नमस्कार मंडळी,
आज खूप दिवसांनी येत आहे. सोबत आणला आहे रोजच्या जेवणातला साधासाच एक पदार्थ. रोजच्याच आमटीचा कंटाळा आला की करावं असं उडदाचं घुटं किंवा उडदाची आमटी.
साहित्यः-
उडदाची डाळ १ वाटी
हरभर्याची डाळ १ मोठा चमचा
कोरडं खोबरं किसून साधारण पाव वाटी
लसूण ४-५ पाकळ्या, आलं एक पेराएवढं, मीठ, चिंचेचा कोळ १ मोठा चमचा.
फोडणीचे साहित्यः- तेल, मोहरी, जिरं, कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर
कृती-
उडदाची डाळ व हरभर्याची डाळ कुकरात ४ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावी. एका कढल्यात कोरडं खोबरं आणि जिरं खरपूस भाजून घ्यावे. शिजलेली डाळ डावेनी घोटून एकजीव करुन घ्यावी. आता त्यात अंदाजे पाणी घालून उकळवण्यास ठेवावी. भाजलेलं जिरं आणि खोबरं त्यात चुरुन घालावे. चिंचेचा कोळ,चवीप्रमाणे मीठ घालावे.
एका कढल्यात तेलाची फोडणी करावी. त्यात कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घालावे. लसूण खमंग होईपर्यंत परतावे. आता उकळी आलेल्या मिश्रणात ही फोडणी घालावी. अजून एक उकळी येऊ द्यावी.
वाफाळत्या भातावर गरमागरम घुटं घेऊन भात ओरपावा.
--शाल्मली.

वाचने
14172
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुश्श...
अगदी अगदी!
In reply to हुश्श... by श्रावण मोडक
मस्त
मस्तच! गेल्
मस्त
छान
छान
छान दिसतेय
नाही..
In reply to छान दिसतेय by धनंजय
उद्याच
अरे वा!
छान..
छान पाकृ.
..व्वा...व्वा...
व्वा.......
पाकृ
वा! चविनं
मस्त!
फेसबूकवरच्या 'आम्ही सारे
ही फेसबूकवरच्या पोस्टची लिंक
In reply to फेसबूकवरच्या 'आम्ही सारे by रुपी
हीच पाककृती स्वत: करून फोटो
रुपी, शाल्मलीने जर