वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये
डिअर ऑल,
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र
वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
वाचने
55612
वाचनखूण
प्रतिक्रिया
167
In reply to काळ अस्तित्वात आहे by गामा पैलवान
गामाश्री, मजा आ गया !
भुकेची जाणीव होते. पण प्रत्येक प्रक्रियेची जाणीव होईलंच याची खात्री काय? समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात. या प्रक्रियेत जाणीव कुठेच नाही.भूकेच्या जाणीवेला कालाची गरज नाही. पहिला पार्ट तुम्हाला मान्य आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होते ही प्रक्रिया जाणीवेच्या कक्षेत आली की झालं ! नाही तरी तो शोध ती प्रक्रिया कुणाच्या तरी जाणीवेत आली म्हणूनच लागला ना ? शिवाय जाणीव हा तुम्ही व्यक्तिगत फिनॉमिना समजतांय पण मूळात जाणीव ही शरीर बद्ध नाही. ती यत्र-तत्र-सर्वत्र असलेली निराकार स्थिती आहे. कधी तुम्ही चंद्रावर जरी गेलात तरी तिथे तुम्हाला चंद्रावर आलो ही जाणीव होईलच. २)`प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ? कोणी असं विधान केलंय का?मग अरा काय म्हणतायंत असं तुम्हाला वाटतं ? घासकडवींनी इथे प्रदीर्घ वैज्ञानिक लेखमाला (इकडून तिकडून विदा गोळा करुन) पोस्टल्या आहेत. त्यांच्याशी याच तर फंडावर मी मतभेद व्यक्त केला होता आणि सर्वच्या सर्व लेखमालातून निव्वळ माहितीशिवाय काहीही हाती लागणार नाही, असं त्यांना पहिले छूटच सांगितलं होतं. ३)स्मृती आणि स्वप्न यांतून काळाचं अस्तित्व सिद्ध होतं.स्मृती किंवा स्वप्न ही या क्षणात झालेली जाणीव आहे. व्यासांनी काल हा देहातून वर्णन केलेला फिनॉमिना आहे. म्हणजे `काल देहासी आला खाऊ' टाईप. पण जाणीव सार्वभौम आहे, काल नाही. ४)रोलरकोस्टरात बसलेल्याचं बूड खुर्चीला चिकटून स्थिरंच असतं. किंबहुना ते तसं स्थिर असल्यानेच आकाशात गटांगळ्या खाल्ल्याचा अनुभव घेऊनही जिवंत राहता येतं.बूड स्थिर आहे ही जाणीव नव्हे काय ? ती मनाच्या बाहेर आहे तोपर्यंत स्थिरत्वाचा अनुभव येतो. ती एकदा मनाच्या गुंत्यात हरवली की चक्कर येते. ५)स्मृती म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं नाहीत. माझ्या मते स्मृती काळाशी निगडीत असतात. तुम्ही म्हणता तो काळ अस्तित्वात नसेल तर स्मृती कुठून उत्पन्न होतात?स्मृती हे मेंदूतलं रेकॉर्डींग आहे.वर्तमान क्षणातजाणीवेच्या कर्सरनंवेध घेतला की तीअॅक्टीवेट होते. तिचा कालाशी संबंध नाही. म्हणजे एखादी घडून गेलेली घटना आठवायला कालाची गरज नाही तर जाणीव जागृत हवी. ती घटना `घडली तेव्हा' ते कळलं जाणीवेमुळे आणि आता ती घटना`तेव्हा घडली होती' हे कळलं तेही जाणीवेमुळेच. कालाचा घटना घडण्याशी किंवा स्मृती अॅक्टीवेट होण्याशी काहीएक संबंध नाही.... कारण काल अशी काही वस्तूच या अस्तित्वात नाही !अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग इथेही उपलब्ध
संजय क्षीरसागर,
In reply to संजय क्षीरसागर, by गामा पैलवान
गामाश्री !
