वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये
वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.In reply to काळ अस्तित्वात आहे by गामा पैलवान
भुकेची जाणीव होते. पण प्रत्येक प्रक्रियेची जाणीव होईलंच याची खात्री काय? समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात. या प्रक्रियेत जाणीव कुठेच नाही.
भूकेच्या जाणीवेला कालाची गरज नाही. पहिला पार्ट तुम्हाला मान्य आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होते ही प्रक्रिया जाणीवेच्या कक्षेत आली की झालं ! नाही तरी तो शोध ती प्रक्रिया कुणाच्या तरी जाणीवेत आली म्हणूनच लागला ना ? शिवाय जाणीव हा तुम्ही व्यक्तिगत फिनॉमिना समजतांय पण मूळात जाणीव ही शरीर बद्ध नाही. ती यत्र-तत्र-सर्वत्र असलेली निराकार स्थिती आहे. कधी तुम्ही चंद्रावर जरी गेलात तरी तिथे तुम्हाला चंद्रावर आलो ही जाणीव होईलच.
२) `प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ? कोणी असं विधान केलंय का?
मग अरा काय म्हणतायंत असं तुम्हाला वाटतं ? घासकडवींनी इथे प्रदीर्घ वैज्ञानिक लेखमाला (इकडून तिकडून विदा गोळा करुन) पोस्टल्या आहेत. त्यांच्याशी याच तर फंडावर मी मतभेद व्यक्त केला होता आणि सर्वच्या सर्व लेखमालातून निव्वळ माहितीशिवाय काहीही हाती लागणार नाही, असं त्यांना पहिले छूटच सांगितलं होतं.
३) स्मृती आणि स्वप्न यांतून काळाचं अस्तित्व सिद्ध होतं.
स्मृती किंवा स्वप्न ही या क्षणात झालेली जाणीव आहे. व्यासांनी काल हा देहातून वर्णन केलेला फिनॉमिना आहे. म्हणजे `काल देहासी आला खाऊ' टाईप. पण जाणीव सार्वभौम आहे, काल नाही.
४) रोलरकोस्टरात बसलेल्याचं बूड खुर्चीला चिकटून स्थिरंच असतं. किंबहुना ते तसं स्थिर असल्यानेच आकाशात गटांगळ्या खाल्ल्याचा अनुभव घेऊनही जिवंत राहता येतं.
बूड स्थिर आहे ही जाणीव नव्हे काय ? ती मनाच्या बाहेर आहे तोपर्यंत स्थिरत्वाचा अनुभव येतो. ती एकदा मनाच्या गुंत्यात हरवली की चक्कर येते.
५) स्मृती म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं नाहीत. माझ्या मते स्मृती काळाशी निगडीत असतात. तुम्ही म्हणता तो काळ अस्तित्वात नसेल तर स्मृती कुठून उत्पन्न होतात?
स्मृती हे मेंदूतलं रेकॉर्डींग आहे. वर्तमान क्षणात जाणीवेच्या कर्सरनं वेध घेतला की ती अॅक्टीवेट होते. तिचा कालाशी संबंध नाही. म्हणजे एखादी घडून गेलेली घटना आठवायला कालाची गरज नाही तर जाणीव जागृत हवी.
ती घटना `घडली तेव्हा' ते कळलं जाणीवेमुळे आणि आता ती घटना`तेव्हा घडली होती' हे कळलं तेही जाणीवेमुळेच. कालाचा घटना घडण्याशी किंवा स्मृती अॅक्टीवेट होण्याशी काहीएक संबंध नाही.... कारण काल अशी काही वस्तूच या अस्तित्वात नाही !
संक्षिसर, धाग्यात पुन्हा एक चित्र घालत असल्याबद्दल क्षमस्व. परंतु एका अर्थी हे धाग्याशी संबंधित आहे, म्हणून कुणाला याविषयी प्रत्यक्ष माहिती आहे का, हे जाणण्यासाठी घातले आहे. भूकेच्या जाणीवेला कालाची गरज नाही. पहिला पार्ट तुम्हाला मान्य आहे.पहिला सोडा हो, सगळेच पार्ट्स मान्य आहेत. फक्त व्यवहारी जगात काळ का अस्तित्वात नाही हे शोधायचंय. २.
