शुक्रवारची कढी
नमस्कार . . . . . या विभागात पहिल्यांदा काही तरी लिहितो आहे . . . . एक अप्रतिम पाककृती सापडली आहे ती आज तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटतेय . . . .
साहित्य - दही, बेसन,तूप किंवा तेल हळद,हिंग,मीठ,कढीपत्ता, आलं, मिरच्या,पाणी ,साखर
कृती - पहिल्यांदा दह्याला थोडं बेसन लावून ठेवावं. काही भागाचं ताक करुन घ्यावं. एका भांड्यात फोडणी करुन घेऊन त्यात बेसन लावलेलं ताक टाकावं. मग साधं ताकही टाकावं. चवीप्रमाणे मीठ साखर टाकून त्याला झकास उकळी आणणे आणि घरच्यांना पेश करणे.
टिपणी- आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की ही साध्या ताकाच्या कढीची कृती आहे पण मग शुक्रवारची कढी असं नाव का बरं ? ह्याचं कारण म्हणजे ती शुक्रवारी भरमसाठ आणि पळीवाढ प्रमाणात केली होती आणि ती खातो आहे अजूनही ! कढी भात, कढी पोळी असं सगळं खाऊनही ती उरते.
अशाच प्रकारे मंगळवारची डाळ, बुधवारचा भात वगैरे चविष्ट पदार्थ करता येतात . . सो आज शुक्रवारची कढी आणि बुधवारचा भात आहे . . . मग काय . . येताय ना जेवायला ??
वाचने
8850
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
फोटो कुठाय शुक्रवारच्या उरलेल्या कढीचा?
फोटोशिवाय कढी उरली आहे हे मान्य करता येणार नाही.
In reply to फोटोशिवाय कढी उरली आहे हे by किसन शिंदे
प्लस वण टू किसनदेव.
In reply to प्लस वण टू किसनदेव. by अत्रुप्त आत्मा
+1
शुक्रवारी रात्री कढी पिणा-यांचा निषेध. बाकी चालू दे.
In reply to शुक्रवारी रात्री कढी पिणा by गवि
त्यादिवशीच प्यायली असती तर उरली कशाला असती?
मंगळवारी शुक्रवारची कढी टाकणे म्हणजे 'शिळ्या कढीला उत आणणे' असे म्हणता येईल का ? ;) :)
In reply to मंगळवारी शुक्रवारची कढी टाकणे by डॉ सुहास म्हात्रे
+१ हेच टंकाया आलो होतो..
=))
नन्तर त्या उरलेल्या कढीत टाकायला भजी करा. ते शिल्लक राहिले की सकाळचा नाश्ता भजी पाव ;)
In reply to नन्तर त्या उरलेल्या कढीत by रातराणी
पाव शिल्लक राहयले की त्याची फोडनी देऊन उसळ.
मापंची रसिकता आटली आपलं पातळ झालीय याचा नमुना.
In reply to मापंची रसिकता आटली आपलं पातळ by कंजूस
दू दू कं काका! =)))))
In reply to दू दू कं काका! by अत्रुप्त आत्मा
मापंकडे चांगले मासलेवाइक अनुभव गाठीशी असताना अशा पावसाच्या तोंडावर मिळमिळीत कढी पाजत आहेत याचा अर्थ झणझणीत कट्ट्याच्या आवतणाची वाट पाहात आहेत.
In reply to मापंची रसिकता आटली आपलं पातळ by कंजूस
आपल्याला, 'मापंची कढी पातळ झालीय ' असे म्हणायचे आहे का ?
आम्हाला चालेल.
इथे तसेही बर्याचदा शिळ्या कढीला उत आलेला वाचलेला आहे.
फोटो कुठाय शुक्रवारच्या