प्रश्न स्मृती म्हणजे काय असा होता. जर स्मृती अस्तित्वात असेल तर काळ अस्तित्वात आहे असं म्हणता येतं.हे ऑलरेडी वरच्या प्रतिसादात पॉईंट नंबर ५ मधे झालंय की ! बघा. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांना एकच फायनल उत्तर देऊन टाकतो ! १)पहिला सोडा हो, सगळेच पार्ट्स मान्य आहेत. फक्त व्यवहारी जगात काळ का अस्तित्वात नाही हे शोधायचंय.२)जाणीव जेंव्हा देहाबाहेर विस्तारते तेंव्हा ती दैहिक काळाच्या पल्याड जाते. पण म्हणून दैहिक काळ अवैध (इन्व्हॅलिड) ठरंत नाही. अन्यथा झोपेतून परत जाग आलीच नसती. जाणीव जरी देहापल्याड विस्तारली तरी तिचा एक छोटासा अंश देहाशी तादात्म्य राखून असतोच.३)माझ्या मते पारंपरिक विज्ञानात (= न्यूटनीय विज्ञानात = स्थूल विज्ञानात ) काळाची उपस्थिती गृहीत धरतात. ती पूर्वावश्यकता नव्हे. मात्र पुंजीय विज्ञानात (= क्वांटम मेक्यानिक्स) परिस्थिती वेगळी असू शकते.४)काळ देहाला कुरतडून खातोय म्हणून तर देह जिवंत आहे. देह अस्तित्वात असणे ही काळ अस्तित्वात असल्याची खूण आहे. मात्र असं असलं तरीही तुम्ही म्हणता तशी जाणीव सार्वभौम आहेच, काळ नाही.५)याच धर्तीवर मनाच्या सहाय्याने मनाचं निरीक्षण करून आत्मतत्त्वापर्यंत पोहोचता येतं. 'मन करा रे प्रसन्न' हा तुकोबांचा अभंग याचीच साक्ष आहे.__________________________________________ हे मात्र ज्याम लक्षपूर्वक वाचा. यापलिकडे कोणत्याही प्रश्नाला काहीही उत्तर नाही. जाणीवेनंच सर्व अस्तित्व बनलंय. तो एकमेव घटक एकाच वेळी आकार असून सुद्धा निराकार आहे. त्या जाणीवेपरता अखिल विश्वात काहीही नाही. म्हणून सर्व ज्ञानी अस्तित्व एक आहे म्हणतात. `अहं ब्रह्मास्मी'चा अर्थ नंदन मंडळी `आय एम दि सुपर पॉवर' असा काढतात आणि तसं कुणी म्हटलं तर त्याच्याकडे नक्की `कोणत्या पॉवर्स आहेत' हे पाहातात. त्याला भींत चालवता येते का? त्याला पाण्यावर चालता येतं का? त्याला न्यायला एंडला आकाशातून विमान येणार का ? अँड सो ऑन.... बाकीची नंदन मंडळी `आयला ! ही काही तरी अचाट भानगड दिसते. आपलं चाललंय ते बरंय, नको तिकडे फिरकायला' असा विचार करतात. वास्तविकात इट इज अ सिंप ल स्टेटमंट ऑफ फॅक्ट. जर सगळं ब्रह्मच आहे तर मी त्या वेगळा कसा असू शकतो ? त्या मुळे मी सुद्धा ब्रह्मच आहे. इट इज जस्ट इंपॉसिबल टू बी अदरवाईज. या जाणीवेची हजोरो नांवं आहेत : बुद्ध तीला शून्य म्हणतो, तुकाराम आकाश (स्पेस) म्हणतात, ज्ञानी आत्मा म्हणतात, अध्यात्मात ब्रह्म म्हटलंय, कृष्ण तीला सनातन वर्तमान म्हणतो, ओशो तीला 'नाऊ अँड हिअर' म्हणतात, एकहार्ट `बिईंग' म्हणतो, निसर्गदत्त महाराज `सद्वस्तू' म्हणतात, मी `निराकार' म्हणतो, कुणी तीला सत्य म्हणतं तर कुणी तीला आदीम शांतता म्हणतात..... आणि इन द