शिवाय जाणीव हा तुम्ही व्यक्तिगत फिनॉमिना समजतांय पण मूळात जाणीव ही शरीर बद्ध नाही. ती यत्र-तत्र-सर्वत्र असलेली निराकार स्थिती आहे.मी जाणीवेस केवळ व्यक्तिगत अनुभव समजत नाही. केवळ हा शब्द महत्त्वाचा. जाणीव जेंव्हा देहाबाहेर विस्तारते तेंव्हा ती दैहिक काळाच्या पल्याड जाते. पण म्हणून दैहिक काळ अवैध (इन्व्हॅलिड) ठरंत नाही. अन्यथा झोपेतून परत जाग आलीच नसती. जाणीव जरी देहापल्याड विस्तारली तरी तिचा एक छोटासा अंश देहाशी तादात्म्य राखून असतोच. ३.
मग अरा काय म्हणतायंत असं तुम्हाला वाटतं ? घासकडवींनी इथे प्रदीर्घ वैज्ञानिक लेखमाला (इकडून तिकडून विदा गोळा करुन) पोस्टल्या आहेत. त्यांच्याशी याच तर फंडावर मी मतभेद व्यक्त केला होता आणि सर्वच्या सर्व लेखमालातून निव्वळ माहितीशिवाय काहीही हाती लागणार नाही, असं त्यांना पहिले छूटच सांगितलं होतं.ही चर्चा मला माहित नाही. किंवा झाली असेल तर आठवंत नाही. यामुळे माझा टाटा. माझ्या मते पारंपरिक विज्ञानात (= न्यूटनीय विज्ञानात = स्थूल विज्ञानात ) काळाची उपस्थिती गृहीत धरतात. ती पूर्वावश्यकता नव्हे. मात्र पुंजीय विज्ञानात (= क्वांटम मेक्यानिक्स) परिस्थिती वेगळी असू शकते. ४.
व्यासांनी काल हा देहातून वर्णन केलेला फिनॉमिना आहे. म्हणजे `काल देहासी आला खाऊ' टाईप. पण जाणीव सार्वभौम आहे, काल नाही.काळ देहाला कुरतडून खातोय म्हणून तर देह जिवंत आहे. देह अस्तित्वात असणे ही काळ अस्तित्वात असल्याची खूण आहे. मात्र असं असलं तरीही तुम्ही म्हणता तशी जाणीव सार्वभौम आहेच, काळ नाही. ५.
बूड स्थिर आहे ही जाणीव नव्हे काय ? ती मनाच्या बाहेर आहे तोपर्यंत स्थिरत्वाचा अनुभव येतो. ती एकदा मनाच्या गुंत्यात हरवली की चक्कर येते.तुम्ही म्हणता तसा रोलरकोस्टरात बसून स्थैर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मनाच्या गुंत्यात हरवता कामा नये. यासाठी मन भ्रमणानुभव देणाऱ्या इंद्रियांशी (डोळा, जठार, इत्यादि) संयुक्त झालं असेल तर ते तिथून काढून आपल्या बुडापाशी स्थिर केलं पाहिजे. मगंच रोलरकोस्टरात बसून स्थैर्याचा अनुभव घेता येईल. याच धर्तीवर मनाच्या सहाय्याने मनाचं निरीक्षण करून आत्मतत्त्वापर्यंत पोहोचता येतं. 'मन करा रे प्रसन्न' हा तुकोबांचा अभंग याचीच साक्ष आहे. ६.
मन म्हणजे काय ते टफींच्या पोस्टवर ऑलरेडी सांगून झालंय. इथून पुढची त्या विषयावरची चर्चा तिथे किंवा माझ्या `मनाच्या बाहेर' या पोस्टवर होऊ शकेल.प्रश्न स्मृती म्हणजे काय असा होता. जर स्मृती अस्तित्वात असेल तर काळ अस्तित्वात आहे असं म्हणता येतं. आ.न., -गा.पै.
In reply to संजय क्षीरसागर, by गामा पैलवान
प्रश्न स्मृती म्हणजे काय असा होता. जर स्मृती अस्तित्वात असेल तर काळ अस्तित्वात आहे असं म्हणता येतं.
हे ऑलरेडी वरच्या प्रतिसादात पॉईंट नंबर ५ मधे झालंय की ! बघा.
आता तुमच्या सगळ्या प्रश्नांना एकच फायनल उत्तर देऊन टाकतो !
१) पहिला सोडा हो, सगळेच पार्ट्स मान्य आहेत. फक्त व्यवहारी जगात काळ का अस्तित्वात नाही हे शोधायचंय.
