नमस्कार . . . . . या विभागात पहिल्यांदा काही तरी लिहितो आहे . . . . एक अप्रतिम पाककृती सापडली आहे ती आज तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटतेय . . . .
साहित्य - दही, बेसन,तूप किंवा तेल हळद,हिंग,मीठ,कढीपत्ता, आलं, मिरच्या,पाणी ,साखर
कृती - पहिल्यांदा दह्याला थोडं बेसन लावून ठेवावं. काही भागाचं ताक करुन घ्यावं. एका भांड्यात फोडणी करुन घेऊन त्यात बेसन लावलेलं ताक टाकावं. मग साधं ताकही टाकावं. चवीप्रमाणे मीठ साखर टाकून त्याला झकास उकळी आणणे आणि घरच्यांना पेश करणे.
टिपणी- आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की ही साध्या ताकाच्या कढीची कृती आहे पण मग शुक्रवारची कढी असं नाव का बरं ? ह्याचं कारण म्हणजे ती शुक्रवारी भरमसाठ आणि पळीवाढ प्रमाणात केली होती आणि ती खातो आहे अजूनही ! कढी भात, कढी पोळी असं सगळं खाऊनही ती उरते.
अशाच प्रकारे मंगळवारची डाळ, बुधवारचा भात वगैरे चविष्ट पदार्थ करता येतात . . सो आज शुक्रवारची कढी आणि बुधवारचा भात आहे . . . मग काय . . येताय ना जेवायला ??
वाचने
8850
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो कुठाय शुक्रवारच्या
फोटोशिवाय कढी उरली आहे हे
प्लस वण टू किसनदेव.
In reply to फोटोशिवाय कढी उरली आहे हे by किसन शिंदे
+1
In reply to प्लस वण टू किसनदेव. by अत्रुप्त आत्मा
शुक्रवारी रात्री कढी पिणा
त्यादिवशीच प्यायली असती तर
In reply to शुक्रवारी रात्री कढी पिणा by गवि
मंगळवारी शुक्रवारची कढी टाकणे
+१ हेच टंकाया आलो होतो..
In reply to मंगळवारी शुक्रवारची कढी टाकणे by डॉ सुहास म्हात्रे
नन्तर त्या उरलेल्या कढीत
पाव शिल्लक राहयले की त्याची
In reply to नन्तर त्या उरलेल्या कढीत by रातराणी
मापंची रसिकता आटली आपलं पातळ
दू दू कं काका!
In reply to मापंची रसिकता आटली आपलं पातळ by कंजूस
मापंकडे चांगले मासलेवाइक
In reply to दू दू कं काका! by अत्रुप्त आत्मा
आपल्याला, 'मापंची कढी पातळ
In reply to मापंची रसिकता आटली आपलं पातळ by कंजूस
आज शुक्रवारची कढी आणि बुधवारचा भात आहे . . .