फायनल रन, आपण ती जाणीवच आहोत. कारण अखिल विश्वात त्यापरता व्यक्त किंवा अव्यक्त असं काहीही नाही. या जाणीवेची स्वतःत अब्जावधी प्रक्रिया निर्माण करण्याची क्षमता आहे. मग ती सूर्यमालीका असो, लक्षावधी आकाशगंगा असोत, समुद्र असो, वृक्षवल्लरी असो, की मुंगी असो की माती की सूक्ष्मातल्या सूक्ष्म विचाराचा ध्वनी... . प्रत्येक व्यक्त गोष्ट त्या अव्यक्तातूनच प्रकट होते आणि त्यातच विलीन होते कारण त्या वेगळं काहीही नाही. त्यामुळे जाणीव देहाच्या आत-बाहेर यत्र-तत्र सर्वत्र आहे. इन फॅक्ट देह सुद्धा जाणीवेच्याच एलीमेंटसचा बनला आहे. तस्मात, जाणीवेला स्वतःत काहीही निर्माण करायला कोणत्याही बाह्य वस्तूची (उदा. काल) गरज नाही कारण ती सर्वसंपन्न आहे. झोप झाली की जाग आपोआप येते, तिथे कालाची गरज नाही. फिजिक्स असो की क्वांटम मेकॅनिक्स, सगळ्या प्रक्रिया अंतीमतः जाणीवेच्याच अखत्यारित आहेत. त्या दृष्टीनं सर्व शोध हे फक्त उलगडा आहेत. तुम्ही जाणीवेच्या प्रक्रियेचे नियम दीर्घकालासाठी थोपवू शकत नाही कारण जाणीवेला काळाची फिकीरच नाही (ती फक्त माणसालाये). देहाच्या कोणत्याही प्रक्रियेसाठी कालाची गरज नाही. कालाची कल्पना बाद केली तरी जनन-मरण होईलच. मानच्या साह्यानं जाणीवेप्रत जाता येत नाही कारण एक विचार फक्त दुसरा विचार निर्माण करतो, तो जाणीव `निर्माण' करु शकत नाही. कारण जाणीव अनिर्मित आहे. तिच्याप्रत जायला कोणताही सेतूच नाही..... तो फक्त उलगडा आहे.In reply to गामाश्री ! by संजय क्षीरसागर
मान्य
In reply to मान्य by सचु कुळकर्णी
ते कसं कसं ??
काळ आणि पृथ्वीचं परिवलन
In reply to काळ आणि पृथ्वीचं परिवलन by गामा पैलवान
तुम्ही विचार आणि जाणिव वेगवेगळं का मानता ?
In reply to तुम्ही विचार आणि जाणिव वेगवेगळं का मानता ? by अर्धवटराव
विचार ≠ विकार
In reply to विचार ≠ विकार by गामा पैलवान
एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला...
In reply to एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला... by अर्धवटराव
अवांतर : गुग्गुळाचार्यांना "not equal sign" म्हणून विचारा.
In reply to एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला... by अर्धवटराव
नॅाट इक्वल
In reply to नॅाट इक्वल by कंजूस
किती छान
In reply to किती छान by अर्धवटराव
:)
हे डिस्कशन आता अध्यात्मिक होत चाललंय
In reply to हे डिस्कशन आता अध्यात्मिक होत चाललंय by संजय क्षीरसागर
मी देखील आवरतं घेतो
In reply to मी देखील आवरतं घेतो by गामा पैलवान
गामाश्री,
In reply to गामाश्री, by संजय क्षीरसागर
.
अस्स होय
In reply to अस्स होय by इरसाल
ओ इरसालसाहेब !
देहाच्या अवस्था
In reply to देहाच्या अवस्था by गामा पैलवान
नो, गामाजी !