२) जाणीव जेंव्हा देहाबाहेर विस्तारते तेंव्हा ती दैहिक काळाच्या पल्याड जाते. पण म्हणून दैहिक काळ अवैध (इन्व्हॅलिड) ठरंत नाही. अन्यथा झोपेतून परत जाग आलीच नसती. जाणीव जरी देहापल्याड विस्तारली तरी तिचा एक छोटासा अंश देहाशी तादात्म्य राखून असतोच.
३) माझ्या मते पारंपरिक विज्ञानात (= न्यूटनीय विज्ञानात = स्थूल विज्ञानात ) काळाची उपस्थिती गृहीत धरतात. ती पूर्वावश्यकता नव्हे. मात्र पुंजीय विज्ञानात (= क्वांटम मेक्यानिक्स) परिस्थिती वेगळी असू शकते.
४) काळ देहाला कुरतडून खातोय म्हणून तर देह जिवंत आहे. देह अस्तित्वात असणे ही काळ अस्तित्वात असल्याची खूण आहे. मात्र असं असलं तरीही तुम्ही म्हणता तशी जाणीव सार्वभौम आहेच, काळ नाही.
५) याच धर्तीवर मनाच्या सहाय्याने मनाचं निरीक्षण करून आत्मतत्त्वापर्यंत पोहोचता येतं. 'मन करा रे प्रसन्न' हा तुकोबांचा अभंग याचीच साक्ष आहे.
__________________________________________
हे मात्र ज्याम लक्षपूर्वक वाचा. यापलिकडे कोणत्याही प्रश्नाला काहीही उत्तर नाही.
जाणीवेनंच सर्व अस्तित्व बनलंय. तो एकमेव घटक एकाच वेळी आकार असून सुद्धा निराकार आहे. त्या जाणीवेपरता अखिल विश्वात काहीही नाही. म्हणून सर्व ज्ञानी अस्तित्व एक आहे म्हणतात.
`अहं ब्रह्मास्मी'चा अर्थ नंदन मंडळी `आय एम दि सुपर पॉवर' असा काढतात आणि तसं कुणी म्हटलं तर त्याच्याकडे नक्की `कोणत्या पॉवर्स आहेत' हे पाहातात. त्याला भींत चालवता येते का? त्याला पाण्यावर चालता येतं का? त्याला न्यायला एंडला आकाशातून विमान येणार का ? अँड सो ऑन.... बाकीची नंदन मंडळी `आयला ! ही काही तरी अचाट भानगड दिसते. आपलं चाललंय ते बरंय, नको तिकडे फिरकायला' असा विचार करतात. वास्तविकात इट इज अ सिंप ल स्टेटमंट ऑफ फॅक्ट. जर सगळं ब्रह्मच आहे तर मी त्या वेगळा कसा असू शकतो ? त्या मुळे मी सुद्धा ब्रह्मच आहे. इट इज जस्ट इंपॉसिबल टू बी अदरवाईज.
या जाणीवेची हजोरो नांवं आहेत : बुद्ध तीला शून्य म्हणतो, तुकाराम आकाश (स्पेस) म्हणतात, ज्ञानी आत्मा म्हणतात, अध्यात्मात ब्रह्म म्हटलंय, कृष्ण तीला सनातन वर्तमान म्हणतो, ओशो तीला 'नाऊ अँड हिअर' म्हणतात, एकहार्ट `बिईंग' म्हणतो, निसर्गदत्त महाराज `सद्वस्तू' म्हणतात, मी `निराकार' म्हणतो, कुणी तीला सत्य म्हणतं तर कुणी तीला आदीम शांतता म्हणतात..... आणि इन द फायनल रन, आपण ती जाणीवच आहोत. कारण अखिल विश्वात त्यापरता व्यक्त किंवा अव्यक्त असं काहीही नाही.
या जाणीवेची स्वतःत अब्जावधी प्रक्रिया निर्माण करण्याची क्षमता आहे. मग ती सूर्यमालीका असो, लक्षावधी आकाशगंगा असोत, समुद्र असो, वृक्षवल्लरी असो, की मुंगी असो की माती की सूक्ष्मातल्या सूक्ष्म विचाराचा ध्वनी... . प्रत्येक व्यक्त गोष्ट त्या अव्यक्तातूनच प्रकट होते आणि त्यातच विलीन होते कारण त्या वेगळं काहीही नाही.
त्यामुळे जाणीव देहाच्या आत-बाहेर यत्र-तत्र सर्वत्र आहे. इन फॅक्ट देह सुद्धा जाणीवेच्याच एलीमेंटसचा बनला आहे. तस्मात, जाणीवेला स्वतःत काहीही निर्माण करायला कोणत्याही बाह्य वस्तूची (उदा. काल) गरज नाही कारण ती सर्वसंपन्न आहे.
