माझ्या मनातला गणपती
लेखनविषय:
माझ्या मनातला गणपती
मूर्ती असावी धातूची!
विसर्जित नाही करायची!!
विसर्जनाचे शास्त्र करून!
ठेवून द्यावी तिला जपून!!
दुर्वा फुले चार वाहून!
हात जोडा मनापासून!!
भारंभार फुलांनी झाकू नका!
निर्माल्य कचरा करू नका!!
थर्मॉकोलची नको आरास!
पर्यावरणाचा होतो ह्रास!!
घरच्या घेऊन वस्तू चार!
मखर छानसे करा तयार!!
नको विजेची प्रखर अती!
रोषणाई ती झगमगती!!
शोभा न्यारी ज्योतीची!
निरांजनाची समईची!!
गोड सुस्वर गा आरती!
आरडा ओरडा नको अती!!
स्पष्ट शब्द उच्चार करा!
बाप्पावरती ध्यान धरा!!
सण साजरा करूया!
गणपती बाप्पा मोरया!!
रचना ....
वाचने
2081
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
छान रचना ! आवडली आणि साध्या सरळ रचनेमुळे भावार्थ ही पोहोचला. आजकाल इतक्या निरागस कविता वाचायला मिळणे मुश्कील झाले आहे.
अगदी छान वाटली कविता!
थोडक्यात गणपती पूजेचे सार सांगितलेत!
अभिप्रयाबद्दल सगळ्यांचे आभार ..
छान वाटली कविता.
सहजसुंदर रचना! आवडलीच!
Sandy
कविता आवडली. आता गणेशोत्सवात जो धुडगूस चालू असतो ते पाहत खरंच इतक्या साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.
साधी सरळ रचना
मस्तच.
धर्मराजमुटके, कंजुस, पैसा ,संदीप चांदणे , सतीश गावडे, एकविरा ,पद्मावती, एस अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार ..
छान रचना !