In reply to नो, गामाजी ! by संजय क्षीरसागर
अज्ञानाचा पडदा
In reply to अज्ञानाचा पडदा by गामा पैलवान
जाणीव मूळात एकसंध आणि अस्पर्शित आहे हा फंडा आहे
माझं दुसरं मत -
In reply to माझं दुसरं मत - by कंजूस
एकदा साधक चिकटले की तो पर्सनल फिनॉमिना होतो
In reply to एकदा साधक चिकटले की तो पर्सनल फिनॉमिना होतो by संजय क्षीरसागर
गुरुजी
In reply to गुरुजी by पैसा
पैसाबाई,
In reply to पैसाबाई, by संजय क्षीरसागर
गुरूला शिष्य निवडता येतो का?
जाणीव
ओके.
In reply to ओके. by निष्पक्ष सदस्य
डोक्याला मुंग्या येणं
In reply to डोक्याला मुंग्या येणं by संजय क्षीरसागर
=)).
In reply to =)). by निष्पक्ष सदस्य
निष्पक्ष प्रतिसाद !
In reply to =)). by निष्पक्ष सदस्य
@ निस,
अध्यात्माचे शिखर गाठलेला माणुस कधीही हेवेदावे करत नसतो. उदा-मी ओशोंपेक्षा सोपं करून सांगतो वगैरे.एकेका श्लोकावर ओशो दीड तास प्रवचन द्यायचे. जमाना बदलला आहे. पब्लिकचा अटेंशन स्पॅन कमालीचा कमी झालायं. आज ओशोंच्या जुन्या प्रवचनांना काहीही मागणी नाही. ती फुकट डाऊनलोड करता येतात. अशा वेळी अत्यंत थोडक्यात आणि नेमकं सांगता येणं महत्त्वाचं झालंय. इतर सदस्य आणि मान्यवरांचं सोडा पण तुम्हाला मुद्दा कळायला अडचण नसावी. २)मुद्दा क्रं दोन-सुरवातीला तुम्ही काही असंबंद्ध प्रतिसाद जे कि तुमच्याशी स्कोर सेटलिंग साठी येत होते ते तुम्ही इग्नोर केलेत तेव्हा छान वाटलं,पण नंतर तुम्ही परत त्यात अडकलात,याला मोहमाया म्हणतात,यासाठी कि तुम्ही हे चांगलेच जाणता कि तुमच्या विचारांशी काहीजण सदैव असहमत असतात तरीही तुम्ही प्रतिवाद करत बसता,हे कशाचे लक्षण आहे?मग तुमच्या अध्यात्मिक उन्नतीचा काय उपयोग?उत्तम प्रतिवाद करता येणं हे सुद्धा अध्यात्मिक प्रगतीचंच लक्षण आहे कारण कोणताही आणि कसाही प्रश्न आला तरी नेमकं कळलेला (च) न गडबडता उत्तर देऊ शकतो. हे सुद्धा एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. ३ )(कृपया यावर प्रतिवाद करू नका.)घाबरु नका. तुमची अध्यात्मिक उन्नतीची परिकल्पना दूर केली आहे.In reply to ओके. by निष्पक्ष सदस्य
=))
In reply to =)) by पैसा
=))
प्रश्न सापडला
हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?
हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?
In reply to हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ? by tusharmk
हो ! आणि लेखक ही एकच आहे.
In reply to हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ? by tusharmk
अहो.. ते दुसरं विडंबन आहे!
In reply to अहो.. ते दुसरं विडंबन आहे! by रुपी
अरे हो !
लै म्हन्जे लैच
मला पण एक वेबसाईट सुरू करायची
In reply to मला पण एक वेबसाईट सुरू करायची by prasadranade
दोन गोष्टी
अवांतर
ssrf.org चा संधर्भ वाचला त्याबद्धल व अधात्मा बद्धल थोडेसे.
आली का ही साईट ?
In reply to आली का ही साईट ? by रानरेडा
होय, या वेबसाईटचे काय झाले हे