झोप झाली की जाग आपोआप येते, तिथे कालाची गरज नाही. फिजिक्स असो की क्वांटम मेकॅनिक्स, सगळ्या प्रक्रिया अंतीमतः जाणीवेच्याच अखत्यारित आहेत. त्या दृष्टीनं सर्व शोध हे फक्त उलगडा आहेत. तुम्ही जाणीवेच्या प्रक्रियेचे नियम दीर्घकालासाठी थोपवू शकत नाही कारण जाणीवेला काळाची फिकीरच नाही (ती फक्त माणसालाये). देहाच्या कोणत्याही प्रक्रियेसाठी कालाची गरज नाही. कालाची कल्पना बाद केली तरी जनन-मरण होईलच. मानच्या साह्यानं जाणीवेप्रत जाता येत नाही कारण एक विचार फक्त दुसरा विचार निर्माण करतो, तो जाणीव `निर्माण' करु शकत नाही. कारण जाणीव अनिर्मित आहे. तिच्याप्रत जायला कोणताही सेतूच नाही..... तो फक्त उलगडा आहे. In reply to गामाश्री ! by संजय क्षीरसागर
In reply to मान्य by सचु कुळकर्णी
तस्मात, जाणीवेला स्वतःत काहीही निर्माण करायला कोणत्याही बाह्य वस्तूची (उदा. काल) गरज नाही कारण ती सर्वसंपन्न आहे.जाणीव सर्वसंपन्न आहे म्हणूनंच ती काळ उत्पन्न करू शकते, नाहीका? किंबहुना तिचं सर्वसंपन्नत्व कालातीत आहे. तुमच्या दृष्टीने काळ म्हणजे पृथ्वीचं परिवलन आहे. तर माझ्या दृष्टीने काळ त्या परिवलनास चालना देणारा आहे. २.
मानच्या साह्यानं जाणीवेप्रत जाता येत नाही कारण एक विचार फक्त दुसरा विचार निर्माण करतो, तो जाणीव `निर्माण' करु शकत नाही. कारण जाणीव अनिर्मित आहे. तिच्याप्रत जायला कोणताही सेतूच नाही..... तो फक्त उलगडा आहे.मनाच्या सहाय्याने जाणीवेप्रत जाता येतं. तुकोबांचा 'मन करा रे प्रसन्न' हा अभंग हेच सांगतो. एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला तरी मन निर्विकार करता येतं. निर्विकार मन जाणीवेत लय पावतं. माऊलींनी ज्ञानेश्वरीत याचं बहारदार वर्णन केलं आहे (ऐकीव माहिती). आ.न., -गा.पै.
In reply to काळ आणि पृथ्वीचं परिवलन by गामा पैलवान
In reply to तुम्ही विचार आणि जाणिव वेगवेगळं का मानता ? by अर्धवटराव
In reply to विचार ≠ विकार by गामा पैलवान
एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला तरी मन निर्विकार करता येतं.मन निर्वीकार व्हायला हि विचारांची वाहिनी अडथळा आणते असा काहिसा अर्थ वाटला मला. आणि मन, विचारांचं सौंदर्य मनातले विकार नाहिसे करायचा अप्रतीम मार्ग आहे हा स्वानुभव आहे. त्यामुळे प्रश्न केला. असो. अवांतरः ते नॉट इक्वल टु चिन्ह कसं टाईपायचं ??
In reply to एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला... by अर्धवटराव
In reply to एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला... by अर्धवटराव
In reply to नॅाट इक्वल by कंजूस
In reply to हे डिस्कशन आता अध्यात्मिक होत चाललंय by संजय क्षीरसागर
In reply to मी देखील आवरतं घेतो by गामा पैलवान
In reply to अस्स होय by इरसाल
पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या आणि देहातल्याच अवस्था आहेत.माझ्या मते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जाणीवेच्या अवस्था आहेत. देहाच्या फक्त जिवंत आणि मृत या दोनच अवस्था आहेत. कितीही विचार केला तरी स्वप्न खरं की जागृतावस्था खरी हा निर्णय त्या त्या अवस्थेत असतांना घेता येत नाही. ही देहाची मर्यादा नसून जाणीवेवर पडलेला अज्ञानाचा पडदा आहे. आ.न., -गा.पै.
