला असण्यापेक्षा खारा चांगला लागतो.)
In reply to सोपे आणि छान! by कंजूस
सविता००१ करणार आहे! =))
हेच मिश्रण जर मोदकाच्या साच्यात घातले, तर मोदक बनेल. फक्त खजूर थोडा वाफवून घ्यायला लागेल म्हणजे मऊ होईल.
नखे गुलाबी करण्यासाठी बेस्ट् आहेत.
In reply to नखे गुलाबी करण्यासाठी बेस्ट् by अभ्या..
बाप्पाने सांगितलंय तेवढेच खायचे नाहीतर बाप्पा त्याच्यासारखे करतो! =))
लाडू मस्तच
भरपूर कामअसणाऱ्या ह्या दिवसात कमी वेळ लागणारे पदार्थ बाप्पाला आवडतातच.
मस्त ! पुढच्या वेळी काजूचे लाडू पहायला मिळु दे ही गणराया चरणी प्रार्थना ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आला रे... आला रे गणेशा... :- Daddyआज्जे, आम्ही हे बनवलेले लाडु खोबर्याच्या किसात घोळवुन घेतो मस्त दिसतात पण आणी लागतात पण, ;)
मी काजू आणि बदाम पदर घालून रोल केलेत यावेळी! साखरेला उत्तम पर्याय!!
मोबाईलवरून टाईप करताना चुकलं
लाडू मस्तच.
स्वाती
परवा करून पाहीले. उत्तम होतात. मी बदाम, काजू, शेंगदाणे .मावे मध्ये खरपूस भाजून घेतले. खजूर (Seedless) हि थोडे गरम करून घेतले. आणि थोडी वेलची पूड, जायफळ पण किसून घातलं. भाजलेल्या बदामाचा घमघमाट येत होता.
माझे आवडते लाडू :)
मस्त, हे पौष्टिक आहेत, लॉन्ग डिस्टन्स सायकलिंग साठी न्यायला सुद्धा हरकत नाही. करून बघतो एकदा...
मस्त आहे हा नैवेद्य, एकदम सोपा आणि पौष्टिक !
अहा किती सोपय :)
सोपी आणि छान पाककृती :)
In reply to सोपी आणि छान पाककृती :) by सानिकास्वप्निल
+11आणि हेल्दी पण.
हे तर भूक लाडू. बाप्पाला प्रवासाला जाण्यासाठी द्यायला हवेत.
खूप सुंदर चवीचे असणार आणि पौष्टिकही !
अतिशय सोपे लाडू !! एरव्ही करायला झटपट आणि सोपे!
सर्व प्रतिसादक आणि वाचक यांना मनापासून धन्यवाद!
काल करुन पाहिले.
अजून एक अॅडीशन म्हणजे चवीला थोडा गुळ घातला.
लाडु अत्यंत रुचकर झाले आहेत.
पैजारबुवा,
In reply to मनःपूर्वक धन्यवाद पैसाताई, by ज्ञानोबाचे पैजार
मी पण करून बघते. सगळे सामान आहेच घरात!
एक नंबर !!!