In reply to देहाच्या अवस्था by गामा पैलवान
In reply to नो, गामाजी ! by संजय क्षीरसागर
ती एकसंध आणि अस्पर्शित आहे.माझी जाणीव (हे लिहितेवेळी) एकसंध आणि अस्पर्शित नाही. तिच्यावर अज्ञानाचा पडदा आहे. तो दूर कसा करू? आ.न., -गा.पै.
In reply to अज्ञानाचा पडदा by गामा पैलवान
In reply to माझं दुसरं मत - by कंजूस
In reply to एकदा साधक चिकटले की तो पर्सनल फिनॉमिना होतो by संजय क्षीरसागर
In reply to गुरुजी by पैसा
In reply to पैसाबाई, by संजय क्षीरसागर
In reply to ओके. by निष्पक्ष सदस्य
In reply to डोक्याला मुंग्या येणं by संजय क्षीरसागर
In reply to =)). by निष्पक्ष सदस्य
In reply to =)). by निष्पक्ष सदस्य
अध्यात्माचे शिखर गाठलेला माणुस कधीही हेवेदावे करत नसतो. उदा-मी ओशोंपेक्षा सोपं करून सांगतो वगैरे.
एकेका श्लोकावर ओशो दीड तास प्रवचन द्यायचे. जमाना बदलला आहे. पब्लिकचा अटेंशन स्पॅन कमालीचा कमी झालायं. आज ओशोंच्या जुन्या प्रवचनांना काहीही मागणी नाही. ती फुकट डाऊनलोड करता येतात. अशा वेळी अत्यंत थोडक्यात आणि नेमकं सांगता येणं महत्त्वाचं झालंय. इतर सदस्य आणि मान्यवरांचं सोडा पण तुम्हाला मुद्दा कळायला अडचण नसावी.
२) मुद्दा क्रं दोन-सुरवातीला तुम्ही काही असंबंद्ध प्रतिसाद जे कि तुमच्याशी स्कोर सेटलिंग साठी येत होते ते तुम्ही इग्नोर केलेत तेव्हा छान वाटलं,पण नंतर तुम्ही परत त्यात अडकलात,याला मोहमाया म्हणतात,यासाठी कि तुम्ही हे चांगलेच जाणता कि तुमच्या विचारांशी काहीजण सदैव असहमत असतात तरीही तुम्ही प्रतिवाद करत बसता,हे कशाचे लक्षण आहे?मग तुमच्या अध्यात्मिक उन्नतीचा काय उपयोग?
उत्तम प्रतिवाद करता येणं हे सुद्धा अध्यात्मिक प्रगतीचंच लक्षण आहे कारण कोणताही आणि कसाही प्रश्न आला तरी नेमकं कळलेला (च) न गडबडता उत्तर देऊ शकतो. हे सुद्धा एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल.
३ ) (कृपया यावर प्रतिवाद करू नका.)
घाबरु नका. तुमची अध्यात्मिक उन्नतीची परिकल्पना दूर केली आहे.
In reply to ओके. by निष्पक्ष सदस्य
साधकाला बोध होणं किंवा न होणं हा त्याच्या व्यक्तिगत (चुकीच्या) धारणा, त्याच्या आयुष्यातले जाणीवेचं अवधान वेधून घेणारे प्रश्न आणि या दोहोंच्या निस्सरणानंतर, बोध होण्यासाठी त्यानं स्वतःच्या आयुष्यात निर्माण केलेली फुर्सत यावर अवलंबून आहे.यांचसोबत साधकात बोध करून घ्यायची इच्छा प्रबळ हवी. २.
तुम्ही जाणीवेच्या त्रिभाजनाचा प्रश्न निर्माण केला म्हणून प्रतिसाद दिला.खरंतर जाणीवेचं त्रिभाजन मांडुक्योपनिषदात सांगितलेलं आहे. माझं स्वतःचं काहीच नाही. ते वचन तुमच्या बोधकथनाशी जुळवायचं बघंत होतो. हा प्रयास माझा मलाच करावा लागणार आहे. तुमच्याशी चर्चा करून उत्तरं मिळाली नाहीत तरी प्रश्न सापडल्यासारखा वाटतो आहे. त्याबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.
In reply to हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ? by tusharmk
In reply to हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ? by tusharmk
In reply to अहो.. ते दुसरं विडंबन आहे! by रुपी
In reply to मला पण एक वेबसाईट सुरू करायची by prasadranade
In reply to आली का ही साईट ? by रानरेडा
गामाश्री, मजा आ गया !